राजू परुळेकर : राजकीय पत्रकार ?
राजु परुळेकर ... संवाद नावाची मुलाखतींची मालिका ई टीव्हीवर पूर्वी बघत असे...
चांगले लोक शोधून शोधून त्यांना ( उत्तरांपेक्षा लांबलचक) प्रश्न विचारण्याची कला त्यांना चांगली साधली आहे असे तेव्हा वाटत असे आणि आदर वगैरे वाटत असे...
पण सध्या त्यांची गाडी राजकीय पत्रकारितेकडे वळाल्यापासून त्यांचे मजेमजेदार लेख लोकप्रभेत वाचायला मिळत आहेत....
नितेश राणेंवर त्यांनी नुकताच लिहिलेला हा लेख वाचा...
http://www.loksatta.com/lokprabha/20100129/alke.htm
लेख वाचून छान छान वाटलं... ...
त्यातली काही महत्त्वाची वाक्यं...
१. आरतीच्या वेळी मात्र आम्ही सर्वजण एकत्र उभे होतो (देवासमोर सर्व समान!) त्यात माझ्या एका बाजूला राज होता, दुसऱ्या बाजूला नितेश राणे. त्या रात्री मी डायरी लिहिताना नोंद केली. नितेश राणे A man to be watched.
२.नितेशला ए.सी. चालत नाही. त्याला लगेच ब्राँकायटीसचा त्रास होऊन तापापर्यंत प्रकरण जाऊ शकतं. त्यामुळे त्याच्यासोबत चर्चा करताना ए.सी., पंखे बंद असतात. मला हे भयानक वाटतं
३.दुसरं म्हणजे ‘झेंडा’ नावाचा एक विकृत चित्रपट उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने आणि कशाकशाने अवधूत गुप्ते नावाच्या माणसाने नारायणराव, राज ठाकरे व इतर अनेकांचं असत्यावर आधारित चारित्र्यहनन करणारा चित्रपट काढला. नितेशने ‘झेंडा’विरुद्ध बंड उभारलं ते आपल्या वडिलांच्या प्रेमातून. ते बंड राजकीय नव्हतं.
४.उद्धवने एखाद्याला पकडला (उदा. आदेश बांदेकर, अवधूत गुप्ते) की त्यांच्या करियरचं वाटोळं निश्चित! राजने एखाद्याला माफ केलं की धोका लाखपट जास्त हा माझा अनुभव...
ते वरचं दोन नंबरचं वाक्य आहे ना, एसी आणि पंख्याचं, त्याचा संदर्भ मूळ लेखात पुन्हापुन्हा वाचूनसुद्धा कळाला नाही...
उद्धवच्या आशीर्वादाने काढलेला झेंडा विकृत आहे असे काही लिहिले आहे या लेखात... मी काही झेंडा पाहिलेला नाही, त्यामुळे काही कल्पना नाही...
ते असो..
एखादा पत्रकर अमुक एका पक्षाचा आहे, म्हणजे त्याने एक विशिष्ट पक्षाची भूमिका घेऊन बोलावं , त्या पक्षाला डिफेंड करत राहावं हे पाहणं मला अवघड जातं...
कुमार केतकर आणीबाणीच्या समर्थनपर काही लिहितात तेव्हा डोकं गरगरतं...
किंवा भरतकुमार राऊतांना तर शिवसेनेच्या (त्यांना स्वतःलाच न पटणार्या??!! ) गोष्टी डिफेन्ड करताना केविलवाणी धडपड करावी लागते असं मला सारखं वाटतं...
मिपावर फार छान सही होती ,(कोणाची बरं? आठवत नाहीये )
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
वाचन
39508
प्रतिक्रिया
0