बुधवारच्या कविता

llपुण्याचे पेशवेll जे न देखे रवी...
नमस्कार मंडळी. काल बुधवार असल्याने प्रतिभेला बहर आला होता. त्यात आम्ही गूढ कविता मोड मधे जाऊन काही ओळी आमच्या मित्रांबद्दल त्यांच्या संमतीने खरडल्या आहेत. त्या खाली देत आहे. प्रत्येक कडवे अथवा कडव्यांचा समूह एका व्यक्तीस उद्देशून लिहीला आहे. अर्थात सर्वजण आमचे खास मित्र असल्याने ते राग मानणार नाहीत अशी हमी त्यानी दिलेली आहेच. मुक्तचुंबनी आकळेआसू रत्नाकररेती अंगुलीध्यासू स्तुतिभास्करी शब्दपिपासू संभोगयंत्री अभियांत्रिकू निळीलेखणी रक्तलांछूनी चुंबकयोनी ठापठाप मत्तप्रहरणी मृदूहोऊनी पूनमक्षेत्री चट चट चट चट बद्धप्रवासी क्रुद्धनगरी खातमर्दनी प्रियपलायनु दारुबाजारी भंगारविकू बाँडशेअरी चढेउतारु पुण्यमध्यनी खरडव्यासू जोडनळातून सबूतठासू जालपणनी कन्याध्यासू खराजवाडे पराखासू भिन्नरूपिणी असंख्यायडी क्वचितलेंगू, नन्हाटिंगू खवट लोचनी, तशाच नोंदी कबिरबानी सावनभादो कॅली नगरी, डांबिसजवळी संपादकाळी, हळवा नंदू क्षुब्धचित्ती रसाळगात्रे अद्वैतातून विद्धविचित्रे अर्थकारणी मालकमात्रे द्वंद्वकारणी पाध्येकात्रे मुक्तविचारी गोळामात्रे क्षुब्धविचारी चोळागात्रे कडकविचारी फोकामात्रे मृदूविचारी रसाळचित्रे उपदेशकरी प्रसन्नचित्ते फोरासरोडी विकलविचित्ते आता काही कविता आमचे मित्र नंदू व बिका यांच्या प्रतिभाबहरातून प्रसवल्या आहेत. त्याचाही रसिकानी आस्वाद घ्यावा. उंटसवारी, दुबईनगरी, छंदीफंदी, अतिशहाणाबिकु ऊसबांधणी माऊधडकी कॉफीऊडवी खजुरपौष्टिकू बेलीप्राशनी क्वेसार्नोबेली पायविक्षिप्ती फ्लोटरकाकू लेखवायदी वंगबेंग्रुळी परिचारकी मेकेदाटु परावलंबी बौन्सरछंदी संभानगरी कंट्रीपांडु दगडीचाळू प्रशिक्षाणार्थु फासपारधु शोधपत्रकु
वर्गीकरण
लेखनविषय:
काव्यरस

68 टिप्पण्या 16,923 दृश्ये

Comments

विनायक प्रभू नवीन

तिच्या मारी पुपेदिनी

ब्रिटिश टिंग्या नवीन

In reply to by विनायक प्रभू

छान कविता! :)

छोटा डॉन नवीन

>>काल बुधवार असल्याने प्रतिभेला बहर आला होता. त्यात आम्ही गूढ कविता मोड मधे जाऊन काही ओळी आमच्या मित्रांबद्दल त्यांच्या संमतीने खरडल्या आहेत. :) "बुधवार" आणि "गुढ मोड" हे शब्द ह्रुदयाला भिडले व ह्रुदय भरुन आले. अर्थातच त्यामुळे कविता आवडल्या, काही काही तर फारच मार्मिक आहेत ( कुणावर ते आम्ही सांगणार नाही )... असेच अजुन येऊद्यात, बरेच जण राहिले आहेत. ही फक्त पोच समजावी, बाकी सविस्तर सवडीने खरडेनच ...!!! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by छोटा डॉन

डान्रावांशी बाय डीफॉल्ट सहमत!
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
करू नका चर्चा एवढ्यात काव्यबंदीची, खरडण्यालायक आहेत अजून बरेच काही (रा.को.) अदिती

निखिल देशपांडे नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

करू नका चर्चा एवढ्यात काव्यबंदीची, खरडण्यालायक आहेत अजून बरेच काही अदिती तु पण लिहि ना दोन चार कडवे निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

प्रभो नवीन

In reply to by निखिल देशपांडे

करू नका चर्चा एवढ्यात काव्यबंदीची, खरडण्यालायक आहेत अजून बरेच काही (बुधवारी कवी)प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

विशाल कुलकर्णी नवीन

In reply to by प्रभो

=)) =)) =)) =)) =)) अवांतर : ऐन बुधवारी गुढ कविता स्फुरली ते स्थान कुठले होते? बुधवारात तर नव्हे? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

छोटा डॉन नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>करू नका चर्चा एवढ्यात काव्यबंदीची, खरडण्यालायक आहेत अजून बरेच काही हॅ हॅ हॅ. असो, चालु द्यात ...!!! ------ छोटा डॉन "करू नका चर्चा एवढ्यात अवांतराची, खरडणारे आहेत आयडी अजुन काही"

Nile नवीन

In reply to by छोटा डॉन

लय भारी पेशवे, पण अजुन 'कर्णमधुर' नादमधुरता आणता आली असती पण त्याकरता शब्द्संग्रह वाढवा, त्याकरता काय करावे हे माहीत आहेच तुम्हाला. ;)
करू नका चर्चा एवढ्यात अवांतराची, खरडणारे आहेत आयडी अजुन काही"
करु नका चर्चा येवढ्यात विडंबनाची, काव्य प्रसवणारे आहेत अजुन काही. ;)

अवलिया नवीन

लै भारी... :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

निखिल देशपांडे नवीन

एक ना एक कडवे मस्त जमले आहे... आणी ते छंद मात्रा वैगेर पण मस्त आहे.. एकदम नादमय रचना म्हणुन बघितली छान म्हणता येत आहे.. सर्व कडव्यांचे अर्थ कळाले... ओळखा पाहु कोण कोण आहेत ते निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

धनंजय नवीन

In reply to by सखाराम_गटणे™

मस्तपेशवे हास्यआसवे वळमुर्कुंडी गंमतथंडी "गंमतथंडी" म्हणजे इंग्रजीतले "व्हेरी कूल!"

धमाल मुलगा नवीन

In reply to by धनंजय

धनंजयराव :) लै भारी!! >>"गंमतथंडी" म्हणजे इंग्रजीतले "व्हेरी कूल!" :) चला..आमच्या शब्दभांडारात नवा शब्द दाखल करुन घेतला :)

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by चतुरंग

इतरांचे काव्य जिथे संपते तिथे धन्याशेठचे सुरु होते! हाहाहाहा.... =)) =)) =)) (विनोदीगूढकाव्यप्रेमी)गूढोबा लाफर पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

शरदिनी नवीन

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पेशव्यांच्या कविता करायच्या प्रयत्नाबद्दल दाद द्यावीशी वाटते. .. बर्‍याच ठिकणी वृत्तामध्ये बदल घडला आहे. काळजी घ्यायला हवी. दिव्यभरारी तेजतर्रारी काव्यअडाणी खेचू नका तुंदिलतनूला गर्दभलाथा देण्याघेण्या चुकू नका

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by शरदिनी

धन्यवाद शरदिनीताई. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

llपुण्याचे पेशवेll नवीन

अदिती, डॉन, निखील, नाना, विप्र , सख्या सर्व प्रतिसादकांचे आभार. आपल्या सारख्या प्रतिसादकांमुळे कविला हुरुप येतो. पुण्याचे पेशवे "पुसले तुम्हास कोणी हरलो कसा इथे मी, सांगा तयास तेव्हा लढलो कसा इथे मी" Since 1984

अवलिया नवीन

तुंदिलतनु तंबोरा उरी तान घेत मस्त साजरी करु प्राशन सिंगलमाल्ट रमणीसंग जरासा हाल्ट सांगा मी कोण?? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by अवलिया

अर्थवाही कडवे आहे. पण गूढ कवितेत मोडत नाही. अगदीच सरळीनी काव्य झाले आहे. २ चमचे दुर्बोधता वाढवा त्यात. आणि हां शब्दवैचित्र्य, दुर्बोधता, ठेका त्याच क्रमाने नाही घातला तर काय होईल सांगता येत नाही. बाकी प्रयत्न चांगला. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

अवलिया नवीन

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चित्रडकवी व्याकुळचित्ते परप्रकाशी शिंतोडे ते भ्रमता मस्तक क्षुब्धतेने न्याय नसे काही येथे अवचित उत्सुक भयशंकित करोनी लेखन ते वाहवा मिळे श्रमसाफल्य साजिरे मनोहर ते --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अवलिया नवीन

In reply to by सखाराम_गटणे™

चूक. साफ चूक. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

निखिल देशपांडे नवीन

In reply to by अवलिया

नाना हे न कळण्या ईतके आम्ही वेडे नाहि आहोत... सोप्प आहे.. बाकी जरा अजुन क्रिप्टिक हवे होते निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

अवलिया नवीन

In reply to by निखिल देशपांडे

नाना हे न कळण्या ईतके आम्ही वेडे नाहि आहोत... मान्य, पण हे ज्यांच्यावर आहे त्यांना कळलं आहे का? हा कळीचा मुद्दा असु शकतो की नाही ?? :? ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

बिपिन कार्यकर्ते नवीन

टाकलेच का शेवटी!!!! छान!!! बाकी ते 'अति' लावल्यामुळे आम्ही आमच्यावरच रचलेल्या उत्कृष्ट नादमय रचनेचे वाट्टोळे केले आहेत तुम्ही. असो. बुधवार म्हणले की हे सगळे आलेच ओघाने... (इथे 'ओघाने' असे म्हणले आहे. 'ओघळाने' असे नाही. ;) ) बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक नवीन

बुधवार झाला. आता शनिवारी काय? बाकी या रचना उच्चभ्रूच!!!

सूहास (verified= न पडताळणी केलेला) नवीन

=)) =)) =)) हरित नोट माजकर्ता, दहीभात हाती खाजकर्ता, पेयपान,खानपान, फुकटपाजकर्ता सौतामात्रे शीतपेय मात्रे.... ओळखा पाहु ?? मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

पूनमक्षेत्री नेमीतयात्री गट्टबियरी क्रुद्धचरित्री इनलॅकाआठवे हळवानेत्री कंजारवस्ते चंद्रावरती पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

धमाल मुलगा नवीन

अग्ग्ग्ग्ग्ग्गं..... अरे काय चाल्लंय? घ्या आमचीपण एक वेंट्री :D विविधभूषणे स्वलेखकर्तु बद्धलेखने जडशब्दाळू प्रतिक्रियामिषे लेखबावळू टार्‍यामात्रे मुंडणकर्वितु

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by धमाल मुलगा

नित्यमार्दवे विर्झण्लावे नित्योल्ल्हसे खाजखाजवे पांघरून्तो गेंडाचर्मे अतिहीणकशी प्रतिसादप्रसवे घ्या अजून एक. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

मिसळभोक्ता नवीन

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तरीच म्हण्ल, अजून एक वळखीचा माणूस दिसत नाही. आता "आवडले" म्हणायला हर्कत नाही. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by धमाल मुलगा

एक लंबर हुच्च रे ... आणि हे आणखी एक लेखकः विक्षिप्त & पेशवे व्यनिसम्राटू मादकजहालू स्पेशलक्लासी सिनेमादेखू खरडउडवू गॉसिपचुकवू टवाळकुळास लावु बौलु अदिती

चित्रा नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काय हल्ली सगळे सोपे पेपर काढतात. ;)

JAGOMOHANPYARE नवीन

चर्चर चर्चर चरखा फिरवी शब्द शिपुर्डे शिरशिर भरवी कुठार कोठे कडकड काठी पंचा पंचक उघडा पाठी.. आयला, मला बी जमलं.... :) *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

भडकमकर मास्तर नवीन

अगडमशस्त्री तिकडमनेत्री दारुणभर्त्री कटीपवित्री जरार्थ पंते शंबूक पत्रे बर्तनमांजे शम्मी सूत्रे _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

बिपिन कार्यकर्ते नवीन

सदासर्वदा अगम्यबोली बडबडभारी बोबडवाणी चित्रडकवी लोकाजळवी गातेगाणी चिवचिवचिमणी :) बिपिन कार्यकर्ते

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गूढआर्जवी अगम्यशब्दी मूढमार्जरीगतप्रसिध्दी विचित्रओळी प्रतिहतबुद्धी शून्यविरघळे हरपतशुद्धी. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

भडकमकर मास्तर नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वर्जितवज्रे शनीशीरावर सोलांकित त्या कुटिलनटावर माणिकमन्ये श्रीखंडशून्ये गोडघाटीच्या तरूतळावर _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

बिपिन कार्यकर्ते नवीन

In reply to by भडकमकर मास्तर

गोडघाटीच्या
मास्तर, तुम्ही तर दुर्बोधतेत ग्रेस वर मात केलीत. आणि त्यांनाच आणले कवितेत. छान!!! बिपिन कार्यकर्ते

भडकमकर मास्तर नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आणि वर्जेश की वज्रेश सोलंकी विसरलात काय वरच्या ओळीतला? _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विजुभाऊ नवीन

In reply to by भडकमकर मास्तर

माणिकमन्ये श्रीखंडशून्ये गोडघाटीच्या तरूतळावर ग्रेस फूल..... मास्तर इतके सोपे प्रश्न देऊ नका नाव माझे व्यवसाय जो. गाणे ल्हितो...मिसळ खातो. बोलु जाता दात खेचतो मी कोण..... ठ्यॉ.. म्हणून कळफलक भिजतो हापीसात टेबलावर नीजतो शिकार खेळी हरवून जातो बारा मतीचे नाव सांगतो मी कोण..... तब्येतीने बारीक खारीक हासताना डोळे बारीक आनन्दी मी सदा असतो. मित्राना जोडत रहातो ............मी कोण. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

Nile नवीन

सगळे पगले, कविता स्त्रवले, डोके पिकले, घाण हगले. :|

llपुण्याचे पेशवेll नवीन

In reply to by Nile

प्रकाटाआ पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

भाग्यश्री कुलकर्णी नवीन

सगळे प्रतिसाद वाचायला मज्जा येतीये.छान वाटतंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

पुण्याचे पेशवे आणि काव्यकुळपरिवारातील सर्व सदस्यांच्या कविता आवडल्या अजून येऊ द्या...! :)

चतुरंग नवीन

पेशव्या, शिंच्या बुधवार सत्कारणी लावलास हों! ;) आणि बाकी कवनजटाही चांगल्याच दुस्तर आहेत!! :D अगम्यकवने दुस्तरलंघी काव्यनेटकी वाजवि पुंगी झिर्झिर वस्त्रा अस्तर लावी विकट विडंबन संगित रंगी! चतुरंग

प्राजु नवीन

हाती घेऊनी गूढ लेखणी लिहिते बाला मूढ देखणी शारदायिनी लाव शिकवणी अर्थनकळे फिरवा पाणी - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रभो नवीन

मनीबसत काव्यपाश होई काव्यप्रसवण्यास निद्रानाश सर्वजण पाडती काव्यरास जणू भरले असे कव्यसंमेलन खास -प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

सखाराम_गटणे™ नवीन

सगळे दिसत आहेत्, पण शरदिनी ताई कुठे दिसत नाहीत.

बिपिन कार्यकर्ते नवीन

In reply to by मुक्तसुनीत

=)) परंपरेला स्मरून एक फोटोच लावायचा ना... खाली जन्मसाल आणि २००९ असा. ;) बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ नवीन

अगम्य कवटी विचित्र दिवटी मात्रा वृत्ते अक्षर छंदी गझल प्रसवुनी म्हणतो घंटी हाणा माथी शनी मंगळ युती. ...........मी कोण लवकर भरभर सारे लिहितो लेखाचे त्रीशतक गाजवतो शब्दचुंबुनी फेकत जातो काना मात्रे पाडत येतो. ..........मी कोण. पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

नंदू नवीन

बापरे, आता आमच्यासारख्यांनी(नवीन सभासद) ही कोडी कशी सोडवायची? कुणी क्लू देईल का क्लू? कनफ्यूज्ड. :SS नंदू

जव्हेरगंज नवीन

_/\_ पुपे , लिखाण का बंद क्येलं?