नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो .
९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !
२५ किलो वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो .
सोबत मोबाईल न घेता , पैसे न घेता ,तीन हजार सहाशे किलोमीटर अंतराची , बहुतांश काळ नर्मदेच्या काठाकाठाने केलेली ,ही पायी परिक्रमा ... साडेपाच महिन्यात १५ जोड्या पादत्राणे झिजवणारा हा कठीण प्रवास . अगदी हातातील दंड ( काठी ) नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडवत बुडवत केलेला . तोल गेला की कपाळमोक्ष निश्चित ! अशा ज्या पारंपारिक मार्गाने केवळ एक टक्का परिक्रमावासी व नागा साधू जातात ,त्या मार्गाची ही एक डोळस अंतर्यात्रा ...
परिक्रमेदरम्यान रोज रात्री थोडेसे लिहून ठेवायचो मगच पाठ टेकायचो.अशा चार वह्या भरल्या .खरे सांगायचे तर अनुभव कथन हा शब्द चुकीचा आहे कारण अनुभव हा सापेक्ष असतो .परंतु सर्वजण मागे लागल्यामुळे त्यातील निवडक भाग सर्वांसाठी मांडतो आहे . हेतू हाच की त्यामुळे नर्मदा परिक्रमा नक्की कशी असते ते लक्षात यावे .
ही लेखमाला वाचून तुम्हाला नर्मदेविषयीच्या पौराणिक , ऐतिहासिक , भौगोलिक , नैसर्गिक , अध्यात्मिक ,पर्यावरण विषयक , आयुर्वेदिक , सामाजिक , सांस्कृतिक ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय , स्थानिक , भाषीक , शास्त्रीय , राजकीय , दैवी , दुर्दैवी अशा अनेक अंगांची तोंड ओळख निश्चितपणे होणार आहे . प्रत्येकाला नर्मदा परिक्रमा करता येणे शक्य होईलच असे नाही . परंतु ही लेख माला वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानस परिक्रमा नक्की घडेल असा विश्वास वाटतो .
कलीयुगात अनेक देव आहेत परंतु ते प्रत्येक उपासकाला दिसतीलच असे नाही . नर्मदा मात्र अशी एकमेव देवता आहे जी साक्षात तुमच्यासमोर प्रकट रुपाने वहाते आहे .
आणि तिचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाला ती अनुभूती देतेच . देते म्हणजे देतेच !
नर्मदे काठी बसून घराचे , प्रपंचाचे , कामाचे स्मरण करण्यापेक्षा प्रपंचामध्ये राहूनच , घरामध्ये बसूनच , सर्व कामे करता करताच अंतःकरणापासून नर्मदेच्या काठाचे चिंतन करणे कधीही श्रेष्ठ !
चला तर मग ! मनातील सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून आपण सर्वजण मिळून पुन्हा एकदा करूयात . . . नर्मदा परिक्रमा
mazinarmadaparikrama.blogspot.com

mazinarmadaparikrama.blogspot.com| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
24434
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुढील भाग वाचायची उत्सुकता दाटली आहे.
पुढील भाग वाचायची उत्सुकता दाटली आहे.
In reply to पुढील भाग वाचायची उत्सुकता दाटली आहे. by चित्रगुप्त
फोटो मस्तच.
फोटो मस्तच.
फोटो मस्तच.
छानच. खंड न पाडता पुढील भाग
छानच. खंड न पाडता पुढील भाग
नर्मदे हर
थोडक्यात तीन चार लेखांत
पुस्तके वाचन वेगळे आणि हे लेखन वेगळे.. कारण..
In reply to थोडक्यात तीन चार लेखांत by कंजूस
या लेखमालेचे एकूण ७५ भाग आहेत असे (ब्लॉगवरून) समजले
काल आणी आज...
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता
बापरे.
In reply to आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता by मनो
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा
In reply to बापरे. by शाम भागवत
खरंय.
In reply to लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा by मनो
+११११११११११
In reply to लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा by मनो
आपणास साष्टांग दंडवत !
In reply to लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा by मनो
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर
In reply to बापरे. by शाम भागवत
छान.
अगदी सहज सुन्दर लेखन. वाचतोय.
सुंदर लेखन ७५ भाग वाचून झाले.
७९
In reply to सुंदर लेखन ७५ भाग वाचून झाले. by अहिरावण
९० पूर्ण
In reply to ७९ by अहिरावण
अरे वा, माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to ९० पूर्ण by अहिरावण
९८ पूर्ण
In reply to ९० पूर्ण by अहिरावण
फेक किस्सा की वास्तव कल्पनेपेक्षा अधिक दारुण?
In reply to ९८ पूर्ण by अहिरावण
ढाराढूर नव्हे सावध झोपला होता .
In reply to फेक किस्सा की वास्तव कल्पनेपेक्षा अधिक दारुण? by अहिरावण
:)
In reply to ढाराढूर नव्हे सावध झोपला होता . by Narmade Har
असं प्रांजळ आणि वाचावेसे
एक लक्ष मानस परिक्रमा
मानस परिक्रमा पूर्ण
नर्मदे हर !
अवांतर :
In reply to नर्मदे हर ! by धर्मराजमुटके
चांगले प्रश्न विचारले आहेत.
In reply to नर्मदे हर ! by धर्मराजमुटके
मला वाटते खरडवहीवर किंवा
In reply to नर्मदे हर ! by धर्मराजमुटके
का? समजु द्या की सगळ्यांना ....
In reply to मला वाटते खरडवहीवर किंवा by शाम भागवत
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे
In reply to का? समजु द्या की सगळ्यांना .... by अहिरावण
आशेवर भारतीय माणूस जगतो...
In reply to मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे by शाम भागवत
प्रश्न व उत्तरे क्रमशः
In reply to नर्मदे हर ! by धर्मराजमुटके
धन्यवाद !
In reply to प्रश्न व उत्तरे क्रमशः by Narmade Har
नर्मदे हर !
In reply to प्रश्न व उत्तरे क्रमशः by Narmade Har
अप्रतिम लिखाण
नर्मदे हर!!
+१
In reply to नर्मदे हर!! by राजेंद्र मेहेंदळे
१०० % जमणार !
In reply to नर्मदे हर!! by राजेंद्र मेहेंदळे
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील
लेख आवडला !
वाचतो आहे.
धन्यवाद!
In reply to वाचतो आहे. by सुक्या
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे
In reply to धन्यवाद! by Narmade Har
अर्ध झालंय अर्धं बाकीय
In reply to हा तुमचा नम्रपणा झाला. खरे by सुक्या
अबकी बार १०० लेख पार !
वाचनासाठी दुवा
आमच्या उत्युपाचा दुवा
पहात आहोत विडीओ.
In reply to आमच्या उत्युपाचा दुवा by Narmade Har
नर्मदा परिक्रमा लेख वाचून
स्लिपिंग बॅग वापरायची.
In reply to नर्मदा परिक्रमा लेख वाचून by कंजूस
मलाही...
सत्तरीच्या घरातले कितीतरी
In reply to मलाही... by कर्नलतपस्वी
सत्तर झाले की.
मैय्याने बोलवले तर जायचे.
In reply to सत्तर झाले की. by कर्नलतपस्वी
एक लाख तास श्रवण !
धन्यवाद. मी सारे लेख ब्लॉग
मनाला भिडणारे अनुभव कथन
https://youtu.be/7gDylUl04yc