मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अल्पमोली बहुगुणी "आले पाचक"

jaypal · · पाककृती
नमस्कार मंडळी तात्याच्या हाटेलात वेगवेगळ्या बल्लवाचार्यांचे वेगवेगळे शाकाहरी व मांसाहारी पदार्थ खाल्याने माझे पोट आनंदाने बहरले(फुगले,तटतटले). हा बहर काही केल्या ओसरेचना. Image removed. :''( Image removed.Image removed. मग काय चालु केला आपला जुनाच उपाय "आले पाचक" आपल्या साठी "आले पाचक" पाक क्रुती सविनय सादर साहीत्य Image removed. १. रसदार पिवळे धम्मक लिंबु Image removed. २. ताजे आले Image removed. ३. काळे मीठ Image removed. प्रथम लिंबु व आले स्वछ धुवुन घ्यावे.(शक्यतो आल्याची साल तशीच असुद्यावी आल्याला उगीचच नाही indian ginseng म्हणतात.) २/३ इंच लांब आल्याचे बारीक काप करावेत. त्या मधे ५/६ चमचे लिंबु रस घालावा. या मिश्रणात आवडीनुसार (अर्धा चमचा) काळे मीठ घालावे. ३०/४० मिनीटे मुरुद्यावे.(साधारण गुलाबी रंग येतो या मिश्रणाला. मला आवडते म्हणुन मी यात थोड्या ओल्या हळदीचे तुकडे देखिल टाकतो.) लहान मुले देखिल आवडिने खातात. फ्रीज मधे साधारण आठवडाभर टिकते पण शक्यतोवर ताजे करुनच खावे. गणपा शेठ येउद्यात रेशीप्या आम्हिपण तयारीत (तयारीचे म्हणा हवे तर) आहोत.Image removed. हे घ्या अल्पमोली बहुगुणी "आले पाचक" आपल्या उदर सेवेशी तयार. Image removed. ता.क. : हे पाचक अपचन, वायुविकार, चव नसणे इत्यादि पचन विकारात अत्यंत गुण्कारी असुन अश्या प्रकारचे त्रासेस होत असल्यास क्रुपया सोडा पिउ नये, तर सारखे गरम (कोमट नव्हे) पाणि प्यावे खुप चंगला फरक पडतो. स्वानुभवावरुन सांगतो.

वाचन 11487 प्रतिक्रिया 0