वेश्याव्यवसायाची नैतिकता
In reply to अनैतिकच by आनंदयात्री
In reply to अनैतिक व्यवसाय..? by मनस्वी
In reply to माफ by आनंदयात्री
हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी...ह्या समाजात अनेक अनावश्यक नैतिक आणि आवश्यक अनैतिक व्यवसाय आहेत. लाच घेणे/देणे, हुंडा घेणे/देणे, राजकारण (विशेषनाम नव्हे.. अनेक व्यवसायांतील राजकारण जे सहकार्यांबरोबर, कर्मचार्यांबरोबर खेळले जाते) असे अनेक समाजघटक आहेत पण बर्याचदा ते करणार्यांची प्रतिमा मात्र स्वच्छ असते. वेश्याव्यवसायातही वेगवेगळे स्तर आहेत - काही पैशांसाठी (तर तुम्ही म्हणाल की मग हाच व्यवसाय का.. दुसरे नैतिक व्यवसाय ती करू शकते उदा. एक अशिक्षित बाई भांडी घासणे, घरकाम करणे इ. कामे करू शकते. पण अशा बायकांवरही लांडगे टपलेले असतात. गरीब बाईमाणूस असल्याने काही बोलूही शकत नाही. आणि पाळणाघरात, लेडिज होस्टेलमध्ये प्रत्येक निराधार निरक्षर स्त्रीला काम मिळतेच असे नाही. {म्हणजे भांडीघासणे, घरकाम ही कामे करू नयेत असे मी म्हणत नाही.. तर ते व्यवसायही स्त्री साठी १००% सुरक्षित आहेत असे नाही.}), काही भरपूर पैसा असून नुसतेच मजा करण्यासाठी (समाजातील उच्च स्तरातील बायका) , एखादी आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी, एखादी पत्नी नवर्याच्या आजारासाठी, काही गावी असलेल्या घरी पैसे पुरविण्यासाठी.. अशा एक ना अनेक स्तरातील स्त्रीया असतात. तर प्रत्येक बाई ही आवडीने हा व्यवसाय पत्करत नाही. माझे म्हणणे असे की हा व्यवसाय जरी अनैतिक असला तरी तो आणि असे अनेक व्यवसाय आता समाजाचा घटक आहेत. ("वेश्याव्यवसायारहित समाज" हे हवेहवेसे पण कायम स्वप्नच रहाणार आहे. कारण पुरुष.. ज्याच्या सुप्त भावनेने ह्यास जन्म दिला.) वेळ आल्यावर सगळे पाठ फिरवतात. नातेवाईक मदत करत नाहीत. मार्ग असतो, पण प्रत्येकीला वाईट वेळ आल्यावर सापडतोच असे नाही. काही वाटा चुकतात. वाटेवर यायची काहींकडे अक्कल नसते. म्हणून त्या अनैतिक नाहीत तर व्यवसायाचे मूळ - पुरुष अनैतिक. तरी कृपया अशा अशिक्षित गरजू महिला ज्यांना समाजसेवी संस्थेकडे जायचे सुद्धा ज्ञान नसते, त्यांसाठी आपण नैतिक व्यवसायाचे पर्याय सुचवू शकता का? मनस्वी
In reply to माफ केले by मनस्वी
In reply to माझे मत by चित्तरंजन भट
In reply to अनैतिक by कोलबेर
In reply to शोषण तिथेही आहेच! by चित्तरंजन भट
In reply to चर्चा उत्तम by विसुनाना
अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी- 'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. ' (ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)हे अवांतर नसुन मला तर समांतर वाटते. मी मराठी वरील ही चर्चा मी पाहिली नाहि. पण अशा प्रकारची मते नवीन नाहीत. आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव प्रतिवादकाच्या चेहर्यावर नक्कि असणार. "एवढा गरिबीचा कळवळा आहे तर आपल्या घरातील संपत्ती का नाही वाटून टाकत?" "एवढा पुळका आहे तर स्वतःच्या घरात ठेउन घ्यायचे!" "आम्ही काय अन्नछ्त्र उघाडल नाय, यवढ आसन तर सोताच्या घरात जेवायला बोलावचं" वगैरे वगैरे सदृश विधाने आपण नेहमी ऐकत असतो. जंगल कमी झाल्यावर बिबटे मानवी वस्तीत शिरतात. पाण्यासाठी ,अन्नासाठी; प्रजोत्पादनासाठी नव्हे. मग बिबट्यांच्या नावे हाकाटी होते. "एवढी बिबट्याच्या भुकेची काळजी आहे तर आपली मुल जाउ द्यात कि बिबट्याच्या तोंडात?" अशी पण चर्चा सुरु होउ शकते. "समजा ज्यांना हा सेफ्टी व्हॉल्व वाटत नाही त्यांच्या घरातील स्त्रिया समाजातल्या पुरुषी कामांधतेला बळी पडल्या तर?" असाही प्रश्न उपस्थित होतो. या आहेत म्हणुन आपल्या आयाबहिणि सुखाने जगताहेत (त्यातल्या त्यात) . स्वामी विवेकानंदांनी म्हणुन तर त्यांना भगिनी म्हटलं . अस मानणारा एक लोक प्रवाह आहे. मुरळ्या, देवदासी या समाजातील धर्मलंडांची सोय व्हावी म्हणुनच निर्माण झाल्या. त्याला 'द्यवाची शेवा' असा धार्मिक पाठिंबा दिला. मूळ प्रश्न असा आहे कि लैंगिक भुक भागली नाही म्हणुन माणुस मरत नाही. पण लैंगिक भूक हि नैसर्गिकच आहे. ती शमली नाही तर समाज स्वास्थ्य टिकेल का? असा आहे. प्रकाश घाटपांडे
In reply to समांतर चर्चा by प्रकाश घाटपांडे
In reply to चर्चा उत्तम by विसुनाना
माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी.वेश्याव्यवसायाच्या बाबतीत नैतिक गणित करत असताना या तीन प्रकारच्या शरीरविक्रेत्यांत मूलभूत फरक करून काही हशील नाही. पण तपशिलांत फरक येऊ शकेल. सामाजिक गुप्ततेमुळे आर्थिक/मानसिक/शारिरिक फायद्या-तोट्याचे गणित तिघांमध्ये वेगवेगळे येऊ शकेल. त्यामुळे एखादी बाजारपेठ कमीअधिक प्रमाणात अन्याय्य असू शकेल. या चर्चेत मी बहुतेक शरिराच्या क्रय-विक्रयाबाबत विचार केला आहे. त्यामुळे बाजार मुक्त की नाही, विक्रेत्याला आणि ग्राहकाला किंमत ठरवण्याचे किंवा नकारण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही, अगतिकतेमुळे अयोग्य किंमत ठरवली जात आहे की नाही, या निकषांवर न्याय-अन्याय ठरवता येतो. क्रय-विक्रय नसला तर माझ्या मते लैंगिक संबंधांच्या नैतिकतेचे वेगळे निकष असावेत - कारण बाजाराच्या दृष्टीने विश्लेषण करता येत नाही. मग ते विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध कुठले का असेनात. बाजारात आपल्याला बराच थोड्या वेळाचा, मुदतीचा विचार करावा लागतो. देण्या-येण्याचा हिशोबखाते किंमत भरल्यानंतर सामान्यपणे बंद केले जाते. (किंवा किंमत आगाऊ दिल्यास सेवा पुरवून झाल्यानंतर हिशोबखाते बंद केले जाते.) पैशांचे हस्तांतरण होत नसेल तर हिशोबाच्या खात्याची मुदत लांब असते. त्यामुळे नैतिकता ठरवण्यासाठी सामान्य बाजाराचे निकष वापरता येणार नाहीत. तेही मूलभूत निकष विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध सर्वांनाच सारखे असावेत. कोणाचेही मानव्य मूल्य स्वस्त होता कामा नये. सामाजिक परिस्थितीमुळे विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक या प्रकारांत "मानव्य मूल्य राखणे" कमीअधिक कठिण असेल, हे तपशील वेगळेवेगळे असतीलच. "सेफ्टी वॉल्व" उपमा ठीक आहे. पण कोणीही "सेफ्टी वॉल्व" होण्यासाठी औदार्य मागणे ठीक नाही. आजकाल ज्यांना आपण प्राण देण्याचे औदार्य मागतो (खाणकामगार, अग्निशामक, सैनिक, वगैर,) त्यांना त्या मानाने शुल्क देतो. इतकेच काय सैन्यातले अधिकारी पगाराबद्दल बोलले, पगारवाढीबद्दल बोलले, तर आपण त्यांना "उदार व्हा" असे म्हणून चूप करत नाही. तसेच "उदारपणे सेफ्टी वॉल्व व्हा" म्हणून अन्याय्य बाजारात बोळवण करू नये.
In reply to अप्रतिम काथ्याकुट ! by प्रसाद गोडबोले

देहविक्रय बेकायदेशीर नाही, सेक्स वर्कर्सचे अधिकार, पोलीस हस्तक्षेप अयोग्य, कंडोमचा वापर हा…; SC ने मांडलेले २१ मुद्दे https://www.loksatta.com/photos/news/2945214/sex-work-is-not-illegal-the-supreme-court-order-says-sex-workers-are-entitled-to-dignity-equal-protection-under-law-scsg-91/
In reply to उत्तम निकाल आणि उत्तम लेख by Trump
In reply to उत्तम निकाल ! by प्रसाद गोडबोले
गणिका उजळ माथ्याने समाजात वावरू लागल्या तर कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष (ही विशेषणे समाजमान्य अर्थाने घ्यावीत. ती माझीच मते आहेत असे समजू नये) मुखावगुंठित मुलीमहिलांना या सर्वातील फोलपणा कळून चुकेल आणि त्या पुरुषसत्ताक नियमांना फाट्यावर मारतील ही आदिम भीती यामागे आहे.यांत भीती कसली? जर प्रत्येक बाई पुरुषसत्तेस फाट्यावर मारून वेश्या बनली, तर कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल. पुरुषांना दुसरं काय हवं? असो. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. लालबत्तीवस्तीत बापाला किंमत नसते. आईला मात्र अतिशय आदराने वागवलं जातं. मग ही पुरुषसत्ताक व्यवस्था म्हणायची का? आ.न., -गा.पै.
In reply to भीती ? कसली भीती ! by गामा पैलवान
कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल.थोडीशी सुधारणा - कुठलीही नाही , जीला स्वतःहुन कामक्रीडेत भाग घेण्याची इच्छा आहे ती , आणि हाच ह्या व्यवसायातील युनिक सेल पॉईंट आहे ! स्त्री-लैंगिकतेचे गूढ ह्या धाग्यावर आलेल्या काही प्रतिसादा नुसार बहुतांश स्त्रियांना कळससुख अर्थात ऑर्गॅझम हा परमोच्च आनंद लाभतच नसतो , त्या केवळ करायचे म्हणुन, कर्तव्य म्हणुन सेक्स करत असतात , परिणामी कामक्रिडेतील स्त्रीचा सहभाग बहुतांश वेळा पॅसीव्ह असतो . (काही सन्माननीय स्त्रीयांचे काही मोजके रतिक्षण ह्याला अफवाद असतीलही , पण इन जनरल "उरका पटकन" हाच अॅटिट्युड असतो.) अशा वेळेस कल्पना करा की एक स्त्री जी स्वेच्छेने कामक्रिडेत सहभाग घेत आहे , जी पैसे घेत आहे , क्लायंट ला खुष करणे हाच जिचा उद्देश आहे तिच्या सोबतचा अनुभव कसला भिन्न असेल ! तसेच पुरुषाच्या नजरेतुन - ही स्त्री आवडली तर आवडली नाहीतर आजचे पैसे अक्कलखाती, नेक्स्ट टाईम नवीन बघु, ही काही कटकटी करणार नाहीये , डोके दुखते आज नको , मूड स्विंग्स वगैरे नखरे नसणार आहेत , बस्स आत्ता आहे हा क्षण एन्जॉय करायचा आहे - carpe diem. ह्या सिचुएशन मध्ये रतिसुखाचा अनुभव काहीतरी वेगळ्याच लेव्हल वरील असावा असा अंदाज आहे ... पुरुषासाठी अन स्त्रीसाठीही!!
In reply to कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास by प्रसाद गोडबोले
In reply to भीती ? कसली भीती ! by गामा पैलवान
In reply to नैतिकता हा प्रश्नच नाही नियोजन हा प्रश्न आहे by sunil kachure
In reply to २)म्हाडा,सिडको. by सुबोध खरे
In reply to खरे साहेब by sunil kachure
लोण ची
सुविधा पुरवणार कोण? बँकेचे कर्ज देताना व्यवसायाचे काही आडाखे असतात. त्यात स्त्रीचे शरीर कसे बसवणार? जी दिसायला जास्त चांगली तिला जास्त कर्ज देणार का? हा निकष कसा ठरवायचा? तारण काय ठेवायचे? आणि त्यांनी कर्ज फेडले नाही तर त्यांच्या कडून वसुली कशाची कशी आणि कोणी करायची? उगाच उंटावरून शेळ्या हाकताय? तुमचं परफेक्ट solution तुमच्या टंकणाऱ्या मेंदूकडून आलेलं आहें. उचल हात आणि बडव कळफलक त्याचा विचार करणाऱ्या मेंदूशी काहीही संबंध दिसत नाही.In reply to कामनियमांचा उगम by चलत मुसाफिर
तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे,तुम्ही वर जी कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष, मुखावगुंठित वगैरे विशेषणं ल्वापारली आहेत त्यांचा निर्देश मुलांच्या संगोपानाकडेच आहे. मात्र या गोष्टी आवश्यक असल्या तरी पुरेश्या नाहीत ( necessary but not sufficient ). बाप देखील नीतिवान असावा लागतो, पण तो मुद्दा वेगळा आहे. आ.न., -गा.पै.
In reply to कळीचा मुद्दा by गामा पैलवान
In reply to ठाम असहमत by चलत मुसाफिर
In reply to पुन्हा चंमतग वाटली by चलत मुसाफिर
In reply to वेश्यांचे आयुष्य by प्रकाश घाटपांडे
विषय आवडला...