मनसे व सीमावाद धोरण
मी तर यापुढे जावून असेही म्हणतो की जर मनसे ने सिमाभागात जर निवडणूका लढवल्या तर त्यांना जास्त फायदा होईल.ह्याबाबत सहमत ...!!! मात्र हे करणे तितके सोपे नाही असे मला वैयक्तिकरित्या वाटते. अवांतर : एखादा टक्का वाढला किंवा वाढत असेल तर एखाद्या प्रदेशाची पुनर्रचना हा एकदम धोकादायक कन्सेप्ट आहे. आपल्या मुंबईचाच विचार करा की राव. मुळात राज्य गठित होताना चुक झाली हे जरी मान्य केले तरी हे लॉजिक वापरणे चुकीचे आहे ... आज खुद्द बेंगलोरमध्ये कन्नड टक्का हा दुसर्या क्रमांकावर आहे, पहिला मान तमिळींचा, इथे हिंदी आणि मराठी भाषिकही मुबलक आहेत. नॉर्थईस्टवालेही डोळ्यात भरावे इतके आहेत. मग खुद्द बेंगलोरबाबत तुमचे काय मत आहे ? अति-अवांतर : ह्या बेळगाव धारवाडप्रमाणेच कर्नाटकाकडुन "सोलापुर, अक्कलकोट आणि इतर काही भाग" हा चुकुन महाराष्ट्रात गेला व तो त्यांना परत हवा आहे अशी भुमिका आहे. महाराष्ट्र सरकारने ह्या भागात विकासाच्या दॄष्टीने अजिबात लक्ष दिले नाही. एकदा जाऊन या ह्या उपरोक्त भागात व पाहुन ह्या किती वैराण आहे हा प्रदेश. खुद्द अक्कलकोटात महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकच्या येष्ट्या अधि पळतात. सोलापुरतली भाषिक आकडेवारी पाहिली तर मराठी, कन्नड आणि तेलगु अलमोस्ट समसमान आहेत. पण त्याच चालीवर जर आपण "बेळगाव" वगैरे पाहिले तर परिस्थीतीत जमिन आस्मानाचा फरक आहे. हा मुद्दा मी एवढ्यासाठी सांगत आहे की "सत्त्ताधार्यांची इच्छाशक्ती" किती महत्वाची ठरते ह्याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. बाकी अजुन खरडेन सवडीने ... तुर्तास एवढेच. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
In reply to हम्म् .... by छोटा डॉन
In reply to हम्म् .... by छोटा डॉन
In reply to महाजन by चिरोटा
In reply to महाजन by चिरोटा
In reply to काही मुद्दे by अभिरत भिरभि-या
In reply to कांहींही न करण्यासाठी छान समर्थन! by सुधीर काळे
खरंच महाराष्ट्र एकीकरण समितीने त्या काळी एकूण एक निवडणूक जिंकली तरीही हा सीमाभाग आपला नाहींच, उलट आपलीच कांहीं शहरे कर्नाटकाला द्यायला हवीत असे म्हणणारे लोक आपल्यात आहेत! जय महाराष्ट्र!मस्त ... कोण आहे बाबा इथे असे ? तुर्तास तरी ह्या धाग्यावर मांडलेल्या मतांमध्ये माझ्या प्रतिसादातल्या "ह्या बेळगाव धारवाडप्रमाणेच कर्नाटकाकडुन "सोलापुर, अक्कलकोट आणि इतर काही भाग" हा चुकुन महाराष्ट्रात गेला व तो त्यांना परत हवा आहे अशी भुमिका आहे." ह्या वाक्याचा आपण अपुर्ण संदर्भ घेतला असे माझे मत झाले आहे. मात्र त्याच वाक्यातील महत्वाच्या व अधोरेखीत शब्दांकडे आपले साफ दुर्लक्ष झाल्याचे मला वाटते. ते शब्द वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यास समर्थ आहेत, ह्याउप्पर मी काही बोलु इच्छित नाही. आता ह्यात आपले लोक ( पक्षी : ह्या धाग्याच्या संदर्भाने मी ) आपलीच शहरे कर्नाटला द्यायला हवीत असे कुठे आणि कसे म्हटले हे माझ्या अल्पबुद्धीला झेपले नाही. असो.
गेली कित्येक वर्षे मराठीचे पद्धतशीरपणे शिरकाण झाल्यावर आणखी काय होणार?ते कसे काय ? ह्याचा परिणाम भाषेवर कसा काय होतो ते मला अजिबात समजले नाही. जर प्रदेश बदलल्याने भाषाचे शिरकाण होत असते असा आपला समज असल्यास मी अधिक काही मत व्यक्त करु इच्छित नाही.
अशाच झोपा काढल्यास मराठी माणूस फक्त अमेरिकेतच सापडणार आहे?माझ्या माहितीप्रमाणे हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असुन कोर्टाने महाजन आयोग गठित केला आहे. दोन्ही सरकार तिथे त्यांच्यात्यांच्या बाजु मांडत आहेत. आता ह्याउप्पर कायदा हाता घेऊन आंदोलने करणे हे जरी मते अगर पब्लिसिटी मिळवण्यास साजेसे असते तरी ह्याचा ह्या मुद्द्याचा निकाल अथवा गुंता सोडवण्यास कणभर उपयोग नाही ह्याची आपल्याला कल्पना असेलच. मग आता ते समजुन जर मराठी माणुस झोपा काढत ( पक्षी : आपल्या नजरेने आंदोलने, तोडफोड, दंगा करत नसेल ) असेल तर आपल्याला काय वाटते की हे चुक आहे ? शिवाय त्यात "अमेरिकेचा" काय संबंध ? अमेरिकेतला तुमच्या नजरेतला "मराठी माणुस" हा जसा हवा होता तसा म्हणजे जळजळीत आंदोलने करणारा, तोडफोड, संप वगैरे करणारा आहे काय ? महाराष्ट्र सीमाविवादासाठी अमेरिकेत एवढे जोरदार आंदोलने चालु आहेत ह्याची मला खरोखर कल्पना नव्हती, इथल्या हरामखोर मिडीयाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले नाही का ! >>खरंच, किती हे महाराष्ट्र प्रेम! :) अरे हो, तुम्हाला खरे महाराष्ट्रप्रेम दाखवायचे असेल तर जळजळीत बोलावे लागते नाही का ! असो. " बेळगाव, कारवार, डांग सह संयुक्त महाराष्ट्र झालाच, कोण भां*द देत नाही तेच बघतो, तसे महाराष्ट्रात बांबु मिळणे अवघड नाही". झाले समाधान ? जय महाराष्ट्र !!! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
In reply to समर्थन .... by छोटा डॉन
In reply to डान्राव!!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to समर्थन .... by छोटा डॉन
In reply to >> "जर by पाषाणभेद
कर्नाटकात सीमाभागात पुर्वी मराठी माध्यमाच्या भरपुर शाळा होत्या. आता त्यांचे प्रमाण भयानक रित्या कमी केलेले आहे. आता कानडी धडे शिकल्याने ते मराठीशी एकरूप होतील का? मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास ते शिकतील का? मराठी साहित्य त्यांना समजणार का? नाही.ठाण्या-मुंबैत पूर्वी खूप मराठी माध्यमाच्या शाळा होत्या, आजही आहेत. पूर्वी मेरीट लिस्टमधे या शाळांची मुलं चमकायची. सुशिक्षित पालकांची मुलं याच शाळांमधून शिकायची, पण कमी शिक्षण असलेल्या पालकांनाही आपल्या पाल्यांनी याच शाळांमधे शिकावं असं वाटतं. अलिकडे या सगळ्या लोकांना इंग्लिश माध्यमाचं आकर्षण आहे. पूर्वी हौशी खगोलाभ्यासकांसाठी १००% मराठीतून कार्यक्रम व्हायचे. आज त्याच संस्थेचे बरेचसे कार्यक्रम, ९५% इंग्लिश आणि ५% मराठी असे होतात. कारण सगळे विद्यार्थी मराठी मातृभाषिक पण इंग्लिश माध्यमातले असतात. त्यामुळे कैतरीच काय? खरंतर मला लाज वाटते, मला ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम माहित आहे पण शेजारच्याच राज्यातल्या नरसी मेहेतांबद्दल त्यांच्या नावापुढचं काहीच माहित नाही. झाशीची राणी माहित आहे पण कित्तूरची चन्नम्मा माहित नाही. विजयनगरच्या दैदीप्यमान इतिहासाबद्दल आपल्यालातरी किती माहित असते की कन्नडीगांना शिवाजीराजांबद्दल प्रेम वाटावं? अदिती (आमचे वसंत कुलकर्णी मूळ बेळगावचे गेल्या चार पिढ्या कन्नडीगाच, पण मराठी गाणी, सारेगमप आवडीने बघतात. आणि वर मला मराठी भावगीतं किती सुंदर आहेत हे सांगतात.)
In reply to ही हा हा हा .... गुड जोक by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to >>ठाण्या-मु by पाषाणभेद
काळे काका बरोबर बोलले. :- "खरंच, किती हे महाराष्ट्र प्रेम!"ओहो, असं आहे तर ... आपला (म्हणजे फक्त महाराष्ट्राचा काही) इतिहास माहित आहे पण इतर राज्यांचा माहित नाही याचं वैषम्य वाटतं म्हणून आम्ही काय ते महाराष्ट्र-द्वेष्टे का? चालू द्यात ... काय बोलणार? एकूणच माझा मुद्दा असा आहे की भारत हा आपला देश आहे. कार्यालयीन आणि अॅडमिनीस्ट्रेशनच्या (मराठी शब्द ऐन वेळी विसरले) सोयीसाठी भारतात रेषा आखून राज्यं बनवली. तेव्हा ती रेषा थोडी इकडे-तिकडे सरकून मला काही फरक पडत नाही. तुम्हाला त्या रेषेवरूनच हट्ट करायचा असेल तर करा. तो चुकीचा आहे असं माझं मत आहे हे मी समजावण्याचा काही प्रयत्न केला. यावरून आमचं आमच्या राज्यावरचं प्रेमच काढणार असाल, (पक्षी: मुद्द्याला उत्तर देताना व्यक्तीगत हल्ले करणार असाल,) तर खरंच चालू द्यात ...गीता वाचण्याची फार हौस नाही मला. अदिती
केवळ सीमावाद हा महाराष्ट्र कर्नाटक आहे असे नाही. बारकाईने बघीतले असता हा वाद निप्पाणी, बेळगाव, कारवार, हुब्बळी तसेच मध्यप्रदेशात बर्हाणपूर, खंडवा, गुजराथ मधला अहवा, डांग जिल्हा (जाणकार या प्रदेशां बाबत मत व्यक्त करा.) आदी भागातही होवू शकतो. वरील सर्व भागांत मराठी टक्का जास्त आहे. वरील भाग महाराष्ट्र 'स्वतंत्र' होत असतांना चुकीने इतर राज्यांत घातले गेले आहेत.बर्हाणपूर, खंडवा या भागात मराठी लोक मोठ्या प्रमाणात आहेत, पण बहुसंख्याक नाहीत. केवळ मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या आहे म्हणून त्यांचे राज्य होऊ शकत नाही. या अर्थाने मग एकेकाळी इंदूरमध्ये मराठी लोक बहुसंख्य होते. पण आजूबाजूला हिंदी भाषकांची संख्याच जास्त होती. नंतर मोठे शहर असल्याने इथे बरेच लोक येत गेले आता मराठी भाषक मोठ्या प्रमाणात असले तरी बहुसंख्याक नाहीत. म्हणून मराठी भाषकांच्या राज्याला जोडण्यात हशील नाही. मुळात संस्कृती, भाषा टिकविण्यासाठी मानसिकता पाहिजे. इथल्या मंडळींनी मराठी संस्कृती कशी टिकवली यावर मी इथे मागे काही लिहिलय. जमल्यास जरूर वाचा. आणि हो, कोणत्याही राजकीय पक्षाच्या खांद्यावर बंदुक ठेवून संस्कृती, भाषा वगैरे गोष्टी टिकवण्यापेक्षा स्वतः त्याचा आग्रह धरल्यास आणि तो अमलात आणल्यास उत्तम.
मनसेचे 'कडक' धोरण मराठी जनतेला फायद्याचे रहाणार आहे. मी तर यापुढे जावून असेही म्हणतो की जर मनसे ने सिमाभागात जर निवडणूका लढवल्या तर त्यांना जास्त फायदा होईल.मनसेचा नक्कीच फायदा होईल. पण त्यामुळे सीमाप्रश्न सुटेल काय? पूर्वी शिवसेनेच्या बाबतीत लोक असेच म्हणायचे. शिवसेना सत्तेवर आल्यास मराटी माणसाचे प्रश्न सुटतील. मी अजूनही सुटलेले प्रश्न शोधतोय.
असो. या पुढील काळात ज्याची भूमी जास्त तो प्रदेश बलवान असेल असे घडेल. (हे प्रत्येक राष्ट्राबाबतीत होवू शकते व महाराष्ट्र हे एक राष्ट्रच आहे.) जास्त भुमी म्हणजे जास्त नैर्सगीक संपदा (रिसोर्स), जास्त फायदा हे साधे गणित आहे. मनसेने (किंवा कोणत्याही पक्षाने) सीमावाद संपवण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहीजे ही काळाची गरज आहे. अन्यथा प्र. के. अत्रेंचे नावपण घेण्यास आपण लायक नाहीत असे मला वाटते.-- हे जरा अंमळ स्पष्ट करून सांगाल तर बरं होईल. सद्यस्थितीत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान ही राज्ये आकारमानाच्या दृष्टीकोनातून सर्वांत मोठी आहेत. त्यात उत्तर प्रदेशातली लोकसंख्याही जास्त आहे. याचा अर्थ युपी बलवान आहे असे म्हणायचे काय? मुळात बलवान म्हणजे कोणत्या अर्थाने? आर्थिक स्थिती, नैसर्गिक साधनसंपत्ती, मनुष्यबळ की अन्य काही? यात आर्थिक स्थिती या निकषाच्या आधारे महाराष्ट्र, गुजरात ही राज्ये बलवान आहेतच. पण नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत बिहार, झारखंड, छत्तीसगड जास्त बलवान आहेत. मध्य प्रदेशात वने जास्त असल्याने ते म्हणजे भारताचे ह्रदय मानले जाते. आणखी एक. महाराष्ट्राला राष्ट्र म्हणून स्थापित करण्याचा हट्ट का? आत्ता आहे त्या संघराज्यीय व्यवस्थेत काही त्रुटी नक्कीच असतील, पण म्हणून ती फेकून देण्यासारखी परिस्थिती किमान आत्ता तरी निर्माण झाल्यासारखे वाटत नाही. बाकी छोट्या डॉनच्या प्रतिसादाशी सहमत. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
In reply to केवळ by भोचक
In reply to केवळ by भोचक
In reply to भोचकराव:-इ by पाषाणभेद
भोचकराव:- इंदूरच्या मुद्याची व सीमाभागातल्या वादाची आपण गल्लत करत आहात. सीमाभाग लक्षात घ्या. (बफर झोन) इंदुर मध्यप्रदेशाचेच आहे हो. ते कोण मागते आहे. त्याचप्रमाणे आम्ही बंगलारू नाही मागत आहे. बेळगावच मागतो आहे ना?बेळगावच्या अनुषंगाने इतर ज्यात वाद फारसे उरलेले नाहीत, असे प्रदेश तुम्ही ओढत आहात. बेळगाव महाराष्ट्रात यावे ही मागणी योग्य आहे. त्यासंदर्भात सनदशीर कार्यवाही सुरू आहे. पण जो प्रदेश आपण म्हणता, त्या प्रमाणे बर्हाणपूर, खांडवा भाग वादग्रस्त नाही. इथे मराठी भाषक जास्त असले तरी त्यांनी आपल्याला महाराष्ट्रात सामील करावे अशी मागणी कधी केलेली नाही. तशी आंदोलने वगैरेही तिथे झाली नाही. त्यामुळे उगाचच प्रश्न उभा करून तिथेही अस्थिरता निर्माण करण्यात काय हशील आहे?
बाकी ईतरांपेक्षा मनसेचे विचार स्पष्ट आहेत. आपल्याला कदाचीत पटणार नाही. म्हणून लेखाच्या आधीचे डिस्केमर वाचा. तुम्ही तुमच्या आवडीच्या पक्षाचेपण नाव सीमाप्रश्नाच्या रिलेशनमध्ये टाकू शकतात. (हौ फ्लेक्झीबल इट ईज ना? प्रश्न एक पक्ष अनेक.)कुणी कुणाचे विचार अनुसरावे हे मी ठरवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही एकदा मनसेचा चष्मा डोळ्यावर चढवल्याने अमुक एक गोष्ट अशीही दिसते हे मी कितीही सांगून काहीही फरक पडणार नाही. राजकारणातली मंडळी आणि त्यांचे राजकारण माझ्या व्यवसायाच्यानिमित्ताने मी जवळून पहात असल्याने त्यांचे विचार, धोरणे यांचे दीर्घकालीन परिप्रेक्ष्यात काय होते हेही पाहिले आहे नि अभ्यासलेही. सर्वच पक्ष हे माझ्या अभ्यासाचे विषय आहे. त्यात आवडीनिवडीचा भाग येत नाही.
>> "असो. या पुढील काळात ज्याची भूमी जास्त तो प्रदेश बलवान असेल असे घडेल. ....... अन्यथा प्र. के. अत्रेंचे नावपण घेण्यास आपण लायक नाहीत असे मला वाटते. हे जरा अंमळ स्पष्ट करून सांगाल तर बरं होईल. " अहो ते एक युनिव्हर्सल सत्य आहे. सीमाभाग व पुर्ण मोठा प्रदेश यात आपण गल्लत करत आहात. मी पुर्ण कर्नाटक किंवा झारखंड महाराष्ट्रात आणायची गोष्टच करत नाहीए. फक्त 'बफर झोन' आम्हाला द्या. तेच न्याय्य आहे. जेन्याय्य तेच आम्हाला मिळो. भैट्यांसारखी आमची वृत्ती नाही. हे युनिव्हर्सल सत्य कसे काय बुवा हे कळले नाही. जपान, जर्मनी, फ्रान्स, अगदी ब्रिटन हे देशही आकारमानाने फार नाहीत. त्यातल्या ब्रिटनने तर भारतासारख्या अवाढव्य देशावर राज्यही केले आहे. आकाराने बलवान नसतानाही त्याने हे केले. त्याचवेळी अवाढव्य चीनवर चिमुकल्या जपानने वरवंटा फिरवला होता. त्याचवेळी आत्ता इस्त्रायलसारखे चिमुकले राष्ट्र आजूबाजूच्या बड्या मुस्लिम राष्ट्रांविरोधात लढतेच आहे की. त्यामुळे आकाराचा संबंध ताकदीशी लावण्यात आपली काही गल्लत होते आहे हे नक्की.
>>>..."आणखी एक. महाराष्ट्राला राष्ट्र म्हणून स्थापित करण्याचा हट्ट का? " कोण म्हणते महाराष्ट्र वेगळा करा म्हणून? प्रत्यक्ष राज ठाकरेंनीही असली बेताल नक्षली वक्तव्य केलेली नाही. कृपया पराचा (आपला मिपाचा नाही हो!) कावळा करू नका. नाहीतर मनसे म्हणजे फुटीरतावादी पक्ष आहे असे मध्यप्रदेशातले , इंदुरातले लोकं समजायला लागतील. राजसाहेबांच्या भाषणानंतर प्रत्येक वेळी 'भारतीयच' राष्ट्रगीत म्हटले जाते. आम्ही आमची हक्काची भूमीच मागतो आहे.खाली तुम्हीच लेखात लिहिलेला वाक्यांश देतो आहे. त्यातून काय अर्थ निघतो ते समजावून सांगा.
असो. या पुढील काळात ज्याची भूमी जास्त तो प्रदेश बलवान असेल असे घडेल. (हे प्रत्येक राष्ट्राबाबतीत होवू शकते व महाराष्ट्र हे एक राष्ट्रच आहे.) जास्त भुमी म्हणजे जास्त नैर्सगीक संपदा (रिसोर्स), जास्त फायदा हे साधे गणित आहे. मनसेने (किंवा कोणत्याही पक्षाने) सीमावाद संपवण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहीजे ही काळाची गरज आहे. अन्यथा प्र. के. अत्रेंचे नावपण घेण्यास आपण लायक नाहीत असे मला वाटते.--- अतिअवांतर- माझं सासर बेळगावचंच आहे. बायकोही सीमेच्या अलीकडे नि पलीकडे राहिलेली आहे. शिवाय आमचे काही मित्रही थेट बेळगावतले आहेत. त्यांच्या मते आमची आता महाराष्ट्रात यायची इच्छा नाही. आम्ही इथे रूळलेलो आहोत. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
In reply to पाषाणभेद वगैरे.. by भोचक
In reply to मुळात हा by पाषाणभेद
आता तेथील मराठी जनता कर्नाटकात आहे म्हणून पाळते पाट्यांचे नियम. मराठी जनता सोशीक आहे तेच लक्षात येते.याचा बेळगावशी काय संबंध?
पण वाद का लांबवला जातो? ३ पिढ्या खपल्यात. जुन्या जखमा भरत आल्यात आता नविन जखमा होत आहेत.एग्गजॅक्टली! अधूनमधूनच का याची आठवण होते? विसरून जा, आणि आपपल्या घरात सुखाने रहा.
आकडेवारीच सांगते तसे. आता बेळ्गावात किती मराठी शाळा चालू आहेत व पुर्वी किती होत्या?हे पहाण्यापेक्षा तिथे बेकारी किती आहे, शिक्षण किती आहे इ.इ. गोष्टी महत्त्वाच्या आहेत का नाहीत? बाकी कृपाशंकर सिंग जर महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सहन होत नाहीत तर त्यांना विजय मोरे सहन होत नाहीत याचा दुस्वास का? म्हणे (संदर्भ मागू नये म्हणून म्हणे उपयुक्त असतं) स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते, "बेळगाव महाराष्ट्रात असो वा कर्नाटकात, ते भारतात असेपर्यंत मला वाईट वाटत नाही." तवांग, अक्साई चायना, पाकव्याप्त काश्मीर यावर भांडण योग्य आहे. बेळगावात जायला मला व्हीजा लागत नाही, त्यामुळे मला व्यक्तीश: काही फरक पडत नाही. (अनेक कन्नडीगांची मैत्रिण) अदिती
In reply to दोन्ही बाजूंनी हेच मुद्दे लागू होतात. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to दोन्ही बाजूंनी हेच मुद्दे लागू होतात. by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मुळात हा by पाषाणभेद
मुळात हा लेख मनसेने सीमाभागात जास्त लक्ष घालून या बाबत आपले धोरण सुस्पष्ट केले पाहीजे यावर केंद्रीत होता.हो ना, ते कुठे आम्ही अमान्य करतो आहे. मनसेने तुर्तास आपली भुमिका स्पष्ट करावी पण कायदा हातात घेऊन वागु नये असे आमचे आहे ( तुमचे ह्याच्या विरुद्ध दिसत आहे ), जेव्हा केव्हा त्यांचे सरकार येईल मग तेव्हा त्यांना अॅथॉरिटी मिळेल की ते कोर्टात जाऊन भांडुन निकाल आपल्या बाजुने आणु शकतात. तुर्तास अधिक काही करणे अपेक्षित आणि गरजेचे नाही.
जे आहेत ते प्र्याक्टीकल विचार आहेत. व सिमावादाबद्दल 'प्र्याक्टीकलच' विचार न्याय देईल.आमच्या दॄष्टीने व कायद्याच्या परिभाषेत प्रॅक्टिकल काय आहे तेच आम्ही पुर्वीच्या प्रतिसादात आणि सध्या वरच्या परिच्छेदात लिहलेले आहे. बाकी सर्व डोकी भडकावुन सत्तेच्या पोळीवर तुप ओढायच्या गोष्टी आहेत असे आम्हाला वाटते. असो, आपण ह्याला "असहमत" आहात असे म्हणता, हरकत नाही.
पण जी तोडफोड होते ती पोलीसांसमक्ष होते. राज्यसरकारचे त्याला उघड उघड समर्थन असते.राज्यसरकार जरी त्यांच्या पाठीशी असले तरी समर्थन कितपत मिळते ह्याची मला कल्पना नाही, थोडी चौकशी करुन मग उत्तर देतो. मात्र राज्यसरकार पाठीशी असण्यामागे त्यांचे "कर्तव्य" ही गोष्ट महत्वाची ठरते. बाकी पोलिसांसमक्ष तोडफोड ह्याला थोडी वेगळी परिमाणे असतात, बर्याचदा लोकल इंटरेस्ट्स आणि राजकिय हस्तक्षेप ह्यामुळे पोलिसांना आपली भुमिका बदलावी लागते. आपल्याला हवी असल्यास खुद्द आपल्या महाराष्ट्रातली उदाहरणे मी देऊ शकतो पण ती "वादग्रस्त" आहेत.
मला सांगा, कालच्या घटनेत किती 'कन्नड र्क्षण वेदीका' च्या लोकांना अटक झाली?सध्या कायदा "कन्नडिगांच्या बाजुने" असल्याने अटक कशासाठी करावी असा प्रश्न पोलिसांसमोर असु शकतो, जर मारहाण किंवा मालमत्तेचे नुकसान होत असेल तर पोलिस बहुदा अॅक्शन घेतात कारण समोरचेसुद्धा गप्प बसत नाही व केंद्र सरकार तसेच सुप्रिम कोर्ट ह्यांच्या प्रेशरमुळे त्यांना अॅक्शन घ्यावी लागते. मात्र निदर्शने, पाट्यांना काळे फासणे, कन्नड पाट्यांचा आग्रह वगैरे सर्व गोष्टी सध्यातरी कायद्यात तंतोतंत जरी बसत नसल्यातरी अगदीच धक्कादायक नाहीत.
मुळात वादग्रस्त प्रदेशात (बफर झोन -गाझा पट्टी सारखा) दोन्ही दिन साजरे होतीलच. 'मनसे' विचार तेथेही आहेतच. त्याला राज्यसरकारचे समर्थन आहेच.हा हा हा. कुठला संदर्भ दिलात राव, काही संबंध आहे का ह्याचा ? तो गाझा पट्टी विवाद हा २ भिन्न देशांमधला आहे की ज्यांचे कायदे अत्यंत वेगळे आहेत व दोन्ही देशांची सर्वभौम सत्ता आणि सरकार अस्तित्वात आहे. मग त्याला कोणाच्या तागडीत तोलणार ? पण आपला सिमाप्रश्न भारतीय संविधान आणि सुप्रिम कोर्ट ह्या दोन्हीच्या कक्षेत येतो, ह्यांचे कायदे इथे लागु आहेत. हाच मुलभुत फरक आहे. बाकी दोन्ही दिन साजरे करण्याच्या संकल्पनेला एक महत्वाचा "कच्चा दुवा" आपण विसरता आहात, तो कर्नाटकचा "विजयोत्सव म्हणजे राज्यदिन" आहे, जर त्याच दिवशी काही लोक राज्यातल्या काही भागात काळे झेंडे लाऊन "काला दिन" पाळत असतील तर वाद होणार नाहीत का ? अजुन एक महत्वाचा मुद्दा की जो मी काल वेळेअभावी लिहु शकलो नाही. सध्याचा वादग्रस्त सिमाभाग हा ऑलरेडी कर्नाटक राज्यात सामिल केला गेलेला आहे, भारत सरकारच्या प्रत्येक संबंधित कागदपत्रात त्याचा उल्लेख कर्नाटक राज्यात्ला प्रदेश म्हणुन होतो. तो "वादग्रस्त अथवा अशांत टापु" म्हणुन घोषित करुन वेगळा ठेवलेला नाही की जेथे कुणाचेच कायदे लागु होणार नाहीत. सध्या तो कर्नाटकमध्ये आहे म्हणुन इथे कर्नाटकचेच कायदे आपल्या संविधानुसार लागु होणार. आता उपाय एवढाच आहे की कोर्टात लढुन तो भाग परत मिळवणे. सध्या एका राज्यात अस्तित्वात असलेल्या प्रदेशासंबंधी वाद आणि वेगळा "वादग्रस्त टापु" ह्या अत्यंत वेगळ्या पातळीवरच्या गोष्ती आहेत ( तुम्ही वर गाझाचे उदाहरण दिले म्हणुन हे सांगितले ).
मागचे मेडीयाचे रेकॉर्ड बघीतले तर वेगवेगळ्या विचारधारांच्या वृत्तपत्रात या संदर्भात बातम्या 'मराठी टक्क्यावर' अन्याय झाला आहे हेच दाखवतात.मराठी पेपरमध्ये येणार्या बातम्यांच्या टक्केवारी आणि वारंवारतेबाबत मी आपल्याशी सहमत आहे. मात्र कुणाला कन्नड येत असेल तर त्याने कॄपया कन्नड वॄत्तपत्रांमध्ये काय आले होते ते कॄपया इथे द्यावे. दोन्ही बाजुं नक्की काय भुमिका घेतात हे पहाणे महत्वाचे आहे.
दै. सामना तर त्यांच्या युतीचे मुखपत्र आहे. त्यातही अशा बातम्या सापडतील.माफ करा. "दै. सामना" ह्या वॄत्तपत्रावर आजकाल आमचा अजिबात विश्वास राहिला नाही, तेवढे सोडुन बोला.
जेणेकरून हळूहळू मराठी टक्का कमी होत जावा. आकडेवारीच सांगते तसे. आता बेळ्गावात किती मराठी शाळा चालू आहेत व पुर्वी किती होत्या?आकडेवारी आणि इतर सांखिकी सोडा हो. मला एवढेच कळते की आजसुद्धा बेळगावात भरपुर मराठी लोक आहेत, ते मराठीत बोलतात, व्यवहार करतात, दुकानाच्या पाट्या मराठीत आहेत, मराठी सिनेमे/ नाटक पहातात, मराठी पेपर आणि मासिके आरामात मिळतात वगैरे वगैरे ... फक्त ह्या विवीक्षित कालखंडात थोडी समस्या निर्माण होते, दोन्ही बाजुचे नेते येऊन मुक्ताफळे उधळुन वाफेचे ढग जमवतात व त्यामुळे हे ३-४ दिवस तिथल्या मराठी माणसांचे आयुष्य जरा विस्कळीत होते. बाकी इतर दिवशी ते आरामात आणि मस्त जगत असतात. नेत्यांचेही इतर वेळी आपापले इतर व्यवहार चालु असतात, काय समजलात ?
तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे ना? मग ज्या वेळी मराठी टक्काच तेथे होता त्याच वेळी (सीमावाद 'ताजा' असतांनाच) का नाही तेथे जनमत घेण्यात आले? म्हणजे महाराष्ट्र जन्माला येत असतांना संघर्षात कुणाचे या सीमावादाकडे लक्ष जावू न दिले व आता त्या बाबत ओरड केली असता आम्हांस काठ्या? व्वा रे न्यायव्यवस्था!तेच सांगत आहे मी केव्हापासुन. माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर अत्यंत प्रगाढ विश्वास असल्याने हा विवाद त्याच माध्यमातुन सोडवावा हे मी ओरडुन सांगत आहे. पुर्वी जे झाले ते चुक आणि अन्यायकारण होते असे महाराष्ट्र सरकारने कोर्टात प्रुव्ह करावे हाच माझा आग्रह आहे, बाकीच्यांना उगाच पकपक करण्यात अर्थ नाही, फार फार तर पेपरांनी ४-८ दिवस मसाला मजकुर मिळेल पण मुळ मुद्दा आहे तिथेच राहिल.
एक लक्षात घ्या की न्याय देणारे माणसेच आहेत. ते खरेदी केले जावू शकतात. हवा तो न्याय 'मिळू' शकतो,असे म्हणल्यावर विषयच संपला !!! हे विधान माझ्या तत्वांशी विसंगत असल्याने मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही, तुर्तास माझा विश्वास आहे हेच खरे. बाकी आपल्या महाराष्ट्रातसुद्धा "वजनदार" नेते आहेतच की, त्यांनी जाऊन न्याय खरेदी करुन आणावा, कसे ? कुठल्यातरी पद्धतीने वाद मिटल्याशी मतलब ;)
असे असेल तर येत्या २०/२५ वर्षांच्या काळात मुंबई ही उत्तर प्रदेशात सामावून उत्तर प्रदेशाची राजधानी घोषीत केली जावू शकते.प्रचंड म्हणजे प्रचंड आणि मुलभुत गल्लत होते आहे. हे भाषावार प्रांतरचना वगैरे सरकारचे वार्षिक उद्योग नाहीत, ते फक्त एकदाच केले गेले. उद्या कोणी उठुन आजच्या टक्केवारीच्या बेसवर अशी मुर्खासारखी मागणी केली तर त्याकडे कोणी ढुंकुनही पाहणार नाही. तुम्ही चुकीचे संदर्भ चुकीच्या ठिकाणी देत आहात ...
आजही भैये, बिहारी महाराष्ट्रात "तेवढ्याच निवांतपणे " जगतात म्हणजे त्यांनी मुंबई 'सगळ्यांचीच' असा हाकारा करावा काय?हम्म्म् .... पुन्ह तोच विसंगत मुद्दा, मुंबई ही पुर्वी युपी/बिहार्यांची होती व ती आता अन्यायाने महाराष्ट्रात जोडण्यात आली आहे असे आपण कुठे वाचले हो ? हा मुद्दा अत्यंत वेगळा नाही का ? मुळचे रहिवासी आणि स्थलांतरीत ह्यातला मुलभुत फरक जरा पाहिला तर हा मुद्दा आपलया वाद-प्रतिवादात "फाऊल" म्हणुन का पकडु नये ?
ब्रिटन, अमेरीका, पुर्व एशीया, मालदिव येथे भारतीय टक्का जास्त आहे. तेथे ते तेवढ्याच निवांतपणे जगतात. म्हणजे त्यांनी भारतीय नियम, भाषा भारतीय धांगडघींगा घालावा असे आहे काय? फोडून काढतील सगळ्यांना.वरचे मुंबई संदर्भात दिलेले उत्तर वाचावे. आपली मुळचे रहिवासी आणि स्थलांतरित ह्यात प्रचंड गल्लत होत आहे. अजुन जास्त मी काय लिहु ?
तर सरकारे 'ईनडायरेक्ट' मान्य करतात की सीमावाद आहे तर. मग सोडवा ना? बैठका घ्या. मतदान घ्या. सोडवा प्रश्न.करेक्ट ...!!! आम्ही तेच म्हणतो आहे. "सरकारने" बैठका आणि चर्चा करव्यात, सध्या "मनसे" ने तुर्तास तरी कसली भुमिका घेऊन रस्त्यावर उतरण्यात शहाणपण नाही हाच आमचा मुद्दा आहे. बाकी ते आयोग वगैरे ऑलरेडी तयार आहे, फारफार तर "मनसे" ह्य प्रकरणी सध्या आपल्या विधानसभेमध्ये हंगामा करून आपल्या सरकारवर प्रेशर आणु शकते की हा वाद तडीस न्ह्या म्हणुन, त्याला मी समर्थन देतो, अन्य काही आक्रस्ताळे मार्ग नको.
त्यांनी "इतर" असे काय "परिमाणे" केली की त्यांना काळे फासले जाते?प्रत्येक गोष्टी मागे काही स्थानिक संदर्भ असतात, थोडी चौकशी करा बरीच माहिती मिळेल ह्या मुद्द्याबाबत. केवळ "मराठी" आहे म्हणुन मारहाण झाली असा "गैरसमज" असेल तर मात्र मी चौअक्शी करा एवढेच सुचवेन.
बेळगावात मराठी झेंडा लावू दिला जात नाही. केवळ मराठी महापौर नसावा हीच वृत्ती याठिकाणी दिसुन आली.मराठी झेंडा म्हणजे नक्की काय ? महाराष्ट्राचा झेंडा म्हणायचे आहे काय ? तो कसा असतो ? शिवाय तो सध्या "कर्नाटकात असलेल्या प्रदेशात सरकारी इमारतींवर लावणे म्हणजे कायदा तोडणे" आहे ह्याची आपल्याला कल्पना आहे काय ? हे बंड नव्हे काय की जेव्हा वाद ऑलरेडी कोर्टात चालु आहे. त्यांचा निर्णय येण्याच्या आधी स्वतःच्या स्वतः निर्णय घेण्याबाबत आपले काय मत आहे , खासकरुन सरकारी मालमत्तेबाबत ?
३ पिढ्या खपल्यात. जुन्या जखमा भरत आल्यात आता नविन जखमा होत आहेत.काही नव्या जखमा वगैरे होत नाहीत. उगाच राजकारण्यांकडुन माथी भडकावुन इश्श्यु अवघड बनवला जात आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख ५ पैकी सध्या ३ पक्ष राष्ट्रिय आहेत व सह्द्या दोन्ही प्रदेशात सत्तेवरही आहेत. ह्यांच्या राष्ट्रिय कमिटीची काय भुमिका आहे हे स्पष्ट झाले की वाद आपोआप सुटेल. सध्या तेच होते नाही हे दुर्दैव !
मनसेच्या नावातच 'महाराष्ट्र' आहे. म्हणून तो 'सीमावादाला' जवळचा आहे. असो.=)) "
महाराष्ट्रएकीकरण समिती" बद्दल आपले मत काय आहे ? ही खास ह्याच हेतुसाठी स्थापन झाली. ह्यांच्या व्यासपिठावर महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षाचे महत्वाचे नेते येऊन तोंडाच्या वाफा सोडुन गेले. खरे काम केले असेल तर अत्रे, प्रबोधनकार, बाळासाहेब गैरे लोकांनी. बाकी सर्व तमाशा हो ! बाकी "मनसे" ने स्पष्ट भुमिका घ्यावी व आपल्या विधानसभेत सरकारला धारेवर धरावे ह्याच्याशी सहमत आहे.
मुळात मुद्दा सीमाभागातला आहे. (बफर झोन). इंदुर, बंगलारू इ. सारख्या 'आयलंड' भागातला नाही. (भोचकरावांनी पण हा मुद्दा वाचावा. त्यांच्या प्रतिसादात द्विरूक्ती करू इच्छीत नाही. ) म्हणजे राज्य गठित होताना चुक झाली हे आपण (नो पर्सनल) मान्य करतात तर. मग सोडवाना तो अन्याय.तेच चालु आहे, फक्त आपण विधायक आणि योग्य पण सतर्क अशी भुमिका घेणे महत्वाचे आहे हेच मी वारंवार ओरडुन सांगत आहे.
बंगलारू कर्नाटकाचेच आहे व राहील त्याबाबत आमची भुमीका स्पष्ट आहे. मी उद्या बंगलारू ला स्थाईक झालो तर पहिल्यांदा कानडी शिकेल. दुकान काढले तर पाटी कानडीतच लिहील. वाईट काय आहे त्यात. मी मराठी सोशीक आहे. पण मी सीमाभागात पानटपरी टाकली किंवा बेळगावात हॉटेल टाकले तर पहिले नाव मराठीतच देईन. बाकी पोलीस, दंगा नको म्हणून दुसरे नाव कानडीत टाकेल. पण तेथे मी सोशीक रहाणार नाही.ह्याबाबत आपले अभिनंदन ... !!! माझे विचार काहिसे वेगळे आहेत पण धाग्याशी संबंधित नसल्याने मी इथे उगाच त्यासाठी जागा खात नाही.
बाकी काही दिवसांत बंगलारूची मुंबई होते का ते पहाणे उत्सूकतेचे ठरेल. ते लोकं काही आपल्यासारखे झोपलेले नाही मुंबई व्हायला म्हणा.यु सेड इट ...!!! नाहे एहोणार बेंगलोरची मुंबई वगैरे ...
मला सांगा, सोलापुर, अक्कलकोट आणि इतर काही भागांत किती कन्नडी लोकांवर अन्याय झाला आहे?तुर्तास इथली कन्नड जनता "पदरी पडले आणि पवित्र झाले" म्हणुन आहे ते अॅक्सेप्ट करत आहे, उद्या पुढे मागे निदर्शने किंवा आंदोलने चालु केली व १ मे ह्या दिशवी काळे झेंडे लाऊन बसली तर "तश्या" बातम्या वाचायला मिळतील ह्याची खात्री बाळगा. मातर सध्या ह्या भागत हे लोकं "आपण भले आणि आपले काम भले" असे वागुन बहुसंख्य उद्योग आपल्या कब्जात घेऊन बसले आहेत असे आम्हाला दिसते. बाय अद वे, आता आम्हीही त्यांना परके मानत नाही आणि त्यांनाही महाराष्ट्र तेवढाच स्वतःचा वाटतो हे सत्य आहे. जी काही किरकिर होते ती सरकारी पातळीवर आणि संधिसाधु नेत्यांच्या माध्यमातुन होते, सामान्य जनता ह्यापासुन अलिप्त आहे :)
त्यांच्या मुलांना बळजबरी कानडी शाळेत जावे लागते हे काय कमी आहे. अहो कानडी शिकले की कानडी धडे, कानडी संस्कार, आचार विचार येतो. कानडी पिढी वाढते, कानडी टक्का वाढतो, मराठी कमी होतो. 'मुळ वादाला' कुजत ठेवले जाते.मला ह्यावर एक शेप्रेट लेख लिहावा लागेल. कन्नड शाळात बळजबरी (? कारण सरकारी सोडली तर अजुन इतर माध्यमे शिक्षणासाठी उपलब्ध आहेत असे आम्हाला ज्ञात आहे ) जात असले तरी बाकीचे पटण्यासारखे नाही. तुर्तास करियरसाठी देशांतरकेलेल्यानी तिकडे मराठी शाळा नसल्याने त्यांच्या मुलांच्या व पर्यायाने स्वतःच्या आचारविचार, संस्कार आणि अस्मितेवर काय परिणाम होतो कहे कॄपया पाषाणभेदांना सांगावे.
तसेच बेळगाव मोठे शहर आहे. तुम्ही सोलापूरचाच विचार करा तुम्ही कानडी असल्यासारखे. सोलापूरही बेळगावाईतकेच विकसीत आहे.असहमत आहे. पण विस्ताराच्या भितीने आणि मुळ मुद्द्याशी तसा डायरेक्ट संबंध नसल्या कारणाने "नो कमेंट्स" असे म्हणतो.
जय मनसे प्रवृत्ती ! 'मनसे' ही एक मानवी प्रवृत्ती आहे हे लक्षात घ्या.होय, हे एक मह्त्वाचे. ही "मनसे प्रवॄत्ती" नक्की काय आहे हे जरा समजावुन सांगाल काय ? काही नवे तत्वज्ञान वगैरे आहे का की ज्याने जादुच्या कांडीसारखे सर्व प्रश्न सुटतात ? असो, विषयाशी संबंधित नसल्याचे आपल्याला वाटत अस्ल्यास खरड किंवा व्यनीद्वारे कॄपया मला "मनसे प्रवॄत्त्ती" समजुन द्यावी अशी मी आपणास विनंती करतो. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
In reply to बेळगाव - महाराष्ट्राचे की कर्नाटकाचे ?? by अभिरत भिरभि-या
मनसे हा