मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चैत्रगौर

क्रान्ति · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चैत्रगौरीचं हळदीकुंकू करायचंय, सगळ्या सुगरण ताया स्वैपाकघरात गुन्तल्या, तेव्हा म्हटलं, आपण लिम्बू-टिम्बू कंपनीनं गौर सजवावी. पहा आवडतेय का! गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

वाचने 7457 वाचनखूण प्रतिक्रिया 19

विसोबा खेचर 09/04/2009 - 07:16
अप्रतीम कविता, अत्यंत श्रीमंत शब्दयोजना! अन्य शब्द नाहीत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अनामिक 09/04/2009 - 16:11
हेच म्हणतो, -अनामिक

मदनबाण 09/04/2009 - 07:27
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती सॉलिट्ट्ट्ट्ट्ट्... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

प्राजु 09/04/2009 - 07:35
अतिशय सुंदर! केवळ सुंदर! शब्द भांडार जबरदस्त आहे. :) जियो!!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

उमेश कोठीकर 09/04/2009 - 07:43
काय शब्दवैभव आहे. जबरदस्त. कुबेराची खाणच जणू. क्रान्ति,सलाम.

स्मिता श्रीपाद 09/04/2009 - 10:44
सुरेख सजलेली गौरीची आरास डोळ्यांसमोर उभी राहिली...:-) मस्तच कवीता... -स्मिता

अविनाशकुलकर्णी 09/04/2009 - 11:12
आहहा..काय सुंदर प्रासादिक रचना..मन खुष झाले....केवळ अप्रतिम..अफाट शब्द भांडार..

सुमीत भातखंडे 09/04/2009 - 12:40
खूपच छान कविता.

जयवी 09/04/2009 - 15:46
अहा....... अगं किती सुंदर...!! अक्षरशः मढवलंस तू चैत्रगौरीला तुझ्या शब्दालंकाराने......... !! मस्त !! "आभाळशेला" खूप आवडला :)

समिधा 10/04/2009 - 01:55
सजलेली चैत्रगौर अगदी डोळ्यासमोर आणलीस. खुपच सुंदर शब्द वापरले आहेस.. गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी मस्त =D> समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

शितल 10/04/2009 - 03:07
सुंदर काव्य रचना चैत्रगौर तुझ्या शब्दांनी सुंदर सजली आहे. :)