मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मात्र रात्रीची गोष्ट भाग २

दशानन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मागील भाग - १ स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. (पहिला पेग होवुन गेला आहे, वैचारीक चर्चा सुरू आहे अशी जागृत अवस्था अशातच पेग २ आगमन) मी - घे ! फिश फ्राय चांगलं आहे... सध्या पिंडाचं गोळं खावुन खावुन वैतागला असशील.. तो- हं... काय करणार परंपरा असतात, त्या पाळाव्या लागतात... नाही पाळल्या तर बाप्पा ढुंगणावर टिमकी वाजवेल ना! बर ते जावु दे, ती हल्ली लिहित नाही... मी - नाही लिहित... टिंगल होते म्हणे तो - हं.. पुरषोत्तममधे गाजणारे नंतर समाजापुढे यायला घाबरतात हेच खरे मी - जावु दे ना आपल्याला काय करायचे? तो बघ कसे वैचारीक लिहतो हल्ली.. तो - वैचारीक ? दे सोडुन, फार्मुला लेखन आहे ते मी - फारमुल्ला ? तो कसा आहे तो - फार जुना फार्मुला आहे.. मागल्या शतकात एका मोठ्या इतिहाससंशोधकाने वापरला होता, तसेच एका महान लेखिकेने वापरला होता. मी - अरे पण आहे काय हा फारमुल्ला? तो - सांगतो की ... समज अ, ब, क, ड या चार संख्या आहेत. अ हा ड पेक्षा लहान आहे हे सिद्ध करायचेच असे आधीच ठरवायचे.. मी - हं.. बर.. तो- विविध संदर्भ वगैरे शोधुन, इकडुन तिकडुन पुरावे मिळवुन अ हा ब पेक्षा आणि क हा ड पेक्षा लहान आहे हे सिद्ध करायचे.. शब्दांचे फुलोरे मांडुन, सजवुन लेख तयार करायचा आणि सगळ्यात शेवटी लिहायचे यावरुन सिद्ध होते अ हा ड पेक्षा लहान आहे... आहे काय आणि नाही काय ? मी - अरे पण... ब हा क पेक्षा लहान आहे हे कोण सिद्ध करणार ? ते नको का करायला ? तो- वेडाच आहेस. असे करायला लागल्यावर अ हा ड पेक्षा नेहमीच लहान आहे हे सिद्ध होत नाही ना ... कधी कधी अ हा ड पेक्षा मोठा असतो मी - मग काय अर्थ ह्याला... तो - तीच तर गंमत असते. ब हा क पेक्षा लहान आहे की नाही हे सिद्ध करायचेच नाही. त्याची अनेक कारणे असतात.. मी - काय काय ? तो - एक तर काही वेळा ब हा क पेक्षा मोठा असतो त्यामुळे तसे मान्य केले तर अ हा ड पेक्षा लहान आहे हे सिद्ध होत नाही, आणि करायचेच झाले तर खुप अभ्यास करावा लागतो, जो शक्य नसतो.. मी - हं.. अजुन.. तो - किंवा ब हा क पेक्षा लहान असला तरी क हा ड पेक्षा लहान आहे हे किंवा अ हा ब पेक्षा लहान आहे हे सिद्ध केलेले चुकीचे असते.. मी - हं.. तो - किंवा अ हा सगळ्यांपेक्षा मोठा असतो.. कारण दिलेला संख्या क्रम गुणवत्तेच्या उतरत्या मुल्याने असतो... मी - हं.. तो - किंवा अ, ब, क, ड ही तुलना करण्यायोग्यच नसतात, पण ओढुन ताणुन अ ची मानहानी करण्यासाठी केलेला हा उपद्व्याप असतो मी - अच्छा असा सोपा फारमुल्ला असेल तर मी ही दोन चार वैचारीक लेखन पाडतो की.. तो - कशाला? थोडी फार इज्जत शिल्लक आहे तुझी ती का घालवतोस.. मी - मग काय करु ? (पेग २ समाप्त) तो - वैचारिक लेखन सोडुन बाकी काहीही कर .. हे तर चालुच रहाणार.. तोवर आपलं जहाल आणि मादक चालु ठेवु...खास परदेशी माल आहे मी - मग काय...करा रिपीट.. तो - करा करा. सहज सहज होत असेल तर करा रिपीट... मी - येस्स रिपीट... पण... सहजच परवानगी असेल तरच कारण दुस-या पेगानंतर जे जे बोलु ते रिपोर्ट हायकमांडला जातात ... (भाग २ समाप्त)

वाचने 5342 वाचनखूण प्रतिक्रिया 14

In reply to by दशानन

नाटक्या Fri, 09/11/2009 - 06:13
परत सुरु केलीत राजे? कधी पासून? स्वगतः च्यायला आता राजे साकिया चा पुढचा भाग कधी टाकता असे म्हणत मागे लागणार!! ;-) - नाटक्या (अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

In reply to by धमाल मुलगा

घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 09/10/2009 - 17:52
धमु बाळ वहीणी साहेब ऑन्लाईन आहेत जोड्यान मारतील ;) ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती

मदनबाण गुरुवार, 09/10/2009 - 17:59
रिपीट... ;) मदनबाण..... पाकडे + चीनी = भाई-भाई.

पाषाणभेद गुरुवार, 09/10/2009 - 20:15
लवकर संपवला आज? ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

प्राजु Fri, 09/11/2009 - 01:02
चकल्या, कडबोळ्या... शेवया सगळं एकातच का , राजे?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

दशानन Fri, 09/11/2009 - 09:40
चकल्या, कडबोळ्या... शेवया सगळं एकातच का , राजे?? बैलपोळा गेला... आता दिवाळी येणार ना... मग थोडी आतिषबाजी करायची आहे ना ;)

अवलिया Fri, 09/11/2009 - 13:33
चालु द्या.... ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पाषाणभेद Sat, 09/12/2009 - 04:28
(भाग २ समाप्त) ??? म्हणजे अजून बैठक संपली नाही का? खरे आहे म्हणा, बसल्यानंतर वेळ काही समजत नाही. ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या