मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टोस्ट...Tea Rusk...

दिपाली पाटिल · · पाककृती
साहीत्यः ४ कप मैदा (मैदा+गव्हाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ, मी गव्हाचे पीठ घेतलेय...) २ टीस्पून यीस्ट १/२ कप + २ टेस्पून साखर १.५ कप कोमट दुध १ टेस्पून मीठ १/४ कप बटर किंवा तुप (याचं प्रमाण जेव्हढं जास्त तेव्हढा खुसखुशीतपणा वाढेल...) कुटलेली दालचीनी, जायफळ आले बारिक तुकडे करुन कृती: १) एका वाडग्यात २ टेस्पून साखर + २ टीस्पून यीस्ट मिसळुन घ्यावे. २) साखर्+यीस्ट मध्ये १/२ कप कोमट दुध घालावे आणि ५-७ मिनीटे बाजुला ठेवुन द्यावे. ३) १ कप दुध + १/४ कप बटर +१/२ कप साखर एकत्र करुन गॅसवर अगदी कोमट तापवावे...अगदी बटर वितळेपर्यंतच, जास्त गरम करु नये. ४) आता मैदा + यीस्टचे मिश्रण + वरिल दुध+तुप्+साखरेचे मिश्रण + आले+ दालचीनी-जायफळ एकत्र करुन ५-१० मिनीटे मळुन घेणे. ५) १ १/२ तास उबदार ठिकाणी पीठ फुगायला ठेवा...जवळजवळ दुप्पट फुगुन येइल. ६) हाताने ४-५ पंच मारुन पीठ परत अर्धा-एक मिनीट मळा. ७) २ बेकिंग ट्रे ला ग्रीस करुन ठेवा ८) आता त्याचे ४ भाग करुन त्या गोळ्यांना जाड लाटुन घ्या आणि लांब-लांब गुंडाळी करुन वरुन पाण्याचा हात फिरवून बेकिंग शीट किंवा कुकी शीटवर ठेवा. ९) आता अजुन ४५ मिनीटे उबदार जागी ठेवुन द्या. १०) ३५० फॅ.वर २५-३० मिनीटे बेक करा... ११) आता या ब्रेड्सना ४-५ तास थंड होऊ द्या आणि नंतर अंदाजे १/२ इंच जाड चकत्या कापुन घ्या... १२) आता या चकत्यांना कुकी शीटवर ठेवून २८० फॅ. वर ३० मि. बेक करा...अधनं-मधनं बघत रहावं लागतं... १३) हलक्या तपकीरी रंगावर कडक झाले की हे टोस्ट झाले समजावे... टीपा: बाहेरच्या इतकं छान लागणार नाही बहुधा...गव्हाच्या पीठापेक्षा मैद्याचे जास्त छान लागतात. बटर,साखर-मीठाचे प्रमाण जरुरीप्रमाणे बदलावे.... आवडीनुसार तीळ, खसखस, मनुका ही घालु शकता..

वाचने 14237 वाचनखूण प्रतिक्रिया 46

मदनबाण Fri, 09/25/2009 - 03:35
आहाहा... शेवटचा फोटु तर यकदम मस्त... :) (मस्का खारी आणि बटर प्रेमी) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

In reply to by लवंगी

शेखर Fri, 09/25/2009 - 03:58
असेच म्हणतो.. अवांतरः चहाचा पण फोटु टाकला असता तर अजुन मजा आली असती....

In reply to by शेखर

शाहरुख Fri, 09/25/2009 - 04:28
चहाचा पण फोटु टाकला असता तर अजुन मजा आली असती....
आणि पाककृती पण :-D फोटो झक्कासच दिसतायत..कृतीही असणारच !! (चहातून पार्ले-जी बिस्किटं बुडाबुडाके खाणारा) शाहरुख

In reply to by दिपाली पाटिल

शाहरुख Fri, 09/25/2009 - 09:29
म्हणजे??
हा प्रश्न विचारलाय की आत्मविश्वास दाखवलाय ? :-) जर आत्मविश्वास दाखवत असाल तर, वेल..यु डिझर्व इट :-) जर प्रश्न असेल तर, मी (हा पदार्थ स्वतः करणार नसल्याने) कृती न वाचता फक्त फोटो बघून प्रतिक्रिया दिली होती.

In reply to by लवंगी

दशानन Fri, 09/25/2009 - 08:28
पाय काय विचारत आहात.... हात कुठे आहेत विचारा... बांधून ठेऊ म्हणत आहे =)) हे देवी ! का का आमच्या जीवावर उठली आहेस तु :D * आज पासून .. आता पासून दिपाली तै.. ब्लॅक लिस्टेड X( *** राज दरबार.....

प्राजु Fri, 09/25/2009 - 08:11
तुला दंडवत गं बाई!!!! तुझा चरणकमळांचा फोटो काढून लाव इथे.. रोज दर्शन घेऊन तरी स्वयंपाक नीट येतो का करायला ते बघते. :) तुझ्यात पेशन्स सॉल्लिड आहेत बाई!! मस्त पाकृ...! नक्की करेन असं म्हणत नाही.. कारण ब्रेड झाल्यावर ४-५ तास थांबून ते पुन्हा बेक करणं माझ्याकडून नाही होणार.. त्यापेक्षा तू भेटे पर्यंत विकत आणूनच खाईन. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

चित्रा Fri, 09/25/2009 - 08:16
असेच म्हणते. मस्तच दिसतायत. तुम्हाला नक्की काय करता येत नाही? म्हणजे अशाच फक्त पाककृती द्याव्यात म्हणते. नाहीतर काय शामत आहे?

सहज Fri, 09/25/2009 - 08:16
स्वयंपाकाची अतोनात आवड बॉ तुम्हाला दिपालीतै!! :-) आता चियाबाटा, फोकेशिया असे वेगवेगळे ब्रेड येउ द्या.

In reply to by सहज

जेवणाच्या वेळेसही टोस्ट खावेसे वाटले ... शेवटचा फोटो खूप मस्त आला आहे. वेगवेगळ्या ब्रेड्सच्या रेसिपीजपण येऊ द्यात ना ... अदिती

टारझन Fri, 09/25/2009 - 08:44
वा वा वा !! टोमॅटो सुप कुठाय ? च्या पेक्षा टोमॅटो सुप मधे ब्रेड भारी लागतो ;) -(ब्रेडप्रेमी) टारोबा बटर

In reply to by दिपाली पाटिल

टारझन Fri, 09/25/2009 - 09:05
अगं तेच असतं ते ... ब्रेड तापवला की झाला टोस्ट आणि सुप मधे टाकायचा असल्यावर त्याला ब्रेड स्क्रम्स का काय तरी म्हणतात ह्हुच्चब्रु लोक .. बाकी भावणा समजा हो दिपाली तै :) -( चहाप्रेमी) टारोबा गिरनार

In reply to by टारझन

दिपाली पाटिल Fri, 09/25/2009 - 09:10
तु म्हणजे अशक्य आहेस... सुपात टाकतात ते ब्रेड्क्रम्स नसतात रे..क्रुटॉन्स म्हणतात त्यांना ...गरिब लोकंही तेच म्हणतात. :D दिपाली :)

In reply to by टारझन

चतुरंग Fri, 09/25/2009 - 09:46
कुठे हे टी रस्क आणि कुठे ती पारले जी? (कुठे इंद्राचा ऐरावत चालीवर..) ;) (चहात पडलेला पार्लेजीचा लगदा चमच्याने खाणारा)चतुरंग

अवलिया Fri, 09/25/2009 - 09:20
[( --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दिपक Fri, 09/25/2009 - 09:53
चहा तयार आहे.. टोस्ट द्या बघु लवकर. :)

In reply to by दिपक

टारझन Fri, 09/25/2009 - 10:17
टोस्ट ऑलरेडी तयार आहे रे ... :) घे की हात वर करून :) -नेत्रदिपक

प्रभाकर पेठकर Fri, 09/25/2009 - 11:13
सुंदर, सोपी, उपयुक्त पाककृती आणि जीभखेचक छायाचित्र. गव्हाच्या पीठाचे, कमी साखर आणि बटरचे टोस्ट कधीतरी करावे म्हणतो. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

sneharani Fri, 09/25/2009 - 12:25
मस्तच... छायाचित्र देखिल मस्तच दिसतायत.

In reply to by श्रावण मोडक

टारझन Fri, 09/25/2009 - 12:56
आहो घाबरू नका .. अनवाँटेड सेवेंटी टू च्या जाहिरातींचा भडीमार चालू असतो टिव्ही वर हल्ली !! - श्रावणातला मोदक

किट्टु Fri, 09/25/2009 - 15:52
करुन बघायला हरकत नाही...शेवटचा फोटो तर एकदम मस्त!!!! पण खुप patience ठेवावा लागेल रेसिपी करताना.... :(

मीनल Fri, 09/25/2009 - 18:03
काय? टोस्ट घरी करता येतात? धागे काढून टाकण्यपेक्षा ह्या दिपाली ची मिपावरची मेबरशिप काढून घ्या बर. रोजच्या रोज असा वात आणलाय! नुसती पाकृ द्यावी आणि गप्प बसावे. ते नाही हिच . ती त्यात फोटो टाकते. स्वतः काम करतेच किचन मधे आणि सर्वांना कामाला लावते. :)) मीनल.

वेताळ Fri, 09/25/2009 - 18:07
खर तर आश्चर्य आहे. मला तरी वाटत होते हे पदार्थ फक्त बेकरीतच मिळतात.बाकी दिपाली तै चैन आहे तुमच्या फॅमिलीची .भारतात आला तर बोलवा एकदा जेवायला.सहसा पुर्ण दिवस जेवणाचा कार्यक्रम ठेवा. म्हणजे बर्‍यापैकी पदार्थ चाखता येतील. वेताळ

रेवती Fri, 09/25/2009 - 18:34
आजकाल दिपालीमॅडमनं सगळ्यांना जळवण्याचा विडा उचललेला दिसतो.;) टोस्टचे फोटू व कॄती आवडली. छान, मस्त असे शब्द संपले आहेत. रेवती

चित्रादेव Sat, 09/26/2009 - 08:22
दिपाली, खरेच खूप टेम्पटींग आहेत टोस्ट. करायला आळस आहे पण कोणी दिले करून तर तयारी आहे खायची. :)