मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टोस्ट...Tea Rusk...

दिपाली पाटिल · · पाककृती
Image removed. साहीत्यः ४ कप मैदा (मैदा+गव्हाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ, मी गव्हाचे पीठ घेतलेय...) २ टीस्पून यीस्ट १/२ कप + २ टेस्पून साखर १.५ कप कोमट दुध १ टेस्पून मीठ १/४ कप बटर किंवा तुप (याचं प्रमाण जेव्हढं जास्त तेव्हढा खुसखुशीतपणा वाढेल...) कुटलेली दालचीनी, जायफळ आले बारिक तुकडे करुन Image removed. कृती: १) एका वाडग्यात २ टेस्पून साखर + २ टीस्पून यीस्ट मिसळुन घ्यावे. २) साखर्+यीस्ट मध्ये १/२ कप कोमट दुध घालावे आणि ५-७ मिनीटे बाजुला ठेवुन द्यावे. ३) १ कप दुध + १/४ कप बटर +१/२ कप साखर एकत्र करुन गॅसवर अगदी कोमट तापवावे...अगदी बटर वितळेपर्यंतच, जास्त गरम करु नये. ४) आता मैदा + यीस्टचे मिश्रण + वरिल दुध+तुप्+साखरेचे मिश्रण + आले+ दालचीनी-जायफळ एकत्र करुन ५-१० मिनीटे मळुन घेणे. ५) १ १/२ तास उबदार ठिकाणी पीठ फुगायला ठेवा...जवळजवळ दुप्पट फुगुन येइल. ६) हाताने ४-५ पंच मारुन पीठ परत अर्धा-एक मिनीट मळा. ७) २ बेकिंग ट्रे ला ग्रीस करुन ठेवा ८) आता त्याचे ४ भाग करुन त्या गोळ्यांना जाड लाटुन घ्या आणि लांब-लांब गुंडाळी करुन वरुन पाण्याचा हात फिरवून बेकिंग शीट किंवा कुकी शीटवर ठेवा. ९) आता अजुन ४५ मिनीटे उबदार जागी ठेवुन द्या. १०) ३५० फॅ.वर २५-३० मिनीटे बेक करा... ११) आता या ब्रेड्सना ४-५ तास थंड होऊ द्या आणि नंतर अंदाजे १/२ इंच जाड चकत्या कापुन घ्या... १२) आता या चकत्यांना कुकी शीटवर ठेवून २८० फॅ. वर ३० मि. बेक करा...अधनं-मधनं बघत रहावं लागतं... १३) हलक्या तपकीरी रंगावर कडक झाले की हे टोस्ट झाले समजावे... Image removed. टीपा: बाहेरच्या इतकं छान लागणार नाही बहुधा...गव्हाच्या पीठापेक्षा मैद्याचे जास्त छान लागतात. बटर,साखर-मीठाचे प्रमाण जरुरीप्रमाणे बदलावे.... आवडीनुसार तीळ, खसखस, मनुका ही घालु शकता..

वाचन 14237 प्रतिक्रिया 0