मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मर्यादा

अरुण मनोहर · · जे न देखे रवी...
रौद्र तांडवे अंगे घुसळीत चंद्रमोहीत श्वासा सोडीत युगायुगांचे जीवन पेरीत सांभाळली मर्यादा कोटी कोटी मस्त्य थवे एक दुजांचे जीवन नवे मनुजही घेती थोडे बरवे सांभाळूनी मर्यादा नद्या मुखींचा गाळ गळोरा त्यामधूनी ये विश्व आकारा खाडी बनली मस्त्य धुमारा सांभाळूनी मर्यादा खोल तळाशी भुतल क्रंदन ज्वालांचेही रसमय नर्तन सागर अद्भुत खेळ चिरंतन सांभाळूनी मर्यादा जसा होतसे मानव सक्षम सागर भासू लागे धनसम कसे लुटू दोनच कर मम यंत्रे वाढवू मर्यादा अगडबंबशी जाल रोवीली मस्त्यथव्यांची रास खेचली कोटी तृणागत मृत फ़ेकली उधळण अमर्याद खाडीप्रत जाती मस्त्यथवे धारून अंतरी बीज नवे विषमयी गटारे तेथ मिळे हत्याकांड अमर्याद सागर जीवन जलकोष्टक केले मानवे विस्कळीत विषवल्ली वाढेल अंदाधूंद तोडून साऱ्या मर्यादा.

वाचने 2039 वाचनखूण प्रतिक्रिया 8

पाषाणभेद Wed, 09/09/2009 - 09:58
कोठे होतात इतके दिवस? खोल समुद्रात मासेमारी करत होता काय? अन आता खाडीत मासेमारी करताय? ----------------------------------- काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

लिखाळ गुरुवार, 09/10/2009 - 19:46
निसर्ग मर्यादा सोडत नाही आणि आपण मात्र अमर्याद नासधूस करुन निसर्गाला ओरबाडतो आहोत असे सांगणारी कविता आवडली. थोडी क्लिष्ट वाटली. -- लिखाळ. आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?