मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्हेजिटेबल पुलाव

श्रीयुत संतोष जोशी · · पाककृती
साहित्य : १/२ कि. बासमती तांदुळ्, साजूक तूप ३ चमचे , काजू . अख्खा मसाला ( लवंग,हि.वेलची,मसाला वेलची,दालचिनी,तमालपत्र ) मीठ , साखर , आलं लसूण पेस्ट , लिंबाचा रस , केशरी रंग , चेरी , संत्र , मोसंब , वेलची केळं. भाज्या : फ्लावर ( लहान फुले काढणे ) ,फरसबी ( उभी कापणे ), गाजर ( लांबट तुकडे ), बटाटा ( लांबट तुकडे ) मटार , कृती : तांदुळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे. फ्लावर्,फरसबी,गाजर व मटार शिजवून घ्यावे. बटाटा व काजू तळून घ्यावा . बटाटा व काजूवर थोडे लाल तिखट व मीठ शिंपडावे. एका पातेल्यात तूप गरम करून त्यात सर्व अख्खा मसाला टाकून तो तडतडला की तांदुळाच्या दुप्पट पाणी घालून उकळवावे.पाणी उकळत असताना त्यात चवीप्रमाणे मीठ , साखर , आलं लसूण पेस्ट व लिंबाचा रस घालावा. नंतर भिजवलेले तांदूळ घालून भात शिजवून घ्यावा. भात तयार झाल्यावर दुस-या पातेल्यात भात आणि भाज्यांचे थर लावून सर्वात वरच्या थरावर फळं आणि काजू घालून सर्व्ह करावे.

वाचन 8133 प्रतिक्रिया 0