विडंबन
हल्लीच सर्किट आणि बेसनलाडू यांनी विडंबनकारांना एक ओपन च्यालेंज दिले की - बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप..इ. ना विडंबनात न आणता ते करता येईल का, किंवा करुन दाखवावे!
आम्ही विडंबनकार वगैरे म्हणण्याइतके ह्या काव्यप्रकारात थोर नाही पण आमच्याच्याने रहावेना (खाज की काय म्हणतात ते:)) असे म्हणून आम्ही च्यालेंजच्या नियमात बसवून एक विडंबन सादर करत आहोत.
सूचना :- विडंबन वाचण्याआधी अश्विनी शेंडे यांचे अतिशय सुंदर मूळ गाणे, जे 'यंदा कर्तव्य आहे' ह्या मराठी सिनेमात आहे ते इथे वाचा आणि इथे ऐका. त्याखेरीज वाचकांना विडंबनाचा आनंद पूर्णपणे घेता येणार नाही असे वाटते.
कधी दूर दूर, कधी तू समोर, तनु कंपते आज का,
का हे असे, फोन तसे, हा घोर लागे जीवा,
कसा आवरु मी; सावरु रे मी आता,
अब्बास हा, अब्बास हा
छळतो मेला, छळतो मला!
क्षणात सारे पंटर ते रे, 'घोडे'च घेऊन येती
जरी दूर तू ही, जवळ भासे अन, काहीच नाही हाती,
मी रडतो-भेकतो; पायाही पडतो, पुन्हा तुला आठवतो
मग करुन फोन त्या पोलिसांस ही; तुझ्याचसाठी 'देतो'!
तू असताना नसल्याचा खेळ हा;
भासे स्वप्न का हे नसतानाही मला,
अब्बास हा, अब्बास हा,
छळतो मेला, छळतो मला!
मनात माझ्या हजार शंका, 'इंटरपोल' ते झोपे का रे,
तू कराचीत आहेस, दुबईत नाहीस, आहेस तू खरा कुठे रे
तू इथेच ये ना, मांडवली कर ना, हवाच आहेस इथे तू,
पण माहित नाही मलाही अजुनी कसे ते करशिल रे तू?
नवे मंत्री सारे, नवी 'खाती' हा खवा,
भासे स्वप्न का हे नसतानाही मला,
अब्बास हा, अब्बास हा,
छळतो मेला, छळतो मला!
चतुरंग
वाचने
6530
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
वा..वा..
In reply to वा..वा.. by केशवसुमार
धन्यवाद केशवा!
मस्त
झकास
व्वाव्वा!!!
मस्त..
अप्रतिम....
प्रतिसादाबद्दल ,
अप्रतिम...........
In reply to अप्रतिम........... by प्राजु
धन्यवाद प्राजु.
झकास. ......