मुंबई (ब्रेबॉन)- ता. ३ डिसेंबर (पीटीआय,एएफपी,एबीसी,ळक्षज्ञ) - दहशतवादी हल्ल्यांना सरावलेल्या मुंबईत आज पुन्हा दक्षिण मुंबईतल्या ब्रेबॉन स्टेडियमवर "क्रिकेट-ए-तोबा" ह्या भारतीय संघाने श्रीलंकन क्रिकेट संघावर हल्ला चढवला आणि पुन्हा मुंबईस (आणि अवघ्या क्रिकेटजगास) वेठीस धरले. ह्या हल्ल्यामध्ये श्रीलंकन क्रिकेटचे एटीएस प्रमुख मुथय्या मुरलीधरन ह्यांच्यासह सहा गोलंदाजांची गोलंदाजी शहीद झाल्याचे वृत्त आहे.
सकाळी १० च्या सुमारास नुकताच "क्रिकेट - ए - तोबा" मध्ये निवड झालेल्या एम विजय ह्याने काही फैरी झाडल्या तेव्हा कमिशनर कुमार संगकारा ह्यांना पुढे यू घातलेल्या वादळाची कल्पना आली नाही. कडवा अतिरेकी गौतम नसल्याने त्यांनी ही बाब पुरेशी 'गंभीर'पणे घेतली नाही. पण त्यानंतर थोड्याच वेळात कुख्यात माथेफिरू दहशतवादी वीरेंद्र सेहवाग ऊर्फ "माथेफिरू बीरू" ने हल्ल्याची सूत्रं आपल्या हाती घेतली. एसीपी (अफेक्टेड क्रिकेट प्लेयर) रंगना हेराथवर त्याने पहिल्याच भेटीत तीनवेळा वार केले. आणि मग निष्पाप गोलंदाजांची कत्तल करण्याचा त्याने सपाटा लावला. अतिशय थंड डोक्याने आणि शांत (खरंतर मख्ख) चेहेर्याने त्याने हा 'रनसंहार' केला.
पुल, कट, ड्राईव्ह, ग्लान्स वगैरे सर्व संहारक अस्त्रे वापरून ह्या माथेफिरूने श्रीलंकन गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. मन मानेल तेव्हा लेटकट, पॅडल स्वीप, रिव्हर्स स्वीप अश्या शस्त्रांनी त्याने वारंवार गोलंदाजांना जखमी केले. एटीएस प्रमुख मुरलीधरनही त्याच्या तडाख्यातून सुटले नाहीत. उलट त्यांच्यावर माथेफिरू बीरूने सर्वांत घणाघाती प्रहार केले. कमिशनर संगकारा ह्यांनी डीप मिडविकेट, "२ लाँगऑन", "२ लाँगऑफ", स्वीपर कव्हर आणि डीप थर्डमॅन असा अभूतपूर्व कडेकोट बंदोबस्त करून देखील माथेफिरू बीरूने वारंवार गोलंदाजांना ह्या बंदोबस्तामधून तर काही वेळा बंदोबस्ता"वरून" फेकून दिले. ह्या क्रूरकर्म्याने प्रत्येक गोलंदाजाच्या गोलंदाजीची निर्घृण हत्या केली. श्रीलंकन क्रिकेटच्या शीघ्र कृती दलाने डाव्या यष्टीच्या बाहेर मारा करून बीरूला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला असता त्याने पुढे सरसावत प्रतिहल्ला केला. रिव्हर्स स्वीपच नव्हे तर रिव्हर्स पुल, रिव्हर्स ग्लान्ससारखी आजतागायत न बघण्यात आलेली अस्त्रंही माथेफिरू बीरूने वापरली. बाऊंन्सर्स, यॉर्कर्स, शॉर्ट, फुल, गुड, हाफ, आर्मर, दूसरा, चौथा, एकोणनव्वदावा..... कुठल्याच चेंडूंचा त्याने मुलाहिजा ठेवला नाही. हा बघा ह्या नराधमाचा क्रूर चेहेरा.....
बघा भीती, दया-माया, क्षमा - शांती... कशाचा लवलेशही नाही ह्याच्या चेहेर्यावर. एकदातर एटीएस प्रमुख मुरलीधरन ह्यांनी त्याला एक अप्रतीम 'फुल' दूसरा टाकला होता. मुरलीघरनना वाटले की त्यांनी माथेफिरू बीरूला पकडले. पण आनंदाने मारलेली त्यांची उडी पूर्ण होईपर्यंत चेंडू थर्डमॅन सीमेपासून १३.५ इंच दूर होता. ह्या निर्ढावलेल्या अतिरेक्याने त्यावरही 'बॅकफुट' पुढे टाकून "रोव्हर्स पॅडल स्वीप" मारला होता. एटीएसप्रमुख केवळ हतबल होऊन बघण्यापलिकडे काहीही करू शकले नाहीत.
ताज्या बातमीनुसार "माथेफिरू बीरू" क्रिकेट-ए-तोबा"च्या आत्मघातकी पथकाचा म्होरक्या असल्याने त्याने एटीएस प्रमुख मुरलीधरन ह्यांच्या हातात त्याने आपली इनिंग संपवली.
पण तरीदेखील 'क्रिकेट-ए-तोबा'चे अजून किमान ४ दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असल्याचे समजते. जगभरात आपल्या विध्वंसक कारवायांसाठी प्रसिद्ध असलेला "सच्या हटेला", "लपेट्या लक्ष्मण", "युवी सहाछकड्या" आणि "धोबीघाट धोनी" ह्यांचा त्यांत समावेश आहे. ब्रेबॉनवर हा रनसंहार आजचा दिवसभर चालू राहील अशी चिन्हं आहेत.
शेवटी - "माथेफिरू बीरू"च्या ह्या हल्ल्यात शहीद झालेल्या गोलंदाजांच्या गोलंदाजीस आमची विनम्र श्रद्धांजली !

वाचने
11253
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
:)
(विषय दिलेला नाही)
शिर्षक
हा हा हा
हॅहॅहॅहॅहॅ
हाण तिच्या
वाईट बातमी!
कहर
येस बॉस.........
In reply to कहर by जे.पी.मॉर्गन
+१
In reply to कहर by जे.पी.मॉर्गन
सहमत
In reply to +१ by श्रावण मोडक
माथेफिरू
In reply to सहमत by जे.पी.मॉर्गन
एक प्रतिक्रिया....
सकाळीच
वेगळा
कं लिवलय
जॉ ब र द स्त!!
कार्लोस
मस्त रे
केविलवाणा प्रयत्न
केविलवाणा नाही पण
In reply to केविलवाणा प्रयत्न by आण्णा चिंबोरी
संदीपशी
In reply to केविलवाणा नाही पण by संदीप चित्रे
बराचसा सहमत
In reply to केविलवाणा प्रयत्न by आण्णा चिंबोरी
अण्णांच्य
In reply to बराचसा सहमत by अक्षय पुर्णपात्रे
मी ही
In reply to अण्णांच्य by Nile
ओक्के ! !
In reply to केविलवाणा प्रयत्न by आण्णा चिंबोरी
मला लेखाची
सहीच...
जबर्दस्त राव
फारच सुंदर.....