नमस्कार मंडळी
तात्याच्या हाटेलात वेगवेगळ्या बल्लवाचार्यांचे वेगवेगळे शाकाहरी व मांसाहारी पदार्थ खाल्याने माझे पोट आनंदाने बहरले(फुगले,तटतटले). हा बहर काही केल्या ओसरेचना.
:''( 
मग काय चालु केला आपला जुनाच उपाय "आले पाचक"
१. रसदार पिवळे धम्मक लिंबु
२. ताजे आले
३. काळे मीठ
प्रथम लिंबु व आले स्वछ धुवुन घ्यावे.(शक्यतो आल्याची साल तशीच असुद्यावी आल्याला उगीचच नाही indian ginseng म्हणतात.)
२/३ इंच लांब आल्याचे बारीक काप करावेत. त्या मधे ५/६ चमचे लिंबु रस घालावा.
या मिश्रणात आवडीनुसार (अर्धा चमचा) काळे मीठ घालावे. ३०/४० मिनीटे मुरुद्यावे.(साधारण गुलाबी रंग येतो या मिश्रणाला. मला आवडते म्हणुन मी यात थोड्या ओल्या हळदीचे तुकडे देखिल टाकतो.)
लहान मुले देखिल आवडिने खातात. फ्रीज मधे साधारण आठवडाभर टिकते पण शक्यतोवर ताजे करुनच खावे.
गणपा शेठ येउद्यात रेशीप्या आम्हिपण तयारीत (तयारीचे म्हणा हवे तर) आहोत.
हे घ्या अल्पमोली बहुगुणी "आले पाचक" आपल्या उदर सेवेशी तयार.
ता.क. :
हे पाचक अपचन, वायुविकार, चव नसणे इत्यादि पचन विकारात अत्यंत गुण्कारी असुन अश्या प्रकारचे त्रासेस होत असल्यास क्रुपया सोडा पिउ नये, तर सारखे गरम (कोमट नव्हे) पाणि प्यावे खुप चंगला फरक पडतो. स्वानुभवावरुन सांगतो.

आपल्या साठी "आले पाचक" पाक क्रुती सविनय सादर
साहीत्य

वाचने
11490
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा!
पहिलाच
In reply to अरे व्वा! by ३_१४ विक्षिप्त अदिती
(साधारण गुलाबी रंग येतो या मिश्रणाला....
धन्यवाद!
विरोधकांना याचा उपयोग होईल!
In reply to धन्यवाद! by ब्रिटिश टिंग्या
मस्त
झकास,
लई भारी.....
मस्त! मी
मी हळदीच्या बरोबर आंबेहळद पण घालते.
In reply to मस्त! मी by स्वाती२
आले पाचक
त्रासेस शब्द गमतीत वापरलाय
In reply to आले पाचक by पक्या
माझ्या
भारी आहे..
तोंडाला चव
आमची आजी
...चान...
>>>आमची आजी