(हिरवा माज)
काव्यरस
जयश्रीताईंचा असला कचकचीत हाफवॉली पडल्यावर आमच्यातल्या विडंबकाने काय करावं असं अपेक्षित आहे? ;)
ग्लेन्फिडिच बरसे सखा डॉलर पाऊस
माज लेऊन हिरवा, येतो डॉलर पाऊस
तिची प्रतिक्षा ग्लासात अन सख्याही फितूर
गालागालात तोबरा, पिंकेपिंकेआड धूर
पापड्-फर्साण चखणा तिथे पुरवतो सखा
खुळावली मैफल माज घेऊन अनोखा
मिरविते नवी नोट रंग कंच हो हिरवा
पिंकसरीत भिजूनी लाल रंग गाली नवा
नोटा उडती बाहेरी आटे खिसा धाकधुक
दोस्त हलके उठती, घेती कलटी नाजुक
बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून
मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!!
चतुरंग
वाचने
3852
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
हाहा...मस्त
संपादक, संपादक,
In reply to संपादक, संपादक, by श्रावण मोडक
+१ हेच
रंगाशेठ काय म्हणायच वो..........
अगदी
तूफ्फान!!!!
In reply to तूफ्फान!!!! by बिपिन कार्यकर्ते
मदत लागली
तरी म्हटल
क्या बात
रंगा येई
ग्लेनफिडी
In reply to ग्लेनफिडी by अमृतांजन
हा नगरी
लै भारी
रंगाशेटचा
बील
पिंक?
मस्त