हेंडगूळ
In reply to हा शब्द by राजेंद्र मेहेंदळे
In reply to ह्या लेखातुन काय शिकायला by शानबा५१२
In reply to मुक्तांगणमध्ये असणारे पेशंट by सर टोबी
आणि त्यांना भेट द्यायला येणारे पाहुणे यांचा संवाद ही बाब आत्तापर्यंत समजली नव्हती. या अशा भेटी गाठी काही जणांसाठी मानसिक दृष्ट्या वेदनादायक असू शकतील असा माझा अंदाज आहे.संपूर्ण सहमत! मूक्तांगणशी माझा संबंध आला होता एका (आज दिवंगत असलेल्या) शाळूसोबती मित्राला भेटण्याच्या निमित्ताने! ज्याचा उल्लेख मी चारेक वर्षांपूर्वी इथे मिपावर करून झाला आहे.... व्यसनमुक्ती केंद्र वगैरे आधुनिक अंधश्रद्धांवर ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांना ठेऊद्या बापडे, पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा ह्याशिवाय अशा व्यसनमुक्ती केंद्राची अजून काही वेगळी ओळख नाही असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत. व्यसनमुक्ती केंद्रे आणि त्या अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या 'तथाकथित' धंदेवाईक मनसोपचारांबद्दल खूप काही लिहिण्यासारखे आहे पण आता इथेच थांबतो... (नव्या अंधश्रध्दांचा कट्टर विरोधक) टर्मीनेटर
In reply to आणि त्यांना भेट द्यायला by टर्मीनेटर
पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा ह्याशिवाय अशा व्यसनमुक्ती केंद्राची अजून काही वेगळी ओळख नाही असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत.ऑ?? टॉल क्लेम?!! म्हणजे रोचक आहे पण तरीही... असेल बुवा.
In reply to पण अडगळ वाटू लागलेल्या आई by गवि
म्हणजे रोचक आहेआहेच! मिळाल्यास उपरोलिखित केसेसचा अधिकृत डेटा मिळतो का ते पाहावे, आयपीस, आएएस ऑफिसर्स पासून असिस्टंट पोलीस कमिशनर, फौजदार, हवालदार आणि प्रशासकीय सेवेतील किती मंडळी (नोकरी टिकवण्या साठी अनिवार्य झाल्याने) तिथे भरती होतात ह्याची माहिती मिळाल्यास खूपच रोचक ठरेल 😀 सब गंदा हैं पर धंदा हैं ये...
In reply to आणि त्यांना भेट द्यायला by टर्मीनेटर
In reply to व्यसनमुक्ती केंद्र वगैरे by सुबोध खरे
बरे झालेले बहुसंख्य रुग्ण आपण व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन बरे झालो हे कुठेही सांगत नाहीत कारण नोकरी व्यवसाय लग्नसंबंधात अडथळा येऊ शकतो.असा प्रकार मनोरुग्ण असलेल्या ओळखीच्या मुलींबरोबर पाहिला.दोघींचा भूतकाळ लग्नासाठी लपविला गेला.एक चांगला संसार करते पण दुसरी परत पहिल्या मानसिक स्थितीत आली.वाताहतच आहे. खरोखर आईवडिलांचा घरच्या लोकांचा मनोरूग्ण,व्यसन असणार्या मुलांमुळे कस लागतो.
In reply to व्यसनमुक्ती केंद्र वगैरे by सुबोध खरे
In reply to असेच काहीसे विचार मनात आले by गवि
In reply to आणखी एक पटले तुमचे डॉक्टर.. by गवि
In reply to एके काली क्षयरोगावरील उपचार by सुबोध खरे
In reply to एके काली क्षयरोगावरील उपचार by सुबोध खरे
In reply to व्यसनमुक्ती केंद्र वगैरे by सुबोध खरे
व्यसनमुक्ती केंद्र वगैरे आधुनिक अंधश्रद्धांवर ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांना ठेऊद्या बापडे, पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा ह्याशिवाय अशा व्यसनमुक्ती केंद्राची अजून काही वेगळी ओळख नाही असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत.सुमारे साडे पाच वर्षांपुर्वी पुंबा ह्यांच्या "गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?" ह्या धाग्यावर फार छान चर्चा झाली होती. धाग्यावरचे तुमचे सर्व प्रतिसाद मुद्देसुद आणि निर्विवादपणे माझ्या विचारांशी जुळणारे होते. त्या धाग्यावर माझाही एक लांबलचक प्रतिसाद होता ज्यात मी व्यसनाधीनता आणि उपरोल्लीखीत दिवंगत मित्राचा व पुण्यात असलेल्या एका मित्राच्या 'हेल्प' ह्या व्यसनमुक्ती केंद्राचा उल्लेख केला होता. हा जुना प्रतिसाद शोधताना बाकिच्या प्रतिसादांचीही उजळणी झाली. आज ते सर्व प्रतिसाद वाचत असताना तुम्ही एका मिपाकराला दिलेल्या उपप्रतिसादातील खालचे वाक्य वाचले आणि गंमत वाटली.
"मी जे लिहिले आहे ते तुम्हाला पटले नाही तर ते माझे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्या"तीथे ज्या मिपाकराला तुम्ही लिहिलेले पटले नव्हते त्याला तुम्ही "ते तुमचे वैयक्तिक मत आहे असे समजून सोडून द्यायला सांगीतले होते, आणि इथे माझ्या वरच्या वाक्यातला "असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत." असा स्पष्ट उल्लेख असलेला भाग सोयीस्करपणे दुर्लक्षीत करुन,
माणसं स्वार्थी असतात. त्याचे खापर व्यसनमुक्ती केंद्र किंवा मनोविकार रुग्णालयावर कशाला फोडताय? म्हणून असे सरसकट विधान करणे चूक आहेअसे लिहुन माझ्या 'वैयक्तिक मताला' सरसकट विधान ठरवताय ह्याची गंमत वाटली 😂 असो,
सहा आंधळे आणि हत्ती च्या गोष्टी प्रमाणे आपण जेवढे पहिले तेवढाच आपला अनुभव आहे असे खेदाने म्हणावे लागते.हे वाक्यही गमतीशीर आहे! व्यसनाधीन लोकं आणि व्यसनमुक्ती केंद्रांबद्दलचा माझा अनुभव काय आणि किती आहे ह्यची आपल्याला कल्पना नसल्याने खेद वगैरे अजिबात वाटुन घेउ नये. हत्ती आणि आंधळ्यांच्या गोष्टीप्रमाणे 'व्यसनमुक्ती केंद्र' म्हणजे हत्ती आणि आंधळ्यांनी चाचपडुन पाहिलेले त्याचे सहा अवयव म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रांच्या व्यवस्थापनातले सहा घटक अशी कल्पना केल्यास त्या सहापैकी पाच घटक मी अगदी डोळसपणे अनुभवले आहेत. फक्त एक घटक तेवढा शिल्लक रहातो, तो म्हणजे तिथे स्वतः रुग्ण म्हणुन भरती होण्याचा अनुभव मात्र मला नाही 😀 वर उल्लेख केलेल्या पुण्यातल्या 'हेल्प' आणि खारघरच्या 'निर्धार' अशा दोन व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये 'पाहुण्यांशी संवाद' म्हणुन चालणाऱ्या सेशन्स मध्ये संचालकांच्या विनंतीला मान देउन तिथल्या रुग्णांना 'मोटीव्हेट' करण्यासाठी अनेकदा भाषणेही ठोकली आहेत. वास्तवीक 'नशा' ह्या प्रकारात मोडणारा आणि सर्वसामान्यपणे ज्ञात असलेला नशेचा एकही प्रकार असा नसेल जो एकदा का होईना पण तो करुन अनुभवला नाही अशा माझ्यासारख्या माणसाने नशामुक्ती केंद्रातल्या रुग्णांसमोर भाषण्/व्याख्यान देण्यची कल्पना जेव्हा 'हेल्प'चा संचालक असलेल्या किशोरने पहिल्यांदा मांडली होती तेव्हा मला ती फारच हास्यास्पद वाटल्याने मी त्यासाठी स्पष्ट नकार दिला होता, पण त्यात काही वावगे नसल्याचे सांगत पुस्तकी ज्ञानावर आधारीत उपदेशांचे डोस पाजणाऱ्या पाहुण्यांपेक्षा अनुभवाचे बोल ऐकणे रुग्णांना आवडते आणि त्याचा परिणामही चांगला होतो असे केवळ सांगुनच न थांबता त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी एका रविवारी 'अल्कोहोलिक अॅनॉनीमस' ह्या संस्थेच्या सेशनलाही मला घेउन गेला होता. पुणे म.न.पा.च्या एका शाळेच्या वर्गात चालणाऱ्या त्या सेशनसाठी उपस्थित असलेली विविध वयोगटांतली ४०-५० स्त्री-पुरुष मंडळी पाहुन सुरुवातीला मला हसुच आले होते कारण त्यांच्यापैकी अर्ध्याहुन अधिक मंडळी प्रचुर मद्यपान करुन आली होती. पुढे त्यांच्यातला एक एक जण आपापले अनुभव सांगू लागल्यावर मात्र मन गलबलुन गेले होते. व्यसनाधीन वीशी-पंचवीशीतल्या मुली आणि मध्यमवयीन महिलांचे अनुभवही सुन्न करणारे होते. आणि विशेष म्हणजे नशामुक्तीसाठीच्या सेशनला नशेत हजर असलेली मंडळीही मन लाउन सगळ्यांचे बोलणे ऐकत होती, आपल्या शंका विचारत होती. हा प्रकार पाहिल्यावर मात्र मला किशोरचे म्हणणे पटले होते आणि माझ्या त्यानंतरच्या प्रत्येक पुणे भेटीत त्याच्या केंद्रातल्या रुग्णांशी 'संवाद' साधत होतो. तिथेच त्याने माझी तुषार नातूंशी ओळख करुन दिली होती आणि ते खारघरच्या 'निर्धार' व्यसनमुक्ती केंद्राची धुरा सांभाळत असताना काहिवेळा तिथेही जाउन तिथल्या रुग्णांशी 'संवाद' साधला होता. तात्पर्य काय? तर माझे वरिल 'स्पष्ट वैयक्तिक मत' हे ऐकिव-वाचीव ज्ञानतुन काढलेला निस्कर्ष नसुन ते अनुभवाचा पायावर आधारित आहे. आणि ते 'वैयक्तिक मत' असल्याने सगळ्यांना पटलेच पाहिजे असा माझा दुराग्रहही नाही! पटले तर घ्यायचे नाहितर सोडुन द्यायचे. हाकानाका. आता प्रतिसाद चांगला का वाटला ते सांगतो, तुम्ही जी उदाहरणे दिली आहेत ती सर्व माझ्या व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे "अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा" ह्या मताला दुजोरा देणारी व्यसनाधीन व्यक्तीच्या कुटुंबीयांची मानसिकता दर्शवत आहेत. बाकी,
व्यसनमुक्ती हा एक अत्यंत कठीण आणि गहन असा विषय आहे. आणि जोवर आपला अगदी जवळचा नातेवाईक यात अडकत नाही तोवर बहुसंख्य माणसे व्यसनाबद्दल आणि व्यसनमुक्ती केंद्राबद्दल बऱ्यापैकी पूर्वग्रह बाळगून असताना दिसतात.सहमत! फक्त वरिल वाक्यात 'बऱ्यापैकी पूर्वग्रह बाळगून असताना दिसतात.' ऐवजी 'बऱ्यापैकी गैरसमज बाळगून असताना दिसतात.' असा बदल सुचवावासा वाटतो! आणि,
खाजगी व्यसनमुक्ती केंद्रात माणूस आपल्या नातेवाईकाला किती वेळ " अडकवून" ठेवू शकेल?ते 'त्या' नातेवाईकाच्या व्यसनापायी दरमहा होणाऱ्या खर्चावर आणि कुटुंबियांच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबुन असेल. आणि शेवटी घरच्यांनी रुग्णाच्या सुधारण्याची आशा सोडुन पैसे भरणे आणि रुग्णाचा घरवापसीचा मार्ग बंद केल्यावर त्याच्यासमोर त्याच केंद्रात राहुन-खाउन दोन-तिन हजार रुपये हातखर्चाला मिळ्णारे पडेल ते काम करण्याचा पर्याय उपलब्ध असतो, असे अनेक रुग्ण आहेत ज्यांनी हा मार्ग स्वीकारला आहे.
In reply to चांगला आणि काहीसा गमतीशीर प्रतिसाद आवडला! by टर्मीनेटर
In reply to आणि त्यांना भेट द्यायला by टर्मीनेटर
In reply to आणि त्यांना भेट द्यायला by टर्मीनेटर
पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागाटर्मी भाऊ, हे अडगळ वैग म्हणणं अ ति वाटते. आधी कुटूंबिय, मित्र मंडळी त्यांच्या कुवती प्रमाणे अनेक प्रयत्न करतात. कुटंबातला विशेषतः तरूण, अगदी व्यसनी झाला तरी कुटूंबियाच्या दृष्टीने अॅसेट असतो. ते हरले की मगच त्यांची पाठवणी केन्द्रात करतात असे पाह्ण्यात येते !
In reply to पण अडगळ वाटू लागलेल्या आई by चौथा कोनाडा
"व्यसनमुक्ती केंद्र वगैरे आधुनिक अंधश्रद्धांवर ज्यांना विश्वास ठेवायचा आहे त्यांना ठेऊद्या बापडे, पण अडगळ वाटू लागलेल्या आई-बापाप्रमाणे कुटुंबातल्या व्यसनी व्यक्तीला ठेवण्याची जागा ह्याशिवाय अशा व्यसनमुक्ती केंद्राची अजून काही वेगळी ओळख नाही असे माझे स्पष्ट वैयक्तिक मत."फोड / उकल:
- व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलेली व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त होऊन परतते हि अंधश्रद्धा आहे, ज्यांना त्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवावा माझा त्यावर विश्वास नाही!
- अडगळ वाटू लागलेल्या आई-बापांना ठेवण्याची जागा = वृद्धाश्रम. आणि सांभाळणे अशक्य झालेल्या कुटुंबातल्या/समाजातल्या व्यसनाधीन व्यक्तीला ठेवण्याची जागा = व्यसनमुक्ती केंद्र, अशी ती तुलना आहे.
In reply to अरे देवा! ते वाक्य इतके 'क्रिप्टीक' झाले by टर्मीनेटर
व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलेली व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त होऊन परतते असे कोणाला वाटत असेल तर ती अंधश्रद्धा आहे,या बद्द्ल काही निरिक्षणे, विदा असतील तर त्याबद्द्ल उत्सुकता आहे. जरुर मांडावित ! यावरून मी मागे वाचलेले एक आत्मचरित्र आठवते. एका ब्रिगेडियर मुलगा डेहराडूनला होस्टेलला राहून शिकत असताना तिथल्या बाजूच्या गावातल्या अफूच्या गांजाच्या शेतीत चुकून पोहोचला. त्याने त्या अमंली पदार्थांचे सेवन केले आणि हळूहळू व्यसनाधीन झाला. त्याचे ब्रिगेडियर वडील विमनस्क झाले आणि त्याला दिल्लीच्या व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. तो मुलगा पूर्ण व्यसनमुक्त झाला आणि एक पुस्तक, स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आणि त्यात व्यसनाधीनतेचा सगळा आलेख मांडला. तो संपूर्णपणे व्यसनमुक्त झाले याची खात्री झाली. पण जेव्हा दोन-तीन वर्षांनी तो दिल्लीतल्या अमली पदार्थ मिळण्याच्या अड्ड्याच्या उपनगरात गेला तेव्हा दुसऱ्या दिवशी तो मृतावथेत सापडला. आदल्या रात्री त्याने पुन्हा नशा केली होती असे आढळले. या आत्मचरित्राचे शेवटचे प्रकरण देखील त्याच्या ब्रिगेडियर वडिलांनीच लिहिलेली आहे ! बहुदा त्यांचं नाव मला आठवते त्यानुसार रॉबिन सिंग वगैरे असं काहीतरी असावं !
In reply to @टर्मी दादा, by चौथा कोनाडा
In reply to याच कारणासाठी व्यसनी माणसाला by सुबोध खरे
In reply to अरे देवा by अहिरावण
व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडायचे कि नाही हे सर्वस्वी रुग्णाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते,रोचक वाक्य. व्यसनाचा विळखा हा एक आजारच असतो. हे म्हणजे एखाद्या अलझायमर्सच्या रुग्णाला "तुझं ह्या रोगातून बरं होणं हे केवळ तुझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे" असं सांगण्यासारखं आहे. पण चालूद्या... मी पॉपकॉर्नचा पुडा घेऊन केव्हाचा बसलोय....
In reply to व्यसनाच्या विळख्यातून बाहेर by विंजिनेर
व्यसनाचा विळखा हा एक आजारच असतो. "हे म्हणजे एखाद्या अलझायमर्सच्या रुग्णाला "तुझं ह्या रोगातून बरं होणं हे केवळ तुझ्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे" असं सांगण्यासारखं आहे.धन्यवाद! धन्यवाद एवढ्यासाठी कि मतभेद दर्शविताना नकळतपणे का होईना पण मुख्यत्वे वाढत्या वयोमानामुळे आणि जनुकीय, पर्यावरणीय घटकांमुळे उद्भवणाऱ्या 'अलझायमर्स' सारख्या (रुग्णाने स्वतःहून ओढवून न घेतलेल्या मेंदूशी निगडित आजाराची) आणि "आ बैल मुझे मार" म्हणतात त्याप्रमाणे एखाद्याने 'व्यसनाचा विळखा' नामक स्वतःहून ओढवून घेतलेल्या आजाराची (वरील माझ्या 'वैयक्तिक मताला' पूरक ठरेल अशी) तुलना करून रोचकता आणखीन वाढवलीत 😀 'अलझायमर्स' ह्या आजारावर आजही रामबाण इलाज उपलब्ध नाहीये (अगदि इस्त्रायलमध्ये सुद्धा 😂), जे काही औषधोपचार केले जातात त्याने आजाराची लक्षणे तात्पुरती कमी होण्यास मदत होते, तीच गत 'व्यसनाचा विळखा' नामक आजाराची, त्यावरही कुठला रामबाण इलाज उपलब्ध नाहीये. व्यसनमुक्ती केंद्रातले उपचार, समुपदेशन ह्यातून रुग्णाला व्यसनमुक्त होण्यासाठी सहाय्यक ठरतील असे प्रयत्न नक्कीच केले जातात आणि त्यांचा तात्पुरता परिणामही होतो, पण मुळात रुग्णाची व्यसनमुक्त होण्याची प्रबळ इच्छाशक्तीच नसेल तर ते परिणाम अल्पकाळासाठी टिकतात आणि बाहेर पडल्यावर काही दिवस, महिने लोटले कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण झालेली दिसते हे वर आधीही लिहिलेले आहे. असो, असे रोचक प्रतिसाद आणखीन येणार असतील तर मी पण आता डझनभर 'पॉपकॉर्न' ची पाकिटे मागवून ठेवतो आणि ते खात खात त्या प्रतिसादांचा वाचनानंद घेत बसतो... मज्जानी लाईफ 😀
In reply to धन्यवाद :) by टर्मीनेटर
पण मुळात रुग्णाची व्यसनमुक्त होण्याची प्रबळ इच्छाशक्तीच नसेल तर ते परिणाम अल्पकाळासाठी टिकतात आणि बाहेर पडल्यावर काही दिवस, महिने लोटले कि पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण झालेली दिसते हे वर आधीही लिहिलेले आहे.वा! वा! माझा मुद्दा तुमच्या थोडातरी ध्यानात येतो आहे हे बघून आणंद झाला. अलझायमर्सशी मी मुद्दाम तुलना केली होती. असं बघा - रोगाची सुरूवात कुठल्या घटकाने झाली ते क्षणभर बाजुला ठेवा (जनुकीय, पर्यावरणीय, परिस्थितीजन्य इ.). आता, त्या रोगावर मात करणं हे केवळ आणि केवळ इच्छाशक्तिवर अवलंबून असतं असा तुम्ही जो दावा करता आहात तो वास्तवाकडे डोळेझाक करणारा तर आहेच पण अनिभिज्ञ वाचकांची दिशाभूल करणारा आहे. आता आजाराची सुरुवात कशामुळे झाली असेल - दारू/अफू/सिगारेटच्या वाटेला कशाला गेला? असं विचारणं आणि मग त्या चूकीवर मात करायची म्हणजे, "रहा इच्छाशक्तिवर अवलंबून (आणि कडमडा तिकडे, आम्हाला त्रास देऊ नका)" - असा सूर असेल तर तो हास्यास्पद आहे, आणि एका प्रकारे हार मानणारा आहे (कुठल्याही दुर्रधर रोग बरा होणारच नसेल तर मग संशोधन करून उपाय का शोधा - असं काहीसं म्हणण्यासारखं) असो. चश्मा उतरवा आणि वास्तवात या. शुबेच्चा !!(हो हा शब्द आमच्यात असाच लिहितात)
In reply to बहुसंख्य रुग्ण जे स्वतःहून by सुबोध खरे
अजूनही हेच आपले वैयक्तिक मत असेल तर मी ते बदलण्यासाठी प्रयत्न करणारच नाहीह्या दोन दिवसांपुर्वी तुम्हीच केलेल्या विधानावर/प्रतिज्ञेवर कायम रहात आवरा आता... जाता जता: "हो...अजूनही तेच माझे वैयक्तिक मत आहे आणि कृपया आपण ते बदलण्यासाठी प्रयत्न करु नये अशी नम्र विनंती 🙏" इत्यलम.
In reply to हेंडगा, हेंडगूळ by वामन देशमुख
रम्य ते बालपण.