काही रेखाटने

भडकमकर मास्तर कलादालन
काही नवीन रेखाटने... मोजूनमापून पोर्ट्रेट काढायचा कंटाळा आला की फक्त एक पेन्सिल घेऊन पांढर्‍यावर काळे करत बसायला मजा येते. छान टाईमपास होतो. टीप : चित्रांना हसले आणि मजेदार कॉमेंट करून लोकांना हसवले तरी चालेल.. फारच मज्जा येइल...
वर्गीकरण
लेखनविषय:

32 टिप्पण्या 15,630 दृश्ये

Comments

भडकमकर मास्तर नवीन

प्रपोर्शन वगैरे गंडले की खोडायचा कंटाळा वगैरे...... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

भडकमकर मास्तर नवीन

_____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

भडकमकर मास्तर नवीन

कधीकधी अ‍ॅनाटोमी वगैरेचा अभ्यास करायची हुक्की येते... ते स्नायू वगैरे वगैरे..... बघून रेखाटता येतंय वाटेपर्यंत न बघता अजिबात येत नाही... आणि असे काहीसे होते.. टर्निन्ग आणि ट्विस्टिंग म्हणजे अवघड काम आहे... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

अवलिया नवीन

पहिल्या चित्रातील फुल्या आधी मारल्या की नंतर नेम धरण्यासाठी ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

भडकमकर मास्तर नवीन

In reply to by अवलिया

हे मस्त ;) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

बिपिन कार्यकर्ते नवीन

जबरीच आहे की हो मास्तर!!! पहिल्या प्रतिसादातलं जास्त आवडलंय. बिपिन कार्यकर्ते

दत्ता काळे नवीन

सगळी रेखाटने उत्तम जमली आहेत.

श्रावण मोडक नवीन

पहिल्या तीन चित्रांखाली 'ओ सजना बरखा बहार आयी' हे वाचून बरं वाटतं आणि क्षणात पुढं 'जय बालाजी' वाचलं की कळतं ही चित्र अशी का झाली आणि चौथं काढावंसं का वाटलं ते... (ह.घ्या.हे वे.सां.न ल.)

भडकमकर मास्तर नवीन

In reply to by श्रावण मोडक

हॅहॅहॅ.. =)) मलविसर्जन आणि आळस झटकण्यासाठीचे उपयुक्त गाणे... म्हणून तिसरे चित्र.... खिखिखि _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

sujay नवीन

पहील्या चित्रातली डावी आणी मधली आवडली, २ घी एकदम आव्हानात्मक वाटतायत.. ;) ;) पहील्या प्रतीसादातलीच प्रपोर्शन चांगलच गंडलय ;) सुजय

लिखाळ नवीन

वा.. काही चित्रे आवडली. पहिल्या प्रतिसादातली उजवीकडची स्त्री..तिचा थोडासा गिरकी घेणारा झगा आणि शरीर रचनाशास्त्राचा अभ्यास असलेला डाविकडला वळणारा पुरूष चांगला लमला आहे. थाळीफेक वगैरे सारखा काही खेळ तो खेळत असावा.. सर्वांत पहिल्या चित्रामध्ये तुम्ही मारलेल्या फुल्या अंमळ मजेदार वाटत आहेत :) -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

हे सगळे जालिंदरजिंचे शिष्य वा भक्त आहेत का? अदिती

अवलिया नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पहिल्या तीन चित्रातील शिष्या असाव्यात असे प्रथमदर्शनी वाटते... चुभुदेघे --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by अवलिया

शिष्य वा भक्त असा प्रश्न होता! असो. या धाग्याचा खफ बनवून त्याला 'डिलीट'पूरचा रस्ता दाखवण्याचा माझा अजिबात हेतू नाही, त्यामुळे असो. अदिती

चतुरंग नवीन

दुसर्‍या चित्रातली डावीकडची ललना बलदंड आली आहे त्यामुळे अंमळ मजेशीर दिसते आहे! (खाडाखोड न करता तशीच चित्रे टाकल्याबद्दल अभिनंदन ;) ) उजवीकची ललना चांगली प्रपोर्शनेट आली आहे. अ‍ॅनॉटॉमीमधला थाळीफेक्या आणि पाठमोरा दोन्ही स्केचेस झक्कास आहेत! :) (रेखाचित्रकार)चतुरंग

पाषाणभेद नवीन

फुर्रर्र्....मस्तरे मास्तुरे! ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

सहज नवीन

मास्तरांच्या लेखनात फायनल न होउ शकलेली पात्रे का? :-) पहिल्या चित्राचे नाव सदाफुली ठेवावे काय? दुसर्‍याचे बाहुली धागा भारी आहे. ऑल स्टार रिजेक्टस!

भडकमकर मास्तर नवीन

In reply to by सहज

स्टार रिजेक्ट्स ची कल्पना मस्तच आहे... ... यावर एक सीरीज केली पाहिजे... ( मोठेमोठे चित्रकार सीरीजवगैरे करतात म्हणे).. खिखिखि... _____________________ अर्थात ही सारी चित्रे स्टार मंडळींचीच आहेत... ... जालावर 'हिच्यावर आमचा फार जीव' प्रकारातल्या ज्या स्टार कन्या असतात त्यांची ही रेखाटने.... दोनचार भित्तीचित्रे उतरवून रेखाटने सुरू करायची... कशाला पायजेत फिगर ड्रॉइंगची पुस्तके??? _____________ तरी शेवटचे चित्र फिगर ड्रॉइंगच्या पुस्तकातलेच आहे,... !! _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

मुक्तसुनीत नवीन

चित्रे आवडली. अवांतर : तिसरे चित्र पहाताना लहानपणी आईच्या हाती वाचलेल्या "माहेर" अंकातल्या रेखाचित्रांची आठवण झाली. तो चित्रकार कोण आठवत नाही !

दशानन नवीन

तुम्ही बी लाइनी मारता तर ;) * लै भारी मास्तर... ते वाईच दोन नंबरचं चित्र लै भारी बरं का... =))

अरुण वडुलेकर नवीन

रेखाटने अतिशय जिवंत साधली आहेत. त्यात एक प्राकरचा तालही आहे आणि गतीही. डावीकडून तिसरी चारुगत्री तर पुढच्या क्षणी उजवा हात पुढे घेत पुढचे पाऊल टाकेल असे वाटते. आपल्या तसर्‍या प्रतिक्रियेतील बलदंडाचे वळण (ट्विस्ट) देखील गतिमानता दाखवते. अ‍ॅनॉटॉमी मस्तच.

पाषाणभेद नवीन

मास्तरांना अ‍ॅनॉटॉमी ची जरा जास्तच आवड आहे हे लक्षात येते. नुकताच तें च्या कायद्यात बदल झाल्यानंतर त्यांच्या आवडीनीवडी आताआता बदलत चालल्याच्या दिसते. आता ते उघडउघड त्यांची आवड कशात आहे व त्यांना कशात अभ्यास करायचा ते सांगत आहेत. असे असतांना मी त्यांच्या पासून दुर राहणेच पसंत करेन. न जाणो आपली काय स्टाईल असेल व ते आपल्याला मॉडेल म्हणून सिलेक्ट करतील. पहिल्या व तिसर्‍या प्रतिक्रियेतील रेखाटन पहा. पहिल्या रेखाटनात टारझन ने काढलेले पैलवानाचे मॉडेल स्पष्ट दिसते. तिसर्‍या प्रतिक्रियेतील रेखाटनात पुरुष थाळी फेक करतांना दिसत आहे. आणि वरतून म्हणतात पण की: "टर्निन्ग आणि ट्विस्टिंग म्हणजे अवघड काम आहे..." ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

भडकमकर मास्तर नवीन

In reply to by पाषाणभेद

तरी म्हटलं अशी प्रतिक्रिया कशीकाय नाही आली अजून? ;) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

दिपक नवीन

लय भारी! पहिल्या प्रतिसादातली पाठची ललना फार लक्ष वेधुन घेत आहे. :)

भडकमकर मास्तर नवीन

मूळ रेखाटनात छायादुकानातले काही परिणाम घातले आहेत. _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

धनंजय नवीन

डायरेक्टर लोक रंगमंचावरील अ‍ॅक्शनसाठी "स्टोरीबोर्ड" कथाफलक बनवतात, त्या शैलीची चित्रे वाटत आहेत.

प्रभाकर पेठकर नवीन

पहिल्या चित्राने हृदयाची धडधड वाढली. आज उच्चरक्तदाबाची एक गोळी ज्यादा घ्यावी लागणार असे दिसते. मास्तरांचे मनःपूर्वक अभिनंदन. 'छायादुकान' शब्द बाकी खासच. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.