मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्हेजिटेबल पुलाव

श्रीयुत संतोष जोशी · · पाककृती
साहित्य : १/२ कि. बासमती तांदुळ्, साजूक तूप ३ चमचे , काजू . अख्खा मसाला ( लवंग,हि.वेलची,मसाला वेलची,दालचिनी,तमालपत्र ) मीठ , साखर , आलं लसूण पेस्ट , लिंबाचा रस , केशरी रंग , चेरी , संत्र , मोसंब , वेलची केळं. भाज्या : फ्लावर ( लहान फुले काढणे ) ,फरसबी ( उभी कापणे ), गाजर ( लांबट तुकडे ), बटाटा ( लांबट तुकडे ) मटार , कृती : तांदुळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. फ्लावर्,फरसबी,गाजर व मटार शिजवून घ्यावे. बटाटा व काजू तळून घ्यावा . बटाटा व काजूवर थोडे लाल तिखट व मीठ शिंपडावे. एका पातेल्यात तूप गरम करून त्यात सर्व अख्खा मसाला टाकून तो तडतडला की तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून उकळवावे.पाणी उकळत असताना त्यात चवीप्रमाणे मीठ , साखर , आलं लसूण पेस्ट व लिंबाचा रस घालावा. नंतर भिजवलेले तांदूळ घालून भात शिजवून घ्यावा. भात तयार झाल्यावर दुस-या पातेल्यात भात आणि भाज्यांचे थर लावून सर्वात वरच्या थरावर फळं आणि काजू घालून सर्व्ह करावे.

वाचने 8133 वाचनखूण प्रतिक्रिया 15

मदनबाण Fri, 11/27/2009 - 10:10
श्रीयुत संतोष जोशी महोदय... सकाळी सकाळी अशा पाकृ वाचण्यास लयं म्हणजी लयं तर्रांस्स्स व्हतो बघा... ;) मदनबाण..... "Life is the flower for which love is the honey." Victor Hugo

अवलिया Fri, 11/27/2009 - 11:07
मेलो ! वारलो ! खपलो ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

गणपा Fri, 11/27/2009 - 11:27
वाह, संतोष मस्तच. विनंती. जर तो शेवटचा फोटो जरा मोठा करता आला तर पहाना.

jaypal Fri, 11/27/2009 - 11:57
आज लगेच फर्माईश केली पण. अश्याच सहज , सुंदर रेशीप्या येउद्यात आम्ही पण तयारीचे आहोत. ____________________________________________________ दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन Fri, 11/27/2009 - 12:17
शब्द संपले ! श्रीयुत संतोष , तू ही एक उत्तम सुगरण्या आहेस हे ठाऊक नव्हतं :) - टारझन

सहज Sat, 11/28/2009 - 18:46
मस्त दिसतोय. केला पाहीजे. >फ्लावर्,फरसबी,गाजर व मटार शिजवून घ्यावे. पुलाव खाताना ह्या भाज्या फार ब्लॅन्ड (??) तर नाही ना लागणार?

प्रभो Sun, 11/29/2009 - 21:16
मस्त... --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!