Skip to main content

(दाढदिवस)

लेखक रेवती यांनी बुधवार, 16/12/2009 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा?... घरातूनच मिळाली हे सांगायलाच हवे का? म्हणतात ना ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.....जाऊदे तुम्ही आपलं विडंबनच वाचा! ;) (सूचना - वृत्त, मात्रा वगैरे कोल्हापुरी चपला घालून फिरायला गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही!... :D ) हे रोजचेच दुखणे, सहण्यात वेळ गेला दाढेस भर पहाटे मळण्यात वेळ गेला घासू किती किती मी, चोळू किती किती मी ढवळ्या न दंतपंक्ती जपण्यात वेळ गेला चोळून जाड ब्रश हा तोंडात कोंबताना गळत्या चुकार फेसा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बदामा जोरात चावताना तुटला असा कसा हा? कळण्यात वेळ गेला वार्षीक दंतदिवशी क्राऊन बसवताना दिसते खरी कशी मी बघण्यात वेळ गेला!! रेवती
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 8983
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
एक से एक !! ठॉ ठो ठॉ !! चला आता आम्ही सुखानं डोळे मिटू शकतो. बाय दं वे, कधी असतो बरं आपला वार्षिक दंतदिन ? - (सर्व मापी) तराजु

In reply to by टारझन

बाय दं वे, कधी असतो बरं आपला वार्षिक दंतदिन ? तसा दंतदिन किंवा दाढ दिवस हा दर सहा महिन्यांनी असतो त्याला आपण दंतस्वच्छताही म्हणतो. तरी वर्षातून एखाद्यावेळेस आमचे दंतवैद्य जी काही किरकोळ दंतदुरुस्ती करतात ती अनेक वर्षे आठवते. गेल्या शनिवारी दंतस्वच्छता कार्यक्रमाच्यावेळेस एकदा क्ष-किरण भेटीसाठी जानेवारीतील भेटसमय ठरवून आले आहे. रेवती

शिर्षक वाचुन एक मिनिट, काकांच्या 'वाढ'त्या गोच्यांचा बंदोबस्त करण्याकरता काकुंनी 'दाढे'ला हात घातला की काय असे वाटले! ;) पदार्पण (हो ना?) मस्त झालंय. घरची स्पर्धा दर्जेदार खेळाडु निर्माण करते या न्यायाने एक-से-बढकर-एक विडंबनं वाचायला मिळतील अशी आशा करायला हरकत नाही. :)

एऽऽक एक से भले दोऽऽ!

काव्यात....असा एक विसुभाऊ बापटांचा कार्यक्रम आहे. त्याच चालीवर रंगाशेठ आणि कुटुंबियांचा कार्यक्रम करायला हरकत नाही आता...... कुटुंब रंगलंय...विडंबनात. :D पदार्पणालाच शतक! रेवतीताई,मस्त जमलंय विडंबन! येऊ द्या असेच....भरभरून!

माननीय रेवतीजी, आपले पदार्पणातील विडंबन वाचले. अतिशय छान केले आहे. मिपावर अनेक छुपे गुणी कलावंत आहेत याची आम्हास शंका होती, आज खात्री पटली. ज्याप्रमाणे श्री गणपा विविध पाककृती टाकुन लोकांची वाहवा मिळवत होते पण घोसाळे की दोडके या सामान्य प्रश्नामधे त्यांची उडालेली दांडी आमच्या एका गृहितकास (गृहितक - श्री गणपा आपल्या सौभाग्यवतींच्या कामाचे श्रेय घेत आहेत) पुष्टी देणारी ठरली. त्याचप्रमाणे आपले विडंबन वाचुन आम्हास श्री चतुरंग यांच्या पुर्वीच्या विडंबनांविषयी खात्री वाटत नाही. आमची शंका अशी आहे की ती विडंबने आपणच केलेली असुन श्री चतुरंग यांनी केवळ टाळ्या मिळवल्या आहेत. तरी आपण या गोष्टीचा खुलासा करावा ही विनंती. धन्यवाद. --अवलिया

In reply to by अवलिया

श्री अवलियांसारखेच म्हणतो. अवांतर: प्रस्तुत बिडंबन 'केव्हातरी पहाटे'च्या चालीवर वाचता (कनिष्ठ पण ज्येष्ठ संपादकांकरता चालीवर गाता) येते.

In reply to by अवलिया

माननीय नाना, आपल्या प्रतिसादाने प्रथम मूक (सभ्य भाषेत: गपगार) झाल्यामुळे खुलासा करण्यास उशीर झाला आहे. आपण मोठ्या मनाने क्षमा करालच (नाही केलीत तर दुसरे विडंबन टाकीन). सांगावयाचा मुख्य मुद्दा असा की आपण अतिषय हुषार आहात. 'त' वरून जसा ताकभात ओळखता तसेच 'वि' वरून विडंबन कोणाचे असू शकेल? ही प्रतिभा कोणाची? हेही ओळखता. आमच्यासारख्या अबलांचा आधार बनून मिपावर आल्याबद्दल मी देवाचे (आकाशातल्या) आभार मानते. आजकाल आपले प्रतिसाद वाचून आम्हास गलबलून येते हे सांगणे न लगे. रेवती

In reply to by रेवती

माननीय रेवतीजी, आपला खुलासा समजला. धन्यवाद! --अवलिया

कधी कधी अगदी खरे लिहितो अवलिया. असो. आता 'गाढ्'दिवसाच्या प्रतिक्षेत.

यावे, यावे... स्वागत!!!

तुम्ही सुद्धा.. चालू दे..ढवळ्या पवळ्याची जोडी.. (दात दुखीला घाबरून कवळी लावलेला) केशवसुमार स्वगतः हा रंगा घरची कामा सोडून विडंबने पाडतो की काय.. म्हणून वैतागून रंगीने त्याच्याच अस्त्राने त्याचेच दात पाडायचे ठरवलेले दिसते)

In reply to by केशवसुमार

स्वगत: असेच काहीसे मलाही वाटले होते! :)

In reply to by श्रावण मोडक

:) रंगरावांना घरातून प्रतिस्पर्धी तयार होतो आहे असे दिसते आहे.

चाल........काटा रुते

रेवती, मस्त जमलय ग!

म्याडम, एकदम झबर्डस्ट!!! मला तर शीर्षक वाचून क्षणभर रंगोपंताची काळजी वाटली. पण असो. आणि ढवळ्या शेजारी पवळ्या बांधलाय तर त्याचे रिझल्ट्स असे उत्तम आले आहेत.... बेष्ट!!! बिपिन कार्यकर्ते

मी साधारणपणे कवितांच्या वाटेस जात नाहीं, पण या वेळी गेलो आणि खूप छान कविता वाचायला मिळल्या. "ढदिवस" या चार शब्दांत कांहीं तरी जादू असावी. मुख्य म्हणजे चतुरंग-जी व रेवतीताईंच्या कवितेत "वृत्त"शिस्त, ज्यामुळे कवितेला एक तर्‍हेचे 'सौष्ठव' मिळते, ती काटेकोरपणे पाळली गेली आहे. मुक्तछंदातल्या कविता 'पोट सुटलेल्या' व्यक्तीसारख्या वाटतात. मस्त! ------------------------ सुधीर काळे, सध्या फ्रेंमाँट, कॅलिफोर्निया येथे मुक्काम

हि बेस्ट कि ती बेस्ट?? हिच बेस्ट.. :)

रंग्यासे रंगी सवाई ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मस्तये. आधी मला वाटले की दाढदुखीच लागली का पाठी. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी

धन्यवाद मंडळी! पहिलाच प्रयत्न गोड मानून घेतलात.:) रेवती

अजमावुनी बदामा जोरात चावताना तुटला असा कसा हा? कळण्यात वेळ गेला अच्छा... तर बदाम कारणीभूत ठरला तर ! ;)

=))

दंतवैद्य ह्या प्रकाराबद्दल लैचं भिती वाटते...दुधाचे सगळे दात नं पडता पक्के दात यायला लागल्यानी सगळे दुधाचे दात उपटायला लागलेले होते...दंतवैद्य ह्या प्रकरणानी तेव्हापासुन लैचं हादरवलेलं आहे..

In reply to by रेवती

अंमळ गंमत ;-), पण तुमचं विडंबन खरंच पहायचं राहून गेलं होतं, ते जेपींमुळे वरती आलं म्हणून आवडल्याची पोच-पावती दिली, इतकंच... :-)