मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<नंदनला पत्रे>

पिवळा डांबिस · · जे न देखे रवी...
काव्यरस
कच्चा माल "स्त्रीसौंदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत बजावणं या तिन्ही वाबतीत भारतासारखी महासत्ता कोणाकडेच नाही रे!!!!" व्वा!! क्या बात है!!! वरील तेजस्वी वाक्य वाचून अगदी बाळ गंगाधरांची आठवण झाली ... आणि खालील ओळी सुचल्या.... :) (चालः पिकल्या पानाचा, देठ की हो हिरवा...) . . . दरबार जुना ह्यो, आय डी तेव्हढं नवंऽऽ.... मध्यानरातीला सोत्ता, मालक दावत्यात दिवं... अनंगरंगी, सिंडी खेळत्ये, नंदन लाजून हळवाऽऽऽ हासून हासून, अहो हासून हासून, डांबिस होई, आडवाऽऽऽ =)) विदेशी खाण्यांनो, फाट्यावर चढा... मालकंस, बॉलीवुड, आणि कंदी पेढा देशीपणाचा रंगे पोवाडा, हो, देशीपणाचा रंगे पोवाडाऽऽ डफामागुनी झील धराया, अवलियाला बोलवाऽऽऽ हासून हासून, डांबिस होई, आडवाऽऽऽ =)) थोडा झुकून, थोडा वाकतो, हासू आवरून आब राखतो.... लई दिसानं बाण फेकतो, हो, लई दिसानं बाण फेकतोऽऽ चुकलं माकलं, माफी करूनी, मुजरा अमुचा घ्यावाऽऽऽ हासून हासून, डांबिस होई आडवाऽऽऽ =)) (आवाहनः आधीच तयार चाल असलेलं विडंबन रचून लेटेष्ट संपादक महाराजांचे श्रम वाचवल्याबद्दल आम्हाला वाचकांचा दुवा मिळेल काय?:)) :P

वाचने 11520 वाचनखूण प्रतिक्रिया 33

अवलिया Wed, 11/25/2009 - 11:23
लै भारी हो डांबिसकाका !! जास्त लिहित नाही.. उगा लेटेष्ट संपादक महाराजांना शरम.. आपलं.. श्रम !! :) --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

विजुभाऊ Wed, 11/25/2009 - 11:46
लै दिसानं डाम्बीस काका आलात आन =)) आडवं आमाला करुन गेलात आमी त म्हनत हुतो. की इथे दिसना तिथं दिसना कुठं दिसना कुठं दिसना. आन आत्ता की व दिसला ग बाइ दिसला आमा करून =)) आडवा गेला

टारझन Wed, 11/25/2009 - 11:48
ह्हाह्हाहा !! नेहमीप्रमाणेच सुरेख धागा !!! श्रीमान पिवळा डांबिस ह्यांचा मी पुर्वीपासुनंच चाहता आहे. ते अत्यंत सुरेख आणि प्रतिसादखेचक लिहीतात . जगा श्रीयुत डांबिस काका .. :) मजा आली .. चालीत वाचल्यानं आनखीच मजा ! - टारझन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

डांबिसराव तुम्हाला आधी दुवा आणि मग हसून हसून आडवा. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

jaypal Wed, 11/25/2009 - 12:18
भले!!! भले !!! शाहीर "पि.डा." कवन वाचुन आक्षी "चौफुल्याला" गेल्या सारखं वाटतय बघा. आठवणितला(आज "लै दिसान रंगल इडा") पानवाला = जयपाल *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

लवंगी Wed, 11/25/2009 - 12:21
पिडाकाका फेटाबिटा बांधून डफली बडवत हा पोवाडा तात्यांसमोर गाताहेत अस चित्र डोळ्यापुढे आलं. पाठी नाना जी जी र जी जी म्हणतोय.. =)) =))

In reply to by लवंगी

टारझन Wed, 11/25/2009 - 12:33
आणि आत्ताच आपले सखारामराव गणपत पाटलाचा गणवेश घेऊन पळाले .. असं कोणी तरी ओरडंत होतं ! असो .. - टारझन

आधी =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आणि मग.... ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= ०O= (नतमस्तक) बिपिन कार्यकर्ते

नंदन Wed, 11/25/2009 - 13:48
विदेशी खाण्यांनो, फाट्यावर चढा... मालकंस, बॉलीवुड, आणि कंदी पेढा देशीपणाचा रंगे पोवाडा, हो, देशीपणाचा रंगे पोवाडाऽऽ डफामागुनी झील धराया, अवलियाला बोलवाऽऽऽ
=)) =)) =))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

Nile Wed, 11/25/2009 - 14:25
विदेशी खाण्यांनो, फाट्यावर चढा... मालकंस, बॉलीवुड, आणि कंदी पेढा देशीपणाचा रंगे पोवाडा, हो, देशीपणाचा रंगे पोवाडाऽऽ डफामागुनी झील धराया, अवलियाला बोलवाऽऽऽ
क्या बात है! इस बात पे तो ताली देके 'दाद' देनी पडती! ब्येस!

धमाल मुलगा Wed, 11/25/2009 - 18:02
=)) =)) =)) =)) =)) =)) अंमळ हळव्या नंदना, आता भागलं का? :P
दरबार जुना ह्यो, आय डी तेव्हढं नवंऽऽ.... मध्यानरातीला सोत्ता, मालक दावत्यात दिवं...
ऑबॉबॉबॉबॉबॉ..... ड्येंजार वो...ड्येंजार :)
अनंगरंगी, सिंडी खेळत्ये, नंदन लाजून हळवाऽऽऽ
=)) =)) पण...च्छ्या: नंदोबापुढे सिंडी अंमळ वयस्करच! की त्यामुळेच हा पठ्ठा लाजुन हळवा झाला? =))

प्रभो Wed, 11/25/2009 - 20:17
काका, जबहर्‍या... =)) --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

शुचि Sat, 06/12/2010 - 05:12
हसून हसून मेले परत जन्मले परत हसत हसत निवर्तले =)) =)) =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

टारझन Sat, 06/12/2010 - 11:18
रिकर्सिव्ह फंक्शन मधे अडकलियेस तर ;) कुठे ब्रेक स्टेटमेंट आहे की णाही ? =)) व्हॉईड शुचि_नवा_फंडा( अंक कैच्याकै) {व्हाईल(१) {हसा() ; क्ष : मरा(); पुनर्जिवित(); गोटु क्ष; } } एरर-बग देणे घेणे.