उर्दू (देवनागरीत) किंवा हिंदी लिहितांना चंद्रानुस्वार वारंवार लागतात. मिपावरील गमभन सॉफ्टवेअर वापरताना 'उ'कार सोडून 'आँटी', 'कँटीन'सारखे शब्द लिहिता आले, पण हूं, यूं घूं येईनात. 'बराहा'मध्ये ते कसे लिहायचे ते माहीत होते पण 'गमभन'मध्ये लिहिता येई ना.
म्हणून मी कांहीं निवडक लोकांना "'ऊ'कारावर चंद्रानुस्वार कसा द्यायचा हे कुणी सांगू शकेल काय?" हा प्रश्न विचारला उदा: "घूंघट"मधला घूं , "यूं तो हमने"मधील यूं, "मैं नशेमें हूं"मधील हूं वगैरे
बर्याच लोकांनी त्यांनाही माहीत नाही असे कळवले, पण 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले. पाठोपाठ पाषाणभेद व शेवटी 'मस्त कलंदर' यांनीही या प्रश्नाला उत्तर दिले.
बर्याच लोकांना ही अक्षरे कशी लिहायची हे माहीत नसावे असे वाटल्यावरून मी ती युक्ती सर्वांना सांगण्याच्या उद्देशाने इथे देत आहे. आभार मानायचे असल्यास वरील तीघांचे मानावे!
H+shift+E+shift+M+shift+U=हूँ
Y+shift+E+shift+M+shift+U=यूँ
GH+shift+E+shift+M+shift+U=घूँ
Enjoy this addition to your knowledge!
मला गमभन लिहिताना एकाद्या ठिकाणी मागे जाऊन लिहितांना एक 'भुताटकी'चा अनुभव येतो. अचानकपणे आधी छान लिहिलेला शब्द नव्या शब्दाबरोबर मारामारी करतो व भलतंच काहींतरी लिहिलं जातं. बरहा किंवा लोकसत्ता-फ्रीडम वापरताना अशी भुताटकी भेटली नाहीं कधी.
याबद्दल मी 'गमभन'च्या वेबसाईटवर जाऊन तिथे मिळालेल्या गृहस्थाना उदाहरणासह लिहिले, पण अद्याप उत्तर आलेले नाहीं.
आता काय केल्याने ते होत नाहीं हे कळले आहे, पण का होते ते कळलेले नाहीं. त्यामुळे जर चुकून काळजी घेतली नाहीं तर पुन्हा भलतंच लिहिलं जातं. तरी इथे कुणाला माहीत असल्यास सांगावे.
सुधीर
वाचने
7354
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>
पाषाणभेद हे बाप्पैगडी आहेत कीं विदूषी?
In reply to >> by दशानन
Profile
In reply to पाषाणभेद हे बाप्पैगडी आहेत कीं विदूषी? by सुधीर काळे
प्रकाटाआ
In reply to Profile by पाषाणभेद
धन्यवाद
In reply to पाषाणभेद हे बाप्पैगडी आहेत कीं विदूषी? by सुधीर काळे
अरे वा!
+१
In reply to अरे वा! by सहज
+२
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
+३
In reply to +२ by टारझन
+४
In reply to +३ by अवलिया
धन्यवाद!
मुलांनो,एक
"याबद्दल
"हां" वर चंद्रबिंदू कसा काढायचा
धन्यवाद
हाँ..खाँ
धन्यवाद
In reply to हाँ..खाँ by प्रमोद देव
युनिकोड
युनिकोड तर आहेच
In reply to युनिकोड by आनंद घारे
पहिले टॅग
In reply to युनिकोड तर आहेच by धनंजय
संस्कृत आणि मराठी असा परिच्छेद लिहीत होतो
In reply to पहिले टॅग by Nile
खरं तर मी
In reply to संस्कृत आणि मराठी असा परिच्छेद लिहीत होतो by धनंजय
आता ही विद्या मलाही शिकवा
In reply to पहिले टॅग by Nile
द्विभाषिक संगणक
In reply to युनिकोड तर आहेच by धनंजय
अरे वा!
In reply to द्विभाषिक संगणक by आनंद घारे
तोच कीबोर्ड
In reply to अरे वा! by Nile
Got it, thanks.
In reply to तोच कीबोर्ड by आनंद घारे
ट्रान्सलि
In reply to तोच कीबोर्ड by आनंद घारे
ये हुई ना
In reply to ट्रान्सलि by विंजिनेर
तिरपा टॅग
मी या शनिवारी-रविवारी प्रयत्न करून पाहीन.
हो प्लिज
In reply to मी या शनिवारी-रविवारी प्रयत्न करून पाहीन. by सुधीर काळे
पण अजूनही मी त्रास देतोय का?