कविते, तुज शोधित आले
लेखनविषय:
काव्यरस
मनसरोवराच्या जलात चिमणा पक्षी
हलकेच उठवितो नाजुक तरंग नक्षी
त्या तरंगनक्षीचे कंकण मी ल्याले
कविते, तुज शोधित आले
इवल्या इवल्याशा बाळमुठी चुरणारे,
झोपेतच हसुनी मंत्रमुग्ध करणारे
ते ओठ दुधाचे टिपुनी तन्मय झाले
कविते, तुज शोधित आले
मायेची थरथर सुरकुतल्या स्पर्शाची,
कौतुकभरल्या नजरेत लहर हर्षाची,
मी आशिर्वादाचे अमृतकण प्याले
कविते, तुज शोधित आले
तू हवीहवीशी साथ सख्या सजणाची,
तू तन्मय मीरा दासी हरिचरणाची,
तुजसाठी जगले, तुझ्यात तल्लिन झाले,
कविते, तुज शोधित आले
तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी
तू सांजवात तेवतेस संध्याकाळी
त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले
कविते, तुज शोधित आले
वाचने
11760
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
व्वा !!!
वा वा वा!!
दृश्यकाव्य
सुंदर
तरल....
मस्त..आवडली
ओह्ह
छान छान!!
खरच खुप
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर...
छान आहे
क्रांतीता
In reply to क्रांतीता by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
अप्रतिम कविता
वाह!
सुंदर
In reply to सुंदर by फ्रॅक्चर बंड्या
असेच म्हणतो
आवडली...!
छान
छान
साधारण
In reply to साधारण by मिसळभोक्ता
अवांतर
In reply to साधारण by मिसळभोक्ता
मिभो,
In reply to मिभो, by चतुरंग
आत्तापर्यंत...
In reply to आत्तापर्यंत... by श्रावण मोडक
संपादकांच
छान
मस्त...
कविता
तरल कविता