Skip to main content

(चंपी)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 26/05/2009 या दिवशी प्रकाशित केले.
देवाशपथ! शरदिनी ह्यांची 'चंपी' वाचून माझी अक्षरश: चंपी झाली आणि मग बधिरल्या मेंदूला काही सुचेना. पण काय चमत्कार थोड्याच वेळात आमच्या भादरलेल्या मेंदूतून हे स्फुरले! ;) चंपी कविता कसली अढळ वस्तरा साफदुहेरी कल्ले कटले टकुरे थोडे हलवुन गेले केस कातरी अडकून मेले काव्य'कर्तरी' चालवताना काय मेंदूला टोचून गेले सुसाटटोण्या, सावनटवळी 'पेय दुधारी' टाकून मेले दर्पटवाळ्या काव्यसख्यांनी दिवट्या जाळून पाने भरली दुर्धर असल्या कवनजटांना भोळीजनता पुरती फसली... पिसाटपिंजर कपाळमाथी लावा सत्वर अधीर भामटी हसतो 'रंग्या' विकट सुरसुरी जटिल विडंबन दर्पण चंपी! २६ मे २००९, अँडोवर
लेखनविषय:

वाचने 5500
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

हसतो 'रंग्या' विकट सुरसुरी जटिल विडंबन दर्पण चंपी! तद माताय!!! =)) आयच्यान सांगतो, मी मूळ कविता वाचली आणि तुला फोन करणार होतो की, "रंग्या, अरे काय झोपलायस की काय? उठ, ऊठ!!! नवीन माल आलाय बघ बाजारात!!!" कविता कसली अढळ वस्तरा साफदुहेरी कल्ले कटले ~X( =)) -चमनगोटा डांबिस आऊट अँडोवर

In reply to by अवलिया

हेच आणि असेच म्हणतो. धन्य ती चंपी ; धन्य ती (चंपी) आणि धन्य ही पिडांतिका ! ;-)

In reply to by मुक्तसुनीत

ही घ्या आणखी एक चम्पी http://misalpav.com/node/7926 भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

अफाट ! अचाट!! बेफाट !!! आपण खरोखरच विडंबनसम्राट आहात! आपल्याला साक्षात दंडवत..!

झकास!

ही (चंपी) खूप आवडली... "हरित तृणांच्या सतरंजीवर मत्त सकाळी सरसर टोले" अशी अवस्था झाली...

अक्षरशः दंडवत रंगाशेट!

In reply to by मेघना भुस्कुटे

अक्षरशः दंडवत रंगाशेट! हेच बोल्तो..! संपलो रे रंगा... :) तात्या.

अगायायाया.. लै भारी.. कल्ले कटले, जटिल विडंबन दर्पण चंपी...्ईहीहीहीहीही :) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

विडंबनाधिपती ऽऽऽ .........विडंबनकुलावतंसऽऽऽ........ विडंबन सम्राट ऽऽऽ.......आ गये है!!ऽऽऽऽ लै भारी! मुळ चंपीइतकेच प्रभावी, नादमय.. ___/\___ कळले असे वाटतानाच सटकणारे :) ;) बाकी सुसाटटोण्या, सावनटवळी, दर्पटवाळ्या, पिसाटपिंजर हे खूप आवडलं ;) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

जबराट.... जोरदार विडंबन... =)) =)) =)) =)) =D> =D> =D> काव्य'कर्तरी' चालवताना काय मेंदूला टोचून गेले सुसाटटोण्या, सावनटवळी 'पेय दुधारी' टाकून मेले पिसाटपिंजर कपाळमाथी लावा सत्वर अधीर भामटी हसतो 'रंग्या' विकट सुरसुरी जटिल विडंबन दर्पण चंपी! हसुन हसुन बेजार.... आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

=)) =)) ज ह ब र्‍या मला आधी मुळ कविता 'पिपात मेले ओल्या उंदीर' चे विडंबन वाटले होते. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

रंगाशेठ, ज ह ब ह रा हा.. चंपी..चालू दे.. (चंपीवाला)केशवसुमार

विडंबन सम्राटांचा विजय असो :) अफाट........ !!!!!!!!!!

_/\__/\__/\_

जोरदार कावनजट ! तेथे पाहिजे जातीचे ! हेच खरे :) -- (भोळा)लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

>> टकुरे थोडे हलवुन गेले केस कातरी अडकून मेले या ओळीलाच आधी फसकन हसलो. पिडाकाकाने म्हटल्याप्रमाणे एकदम विडंबन एकदम 'तद माताय' जमलय ! :) लिहिता रहा रे बाबा...

____ (लोटांगणाची स्मायली आहे ही.) बिपिन कार्यकर्ते