मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनोरथाच्या वाटेवर जरी

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
भू-कवचा विंधून धरेच्या गाभ्याशी जाईन शून्य गुरुत्वाकर्षण तिथले अधांतरी मोजेन निंबोणीचे रोप कोवळे चन्द्रावर रुजवीन अंगाईचे शब्द बदलूनी पुन्हा लिहून काढीन जर्द तांबडी मंगळमाती शनीवरी शिंपीन शनि-मंगळ मग युती अनोखी एकवार पाहीन राहू-केतुची जोडगोळी मग समक्ष बघण्यासाठी चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद सोडवीन निरगाठी सात अश्व सूर्याचे - त्यांना थोपटीन प्रेमाने त्यांचा दाणा , पाणी , खरारा करीन मी निगुतीने कृष्णविवर सैराट , भटकते हुडकून मग काढीन गळाभेट घेईन तयाची - त्यात विरुन जाईन मनोरथाच्या वाटेवर जरी वास्तव पसरी काटे त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे

वाचने 3458 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 07/06/2024 - 15:32
छान. लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 07/06/2024 - 15:33
मनोरथाच्या वाटेवर जरी वास्तव पसरी काटे त्या काट्यातून फूल फुलवी जो त्याचे संचित मोठे
-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 07/06/2024 - 17:51
निंबोणीचे रोप कोवळे चन्द्रावर रुजवीन अंगाईचे शब्द बदलूनी पुन्हा लिहून काढीन
हे आवडलं !

चित्रगुप्त 13/06/2024 - 21:28
ही कविता इंग्रजीत गूगल भाषांतर करून कृबु प्रतिमेसाठी वापरली असता खालील चित्रे आली: (हे प्रयोदाखल करून बघितलेले आहे, बाकी हेतु काही नाही) . . .

In reply to by चित्रगुप्त

अनन्त्_यात्री 14/06/2024 - 10:44
टाईमपास कवितेला चार चाँद लावल्याबद्दल चित्रगुप्ताय नम: सूर्याच्या सात घोड्यांपैकी १-२ गायबलेत. बहुधा माझी नजर चुकवून चरायला गेले असावेत.

कर्नलतपस्वी 13/06/2024 - 22:07
कवीता सुंदर आहे. चित्रगुप्तांचे उद्योग खतरनाक वाटले, पण तरी सुद्धा पुरक आहेत.

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 13/06/2024 - 22:26
यात (आपले डोके अजिबात न वापरता) भाषांतर आणि चित्रनिर्मितीत संपूर्णपणे कृबुचाच वाटा आहे. नवनवीन प्रयोग करण्यातून ज्ञान मिळत राहील.

अथांग आकाश 14/06/2024 - 13:06
कविता आवडली! मी नजरचूकीने माथेरानच्या वाटेवर जरी शिर्षक वाचले होते :P