स्वगतः
१.मला मॉडर्न्स सायन्स/ मॅथेमॅटिक्स मधील संकल्पना आपल्या तत्वज्ञानाशी जोडायला फार आवडते. एस.क्यु.एल मध्ये इंडेक्सिंग हा प्रकार असतो प्रत्येक रो ला एक इंडेक्स लावली की सगळे सॉर्ट, फिल्टर वगैरे ऑपरेशन्स सुपरफास्ट होतात.
किंवा गुगलने सर्वच इंटरर्नेटवर जे केले आहे तसे इंडेक्सिन्ग. म्हणजे कसं की गोष्टी शोधणे सोपे होते.
किंवा अजुन सोपे उदाहरण म्हणजे आता आपल्या पयथॉन मध्ये डिक्शनरी डेटा टाईप असतो ज्यात key : value अशा पेयर असल्याने कोणतेही सर्च ऑपरेशन सोप्पे होउन जाते.
तसे आपल्या तत्वज्ञानाच्या बाबतीत करता आलं तर मजा येईल. म्हणजे कसे की लॉजिकल अर्ग्युमेंट्न्स ना स्पेसिफिक कीज असाईन करायच्या , "कीज : अर्ग्युमेंट्स" अशा पेयर्स करायच्या , जेणे करुन अख्खे लॉजिकल अर्ग्युमेंट लक्षात राहील स्टार्ट तू एन्ड.
भन्नाट आयडीया. चला ट्राय करु !
२. स्वान्तःसुखाय अॅज युजुअल !
________________________________________________
https://sreenivasaraos.com/wp-content/uploads/2012/09/ardhanari33.jpg
पण हे म्हणजे संपुर्ण विश्व , चराचर, समस्त झालं , आता हे म्हणजे २ नव्हे, हे म्हणजे ९ झालं!
९ म्हणजे ? ९च का ? अनंत/ इन्फिनिट का नाही?
कारण सामान्य लोकांनां अंक आणि संकल्पना ह्यातील फरक कळत नाही म्हणून. इन्फिनिटी हा अंक नाही, संकल्पना आहे. आणि इन्फिनिटी एक नाही, अगणित आहेत,
इन्फिनिटी ही संकल्पना अकल्प्य आहे, incomprehensible, अप्राप्य आहे.
तस्मात ते सोडा.
समजा, तुम्ही असे जीव आहात की ज्यांना फक्त एकक संख्या समजतात, तर मग तुमच्यासाठी ९ काय असेल ते कल्पना करा. सर्वात मोठ्ठी संख्या ! त्याच्यात सर्वच्या सर्व सामावलं आहे !
तेच दोन अंकी संख्या मोजणाऱ्यासाठी ९९ असेल
आणि ३ अंकी मोजणार्या साठी ९९९ .....
आणि ...
पण मुळात सगळे ९ चे अवतार. मूळ एकमात्र ९.
If you can "imagine" this 9, you can "see " what you think as infinity.
२. पण हे ९ असं काही नाहीयेच. कारण दिसत जरी असले अगणित आकार , पदार्थ दिसत आहेत पण मुळात आहेत फक्त दोघंच . शिव शक्ती. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे विश्व विश्व वाटतंय ते सूक्ष्म रुपात पाहिलं तर शिव शक्तीच आहे. बस २.
१. पण मग ह्या शिव शक्ती मधील बाऊंडरी कोणती ? कोठे शिव संपतो अन् कोठे शक्ती सुरू होते ?
जे सत् आहे ते शिव , जे असत् आहे ते शक्ती. जे चित् अर्थात जागृत आहे ते शिव, जे अचित आहे , जड आहे , निर्जीव आहे ते शक्ती. जे आनंद आहे ते शिव. जे जे आनंदाचा अभाव आहे ते ते शक्ती.
सत् चित् आनंद = सच्चिदानंद म्हणजे शिव . त्या व्यतिरिक्त सर्व शक्ती.
पण ज्याला आपण जिवंत म्हणत आहोत, चित् म्हणत आहोत, त्याचे एकेक अवयव, कॉम्पोनंट्स हे निर्जीव केमिकल्सनेच बनलेले आहेत ना ! कार्बन हायड्रोजन ऑक्सीजन... अर्थात सर्वच आचित् आहे, सर्वच शक्ती आहे. अगदी "मी आहे" ही जिवंतपणाची जाणीव देखील अचेतन निर्जीव वस्तुतून आलेली आहे. बाकी सर्वच सर्व शक्ती शक्ती शक्ती आहे. केवल १.
पण मग ही जिवंतपणाची जाणिव आली कुठून ? त्या निर्जीव गोष्टींच्या मधून ? म्हणजे ज्याला आपण निर्जीव समजत होतो त्यात ही "मी आहे" ही जाणीव, ही चेतना होतीच , फक्त आपल्याला लक्षात येत नव्हती , अर्थात सर्वच चित् आहे , सत् आहे, सर्वच केवळ शिव आहे , बास "मी आहे" ह्या जाणिवेचा सार्वत्रिक सार्वकालीन असल्याचे कळल्याचा आनंद आहे. सर्वच शिव शिव शिव. केवल १. अर्थात २ नाहीच बस १ आहे. केवल १.
https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/3/3c/Yin_and_Yang_symbol…
...000129210 = 12910
...000 ही ही ती (Blank space).
आता तुम्ही बौध्द असलात तर असलात तर शून्य शून्य म्हणा किंवा वेदान्ति असलात ब्रह्म म्हणा म्हणा किंवा शैव असला तर शिव म्हणा....
( )129210... अङ्कानां वामतो गति।।० : देव, भक्ती, अध्यात्म, प्रापंचिक निवृत्ती, ज्ञान, साधना , मोक्ष असं काही नाही, थातुर मतुर कल्पना. खाओ पियो ऐश करो . बाकी सर्व निरर्थक आहे. ० १: विश्व आहे हाच पुरावा आहे कोणीतरी विश्वकर्मा अर्थात निर्माता असल्याचा. तस्मात् एक देव आहे. शिव. बस १. २: आणि मग जर हा एक निर्माता बाजूला केला की जे उरते, ते जे की निर्माता नाही, ते झालं निर्माणसाहित्य. म्हणजे शक्ती. शिव नाही ते शक्ति. शिव आहे तसेच शक्तीही आहे. शिव आणि शक्ति . २ ९: आणि हे शिवशक्ती आपण आजू बाजूला पाहतो त्या छोट्या मोठ्या गोष्टींबाबत नाहीये, समस्त विश्वाबाबत आहे ! सूर्य, चंद्र, तारे युनिव्हर्स , पृथ्वी, देश , राष्ट्र, आपलं घर, लॅपटॉप , इंटरनेट, मिपा, टाईप करणारे आपण , वाचणारे वाचक . सर्वच. बस शिव शक्ती. हे समस्त विश्व आणि त्याही पलीकडे शिवशक्तीचे अर्धनारीनटेश्वर रुपात नृत्य चालू आहे ! कॅन यू सी इट ?
https://sreenivasaraos.com/wp-content/uploads/2012/09/ardhanari33.jpg
पण हे म्हणजे संपुर्ण विश्व , चराचर, समस्त झालं , आता हे म्हणजे २ नव्हे, हे म्हणजे ९ झालं!
९ म्हणजे ? ९च का ? अनंत/ इन्फिनिट का नाही?
कारण सामान्य लोकांनां अंक आणि संकल्पना ह्यातील फरक कळत नाही म्हणून. इन्फिनिटी हा अंक नाही, संकल्पना आहे. आणि इन्फिनिटी एक नाही, अगणित आहेत,
इन्फिनिटी ही संकल्पना अकल्प्य आहे, incomprehensible, अप्राप्य आहे.
तस्मात ते सोडा.
समजा, तुम्ही असे जीव आहात की ज्यांना फक्त एकक संख्या समजतात, तर मग तुमच्यासाठी ९ काय असेल ते कल्पना करा. सर्वात मोठ्ठी संख्या ! त्याच्यात सर्वच्या सर्व सामावलं आहे !
तेच दोन अंकी संख्या मोजणाऱ्यासाठी ९९ असेल
आणि ३ अंकी मोजणार्या साठी ९९९ .....
आणि ...
पण मुळात सगळे ९ चे अवतार. मूळ एकमात्र ९.
If you can "imagine" this 9, you can "see " what you think as infinity.
२. पण हे ९ असं काही नाहीयेच. कारण दिसत जरी असले अगणित आकार , पदार्थ दिसत आहेत पण मुळात आहेत फक्त दोघंच . शिव शक्ती. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे विश्व विश्व वाटतंय ते सूक्ष्म रुपात पाहिलं तर शिव शक्तीच आहे. बस २.
१. पण मग ह्या शिव शक्ती मधील बाऊंडरी कोणती ? कोठे शिव संपतो अन् कोठे शक्ती सुरू होते ?
जे सत् आहे ते शिव , जे असत् आहे ते शक्ती. जे चित् अर्थात जागृत आहे ते शिव, जे अचित आहे , जड आहे , निर्जीव आहे ते शक्ती. जे आनंद आहे ते शिव. जे जे आनंदाचा अभाव आहे ते ते शक्ती.
सत् चित् आनंद = सच्चिदानंद म्हणजे शिव . त्या व्यतिरिक्त सर्व शक्ती.
पण ज्याला आपण जिवंत म्हणत आहोत, चित् म्हणत आहोत, त्याचे एकेक अवयव, कॉम्पोनंट्स हे निर्जीव केमिकल्सनेच बनलेले आहेत ना ! कार्बन हायड्रोजन ऑक्सीजन... अर्थात सर्वच आचित् आहे, सर्वच शक्ती आहे. अगदी "मी आहे" ही जिवंतपणाची जाणीव देखील अचेतन निर्जीव वस्तुतून आलेली आहे. बाकी सर्वच सर्व शक्ती शक्ती शक्ती आहे. केवल १.
पण मग ही जिवंतपणाची जाणिव आली कुठून ? त्या निर्जीव गोष्टींच्या मधून ? म्हणजे ज्याला आपण निर्जीव समजत होतो त्यात ही "मी आहे" ही जाणीव, ही चेतना होतीच , फक्त आपल्याला लक्षात येत नव्हती , अर्थात सर्वच चित् आहे , सत् आहे, सर्वच केवळ शिव आहे , बास "मी आहे" ह्या जाणिवेचा सार्वत्रिक सार्वकालीन असल्याचे कळल्याचा आनंद आहे. सर्वच शिव शिव शिव. केवल १. अर्थात २ नाहीच बस १ आहे. केवल १.
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु । अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ ५-१३ ॥सच्चिदानंद केवळ निर्देश करणारा शब्द आहे, अर्थवाही शब्द नाही. हा शब्द केवळ शिवशक्तीकडे तुम्हाला निर्देश करत आहे, शिवशक्ती काय आहे ह्याचा अर्थ सांगत नाहीये. (तुम्हाला विचारलं की पुर्वदिशा कोणती? तर तुम्ही हाताने दाखवाल अन म्हणाल "ही पूर्व दिशा". पण ती "एक्झॅक्टली पूर्व" असेल का ? आज सकाळी तिथूनच सुर्य उगवला असेल का ? तर नाही . तुमचे उत्तर अर्थावाही नाही, केवळ निर्देशक आहे, दिशा दाखवणारे आहे. तसे काहीसे.) ०/ (ब्लँक स्पेस) पण मुळात शिवशक्ती हे द्वैतच नाही केवळ १ आहे असं आपण म्हणतोय पण ज्याला आपण १ म्हणतोय ते "हे एक आहे" हे कोणाला कळणार? तिथं कळणे न कळणे हेही द्वैत नाही. बस ० आहे.... पण हा अनुभव घेणारा कोण ? पण ० आहे असे म्हणणारा, अनुभवणाराही ही नाही. मग जर अनुभवताच नसेल तर अनुभव नाही, मग अनुभाव्यही नाही, अर्थात हे ० ही नाही... बस (ब्लँक स्पेस)
अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें । ग्रहण झालें एकसरें । सर्वग्रासें ॥ ९-६३ ॥
यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:। अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: सोऽयं वो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:।।काय म्हणायचं ते म्हणा. आता काय फरक पडतो. Now I "See" You. अरे I आणि you हे नाहीये. आणि "see" हे देखील नाहीये. बस तो तूच आहेस. बस इतकेच . तुझा तूची देव तुझा तूची भाव फिटला संदेह अन्यातत्वी :) https://www.youtube.com/watch?v=TMLaPbuB3hc तत्त्वमसि! (ब्लँक स्पेस) ( )
वाचने
9773
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
डिक्शनरी
"१" इंडेक्स दोनदा?
In reply to डिक्शनरी by प्रसाद गोडबोले
नाही नाही
In reply to "१" इंडेक्स दोनदा? by गवि
काही कळले काही नाकळले.
सगळी 'फिलॉसॉफी' अर्थशून्य
In reply to काही कळले काही नाकळले. by चित्रगुप्त
तत्वज्ञान व एस्क्यूएल् सारखे विदासंच यांची सांगड
चला. कोणाला तरी तशाच शंका
In reply to तत्वज्ञान व एस्क्यूएल् सारखे विदासंच यांची सांगड by कांदा लिंबू
हा हा
In reply to चला. कोणाला तरी तशाच शंका by गवि
विंदाचीं कवीता आठवते.
मला पण काहीही कळले नाही. पण
In reply to विंदाचीं कवीता आठवते. by कर्नलतपस्वी
@प्रगो.....पटले तर उत्तर द्या अन्यथा पुर्व प्रतिसाद होल्ङ्स गुड
In reply to विंदाचीं कवीता आठवते. by कर्नलतपस्वी
नमस्कार कर्नल सर ,
In reply to @प्रगो.....पटले तर उत्तर द्या अन्यथा पुर्व प्रतिसाद होल्ङ्स गुड by कर्नलतपस्वी
रिकामी जागा वेगळी आणि 'शून्य'
सुपर्ब प्रगो!
अंकप्रवास ९२१०१९० असा आहे
In reply to सुपर्ब प्रगो! by Bhakti
एक शंका…
In reply to अंकप्रवास ९२१०१९० असा आहे by प्रसाद गोडबोले
गंतव्य कसे काय वेगळे?
In reply to एक शंका… by सोत्रि
कारण कोठे थांबायचं हा
In reply to गंतव्य कसे काय वेगळे? by प्रसाद गोडबोले
नाही
In reply to कारण कोठे थांबायचं हा by सोत्रि
संस्कृत मध्ये अंक डावीकडुन
In reply to अंकप्रवास ९२१०१९० असा आहे by प्रसाद गोडबोले
आवर्तन कसं दाखवाल ?
माफ करा , पण तुम्हाला नक्की
In reply to आवर्तन कसं दाखवाल ? by नठ्यारा
पुनरपि जननं पुनरपि मरणं
In reply to माफ करा , पण तुम्हाला नक्की by प्रसाद गोडबोले
Elon Musk - Consciousness
(ब्लँक स्पेस)
- सगळे ९ चे अवतार असल्याने २, दशम व त्यापुढील पटीतल्या ११, २२, किंव ९९ सगळे ९ ह्या इंडेक्समधे मांडता येतील.
- तुमच्या डिक्शनरीत इहवाद हा शून्य इंडेक्समधे आला होता. तोही ह्या ९ ह्या इंडेक्समधे मोडला आहे. इहवाद आणि अनात्मवाद एकदम वेगळे असल्याने ते एकाच इंडेक्समधे मांडता येणार नाहीत.
- काहीच स्थायी नसून सर्व अवकाश आहे हे अनात्मवादचं मूळ आहे त्यामुळे (ब्लँक स्पेस)" : "( ) हे ० इंडेक्समधेच मांडता येतंय/li>
- (मुमुक्षू) सोकाजीतुमच्या ‘छंदा’बद्दल आदर आहेच..
आता मला कोणत्यातरी गट
In reply to तुमच्या ‘छंदा’बद्दल आदर आहेच.. by स्वधर्म
धन्यवाद आणि अभिनंदन
In reply to आता मला कोणत्यातरी गट by प्रसाद गोडबोले
पर्फेक्ट !
In reply to धन्यवाद आणि अभिनंदन by स्वधर्म
सध्या असे वाटते, की
In reply to तुमच्या ‘छंदा’बद्दल आदर आहेच.. by स्वधर्म
व्हॉला !!
In reply to सध्या असे वाटते, की by कॉमी
वेलकम. नक्की सांगेन.
In reply to व्हॉला !! by प्रसाद गोडबोले
विश्व आहे हाच पुरावा आहे
स्वयंसिद्ध, अपौरुषेय, वगैरे ....
In reply to विश्व आहे हाच पुरावा आहे by कॉमी
स्वयंसिद्ध हे स्पेशल प्लिडींग
In reply to स्वयंसिद्ध, अपौरुषेय, वगैरे .... by नठ्यारा
स्वप्न खरं असतं का ?
In reply to स्वयंसिद्ध हे स्पेशल प्लिडींग by कॉमी
स्वप्नावस्था केवळ आपल्या
In reply to स्वप्न खरं असतं का ? by नठ्यारा
स्वयंसिद्ध
In reply to स्वप्नावस्था केवळ आपल्या by कॉमी
स्वयंसिद्ध गोष्टी असू शकतात
In reply to स्वयंसिद्ध by नठ्यारा
आणि मग जर हा एक निर्माता
पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन
In reply to आणि मग जर हा एक निर्माता by कॉमी
पण माझा तो प्रश्न नाही. तसे
In reply to पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन by सोत्रि
विचार करण्यासाठी चांगले
In reply to आणि मग जर हा एक निर्माता by कॉमी