मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही लोकांना कम्युनिझम आणि कम्युनिस्ट विचारसरणी का आवडते?

विकास · · काथ्याकूट
या काथ्याकुटाची स्फुर्ती: लोक कम्युनिस्टांवर इतके चिडतात तरी का? कम्युनिस्टांबद्दल (विशेष करून भारतीय) मला का राग आहे हे वेळोवेळी वेगवेगळ्या चर्चांतील प्रतिसादात येत असल्याने तसेच माझ्या भावना इतर अनेक विचारी सदस्यांनी मांडल्या असल्याने मी त्या तेथे परत मांडल्या नाहीत... मात्र तेथे कॉम्रेड्स अथवा समर्थक कम्युनिझमका हवा हे सांगायच्या ऐवजी इतर कसे वाईट हेच लिहीत बसले (त्यात खोटे किती हा एक मुद्दा आहेच). कदाचीत चर्चाविषयाच्या प्रश्नामुळे तसे घडले असेल. म्हणून हा वेगळा चर्चा प्रस्ताव. हे मूळ प्रस्तावाचे विडंबन नाही! मात्र राहून राहून काही प्रश्न कायम पडत आलेत, ज्याची उत्तरे आपले कॉमिबांधव शिताफीने टाळतात अथवा देऊ शकत नाही: (हे सर्व भारतासंदर्भात, भारतीयांसंदर्भात आणि येथे कॉम्रेड्स म्हणून लिहीणार्‍या आणि इतर ९९% कॉम्रेड्स संदर्भात आहे. मला खात्री आहे १% कॉम्रेड्स नक्की प्रामाणिकपणे कम्युनिझम पाळत असतील आणि त्याबद्दल मला त्यांचा आदर आहे).
  1. असे कॉम्रेड्स, किमान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कम्युनिस्ट विचारसरणी किती पाळतात?
  2. स्वतः निधर्मी रहायचे व्रत घेतलेले असताना इतरांना, विशेषत: हिंदूंना धर्माच्या आणि जातीच्या चष्म्यातून का बघतात?
  3. इतरांना (अर्थात हिंदूंना) हिंसाचारी म्हणताना स्वतः नक्षलवाद्यांची आणि कॉम्रेड्सनी केलेली हिंसा कशी खपवून घेतात?
थोडक्यात काही लोकांना कम्युनिझम आणि कम्युनिस्ट विचारसरणी का आवडते? माझी आशा आहे या प्रश्नांची उत्तरे (प्रतिप्रश्न आणि इतरांवर टिका नाही तर "यात" काय आहे) येथील कम्युनिस्टांचे प्रामाणिक समर्थक देतील.

वाचन 9449 प्रतिक्रिया 0