पुरोगामित्वाची चढाओढ ही तितकी वाईट नाही
लेखनप्रकार
मागे दुसर्या एका मराठी संकेतस्थळावर "समलैंगिकता आणि समाज" चर्चा चालू होती, तिथे "डीजे" या आयडीखाली मी पुढील प्रतिसाद दिला होता. (त्या संकेतस्थळावर "धनंजय" हा आयडी उपलब्ध नाही, म्हणून वेगळा आयडी घेतला.) बारीक सारीक बदल करून - म्हणजे मिसळपावावरील माझ्या लेखाचा दुवा देऊन, तो प्रतिसाद येथे देत आहे.
- - -
एका सामाजिक विषयावर चर्चा चलली आहे, आणि अपेक्षेप्रमाणे मतमतांतरे ऐकू येत आहेत.
या विषयाच्या अनुषंगाने आत्मकथन मी मिसळपावावर केले आहे. तेच पुन्हा वेगळ्या संकेतस्थळावर करण्यासाठी मला इच्छा नाही.
परंतु या बाबतीत वर एक मत आले आहे, त्याविषयी मला काही सांगावेसे वाटते.
एक प्रतिसादकर्ते म्हणतात :
आजकाल कुठलीही चर्चा झाली की संस्कृती बुडते आहे असे बोंबलणार्यांमध्ये जशी स्पर्धा असते. मी किती पुरोगामी आहे हे दाखविण्याची चढाओढ लागली असते.या बाबतीत मला काही सांगायला आवडेल. माझ्या समलैंगिकतेमुळे संस्कृती बुडते असे अहमहमिकेने सांगणार्यांच्या विरुद्ध स्वतःहून माझी बाजू घेऊन कोणी आत्मीयतेने बोलतो याचा मला आधार मिळतो. मला वाटते अन्य कोणाची चीरफाड होताना त्याचा कैवारी होणे म्हणजे जर पुरोगामित्वाची दांभिक चढाओढ असेल, तर अशा दंभाचा मी समर्थक आहे. जीव वाचवणार्याच्या दंभामुळे जीव वाचला म्हणून वाचलेला जीव स्वस्त होत नाही. हे झाले टोकाचे विधान - "चढाओढ असली तरी चालेल". मुळात कुणाचा कैवार करणे म्हणजे दंभ आहे असे म्हणण्यासाठी काय पाया आहे? ठीक आहे : समाजात मी दांभिक दिसू नये, अशा प्रकारे संचार कसा करावा, या बाबतीत शिकवण घ्यायला मी तयार आहे. पण वेगळ्या विषयात ही शिकवण मला मिळवू द्या. समजा आमच्या ऑफिसमध्ये एका महत्त्वाकांक्षी बाईची (आणि त्याबरोबर सर्व महत्त्वाकांक्षी बायकांची) नालस्ती होत आहे. काही लोक कोमल-स्त्रीत्वाची संस्कृती बुडते आहे म्हणून बोंब मारत आहेत. उगाच पुरोगामित्वाचा बाऊ करायचा नाही तर मी कसे वागावे? "पूर्वीपासून पुरुषाच्यामागून गुप्तपणे बायका सूत्रे हलवत होत्या, हे आम आहे" असे एकदा म्हणून मग गप्प बसावे काय? मी "मध्यभागी" गप्प बसलो, तर "संस्कृती बुडते" हीच बोंब शिल्लक राहाते. सध्यातरी 'हे नेहमीच चालते' समजून गप्प बसणे मला प्रशस्त वाटत नाही. कुणाची बाजू हिरिरीने घेऊ शकणे हे मानव्य मूल्य आहे. "चालायचंच" म्हणणार्या, मत नसणार्या, बहुसंख्यांना तो दिखाऊपणा वाटू शकतो, तरी हे मानाव्य मूल्य जोपासावे, अशी माझी येथील मित्रांना विनंती आहे. अन्य लोकांना मीसुद्धा कधीमधी बुजरेपणा टाकून मदत करावी, अशी वृत्ती मीसुद्धा बाणवावी. वरील प्रतिसादकर्ता असेही म्हणतो :
जुन्या काळापासून भारतात अम्रदपसंदी किंवा लौंडेबाजी ही अतिशय आम.राहिला समलैंगिकतेबाबत "लौंडेबाजी"चा उल्लेख. "लौंडेबाजी पूर्वी कधी भारतात आम होती" तशी आजही आहे. लौंडेबाजी करायला अवसर नाही हे काही कारण नाही की भारतात राहाणे मला शक्य नाही. अतिसामान्य तर्हेने एकनिष्ठ प्रेम, किंवा एकनिष्ठतेचे ध्येय असलेले अतिसामान्य स्खलनशील प्रेमही, असे काही करण्यास मला भारतात वाव नाही, म्हणून माझा जन्मदेश मला जाचक आहे. उगाच मला आधार देऊन समलैंगिकतेचा बाऊ होईल, असे वाटून "अरे तू ऐतिहासिक प्रकारची आम लौंडेबाजी करून चालवून घे" असे कोणी म्हटले, तर माझे समाधान होण्यासारखे नाही. - - - आजकाल मिसळपावावरच्या काही प्रतिसादकर्त्यांच्या सह्या लोकप्रिय झाल्या आहेत त्यांत "समलैंगिकतेचे उदात्तीकरण" करणार्यांना व्यंग्यात्मक शैलीत ढोंगी म्हणले जाते आहे. या हेटाळणीने माझ्या (आणि कोणाच्याही) कैवाराला आलेल्यांनी बुजू नये, ही विनंती. उगाच "आपण ढोंगी आहोत का?" या विचारांत गढून स्वतःला दोष देऊ नये. डझनावारी लोकांची सहज आणि स्वस्त चिडवाचिडवी एका पारड्यात, आणि माझे जगणे काही प्रमाणात सुसह्य केल्याचे जिवाएवढे मोठे आभार दुसर्या पारड्यात. सौदा घाट्याचा नाही हे आश्वासन मी तुम्हाला देतो.
वाचने
8836
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लेखाशी पुर्ण सहमत!
पुरोगामित्वाची चढाओढ
In reply to पुरोगामित्वाची चढाओढ by मिसळभोक्ता
सहमत
लेखातले विचार आवडले!
In reply to लेखातले विचार आवडले! by चतुरंग
समलैंगिकत
+१
In reply to +१ by शलाका
बरं काही
धनंजय
धनंजयांचे
स्वाक्षरी इ.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मनोगत चांगले आहे
पुरोगामीत्व वाईट नाहीच..!
In reply to पुरोगामीत्व वाईट नाहीच..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
धनंजय
डझनावारी
नंतर
उत्तम, संयत विवेचन
समलैंगीकता
In reply to समलैंगीकता by विजुभाऊ
चुकीची गृहितके
माझ्या पुरोगामित्वाची धाव (कुंपणापर्यंत? ;))
अग्ग
खुलासा
In reply to खुलासा by अवलिया
अवलियाने
In reply to खुलासा by अवलिया
सद्भावना पोचल्या
मला वाटते
सहमत आहे.
सर्वांचे आभार - काही उपप्रतिसाद
धनंजय, चर्च
In reply to धनंजय, चर्च by लिखाळ
लिखाळ शी सहमत
चर्चेचा परामर्श
विसुनानां
In reply to विसुनानां by नितिन थत्ते
योग्य
>>याचा भार
पुरोगामित्वाच्या चढाओढीवर पुन्हा एकदा
In reply to पुरोगामित्वाच्या चढाओढीवर पुन्हा एकदा by चित्तरंजन भट
बहुतेक दु:खे स्वतःची नसतात
In reply to बहुतेक दु:खे स्वतःची नसतात by धनंजय
मर्यादित नाही
तुमचे