कृतांतकटकामलध्वज जरा जरी पातली...(#)
केस पांढरे तरी हा
डाय लावतो हिरवा
पाखरांनो सावधान
घुमे टेचात पारवा
केस पांढरे तरी हा
डाय गुलाबी लावतो
पाखरांनो उडलात
तरी पिसे हा मोजतो
केस पांढरे तरी हा
काळा कलप लावतो
पाखरांनो सावध हा
दाणे दुरून टाकतो
केस पांढरे तरी हा
अंतर्यामी अतरंगी
पाखरांनो नका भिऊ
निर्विष याची हो नांगी
(#)माझ्यासारख्या विविधरंगी केश-भूषित साठी-पार युवकांनी कृपया हलक्यात घ्यावे :)
वाचने
2050
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
उम्र ढल गयी, मगर बल अभी बाकी है,
दिल धड़कता है, मुकम्मल अभी बाकी है।
खिज़ाब ही तो है बालों में, दुनियावालों,
इश्क़ का हिसाब अभी बाक़ी है|
In reply to वृद्ध देखणा चेहरा माझा...... by कर्नलतपस्वी
said it __/\__
साल्टपेपराची येता शान
वाजवीत फिफ्टीचा डंका
प्लेबॉयाच्या कव्हरावरती
स्थान मिळतसे नवहंका
.
साल्टपेपराची: सोमण्याच्या मिलिंदाची १० वर्षापूर्वीची मिठमिरी केशकथा.
नवहंका: "हॅन्डसम नका ना म्हणू, हंक म्हणा' म्हणणारी पिढी.
बेबी बुमर्स ना समजेल अशा भाषेत टंकाळा ना? डिकोड करता करता डोस्क्याचं दही होतय बघा.
In reply to अभ्याशेठ, by कर्नलतपस्वी
नको नको.
सोप्पं सोप्पं काही लिहिलं की अनंतयात्रींना वाईट वाटतं. ;)
.
(अनंतयात्रीशास्त्री: राग मानू नका बरका. आपल्या काव्याचे आणि काव्यप्रसवचिकाटीचे आम्ही फ्यान हावोत)
In reply to नको नको by अभ्या..
पापीलवार आहेत.
अभ्याशेठ आपण फ्यानच आहात तर B(loomer) L(anguage) D(e)- C(oder) होण्याचे बघा असे कर्नल साहेबांस म्हणायचे असावे :)
In reply to सध्या BLDC फ्यान by अनन्त्_यात्री
आम्ही पीएसपीओ च्या जमान्यातले हावोत. ;)
.
परमनंट स्टुडन्ट परमनंट ओबिडिएन्ट.
In reply to ह्या ह्या by अभ्या..
अज्याबात लागत नै.
Looks like I am thick-skinned.
B(aby boomer's) ...
आपला पास.
वृद्ध देखणा चेहरा माझा......