( )129210... अङ्कानां वामतो गति।।
( )129210... अङ्कानां वामतो गति।।० : देव, भक्ती, अध्यात्म, प्रापंचिक निवृत्ती, ज्ञान, साधना , मोक्ष असं काही नाही, थातुर मतुर कल्पना. खाओ पियो ऐश करो . बाकी सर्व निरर्थक आहे. ० १: विश्व आहे हाच पुरावा आहे कोणीतरी विश्वकर्मा अर्थात निर्माता असल्याचा. तस्मात् एक देव आहे. शिव. बस १. २: आणि मग जर हा एक निर्माता बाजूला केला की जे उरते, ते जे की निर्माता नाही, ते झालं निर्माणसाहित्य. म्हणजे शक्ती. शिव नाही ते शक्ति. शिव आहे तसेच शक्तीही आहे. शिव आणि शक्ति . २ ९: आणि हे शिवशक्ती आपण आजू बाजूला पाहतो त्या छोट्या मोठ्या गोष्टींबाबत नाहीये, समस्त विश्वाबाबत आहे ! सूर्य, चंद्र, तारे युनिव्हर्स , पृथ्वी, देश , राष्ट्र, आपलं घर, लॅपटॉप , इंटरनेट, मिपा, टाईप करणारे आपण , वाचणारे वाचक . सर्वच. बस शिव शक्ती. हे समस्त विश्व आणि त्याही पलीकडे शिवशक्तीचे अर्धनारीनटेश्वर रुपात नृत्य चालू आहे ! कॅन यू सी इट ?
https://sreenivasaraos.com/wp-content/uploads/2012/09/ardhanari33.jpg
पण हे म्हणजे संपुर्ण विश्व , चराचर, समस्त झालं , आता हे म्हणजे २ नव्हे, हे म्हणजे ९ झालं!
९ म्हणजे ? ९च का ? अनंत/ इन्फिनिट का नाही?
कारण सामान्य लोकांनां अंक आणि संकल्पना ह्यातील फरक कळत नाही म्हणून. इन्फिनिटी हा अंक नाही, संकल्पना आहे. आणि इन्फिनिटी एक नाही, अगणित आहेत,
इन्फिनिटी ही संकल्पना अकल्प्य आहे, incomprehensible, अप्राप्य आहे.
तस्मात ते सोडा.
समजा, तुम्ही असे जीव आहात की ज्यांना फक्त एकक संख्या समजतात, तर मग तुमच्यासाठी ९ काय असेल ते कल्पना करा. सर्वात मोठ्ठी संख्या ! त्याच्यात सर्वच्या सर्व सामावलं आहे !
तेच दोन अंकी संख्या मोजणाऱ्यासाठी ९९ असेल
आणि ३ अंकी मोजणार्या साठी ९९९ .....
आणि ...
पण मुळात सगळे ९ चे अवतार. मूळ एकमात्र ९.
If you can "imagine" this 9, you can "see " what you think as infinity.
२. पण हे ९ असं काही नाहीयेच. कारण दिसत जरी असले अगणित आकार , पदार्थ दिसत आहेत पण मुळात आहेत फक्त दोघंच . शिव शक्ती. ह्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जे विश्व विश्व वाटतंय ते सूक्ष्म रुपात पाहिलं तर शिव शक्तीच आहे. बस २.
१. पण मग ह्या शिव शक्ती मधील बाऊंडरी कोणती ? कोठे शिव संपतो अन् कोठे शक्ती सुरू होते ?
जे सत् आहे ते शिव , जे असत् आहे ते शक्ती. जे चित् अर्थात जागृत आहे ते शिव, जे अचित आहे , जड आहे , निर्जीव आहे ते शक्ती. जे आनंद आहे ते शिव. जे जे आनंदाचा अभाव आहे ते ते शक्ती.
सत् चित् आनंद = सच्चिदानंद म्हणजे शिव . त्या व्यतिरिक्त सर्व शक्ती.
पण ज्याला आपण जिवंत म्हणत आहोत, चित् म्हणत आहोत, त्याचे एकेक अवयव, कॉम्पोनंट्स हे निर्जीव केमिकल्सनेच बनलेले आहेत ना ! कार्बन हायड्रोजन ऑक्सीजन... अर्थात सर्वच आचित् आहे, सर्वच शक्ती आहे. अगदी "मी आहे" ही जिवंतपणाची जाणीव देखील अचेतन निर्जीव वस्तुतून आलेली आहे. बाकी सर्वच सर्व शक्ती शक्ती शक्ती आहे. केवल १.
पण मग ही जिवंतपणाची जाणिव आली कुठून ? त्या निर्जीव गोष्टींच्या मधून ? म्हणजे ज्याला आपण निर्जीव समजत होतो त्यात ही "मी आहे" ही जाणीव, ही चेतना होतीच , फक्त आपल्याला लक्षात येत नव्हती , अर्थात सर्वच चित् आहे , सत् आहे, सर्वच केवळ शिव आहे , बास "मी आहे" ह्या जाणिवेचा सार्वत्रिक सार्वकालीन असल्याचे कळल्याचा आनंद आहे. सर्वच शिव शिव शिव. केवल १. अर्थात २ नाहीच बस १ आहे. केवल १.
एवं सच्चिदानंदु । आत्मा हा ऐसा शब्दु । अनन्यावृत्ति सिद्धु । वाचक नव्हे ॥ ५-१३ ॥सच्चिदानंद केवळ निर्देश करणारा शब्द आहे, अर्थवाही शब्द नाही. हा शब्द केवळ शिवशक्तीकडे तुम्हाला निर्देश करत आहे, शिवशक्ती काय आहे ह्याचा अर्थ सांगत नाहीये. (तुम्हाला विचारलं की पुर्वदिशा कोणती? तर तुम्ही हाताने दाखवाल अन म्हणाल "ही पूर्व दिशा". पण ती "एक्झॅक्टली पूर्व" असेल का ? आज सकाळी तिथूनच सुर्य उगवला असेल का ? तर नाही . तुमचे उत्तर अर्थावाही नाही, केवळ निर्देशक आहे, दिशा दाखवणारे आहे. तसे काहीसे.) ०/ (ब्लँक स्पेस) पण मुळात शिवशक्ती हे द्वैतच नाही केवळ १ आहे असं आपण म्हणतोय पण ज्याला आपण १ म्हणतोय ते "हे एक आहे" हे कोणाला कळणार? तिथं कळणे न कळणे हेही द्वैत नाही. बस ० आहे.... पण हा अनुभव घेणारा कोण ? पण ० आहे असे म्हणणारा, अनुभवणाराही ही नाही. मग जर अनुभवताच नसेल तर अनुभव नाही, मग अनुभाव्यही नाही, अर्थात हे ० ही नाही... बस (ब्लँक स्पेस)
अहो अर्धनारीनटेश्वरें । गिळित गिळित परस्परें । ग्रहण झालें एकसरें । सर्वग्रासें ॥ ९-६३ ॥
यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:। अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: सोऽयं वो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:।।काय म्हणायचं ते म्हणा. आता काय फरक पडतो. Now I "See" You. अरे I आणि you हे नाहीये. आणि "see" हे देखील नाहीये. बस तो तूच आहेस. बस इतकेच . तुझा तूची देव तुझा तूची भाव फिटला संदेह अन्यातत्वी :) https://www.youtube.com/watch?v=TMLaPbuB3hc तत्त्वमसि! (ब्लँक स्पेस) ( )
In reply to डिक्शनरी by प्रसाद गोडबोले
In reply to "१" इंडेक्स दोनदा? by गवि
In reply to काही कळले काही नाकळले. by चित्रगुप्त
सगळी 'फिलॉसॉफी' अर्थशून्य/अनावश्यकहरकत नाही. पहिलं ० शुन्य , एकक स्थानाचे शुन्य त्याविचाराचेच इंडेक्स आहे. तुम्हाला ते पटत असेल तर तिथं थांबा. ते पटेनासे झाले तर पुढील इंडेक्स वर या! जे कळेल जे पटेल जे सुलभ वाटेल तिथं थांबा ! सर्व स्वान्तःसुखाय आहे हे :) ( )१२९२१०
In reply to तत्वज्ञान व एस्क्यूएल् सारखे विदासंच यांची सांगड by कांदा लिंबू
In reply to चला. कोणाला तरी तशाच शंका by गवि
वास्तविक शून्य हेच सत्य आहेतुम्ही स्टेपबाय स्टेप इन्डेक्स, लॉजिकल अर्ग्युमेंट्स सह फॉलो करत गेलात तर ते एकक स्थानातलं शुन्य आणि ( )१२९२१० ह्यातल्या १ लाखाच्या अलिकडे असलेलं शुन्य / ब्लँक स्पेस ह्या दोहोत फरक आहे हे तुमच्या लक्षात येईल ! They are different ... And once you see it, you can not "un-see" it! ह्यालाच माऊली "अधिक देखणे तरी निरंजन पाहणे " असं म्हणतात ! किंव्वा अमृतानुभवात अजुन सुंदर उपमा देतात माऊली - शिवदर्शनाचा सोहळा !
येहवीं आडोळलिया डोळा । शिवदर्शनाचा सोहळा । भोगिजे भलते वेळां । भलतेणें ॥ ९-५५ ॥काय बोलु , काय एक्स्प्लेन करणार , कसं करणार वर्णन !
किंबहुना श्रीनिवृत्तीं । ठेविलों असों जया स्थितीं । ते काय देऊं हाती । वाचेचिया ? ॥ ८-८ ॥:)
In reply to विंदाचीं कवीता आठवते. by कर्नलतपस्वी
In reply to विंदाचीं कवीता आठवते. by कर्नलतपस्वी
In reply to @प्रगो.....पटले तर उत्तर द्या अन्यथा पुर्व प्रतिसाद होल्ङ्स गुड by कर्नलतपस्वी
In reply to सुपर्ब प्रगो! by Bhakti
अंकप्रवास ९२१०१९० असा आहेग्रेट. प्रत्येकाचा प्रवास वेगळा . प्रत्येकाचं understanding वेगळे. आणि प्रत्येकाचे गंतव्य ही वेगळे. आपला आपण मार्ग चालायचा. आपले आपणच दीप व्हायचं. अत्त दीप भव! चरैवति चरैवाति!
In reply to अंकप्रवास ९२१०१९० असा आहे by प्रसाद गोडबोले
प्रत्येकाचा प्रवास वेगळा . प्रत्येकाचं understanding वेगळे. आणि प्रत्येकाचे गंतव्य ही वेगळेप्रवास वेगळा understanding वेगळं हे ठीक पण गंतव्य कसे काय वेगळे? - (मुमुक्षू) सोकाजी
In reply to एक शंका… by सोत्रि
गंतव्य कसे काय वेगळे?कारण कोठे थांबायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे. कित्येक जण नास्तिक मते मानणारे आहेत जे ० शुन्य वर थांबले आहेत. काही जण फक्त १ च मी म्हणतो तो देव खरा बाकी सब झुट ह्या मतावर ठाम आहेत ते आपण पाहतोच आसपास. कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी || असे म्हणणारे सावतामाळी हे पॅनथेईस्ट अर्थात ९ वर थांबले आहेत असे म्हणाता येईल. बाकी अनेक भारतीय भोळे भाबडे भाविक जे 'अनेक इश्वर असले तरी मुळात एक आहे' अन मी दुसरा ह्या द्वैतावर , २ वर थांब्ले आहेत. आमचे एक अत्यंत जवळचे मित्र सगळं वाचुन समजुन देखील शेवटी द्वैतच सत्य आहे , द्वैतच जास्त भावते असे मानणारे आहेत. बहुतांश भारतीय सम्प्रदाय इस्कॉन बिस्कॉन वगैरे ह्यात मोडतात. बाकी बहुतांश संत आणि विशेषकरुन मराठी संत अद्वैती आहेत ते १ , सर्वं खल्विदं ब्रह्म असे म्हणुन त्याच्याही परे गेले आहेत. मला स्वतःला अद्वैत जे मी ( ब्लँक स्पेस) ने इंडेक्स केले आहे ते भावते. तुकोबांच्या शब्दात -
जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥१॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥२॥ देखोनि न देखें प्रपंच दृष्टी । स्वप्नीचिया सृष्टि चेइल्या जेवीं ॥३॥ तुका म्हणे ऐसें जालियावांचून । करणें तो सीण वाटतसे ॥४॥आवड ज्याची त्याची ! म्हणुन म्हणालो , प्रत्येकाचे गंतव्य वेगळे !
In reply to गंतव्य कसे काय वेगळे? by प्रसाद गोडबोले
कारण कोठे थांबायचं हा प्रत्येकाचा चॉईस आहे.मग तो थांबा होणार नाही का गंतव्याच्या मार्गावरचा? मोक्ष, निर्वाण, निब्बाण, जजमेंट डे, कयामत हे गंतव्य आहे, हे सर्व मनुष्यप्राण्यांसाठी सेमच असेल, वेगळे नाही. - (मार्गस्थ) सोकाजी
In reply to कारण कोठे थांबायचं हा by सोत्रि
In reply to अंकप्रवास ९२१०१९० असा आहे by प्रसाद गोडबोले
In reply to आवर्तन कसं दाखवाल ? by नठ्यारा
In reply to माफ करा , पण तुम्हाला नक्की by प्रसाद गोडबोले
- सगळे ९ चे अवतार असल्याने २, दशम व त्यापुढील पटीतल्या ११, २२, किंव ९९ सगळे ९ ह्या इंडेक्समधे मांडता येतील.
- तुमच्या डिक्शनरीत इहवाद हा शून्य इंडेक्समधे आला होता. तोही ह्या ९ ह्या इंडेक्समधे मोडला आहे. इहवाद आणि अनात्मवाद एकदम वेगळे असल्याने ते एकाच इंडेक्समधे मांडता येणार नाहीत.
- काहीच स्थायी नसून सर्व अवकाश आहे हे अनात्मवादचं मूळ आहे त्यामुळे (ब्लँक स्पेस)" : "( ) हे ० इंडेक्समधेच मांडता येतंय/li>
In reply to तुमच्या ‘छंदा’बद्दल आदर आहेच.. by स्वधर्म
आता मला कोणत्यातरी गट क्रमांकात ढकलण्यात येईल पण त्याचा मला किंवा कुणालाच कसलाही फरक पडणार नाहीकोणत्याही गटात कधीही कोणाला ढकलता येत नसतं , गट क्रमांक तुमच्या जन्मापासुनच्या संस्कारांन्नी निर्धारित होत असतात. ज्यांनी स्वामी चिनमयानंद आणि तशाच लोकांकडुन खरेच काहीतरी अद्वैत तत्वज्ञानाचा अभ्यास केला असेल , श्रीमदाद्य शंकराचार्य ह्यांन्नी केलेले बौध्द मत खंडन , द्वैत , शाक्त , शैव , मीमांसक , द्वैतवाद आदि अन्य मतांचे केलेले खंडन वाचले असेल त्यांन्ना वरील लेखात उधृत केलेली विचारसरणी स्टेप बाय स्टेप लॉजिकल अर्ग्युमेंट्स आहेत आणि ते लक्षात रहावेत म्हणुन त्यांन्ना ()१२९२१० हे इंडेक्सिंग केलेले आहे हे नक्कीच लक्षात येईल . ज्याच्या लक्षात येईल त्याचा येईल ! "जी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही ती अंधश्रध्दा , संकल्पनांचे जोखड वगैरे वगैरे" ही कोणत्या गटाची विचारसरणी आहे हे तुमचे तुम्हालाही जाणवत असेलच ! मला तुम्हाला कोणत्या गटात ढकलण्याची गरजच नाही. तुम्ही ऑलरेडीच तिथे आहात ! आणि तुम्ही मला उपरोधिक टीकात्मक बोलत असलात तरी ह्या लेखाच्या निमित्ताने तुम्हाला तुमचा गट कोणता हे लक्षात येत आहे ह्यातच मला समाधान आहे ! मला अभ्यास करताना एकदा ऐकण्यात आले होते की ढोबळमानाने की महायान आणि थेरवाद बौध्द मतात एक मोठ्ठा फरक आहे तो म्हणजे - महायान म्हणतो की एकदा आपल्याला आपलं मुळस्वरुप लक्षात आलं की बाकी सगळं शुन्यच आहे तस्मात आपल्याला काहीच करायची गरज नाही , एकदा आपण बुध्दत्वाला पोहचलो की बस. आणि थेरवाद मतात - आपण सर्वच बुध्दत्वाला प्राप्त होत नाही तोवर धर्मचक्र परिवर्तन चालु राहिले पाहिजे कारण प्रत्येकाचे निर्वाण महत्वाचे आहे, केवळ आपले निर्वाण साधुन पुरेसे नाही. म्हणुन त्यामध्ये बोधीसत्व ही कन्सेप्ट आहे . किंव्वा व्हाईस-अ-वर्सा. मी काही ह्यातील एक्क्ष्पर्ट नाही. पण हे जरं असं असेल तर मला स्वतःला महायान विचारधारा भावते. मला कोणाला काहीही शिकवण्यात रस नाही. लेखन करणे हा माझा छंदच आहे. Now you understand what do I mean by - "हे सगळं स्वांन्तःसुखाय आहे. " तुका म्हणे आता खेळतो कौतुके । झाले तुझे सुख अंतर्बाही ।। मनःपुर्वक धन्यवाद :)
In reply to आता मला कोणत्यातरी गट by प्रसाद गोडबोले
In reply to धन्यवाद आणि अभिनंदन by स्वधर्म
In reply to तुमच्या ‘छंदा’बद्दल आदर आहेच.. by स्वधर्म
सध्या असे वाटते, की संकल्पनांची वेगळीच मांडणी करून भाषेवरील प्रभुत्वाने काही तरी अगम्य कोणी बोलत असेल, तर तो त्यांचा खेळ किंवा छंद आहे. त्याचा सत्याशी संबंध आहे, या अंधश्रध्देतून बाहेर पडल्यामुळे मोकळे वाटते. बर्याच लोकांना आपल्यावर कोणत्या संकल्पनांचं जोखड आहे याच पत्ताच नसतोअसेच वाटते.
In reply to सध्या असे वाटते, की by कॉमी
असेच वाटते.पर्फेक्ट ! धन्यवाद कॉमी. तुम्ही लेखातील किंव्वा त्यावरील अन्य प्रतिसादातील कशावरही काहीही प्रतिसाद न देता न चुकता गट. क्रमांक. २ मधील लोकांचा जो विचार असेल असे ज्या प्रतिसादातुन स्पष्ट जाणवते त्यावरच प्रतिसाद दिलात. तुमचं "असेच वाटतं" असे म्हणणे ह्याचा अर्थच "माझा मेंदुही अशाच प्रकारे विचार करतो" असा आहे ! आणि माणसांचे विचार हे जन्मापासुन झालेल्या संस्कारांनी ठरत असल्याने जन्मापासुनच तुमचा गट निश्चित होत जातो, (गट बदलता येत नाहीच अशातला भाग नाही , पण गट बदलणे वाढत्या वयाबरोबर दुरापास्त होत जाते. ) मी वरच म्हणलो त्याप्रमाणे - कोणी कोणाला कोणत्याही गटात ढकलु शकत नाही, आपला गट हा आपल्या जन्मापासुन आपल्यावर झालेल्या संस्कारांमधुन आपोआप ठरत असतो. आपला गट कोणता हे ज्याने त्याने आपले आपण समजुन घ्यायचे असते . Its a process of self discovery. मला मनापासुन आनंद आहे की मी तुमचा गट क्र. २ अगदी व्यवस्थित ओळखला आहे ! आणि हा एक प्रकारे पुरावाच आहे की मला माझा गट क्र.१ व्यवस्थित कळालेला आहे ! बाकी तुम्हाला अजुन काही वाटत असल्यास आवर्जुन सांगा. This is actually very very helpful. (No sarcasm intended at all.) मनःपुर्वक धन्यवाद !
In reply to व्हॉला !! by प्रसाद गोडबोले
विश्व आहे हाच पुरावा आहे कोणीतरी विश्वकर्मा अर्थात निर्माता असल्याचा. तस्मात् एक देव आहे. शिव. बस १.जर प्रत्येक गोष्टीचा त्या गोष्टीपेक्षा वेगळा निर्माता असतो हे गृहितक मानले तर कोणतेही special pleading न करता विश्वानिर्मात्याचा निर्माता कोण हा प्रश्न उभा राहतो.
In reply to विश्व आहे हाच पुरावा आहे by कॉमी
In reply to स्वयंसिद्ध, अपौरुषेय, वगैरे .... by नठ्यारा
In reply to स्वयंसिद्ध हे स्पेशल प्लिडींग by कॉमी
In reply to स्वप्न खरं असतं का ? by नठ्यारा
In reply to स्वप्नावस्था केवळ आपल्या by कॉमी
In reply to स्वयंसिद्ध by नठ्यारा
आणि मग जर हा एक निर्माता बाजूला केला की जे उरते, ते जे की निर्माता नाही, ते झालं निर्माणसाहित्य. म्हणजे शक्ती. शिव नाही ते शक्ति. शिव आहे तसेच शक्तीही आहे. शिव आणि शक्तिहे केवळ रुपकात्मक, कवितेचे मटेरियल वाटते. ह्याचा खरोखर सत्याशी काही संबंध आहे असे वाटतं नाही. बाकी उर्वरित विचारांबाबत. शिव शक्ती हि द्वयी घेऊन शेवटी सगळीकडे चेतना असण्याची शक्यता असल्याने सगळे शिव आहे हे वाचायला छान आहे, विचार करण्यासाठी चांगले मटेरियल आहे. लेखनाचा फ्लो छान आहे. पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन वाटते. सर्व गोष्टींचा बिल्डिंग ब्लॉक एकच आहे हे खरे असले तरी त्याचे ज्ञान होणे किती cathartic असेल ह्याबाबत शंका आहे.
In reply to आणि मग जर हा एक निर्माता by कॉमी
पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन वाटते.सहमत, शाब्दिक पातळीवर कितिही चर्चा केली तर ती शब्दबंबाळच होणार.
सर्व गोष्टींचा बिल्डिंग ब्लॉक एकच आहे हे खरे असले तरी त्याचे ज्ञान होणे किती cathartic असेल ह्याबाबत शंका आहे.त्याचे ज्ञान होणे शक्य आहे. ध्यानमार्गाचा अवलंब केल्यास ते शक्य आहे हे ध्यानमार्गाच्या स्वानभुवावरून सांगू शकतो. - (ध्यानमार्गी) सोकाजी
In reply to पण सगळे निरर्थक स्पेक्युलेशन by सोत्रि
In reply to आणि मग जर हा एक निर्माता by कॉमी
विचार करण्यासाठी चांगले मटेरियल आहे.एवढेच महत्वाचे आहे कारण आपण फक्त विचारच करू शकतो या विषयावर. सुरुवात, शेवट , निर्मिती करणारे कोणीतरी, बाऊंडरी वगैरे असलीच पाहिजे ही आपल्या विचारांची मर्यादा आहे. कारण आपण सुरुवात आणि शेवट असलेले आहोत. कुंपणे असलेले आहोत. आपण या खेरीज कल्पनाच करू शकत नाही. कोणीतरी ईषणा केल्याशिवाय काहीतरी "अस्तित्वात" येऊच शकत नाही अशी घट्ट समजूत ही आपल्या मर्यादित परीघाची देणगी. आणि तो तोडून आपण जगू शकणार नाही.
डिक्शनरी