काही लोकांना कम्युनिझम आणि कम्युनिस्ट विचारसरणी का आवडते?
- असे कॉम्रेड्स, किमान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कम्युनिस्ट विचारसरणी किती पाळतात?
- स्वतः निधर्मी रहायचे व्रत घेतलेले असताना इतरांना, विशेषत: हिंदूंना धर्माच्या आणि जातीच्या चष्म्यातून का बघतात?
- इतरांना (अर्थात हिंदूंना) हिंसाचारी म्हणताना स्वतः नक्षलवाद्यांची आणि कॉम्रेड्सनी केलेली हिंसा कशी खपवून घेतात?
२. स्वतः निधर्मी रहायचे व्रत घेतलेले असताना इतरांना, विशेषत: हिंदूंना धर्माच्या आणि जातीच्या चष्म्यातून का बघतात?हा व्रत वगैरे प्रकार मला माहीत नाही. आणि "स्वत: निधर्मी" हा काय प्रकार आहे मला माहीत नाही. असे कोणी लोक तुम्हाला भेटले आहेत का - की ही एक अद्भुतरम्य कल्पना आहे? या अद्भुतरम्य कल्पनेला सोडून आपण एका जगात प्रत्यक्ष सापडणार्या व्यक्तीकडे येऊ : मी स्वतःला प्रस्तुत करतो. सरकार आणि कायदे निधर्मी असावेत असे मी मानतो, आणि तसा प्रयत्न करतो, तशा चळवळींना पैसे देतो. जिथे सरकारचा अमुक कायदा निधर्मी असणे सध्याच्या राजकारणात दुरापरस्त आहे, तिथे सर्वधर्मसमभाव ही तडजोड म्हणून स्वीकारतो. परंतु वैयक्तिक आयुष्यात धर्मांकडे समान दुर्लक्ष करणे किंवा सर्व धर्मांना समप्रमाणात वेळ देणे ही माझ्याकडून कोणी अपेक्षा केली तर तो शुद्ध मूर्खपणा आहे. बहुतेक देशांमध्ये एखादा धर्म बहुसंख्य असतो, आणि त्याच्या बर्यावाईट वैशिष्ट्यांचे संस्कृतीत सर्वाधिक रोपण होते. तो अलिखित कायदा होतो. माझ्या अनुभवातली उदाहरणे - भारतात हिंदू धर्म आणि यू.एस.मध्ये ख्रिस्ती धर्म. या धर्मांच्या वैशिष्ट्यामुळे माझ्या वैयक्तिक आयुष्यात, आणि कौटुंबिक आयुष्यात सर्वाधिक फरक पडतो. यांच्या अलिखित नियमांमधून कधी मला फायदे मिळतात (हलकेफुलके उदाहरण - रविवारी सुटी असण्याचे कारण ख्रिस्ती धर्मातील "रविवारी आरामाचा दिवस आहे" हा तपशील), तर कधीकधी तोटे होतात (हलकेफुलके उदाहरण - रविवारी दारू विकत मिळत नाही, हा बॉल्टिमोर येथील ख्रिस्ती लोकांचा प्रादेशिक तपशील). उदाहरण मुद्दामून हलकेफुलके घेतले आहे. पण आयुष्यात यापेक्षा कितीतरी महत्त्वाचे फायदे आणि तोटे मला बहुसंख्य धर्माच्या संस्कृतीतून मोठ्या प्रमाणात होतात. अप्रमुख अल्पसंख्याक धर्माच्या संस्कृतीतून जवळजवळ थेट परिणाम होत नाहीत. अर्थातच व्यक्ती म्हणून ज्या बाबतीत मला खूप फरक पडतो आहे, त्याच बाबतीत मी नेटाने चळवळ करेन. आता मिसळपावावर किंवा मराठी संकेतस्थळांवर मी लिहिलेच तर हिंदूधर्मातील आवडत्या-नावडत्या प्रथांबद्दल लिहितो. (खरे तर बहुतांश ललित वाङ्मयाबद्दल ९०% लिहितो.) पण त्या उरलेल्या १०% मध्येसुद्धा ख्रिस्तीधर्मातील प्रथांबद्दल लिहीत नाही (म्हणजे लिहितो, पण अगदी क्वचित). यात आश्चर्य काय? मराठी संकेतस्थळांवर मी कोणाशी संवाद साधतो आहे? अमेरिकेतील बहुसंख्य ख्रिस्ती संस्कृतीमुळे मला अमुक फायदा मिळतो आणि तमुक तोटा होतो, ही चर्चा मी अमेरिकन/स्थायिक लोक ज्या स्थळावर गप्पा मारत आहेत तिथे करेन. ख्रिस्ती धर्माची इथे जर काही प्रशंसा-तक्रार करायची असेल, तर ख्रिस्ती धर्माचे अमेरिकेतील समाजशास्त्र काय त्याची आधी प्रस्तावना द्यावी लागेल, त्याचा मला कंटाळा वाटतो. आणि त्या विषयाचे सोयरसुतक माझ्या येथील मित्रांना आहे का? येथे एक सामान्य जीवनातला दृष्टांत देतो. "उकडत असेल तर खोलीत पंखा लावावा, थंडी वाजत असेल तर पंखा बंद करावा" असे माझे सामान्य तत्त्व आहे. पण मी ज्या खोलीत बसलो आहे, उकडत असेल/नसेल तर त्याच खोलीत पंखा लावण्याबद्दल/बंद करण्याबद्दल मी ऑफिस-सहकार्याशी बोलतो. मी सर्व खोल्यांमध्ये जाऊन पंखे चालू-बंद करण्याचा त्रास घेत नाही, म्हणून काय माझे सामान्य तत्त्व थोतांड आहे? "सर्व खोल्यांमध्ये समसमान वेळ बोलल्याशिवाय आपल्या खोलीत पंखा लावण्याबद्दल इतका बोलू नकोस!" असे माझ्या ऑफिस सहकार्याने म्हटल्यास मी त्याला वेड्यात काढेन. बहुतेक सर्वच अशा सहकार्याला वेड्यात काढतील. आता समांतर बघा : "कुठल्याही धर्म-संप्रदायात जन्मापासून चिकटलेला उच्च-नीचभाव नसावा" असे माझे सामान्य तत्त्व आहे. पण हा बदल व्हावा म्हणून सर्वाधिक मनस्ताप मी हिंदू धर्माबद्दलच करतो. कारण माझी नाती-गोती-मित्र हे बहुसंख्य हिंदू धर्माच्या दालनात आहेत. "प्रत्येक धर्माच्या बाबतीत तू समसमान वेळ दे, नाहीतर हिंदू धर्माबद्दलही बोलू नकोस" असे कोणी म्हणेल तर त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. शहाणे-शहाणे लोक अशी काही विचित्र अपेक्षा ठेवतात, तेव्हा त्यांना काय म्हणावे ते कळत नाही. इतकेच काय "प्रत्येक धर्माच्या बाबतीत समसमान चळवळ केल्याशिवाय तुझे सामान्य तत्त्व ढोंग आहे" असे कोण्या मित्राने म्हटले तर मात्र अशा मित्राने नीट विचार कधी केलाच नाही, असे मला वाटणे अपरिहार्य आहे. या मित्राची अपेक्षा तरी काय आहे - यू.एस.मध्ये हिंदू, मुसलमान, ज्यू, पारशी, रेड इंडियन टोळ्या वगैरे प्रत्येक धर्मात कुठल्या दिवशी दारू विकत नाहीत ते चौकशी करून मगच बॉल्टिमोर येथील कायद्याबद्दल सर्वधर्मसमभावाने तक्रार करू? हे तक्रारीचे पत्रक आहे की जाडजूड ग्रंथ! माझे वैयक्तिक सोडा. कोणी 'क्ष' मनुष्य "कायदा निधर्मी पाहिजे" असे म्हणतो. आणि चळवळ करतो फक्त आपल्या संपर्कात येणार्या प्रमुख धर्मात. या 'क्ष' व्यक्तीच्या बाबतीतही हेच अपेक्षित आहे, आणि असे दिसल्यामुळे त्याचे सामान्य तत्त्व मुळीच ढोंग होत नाही. - - - हा प्रतिसाद मूळ "कम्यूनिस्ट" विषयाला अवांतर आहे. पण मुद्दा २ हा विकास यांनीच दिला असल्याकारणाने उत्तर देत आहे. हा अवांतर मुद्दा त्यांनी तरी येथे का उपस्थित केला? याबद्दल कुतूहल वाटते आहे.
In reply to ९९-१ आणि आदर्शवाद; निधर्मी प्रश्न by धनंजय
In reply to माझे म्हणणे... by विकास
जर स्वत:ला कुठल्याच धर्माचे मानत नसाल आणि तसा इतरांकडून पण वागण्याचा हट्ट करत असाल आणि मग त्याचा भार फक्त हिंदूंना, त्यांच्या प्रथांना नावे ठेवण्यात आणि काही अंशी (तुम्ही नाही) बुद्धीभेद करण्यात घालवत असाल मात्र इतर धर्म आणि धर्माच्या बाबतीत चिडीचूप तर ते बरोबर आहे का?हाच माझा मुद्दा आहे - मी (म्हणजे 'धनंजय' नव्हे तर कोणी 'क्ष' व्यक्ती) कुठलाही धर्म मानतो/मानत नाही ते कसेही असो. ज्या लोकांच्या धर्म मानण्याने माझ्या (म्हणजे 'धनंजय' नव्हे तर 'क्ष' व्यक्तीच्या आयुष्यावर) आयुष्यावर परिणाम होतो (म्हणजे बहुसंख्य लोक भारतात हिंदू, यू.एसमध्ये ख्रिस्ती) त्या एका धर्माबद्दलच मुख्यत्वे बोलणार, बाकी धर्मांबाबत फारसे बोलणार नाही. हेच अपेक्षित आहे. तुमच्या प्रश्नातील "हट्ट", "बुद्धिभेद", आणि "चिडीचूप" हे शब्द बाजूला काढून वरील "बरोबर आहे का?" प्रश्नाला माझे उत्तर - "अपेक्षित आहे. बरोबर आहे." "हट्ट", "बुद्धिभेद", "चिडीचूप" हे शब्द बाजूला का काढले? कारण त्यांच्या अर्थामध्येच निंदा आहे, ते ठेवल्यास प्रश्नाचे उत्तर आपोआप "नाही" होते = र्हेटॉरिकल क्वेश्चन = उत्तर सांगणारा आणि प्रश्नच नाही. मला असे जाणवले आहे, की या चर्चेतून तुम्ही खरेच उत्तरे मिळवू बघत आहात. म्हणून त्या प्रश्नाचे "र्हेटॉरिकल"/"प्रश्नच नाही"चे स्वरूप हे शब्द काढून बदलले. - - - तुलना करा : निंदात्मक प्रश्न : "धनंजय, तू ग्लोबल वॉर्मिंगबद्दल हट्ट करून, ते न मानणार्या लोकांशी गाड्या कमी चालवण्याबाबत बुद्धिभेद करून, मेक्सिकन ट्रक प्रदूषण प्रश्नाबाबत चिडीचूप राहातोस, ते बरोबर आहे का?" उत्तर : "अर्थातच, नाही." योग्य प्रश्न : "धनंजय, तू ग्लोबल वॉर्मिंग होते आहे असे ठाम समजून, ते न मानणार्या ओळखीच्या लोकांशी गाडी कमी चालवण्याबाबत सारखासारखा बोलतोस, पण मेक्सिकन ट्रकच्या प्रदूषणाबाबत मात्र काहीच बोलला नाहीस, ते बरोबर आहे का?" उत्तर : होय. माझे असेच वागणे अपेक्षित आहे.
In reply to शेवटचे अवांतर by धनंजय
In reply to ९९-१ आणि आदर्शवाद; निधर्मी प्रश्न by धनंजय
In reply to सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता by मिहिर
तर धर्मनिरपेक्षता म्हणजे व्यक्तीच्या धर्माला सार्वजनिक जीवनात स्थान नसणे.या व्याख्येबाबत असहमत आहे. (लोकशाही देशांत तरी) धर्मनिरपेक्षता ही फक्त सरकारी धोरणात, कायद्यात आणि कायद्याच्या अंमलबजावणीत असते. "सार्वजनिक" जीवनात सरकारी नसलेला बराच भाग असतो. अशा ठिकाणी लोक स्वतंत्रपणे वागायचे तसे वागतीलच. त्यात धार्मिक स्वातंत्र्य वेगळे सांगावे लागत नाही. (पण तुम्ही म्हणता तो गैरसमज अनेकांचा असतो. अमेरिकेत सरकारी शाळेत सरकारी नोकर असलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना एकत्र जमवून सरकारी खर्चाने विकत घेतलेल्या लाऊडस्पीकरवर ख्रिस्ती प्रार्थना पढवण्यास बंदी आहे. पण शिक्षक स्वतः प्रार्थना म्हणण्यास बंदी नाही, किंवा कुठलाही विद्यार्थी शाळेत स्वतःहून ख्रिस्तप्रार्थना म्हणण्यास बंदी नाही. परंतु अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की कोर्टाने केलेली "सरकारी शाळेतर्फे प्रार्थना पढवायची बंदी" ही विद्यार्थालाही स्वतःहून प्रार्थना म्हणण्याची बंदी आहे. हा सूक्ष्म भेद न कळण्यातला या लोकांचा घोटाळा आहे, की खोडसाळ लोकांचा अपप्रचार आहे, हे कोणास ठाऊक. भारतातही अशा प्रकारचे काही गैरसमज दिसत असावेत, पण मला उदाहरण चटकन आठवत नाही.)
In reply to काही by पिवळा डांबिस
In reply to पिडांकाका by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काही by पिवळा डांबिस
In reply to ह्म्म्म... by एकलव्य
In reply to आज समाजात by नितिन थत्ते
In reply to असहमत! by पिवळा डांबिस
In reply to विषयाची by भडकमकर मास्तर
In reply to मिपावर by नितिन थत्ते
In reply to श्रीयुक्त कर्क ह्यानी मांडलेला मुद्दा अविचारी वाटतो by वेताळ
In reply to श्रीयुक्त कर्क ह्यानी मांडलेला मुद्दा अविचारी वाटतो by वेताळ
In reply to देसाई by हेरंब
In reply to साम्यवाद.. कम्युनिझम.. आपण... by रेझर रेमॉन
In reply to एकम् सत् by नितिन थत्ते
In reply to एकम् सत् by नितिन थत्ते
अधिष्ठान अहंकार तशी विविध साधने । वेगळाल्या क्रिया नाना दैव ते येथ पांचवे ॥ अध्याय १८ - १४ ॥ काया-वाचा-मने जे जे मनुष्य करितो जगी । धर्माचे वा अधर्माचे त्याची ही पांच कारणे ॥ अध्याय १८ - १५ ॥ह्या श्लोकाचा मी कर्मण्येवाधिकारस्ते शी संबध इतक्याच कारणाने लावतो की कर्माचे मिळणारे फळ हे ह्या "पाच कारणांवर" अवलंबून असते असे मला वाटते. यातील कदाचीत दैव या विषयावरून चर्चा निघू शकेल. पण तसे करावेसे वाटल्यास वेगळी चर्चा टाका, इथे कम्युनिझमवरील चर्चाच चालूंदेत ही विनंती. आपण आपल्या अथवा इतर कुणाच्याही आयुष्यातील अनेक अशा गोष्टी पाहू शकतो ज्यात असे का झाले याचे विश्लेषण करताना ही पाचही कारणे दिसू शकतात. त्यातील दैव मानले (डेस्टीनी मानली) नाही तरी काही गोष्टी ह्या अशाच का झाल्या ह्याचे सरळ उत्तर मिळत नाही. असो. >>>कम्युनिस्टांच्या तत्वज्ञानात सर्व उद्योगांची सरकारी/सामाजिक मालकी असेल आणि त्यामुळे कोणालाही वैयक्तिक फायदा होणार नाही असे आहे. अशा व्यवस्थेत चांगल्या कामाचा काही रिवॉर्ड मिळत नसल्याने काही चांगले करण्यास इन्सेण्टिव्ह नसते आणि म्हणून अशी व्यवस्था अस्तित्वात येऊ शकणार नाही. आलीच तर ती प्रगतीशील असणार नाही. त्यामुळे हे तत्त्वच फालतू आहे असे बहुतेक कम्युनिस्टविरोधकांचे म्हणणे आहे. इथे बोंब आहे. कारण कोणी काय करायचे हे सरकारच ठरवत आहे. थोडक्यात "कर्मण्ये वाधिकारस्ते..." मधील कर्मावर अधिकारच राहीला नाही... आणि (गोट्या म्हणतो तसे) केवळ "रस्त्यावर येऊन कर्मावरचा वाद राहीला" ;) ("कर्मण्येवाधिकारस्ते" म्हणजे कर्मावरचा वाद रस्त्यावर का घालावा? - गोट्या मालीकेतील गोट्याची अक्कल!) थोडक्यात कम्युनिझममधेच कशाला पण काही अंशी कारणे वेगळी असली तरी सोशॅलिझममधे पण आपण म्हणता तसे "इन्सेटिव्ह" नसल्याने व्यवस्था प्रगतीशील होत नाही. हेच भांडवालशाहीतील एखाद्या उद्योगालापण लागू होते जर तेथे इन्सेटीव्ह नसला तर. अर्थात भांडवलशाहीत इतर अनेक चुका असल्या तरी हे तत्व नाही... ते फालतू आहे का आदर्श ह्याच्याशी माझे देणेघेणे नाही. त्याची भारतात आणि जगात इतरत्र ही प्रामाणिक गरज असणे शक्य नाही त्यामुळे ते आमलात आणू नये असे वाटते. कारण त्यात मिळणारे इन्सेटीव्हज (अथवा रोजी-रोटी) हे स्वतःच्या हक्काने केलेल्या कर्मामुळे मिळणार नाहीत तर सरकारच्या इच्छेने मिळणार असते. मात्र तसे गीतेत कुठेच म्हणलेले नाही. किंबहूना गीता ही श्रीकृष्णाने युद्धात लढ म्हणून सांगितली. वर असेही अर्जुनास सांगितले की जिंकलास तर राज्य मिळेल मेल्यास (स्वतःचे कर्तव्य करत मेल्यामुळे) स्वर्ग मिळेल. थोडक्यात इन्सेटीव्ह त्याकालानुरूप सांगितले होतेच. >>>प्रत्यक्षात दोन्ही तत्त्वे एकच आहेत असे नाही का म्हणता येणार्? जर आपण म्हणता तसे गीतेतील तत्वज्ञान हे एकच आहे असे असेल तर "कम्युनिझम आणि गीतेत" काही फरक नाही, म्हणून आम्ही कम्युनिझम इतकीच गीता पण मानतो असे म्हणू शकाल का?
In reply to अयोग्य संदर्भ by विकास
In reply to जर आपण by नितिन थत्ते
वा इकास