मनोरथाच्या वाटेवर जरी
भू-कवचा विंधून धरेच्या
गाभ्याशी जाईन
शून्य गुरुत्वाकर्षण तिथले
अधांतरी मोजेन
निंबोणीचे रोप कोवळे
चन्द्रावर रुजवीन
अंगाईचे शब्द बदलूनी
पुन्हा लिहून काढीन
जर्द तांबडी मंगळमाती
शनीवरी शिंपीन
शनि-मंगळ मग युती अनोखी
एकवार पाहीन
राहू-केतुची जोडगोळी मग
समक्ष बघण्यासाठी
चंद्रसूर्य कक्षांच्या अलगद
सोडवीन निरगाठी
सात अश्व सूर्याचे - त्यांना
थोपटीन प्रेमाने
त्यांचा दाणा , पाणी , खरारा
करीन मी निगुतीने
कृष्णविवर सैराट , भटकते
हुडकून मग काढीन
गळाभेट घेईन तयाची -
त्यात विरुन जाईन
मनोरथाच्या वाटेवर जरी
वास्तव पसरी काटे
त्या काट्यातून फूल फुलवी जो
त्याचे संचित मोठे
वर्गीकरण
वाह !
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ख़ास.
निंबोणीचे रोप कोवळे
प्रा.डाॅ., चौ को
या कवितेचे कृबुने केलेले चित्रण बघा.
In reply to या कवितेचे कृबुने केलेले चित्रण बघा. by चित्रगुप्त
Surrealistic कृ बु चित्रांनी
खतरनाक
In reply to खतरनाक by कर्नलतपस्वी
खतरनाक उद्योग
कविता आवडली!
खूप सुंदर. एकदा सुरुवातीला करेन मग करीन