जरा मोकला झाल्तो तर कालपास्न ईचार करीत व्हतो .क लीवाच बर ?पन डोस्क्यान कई येचना.
रिंग रिंग रिंग रिंग रिंग .... मोबाईल वाजतवता.
'ह्या~लू ! बोल्तो कोन ?'
'बाला आर मना नाय वलीकलास ? मी चंद्या, बारके पाड्यानचा. '
झारकन डोस्क्यान वायर घुस्ली.
'हा बोल आर हायस कुट तू ? '
.........धा मिन्टानी फोन खाली ठ्येवला न डायरेक मना मत्मा गांधीच आटवले बोल.
चवतीत आसताना शिक्शन ईंन्स्पेक्टर समोर भाडखाउनं मत्मा गांधी वर भाशन दिल्लवत.
ज्याआयला भाशन आयकता आयकता ईंन्स्पेक्टर झीट येऊन खाली परलावता.
ईयत्ता चवतीचा वर्ग. मास्तर येक डोला दरवाज्याकड लावुन शिकवत होते.
ईंन्स्पेक्टर आले.
शिकवल्याप्रमान पोर ऊटली.
'येक सात नम~~~~स्ते'
'बसा बसा मुलांनो.' ईंन्स्पेक्टर म्हनला.
'मास्तर, तूमच्या वर्गातल्या सगळ्यात हुशार मूलाला ऊभ करा. मी त्याला गणीतातील काही प्रश्न विचारतो.'
'मिथन्या ऊट. ' मास्तर.
मी ऊबा रायलो. ४७ मार्क झेऊन सामाईत पयला आल्तो बोल.
'१७ गुणिले ८ कीती होतात ?' ईंन्स्पेक्टरन ईचारल.
'अं ...अं ...' माजी हातभर फाटली.
मना त १० परयंतच पाडे येत वते.
'येकशे चालीस ' मी ठोकल.
'एकशे चाळिस ? मास्तर हा तुमच्या वरगातला सगळ्यात हुशार मुलगा ना? हा चक्क एकशे चाळिस सांगतो.?' ईंन्स्पेक्टर आवाक झाल्ता.
'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.'
ईंन्स्पेक्टर पयली चक्कर आली.
ईंन्स्पेक्टरच आ केलेल तोंड बंद नाय झाल तवर मास्तरनी ईचारल
'सर मूलांनी महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय. म्हणायला सांगू?'
'सांगा.' ईंन्स्पेक्टरन तोंड मिटल.
'चंद्रकांत ऊट. भाषण कर.' मास्तर न आदेश दिला.
चंद्या ऊटला न भाशनाला सुरवात केली.
'मत्मा गांधी च पुर्न नाव मोहनदास करमचंद गांधी.
२ आक्टोबर ला पोरबंदर हीत गांधीजीचा जन्म झाला.
गांधीजीचे बालपन खुपच गरीबीत गेले.
ल्हानपनी येकदा त्यांनी वडलांच्या खिच्यातून पैशे चोरले. तेसमजल्यावर
वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई.
आपले शालेतील शिक्शन पुर्न करुन ते विलायतेला गेले.तीते त्यानी वकीलीच शिक्शन झेतल. आनी ते भारतात परत आले.
भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय
मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय
मग ते भारतात परत आले.
काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला.
मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'
ईंन्स्पेक्टरला पुडच कायव आयकायला गेल नाय. तो आरवा झाल्ता.
(गमतीन झ्या. यात महात्मा गांधीजीची कोनत्याव परकारे चेष्टा करन्याचा हेतु नाय.)
मिथुन काशिनाथ भोईर.
वाचने
33949
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
खो खो खो
'सर आवो हा
+१
In reply to 'सर आवो हा by अनामिक
+२
In reply to +१ by मिसळभोक्ता
+३
In reply to +२ by सहज
स्वाकशरी एकदम क ड क...
In reply to +१ by मिसळभोक्ता
की बॉर्ड्वरची
In reply to स्वाकशरी एकदम क ड क... by कौस्तुभ खैरनार
छान लिहलय
-रजनिश
क क लिवलय
लई भारी!!
हा हा
खी, खी, खी,
In reply to हा हा by रेवती
ह्या पोरांपरीस ते मास्तरचं लै बेण व्हतं...
खी खी ही ही
_____________________________
___१___
In reply to _____________________________ by भडकमकर मास्तर
____२____
In reply to ___१___ by धनंजय
____३____
In reply to ____२____ by घाटावरचे भट
______४_______
In reply to ____३____ by बिपिन कार्यकर्ते
______श्री_______
In reply to ______४_______ by Nile
----------------६----------------
In reply to ______श्री_______ by अक्षय पुर्णपात्रे
------------७------------
In reply to ----------------६---------------- by आकडा
______________८_______________
In reply to ------------७------------ by llपुण्याचे पेशवेll
-------------------------९------------------------------
In reply to ______________८_______________ by ३_१४ विक्षिप्त अदिती
______________________१०______________________
In reply to -------------------------९------------------------------ by अनिल हटेला
(विषय दिलेला नाही)
खो.खो..
जबरा!
हाहाहा..खू
भारी
'सर आवो हा
भारीच
हाहा
भन्नाट
Ultimate !!
In reply to भन्नाट by सुनील
जल्ला
मिथन्या ग्रेटच...
+१ चुचु
In reply to मिथन्या ग्रेटच... by हर्षद आनंदी
:))
हॅहॅहॅ
(विषय दिलेला नाही)
लै भारी
आर बाल्या किती दिसानी
क लिवलय क
बाल्या
श्री रा रा
+++++
मस्तच...
कवरं
अफलातुन....
झकास
लय भारी
लै भारी रे
मस्तचbinarybandya
मस्त
लय भारी...
लय भारी..
भारी..
सहमत
In reply to भारी.. by कॅप्टन जॅक स्पॅरो
लय भारी....
कौतुक
हसुन हसुन मरायची वेळ आली आहे.
माझे सत्याचे प्रयोग
हाहाहा!!
(No subject)
कं झाला
तेजाला ह्येला मिनी चोल्यान ला
कित्ती वर्षात दादूस आलाच नाही
(No subject)
बाल्या कुटं गेला रे...
:)) :)) :))
मजा आली
कंर बाला तेजायला कुठ गेला बे
हा हा
कुटं हायस र बाला दादूस.....
=))