'उ'कारावर चंद्रानुस्वार कसा काढायचा?
लेखनप्रकार
उर्दू (देवनागरीत) किंवा हिंदी लिहितांना चंद्रानुस्वार वारंवार लागतात. मिपावरील गमभन सॉफ्टवेअर वापरताना 'उ'कार सोडून 'आँटी', 'कँटीन'सारखे शब्द लिहिता आले, पण हूं, यूं घूं येईनात. 'बराहा'मध्ये ते कसे लिहायचे ते माहीत होते पण 'गमभन'मध्ये लिहिता येई ना.
म्हणून मी कांहीं निवडक लोकांना "'ऊ'कारावर चंद्रानुस्वार कसा द्यायचा हे कुणी सांगू शकेल काय?" हा प्रश्न विचारला उदा: "घूंघट"मधला घूं , "यूं तो हमने"मधील यूं, "मैं नशेमें हूं"मधील हूं वगैरे
बर्याच लोकांनी त्यांनाही माहीत नाही असे कळवले, पण 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले. पाठोपाठ पाषाणभेद व शेवटी 'मस्त कलंदर' यांनीही या प्रश्नाला उत्तर दिले.
बर्याच लोकांना ही अक्षरे कशी लिहायची हे माहीत नसावे असे वाटल्यावरून मी ती युक्ती सर्वांना सांगण्याच्या उद्देशाने इथे देत आहे. आभार मानायचे असल्यास वरील तीघांचे मानावे!
H+shift+E+shift+M+shift+U=हूँ
Y+shift+E+shift+M+shift+U=यूँ
GH+shift+E+shift+M+shift+U=घूँ
Enjoy this addition to your knowledge!
मला गमभन लिहिताना एकाद्या ठिकाणी मागे जाऊन लिहितांना एक 'भुताटकी'चा अनुभव येतो. अचानकपणे आधी छान लिहिलेला शब्द नव्या शब्दाबरोबर मारामारी करतो व भलतंच काहींतरी लिहिलं जातं. बरहा किंवा लोकसत्ता-फ्रीडम वापरताना अशी भुताटकी भेटली नाहीं कधी.
याबद्दल मी 'गमभन'च्या वेबसाईटवर जाऊन तिथे मिळालेल्या गृहस्थाना उदाहरणासह लिहिले, पण अद्याप उत्तर आलेले नाहीं.
आता काय केल्याने ते होत नाहीं हे कळले आहे, पण का होते ते कळलेले नाहीं. त्यामुळे जर चुकून काळजी घेतली नाहीं तर पुन्हा भलतंच लिहिलं जातं. तरी इथे कुणाला माहीत असल्यास सांगावे.
सुधीर
वाचन
7349
प्रतिक्रिया
33