पुरावा काय?

परिकथेतील राजकुमार जनातलं, मनातलं
काल संध्याकाळी फिरता फिरता चौपाटीवर गेलो. (मुळामुठेच्या काठाला आजकाल चौपाटी म्हणायची फॅशन आहे पुण्यात) सहज लक्ष गेले आणी एक परिचीत चेहरा दिसला, जवळ गेलो आणी पाहिले तर काय आमच्या अनेक बेरकी मिपा मित्रांपैकी एक मित्र स्वत:शीच बडबड करत बसला होता. "पण तुला सांगितला कोणी होता शहाणपणा ? चांगले खरडा खरडी खेळत होतास, विडंबन करत होतास... हे भलतेच शहाणपण कुठुन सुचले तुला?" मी हळुच त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्या बरोब्बर तो दचकला. "नाना अरे मी आहे परा" मी म्हणालो. "मिपावाले दिसलेकीच भिती वाटायला लागलीये आता मला." नाना मामला गंभीर आहे हे ओळखुन आम्ही नानाला घेउन बळेबळेच पाणवठ्यावर दाखल झालो. चौपाटीवर उडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे बघुन झाल्यावर आणी २ पेग पोटात गेल्यावर नाना जरा रंगात आला. "साला आख्खी दुनिया मला बेरकी म्हणुन ओळखते पण तो मास्तर मलाच चुना लावुन गेला. काय घोडे मारले होते मी त्याचे काय माहित?" नाना उद्विग्नपणे म्हणाला. "नाना, नाना अरे असे झाले तरी काय?" मी विचारले. "मेराच चुक्या जो मैने 'मास्तर तुम्हारा चुक्याच' लेख लिहिला. त्या बेरकी गुर्जींनी बरोब्बर बदला घेतला :( पाहुण्याच्या हातुन साप मारला त्यानी." नाना वदला. "नाना नाना शांत हो" मी रिपिटची ऑर्डर देत म्हणालो. "शांत ? तळपायाची आग मस्तकात गेलीये माझ्या. च्यायला लोक त्यांचे महामुर्ख प्रॉब्लेम घेउन धावणार ह्या मास्तरकडे, उपाय सुचवणार तो, मी फक्त लिहायचे काम करणार आणी ह्या सगळ्याचा मोबदला काय ? तर लोक मला खव आणी व्यनीतुन झोडणार. एक ताई मला छपरी समुपदेशक म्हणाल्या,तु विकृत मनोवृत्तीचा आहेस असेही काही जण म्हणाले " :( "तुला का गुर्जींना ?" माझी शंका. "मला मला मला ! च्यायला 'जेणो काम तेणो साजे दुजा करे सो पछताये' म्हणतातना ते अगदी खरे आहे. हे सगळे करुन नामा निराळे आणी वर खव मध्ये येउन खीखीखी करत बसले." "नाना तरी मी तुला सांगत होतो, असंगाशी संग आणी प्राणाशी गाठ." "च्यायला पाध्ये तर आनंदाने नाचत असतील हे बघुन" नानाचे दु:ख बाहेर आले. "पण मी काय म्हणतो नाना, हे मास्तरनी मुद्दाम केले ह्याला 'पुरावा' काय?" शुद्धीत आलो तेंव्हा मख्खपणे एक वेटर हातात बिल घेउन उभा होता, माझ्या डोक्यातुन आणी डाव्या दाढेतुन चांगलीच कळ येत होती आणी नानाची खुर्ची रिकामी होती. "अहो माझा मित्र अर्धे पैसे देणार होता हो, कुठे गेला तो ?" मी इकडे तिकडे पाहात म्हणालो. "तो अर्धे बिल देणार होता ह्याला पुरावा काय?" वेटर शांतपणे म्हणाला.
वर्गीकरण

38 टिप्पण्या 7,125 दृश्ये

Comments

छोटा डॉन नवीन

In reply to by घाटावरचे भट

एकदम कडक असेच म्हणतो ... जबरा लेख ..!!! कॄपया इतर लोकांनी लेख का "कडक" आहे ह्याचा पुरावा मागु नये, अपमान होईल ... ------ (पुराव्याने शाबीत)छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मिंटी नवीन

In reply to by छोटा डॉन

कॄपया इतर लोकांनी लेख का "कडक" आहे ह्याचा पुरावा मागु नये, अपमान होईल ... =)) =)) =)) =)) डॉन एकदम टिपिकल पुणेरी भाषेत बोललास की रे........... ;) असो. परा फुल्ल फॉर्मात आहेस तु सध्या ......... मस्त लेख. :)

बिपिन कार्यकर्ते नवीन

In reply to by छोटा डॉन

सहमत!!! परा येडा झालाय!!!! बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे नवीन

नाना तुम्हारा चुक्याच!!! =)) =)) =)) ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

अवलिया नवीन

पराचा जाहिर निषेध !!! =)) मीच तुला भेटलो होतो, तुझ्याशी चर्चा केली आणि तुला मारले याचा 'पुरावा' काय? :? बाकी, एकदम कडक ! :) लगे रहो ! चौपाटीवरील भेटीचे काही लेख मागे मी टाकले होते, ती परंपरा तु चालु ठेवशील याबद्दल आता शंका नाही. आता मी सुखाने डोळे मिटायला मोकळा झालो ! :) --अवलिया

प्रमोद देव नवीन

परा पेटलाय! ;) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

भडकमकर मास्तर नवीन

=)) _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

आनंदयात्री नवीन

एक नंबर .. पार हसुन हसुन पुरेवाट !! =)) =)) =)) त्यामुळे नानाच्या चौपाटी लेखांची तसेच त्यावर आलेल्या मालकांच्या कमेंटमधल्या सहीची सहीच आठवण झाली ;) - (चौपाटीवरचा फुगेवाला) आंद्या अभ्यंकर

प्राजु नवीन

In reply to by आनंदयात्री

+१ जबरदस्त! परा सुटला आहे मोकाट.. त्याला आवरा रे जरा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

In reply to by प्राजु

पर्‍या, लेका मोकाट सुटला आहेस तू! काय प्राजु, 'आवरायचं' का याला? ;-)

विजुभाऊ नवीन

In reply to by आनंदयात्री

=)) =)) =)) =)) =)) एकदम बर्रोब्बर धन्दा ओळखलात यात्रेकरु आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

टारझन नवीन

In reply to by आनंदयात्री

(चौपाटीवरचा फुगेवाला) आंद्या अभ्यंकर
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) आयची जै रे ... आंद्या भाड्या ... बर्रोब्बर धंदा आहे ... बाकी परा ला जरा जास्त येळ आहे गड्या .. हल्ली फॉर्मात नसल्याने एक दोन गोष्टींचा संदर्भ लागला नाही .. =)) चोक्कस लिवलंय (चौपाटीवरचा "गोळ्या"बिस्किट वाला) टार्‍या भयंकर

लिखाळ नवीन

हा हा हा .. लै भारी रे परा.. ह ह पु वा .. :) -- लिखाळ.

श्रावण मोडक नवीन

आमच्या अनेक बेरकी मिपा मित्रांपैकी एक मित्र स्वत:शीच बडबड करत बसला होता. :| मिपावाले दिसलेकीच भिती वाटायला लागलीये आता मला. >:P साला आख्खी दुनिया मला बेरकी म्हणुन ओळखते पण तो मास्तर मलाच चुना लावुन गेला. :)) त्या बेरकी गुर्जींनी बरोब्बर बदला घेतला Sad पाहुण्याच्या हातुन साप मारला त्यानी. :) एक ताई मला छपरी समुपदेशक म्हणाल्या,तु विकृत मनोवृत्तीचा आहेस असेही काही जण म्हणाले. =D> हे सगळे करुन नामा निराळे आणी वर खव मध्ये येउन खीखीखी करत बसले. ;) असंगाशी संग आणी प्राणाशी गाठ. :D आणि "अहो माझा मित्र अर्धे पैसे देणार होता हो, कुठे गेला तो ?" मी इकडे तिकडे पाहात म्हणालो. =)) "तो अर्धे बिल देणार होता ह्याला पुरावा काय?" वेटर शांतपणे म्हणाला. =)) एकेका वाक्यातून विश्वरूपदर्शन घडते...;)

क्रान्ति नवीन

हसण्यासाठी जन्म आपुला हसवण्यासाठी पराभौ टपला! तापमान वाढलं तरी आम्ही मात्र खुश आहोत! =)) =)) =)) =)) =)) क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com

चतुरंग नवीन

तुझा 'परा'मानसशास्त्राचा दांडगा अभ्यास आहे! : :D मस्तच! एकदम फुल्टू! ;) चतुरंग

नितिन थत्ते नवीन

In reply to by चतुरंग

आणि खरडींचा सुद्धा खराटा (रंग माझा वेगळा)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

लै भारी ! अजून येऊ दे रे !

दिपक नवीन

लै भारी !:) परा क्या मारा

देवदत्त नवीन

:) :D =)) (डावा गाल अजूनही सुजलाय का लाडू ठेवल्यासारखा? :S )

ब्रिटिश टिंग्या नवीन

__/\__

तिमा नवीन

ज्ये काई चाललाय ते जराही टक्कुर्‍यांमंदी गेलं नाय! आवो सगल्यांना कलंल असं लिवा ना ! ह्ये म्हन्जी कंपुबाजांची 'कंपारी' वाटतीया! छान चढलीये सगल्यांसनी! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|