जेंव्हा ते पहील्यांदा चालून आले...
बॉस्टनमधे ज्या काही बघण्यासारख्या अनेक ऐतिहासीक वास्तू आहेत त्यात १९९५ मधे अजून एका वास्तूने भर घातली. वास्तवीक त्याचा अमेरिकन इतिहासाशी प्रत्यक्ष संबंध नव्हता, तरी देखील. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाची वाटचाल ज्या पथावरून सुरू झाली, त्या "फ्रीडम ट्रेल" वर, बॉस्टन सिटीहॉलच्या बाजूस वर्दळीच्या भागात सहा मोठे काचेचे मनोरे उभे केले गेले. त्या मनोर्यातून एकात एक असे चालत जाता येते. मधे चालत जात असताना पांढरी वाफ - प्रतिकात्मक धूर येत असतो आणि त्या मनोर्यातून जात असताना काचेतून जशी बाहेरचे बघताना पारदर्शकता जाणवते तशीच त्या काचेवर लिहीलेले मोठमोठे क्रमांक देखील डोळ्यात भरतात.
असे बघत बघत आपण बाहेर येतो आणि बाजूस लगेचच असलेल्या एका स्मृती खडकावर ती सुप्रसिद्ध (की दुर्दैवी?) वाक्ये दिसतातः
जेंव्हा त्याचे उद्घाटन झाले तेंव्हा त्याच्या बातम्या स्थानिक माध्यमात एक-दोन दिवस येत होत्या. त्या ऐकताना आम्हा मित्रांना गप्पा मारताना एक प्रश्न पडला होता की ज्यूंना मारले जर्मन नात्झींनी आणि ही अपराधाची भावना अमेरिकेत तीही लिबरल बॉस्टनमधे कशासाठी? अर्थात याचे देखील उत्तर कोणा ज्यूने न सांगता समजू शकले. एक म्हणजे १९४२ च्या शेवटाला जर्मनीत ज्यू, जिप्सि आणि इतर अनेकांची कशी निर्घृण हत्या होत आहे हे समजूनदेखील अमेरिकेने दोस्त राष्ट्रांबरोबर कानाडोळा करायचेच ठरवले होते त्याचा कुठेतरी राग असावा आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे ह्या अत्याचारांची आठवण आणि जाणीव ही जनसामान्यात राहावी कारण सत्तेच्या माजातून होणार्या एका अन्यायाकडे दुर्लक्ष केल्याचे परीणाम हे अनेक अन्यायांची निर्मिती करू शकतात. तीच अवस्था अजून पुढे नेल्यास दहशतवादाच्या संदर्भातही लागू होते. आज कुठेतरी वाटते की संपुर्ण जगात बोकाळलेल्या दहशतवादाचा उगम हा कुठेतरी भारतीय राजकारण्यांनी आणि "तथाकथीत" बुद्धीवाद्यांनी योग्य वेळेस योग्य निर्णय अथवा न्याय्य बाजू न घेण्यात झाला आहे. कंदहारप्रकरणी सोडलेला अतिरेकी हा ९/११ च्या अतिरेक्यांना मदत करत राहीला... आपण संयामने घ्यावे म्हणणार्या अमेरिका, ब्रिटन, आणि युरोपातील इतर राष्ट्रांनापण त्याची फळे भोगावी लागली/लागत आहेत. इतकेच कशाला आता पाकीस्तानचे काय झाले आहे ते पहा...असो.
दुसर्या महायुद्धातील होलोकास्ट हे खूप भिषण होते पण त्याच्या मुळाशी होती ती निरंकूश सत्ता आणि त्या सत्तेच्या दबावाखाली आम्ही काही करू शकू ही गुर्मी. हिटलर आणि नात्झींची गुर्मी आणि स्थानीक संस्कृतीस तुच्छ लेखण्याचा माज हे गुणात्मकरित्या वेगळे नाहीत. त्यातील भाव एकच आहे. फक्त एका ठिकाणी एक पारडे जड होते तर दुसरी कडे त्याच्या विरुद्ध... मात्र अजून एक गोष्ट समान होती, ती म्हणजे स्वतःचे जळत नसताना इतरांच्या भावनांकडे आणि त्यांच्यावर होणार्या अन्यायाकडे दुर्लक्ष करणारी "तथाकथीत" बुद्धिवाद्यांची वृत्ती. अर्थात जसे सगळेच जर्मन हे नात्झी नव्हते, तसेच सगळेच बुद्धीवादी हे तथाकथीत नसतात. हे देखील एक सत्य लक्षात ठेवणे महत्वाचे.
तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते. त्यात जर स्वतःच्या पोटाला चिमटा बसलाच तर अजूनच जाणवू शकते. पण अशी हिंसा कितीही निंदनीय असली आणि तशी ती असतेच, तरी ती कशाची प्रतिक्रीया म्हणून झाली ह्याचा विचार करणे, ती परत घडू नये असे वाटत असल्यास काय व्हावे यावर विचार करणे, स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते. असाच जास्त विचार केल्यास अशा स्मारकांतून निष्कर्ष निघतो असे वाटते.
----------------------------------
सर्व छायाचित्रांचा संदर्भः http://www.nehm.com/
हिटलर आणि नात्झींची गुर्मी आणि स्थानीक संस्कृतीस तुच्छ लेखण्याचा माज हे गुणात्मकरित्या वेगळे नाहीत.स्थानिक संस्कृतीस तुच्छ मानणे आणि नाझीवादाचा हा असा जोडलेला संबंध हास्यास्पद आहे. गुर्मी आणि माज ह्यात कसला असतो हो गुणात्मक भेद? कुणाला पैशाची मस्ती असते कुणाला सत्तेची कुणाला दोन्हीची तर कुणी जन्मजात मग्रुर असतो म्हणून हे सगळे काय हिटलर/नाझीवादासी जोडलेले असतात काय? हिटलर सारख्या नराधमांची पूजा करणे त्यांना उघडपणे हिरो मानणारे आजही आहेत. आणि ते इथले बुद्धीवादी आहेत की तथाकथीत राडेबाज हे तुम्हालाही चांगलेच माहित आहे. तेव्हा गुणात्मक संबंध कुठे लावायचा ते तुम्हीच ठरवा. एकिकडे हिटलरची प्रशंसा आणि दुसरीकडे बिका काकांनी लिहिलेल्या लेखावर नरसंहारावर आसवे ढाळणे ह्यात किती पराकोटीची विसंगती भरलेली आहे हे दिसून न येणे ह्याला काय म्हणावे विकास राव?
ज्यूंना मारले जर्मन नात्झींनी आणि ही अपराधाची भावना अमेरिकेत तीही लिबरल बॉस्टनमधे कशासाठी?अलीकडेच चॉम्स्कींची एक मुलाखत पाहत होतो. त्यात त्यांनी तेव्हाच्या अमेरिकेतल्या छुप्या आणि उघड ज्यू-द्वेषाबद्दल लिहिले आहे. त्यांचे बालपण ज्या फिलाडेल्फिया शहरात गेले, तिथे दुसर्या महायुद्धात पॅरिसचा पाडाव झाल्यावर झालेल्या जल्लोषाचे वर्णनही त्यांनी केले आहे. (पहिल्या महायुद्धातही जर्मन वंशाचे नागरिक अमेरिकेन लोकसंख्येच्या १/६ असल्याने अमेरिका युद्धात ल्युसिटानिया जहाज बुडेपर्यंत उतरली नाही असाही एक प्रवाद आहे.). अगदी न्यू यॉर्क टाईम्ससारख्या ज्यूंच्या मालकीच्या प्रकाशनसंस्थेनेही नाझींचे अन्याय पुरेशा प्रभावीपणे लोकांसमोर मांडले नाहीत असा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर या स्मारकाचे महत्त्व नजरेत भरावे.
तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते. त्यात जर स्वतःच्या पोटाला चिमटा बसलाच तर अजूनच जाणवू शकते. पण अशी हिंसा कितीही निंदनीय असली आणि तशी ती असतेच, तरी ती कशाची प्रतिक्रीया म्हणून झाली ह्याचा विचार करणे, ती परत घडू नये असे वाटत असल्यास काय व्हावे यावर विचार करणे, स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते. असाच जास्त विचार केल्यास अशा स्मारकांतून निष्कर्ष निघतो असे वाटते.-- सहमत आहे.
In reply to उत्तम by नंदन
In reply to स्मारकाची चांगली ओळख by धनंजय
स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते.आपल्या कडे दोन्ही बाजूंनी हेच चालू नाहीये का? हिंसाचार आणि दहशीतीद्वारे चालू केलेले काम तुम्हाला तुमच्या संपुर्ण उद्दिष्टापर्यंत कधीच पोचवू शकत नाही, हा निष्कर्श हिटलरच्या उदाहरणावरून जास्त संयुक्तीक वाटतो. - अफाट जगातील एक अडाणि.
In reply to +१ by अडाणि
In reply to स्मारकाची चांगली ओळख by धनंजय
In reply to धन्यवाद by विकास
आत्तापर्यंत आलेल्या संदर्भातून (आणि उपदेशातून) असा सूर आहे की मराठीच्या भल्या साठी "उस्फूर्त" जमावाने केलेल्या राड्यात थोडा फार त्रास झाला तर काहीच हरकत नाही.हा भाग तुम्हाला निर्देशून नव्हता, ईतर प्रतिक्रिया आणि लेखातून चर्चेचा जो सूर दिसला त्या अनुशंगाने लिहिले होते. अवांतर - तुम्ही चालु केलेला दुसरा धागा ही मला पटला नव्हता, कारण ईतर ठीकाणी हाणामारी / गोंधळ होत असेल तरी तो आपला आदर्श असू नये. त्या लेखा वरील प्रतिक्रिये वरून तरी असे दिसले नाही. - अफाट जगातील एक अडाणि.
In reply to माफ करा by अडाणि
मात्र त्याच बरोबर असे का व्हावे याचा आपण विचार न करता नुसते झोडपणे हे देखील मान्य नाहीसहमत.अबु आझमी मुजोर आहे हे मान्य.त्याने मराठीत शपथ घ्यायला काहीच हरकत नव्हती. आज Times ला त्याने मुलाखत दिली आहे."मी कुठलीही घटनाबाह्य कृती करत नसताना मला विरोध का?विधानसभा अध्यक्षांनी मला मराठीत शपथ घ्यायची सुचना केली असती तर हरकत नव्हती" असे म्हंटले आहे. राज ठाकरे ह्यांनी मराठीत शपथ घ्यायच्या वादात कर्नाटकात एका आमदाराला कन्नड येत नाही म्हणून वगळले हा संदर्भ दिला होता. इकडे दोन वृत्तपत्रांनी(Times of India आणि एक कन्नड वृत्तपत्र) अशी घटना कधीही न घडल्याचे सांगितले आहे.. भेंडी P = NP
तात्पर्यः तात्कालीक हिंसा हे कुणाचेही पटकन लक्ष खेचते. त्यात जर स्वतःच्या पोटाला चिमटा बसलाच तर अजूनच जाणवू शकते.ह्या वाक्याशी सहमत आहे, आणि असे मी नुकतेच एका प्रतिसादात म्हणले ही आहे. पण याचा एक मोठा तोटा असा आहे की अश्याप्रकारे हिंसा करुन लक्ष खेचण्याचा प्रयत्न ही होउ शकतो आणि असे होत आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. (उदा. कुणा नेत्याच्या पुतळ्याची विटंबना इ.)
पण अशी हिंसा कितीही निंदनीय असली आणि तशी ती असतेच, तरी ती कशाची प्रतिक्रीया म्हणून झाली ह्याचा विचार करणे, ती परत घडू नये असे वाटत असल्यास काय व्हावे यावर विचार करणे, स्वतःचा खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे "इतर कसे चुकत आहेत" हे दाखवण्यापेक्षा अधिक महत्वाचे वाटते. असाच जास्त विचार केल्यास अशा स्मारकांतून निष्कर्ष निघतो असे वाटते.खारीचा वाटा उचलण्यात 'चुक दाखवणे' हे ही आलेच. सामाजीक प्रबोधन हा कळीचा मुद्दा आहे. (सध्याचा कुठलाही वाद घ्या) आता मुद्दा उरतो तो (सो कॉल्ड)तथाकथीत बुद्धीवादी लोक यांचा. प्रत्येक विचारवंत हा बरोबरच असला पाहीजे असं नाही. प्रामाणीक उदाहरण द्यायचं झालं तर अणुबॉम्ब, ग्लोबल वॉर्मींग इ. विषयांवरही नावजलेल्या शास्त्रज्ञ मंडळीमध्ये वाद होताच (आणि आहे). प्रत्येकाने आपले मुद्दे मांडण साहजिक आहे. पण हे करताना (पब्लीक फोरम्स वरती) प्रत्येकाने संयम बाळगणही महत्त्वाचं आहे. वास्तवीक धनंजय, मुक्तसुनीत, विकास आणि इतर अनेक मंडळी (काही लोकांच्या भाषेत सांगायचं झालं तर) 'स्वत:च काही जळत नसतानाही' अश्या वादात सहभागी होतात याचं मला आश्वर्य वाटतं आणि त्याच बरोबर कौतुकही. जनक्षोभाची पर्वा न करता आपलं मत परखडपणे मांडणं हे अश्या वेळेस मुग गिळुन गप्प बसण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ.
In reply to एका by Nile
In reply to खारीचा वाटा by विकास
पण पहील्या वाक्यातील "चूक दाखवण्या" चा वाटा उचलण्यासाठी जरा नैतिक बळ असावे असे वाटतेखरंय. ह्यावर आम्ही फक्त लिंकनचे वाक्य quote करतो: "He has a right to criticize, who has a heart to help." :)
In reply to धनंजय आणि विकास ह्यांचे लेख आवडले by अजय भागवत
In reply to थोडक्यात आणि योग्य by विकास
हिटलर आणि नात्झींची गुर्मी आणि स्थानीक संस्कृतीस तुच्छ लेखण्याचा माज हे गुणात्मकरित्या वेगळे नाहीत. त्यातील भाव एकच आहे.या वाक्यामुळे तो पूर्णत: पटला असे म्हणता येत नाहि. ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
आज कुठेतरी वाटते की संपुर्ण जगात बोकाळलेल्या दहशतवादाचा उगम हा कुठेतरी भारतीय राजकारण्यांनी आणि "तथाकथीत" बुद्धीवाद्यांनी योग्य वेळेस योग्य निर्णय अथवा न्याय्य बाजू न घेण्यात झाला आहे.खरच अस आहे? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to मला काय त्याचे by एकलव्य
In reply to मला काय त्याचे by एकलव्य
In reply to मला काय त्याचे by एकलव्य
In reply to मला काय त्याचे by एकलव्य
In reply to असेच काहीसे... by पॅपिलॉन
In reply to सुंदर लेख लिहिलात... by प्रसन्न केसकर
In reply to सुंदर लेख लिहिलात... by प्रसन्न केसकर
मराठीच्या मुद्यावर निवडणुक लढवुन विजयी झालेला माझा आमदार केवळ त्याने मराठीचा मुद्दा सदनात लावुन धरला म्हणुन जवळपास पुर्ण टर्म करता विधीमंडळातुन निलंबित झाला आहेमाफ करा, तुमचा आमदार केवळ मराठीचा मुद्दा लावुन धरला म्हणून निलंबीत झालेला नाही. सभागृहासारख्या ठीकाणी मारहाण केल्याने निलंबीत झाला आहे. एखाद्या मुरब्बी पत्रकारा सारखे तुम्ही इथे फॅक्ट ट्वीस्ट केलेली आहे. मराठीचा मुद्दा लावुन धरण्यास कुणीही बंदी घातलेली नाही. पण अबू आझमीला धडा शिकवण्याच्या नादात आपण सभागृहाचे आणि त्यायोगे लोकशाहीचे पावित्र्य भंग पावत आहोत ह्याची जाणिव नसल्याने तुमचा आमदार निलंबीत झालेला आहे. तुम्ही जसे मतदान करुन तुमच्या आमदाराला निवडून आणलेत तसे अबूलाही त्याच्या मतदारांनी रीतसर निवडून आणून सभागृहात प्रवेश दिला आहे. तेव्हा केवळ मराठीचा मुद्दा लावून धरल्याने आमदार निलंबीत झाले असा प्रचार करू नका.
अन राज्यातील लोकशाही यंत्रणेच्या सर्वोच्च स्थानी मला प्रतिनिधीत्व नाकारण्यात आलेले आहे - असे गोंधळ यापुर्वी अनेकदा सदनात झालेले असुनही अशी कडक शिक्षा बहुधा प्रथमच होत आहे.)महाराष्ट्रात पूर्वी कधी कोणत्या आमदाराने सभागृहात दुसर्या आमदाराला मारहाण केली आणि त्यावर ह्यापेक्षा कमी कडक शिक्षा झाली हे दाखवुन द्या.
इथं ज्यु लोकांविरोधात हिटलरनं केलेल्या अन्यायाचा उल्लेख केला. माझ्या मते तेव्हा जर्मनीत ज्यु लोकांचे जे स्थान होते तेच आज महाराष्ट्रात मराठी भाषिकांचे ठरत आहे.खरंच का? ज्यू लोकांचा जर्मनित झालेला अनन्वित छळ आणि मराठी माणूस ह्यांची अतिशयोक्ती म्हणूनही तुलना करणे तुम्हाला सूज्ञपणाचे वाटते का? - कौंतेय
In reply to मराठीच्या by कौंतेय
In reply to ज्यु आणि मराठी तुलना... by प्रसन्न केसकर
In reply to ज्यु आणि मराठी तुलना... by प्रसन्न केसकर
आत्मपरिक्