चकोल्या
चकोल्या
हा फार जुना पदार्थ आहे.
साहीत्य- कणीक,तेल,तूरडाळ,सुके खोबरे,मेथी दाणे,जिरे, लाल तिखट,मीठ,गूळ,हळद,हिंग,चींच,
क्रुती - कणीकेच्या चपात्या लाटून (भाजू नये) सुरीने १ इंच आकाराचे तुकडे कापावेत. तुरीची डाळ शिजवून घ्यावी.ती पळीने थोडी बारीक करून घ्यावी. कढईत तेल घालून त्यात मेथीदाणे,हिंग,ह्ळदीची फोड्णी करून्,त्यात डाळ,लाल तिखट
,मीठ,थोडा गूळ,चींच,भाजलेले जिरे खोबरे घालून उकळी आणावी.व कणकेचे तुकडॅ त्यात घालून शिजवावे. खाताना तूप घालावे.
वाचने
6947
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
ह्यालाच वरणफळं असेही नाव आहे. अप्रतिम पदार्थ आहे. थंडीच्या दिवसात रात्रौ गरम गरम खावा, सोबत एखादा भाजलेला पापडही असावा..
चकोल्या हे नाव कोणत्या प्रदेशातले? मी याचे 'डाळफळ' असे नाव ऐकले आहे. आमच्या घराजवळील पोटोबा या उपाहारगृहात हा पदार्थ मिळतो.
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------
In reply to चकोल्या हे by युयुत्सु
युयुत्सू यांचा अभिप्राय अप्रस्तूत आहे.ही पाकक्रुती किमान १०० वरषे जुनी आहे. मी शोधलेली नाही.
याला चकोल्या म्हणतात. पाणी फोडणीला घातल्यावर त्यात थोडी मुगाची दाळ घालून ती शिजवून घ्यायची, ती वरणफळं पण सुरेख लागतात.
क्रान्ति
आई उदे ग अंबाबाई
मला ही वरणफळं कधीच्च आवडली नव्हती.. स्वयंपाकाची आवड असलेल्या माझ्या एका भावाने सुचवलेली अॅडिशन....
व्यवस्थित चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, नायलॉन शेव, तूप, नि फोडणीच्या कढईमध्ये तेलात परतलेलं थोडंसं तिखट नि लसूण.... हे सगळं हाताशी घेऊन बसायचं... नि हवं तसं वरण्फळामध्ये घालायचं.... अशी मस्त टेस्ट येते की माझ्यासारखी वरणफळाला नाकं मुरडणारे लोक पण आवडीने खातात...
ही आमची सजवलेली वरणफळे::
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!In reply to आणखी एक... by मस्त कलंदर
चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, नायलॉन शेव, तूप, नि फोडणीच्या कढईमध्ये तेलात परतलेलं थोडंसं तिखट नि लसूण.....
आवडले..
चकली
http://chakali.blogspot.com
In reply to आणखी एक... by मस्त कलंदर
मस्त आयडिया! मलाही वरणफळ फारशी आवडत नाहीत. आता अशी सजावट केलेली बघेन खाऊन.
In reply to आणखी एक... by मस्त कलंदर
खानदेशातही वरणफळांना चाकोल्या/चिखल्या म्हणतात...पण तिकडे अगदी साधा पदार्थ असतो हा...साधं वरण आणि त्यात कणकेचे विविध आकार बनवुन सोडायचे आणि वरुन साजुक तुप घेउन खायचे...याला सोबत करायला बर्याचदा मिरचीचा ठेचा, दाणे-लसुण चटणी किंवा पापडाचा खुळा (भाजलेला उडिद पापड+ दाणे-लसणाची चटणी + तेल) असतात... पण हे कांदा,टोमॅटो-शेव एक्दम भारी...करुन बघायला हरकत नाहीये... :)
दिपाली :)
आम्हीही याला 'डाळफळं' म्हणतो,चापून खातो.सोबत पोह्याचा तळलेला पापडही झक्कास लागतो.खूपदा पक्वान्नं म्हणून केला जातो.
आमच्या घरी वरणफळे नेहेमीच असतात. आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतात. पुलेशु.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
घरी दाल-फ्राय उरलेय बरेच कालचे :-?
आता हे वापरुन करुन पाहाते आज चाकोल्या ;)
चुचु
यम्मि.... =P~
आमी रत्रि वरन शिल्लक रहिल कि सकाळी दाल डोकरी करतो...
वरनाला पुन्हा थोडस मोहरी,लसुन्,हिन्ग्,तुप घालुन फोड्णी द्यायची आन चपाति लतुन काप सोडायचे,,वरुन कोथिम्बिर 8>
वाउव्...मस्तच लगत्....तिखट डाळी पेक्शा वरनात खुप आवडत मला.... :D
मी तर आइ ला मुद्दाम शिल्लक टेवायला लवते वरण... >:)
In reply to दाल डोकरी...!! by मसक्कली
:T अग बै जरा शुध्द बोल कि
माझ्याकडे ये ट्युशनला ;)
मला बै कोणी अशुध्द बोलले कि गरगरायला होते असे >>> :O
:P
तुझ्या आईला त्यात चिन्च , गुळ न शेन्गदाणे घालायला सान्ग , सुरेख लागते.
चुचु
ह्यालाच