बऱ्याच वर्षानी एक कादंबरी एकाच बैठकीत वाचून संपवली-
हाकामारी -हृषीकेश गुप्ते.
ही तशी जेमतेम १०० पानांची लघुकादंबरी, हल्ली इंटरनेट, व्हाट्सप, टीव्ही मुळे माझे वाचन प्रचंड मंदावले आहे, अगदी मध्यंतरी घेतलेले लॉर्ड्स ऑफ द डेक्कन हे पुस्तक आवडीचे असूनही निवांतपणेच वाचन सुरू होते, ते आज संपवले, आणि परवाच विकत घेतलेले 'हाकामारी' वाचण्यासाठी बाहेर काढून ठेवले, संध्याकाळी खरे तर बाहेर भटकायला जायचे होते पण कंटाळा केला आणि पुस्तक वाचायला घेतले आणि सुरुवातीपासूनच झपाटून गेलो, गुप्ते यांची दंशकाल ही कादंबरी, तसेच गानू आजीची गोष्ट वाचली होती. नव्या दमाचा ताकदवान लेखक.
मात्र रूढार्थाने हाकामारी ही भयकादंबरी नाही. पण त्यात भयाचा आकळ सतत जाणवत राहतो. कोकणातल्या गोठणे गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कादंबरी, जसा हलकेच सुरू होणारा पाऊस मुसळधार होऊन सर्व जमीन पाण्याने भरून काढतो तशी ही कादंबरी झिरपत झिरपत जाऊन मनोव्यापारांचे एक अनोखे जग आपल्यासमोर पुढे करते. कधी त्यात बालपणीचे स्मरणरंजन येते, वाड्यातले गूढरम्य विश्व उभे राहते तर हाकामारीचे परंपरागत संदर्भ येत राहतात आणि आपण ज्याची कल्पनाही केली नसेल अशा एका दुर्दैवी घटनेने कादंबरीची समाप्ती होते.
कादंबरीचे भयकारी मुखपृष्ठ बघून कादंबरी वाचण्यास सुरुवात केल्यास सुरुवातीलाच काय पण आपण कादंबरी संपवत आलो तरी मुखपृष्ठ आपल्या वाचनाशी विसंगत वाटत राहते. मात्र शेवटच्या काही पानात त्या मुखपृष्ठाचा अर्थ अचानक उलगडतो आणि लेखकाचंच एक वाक्य आपल्या मनात रुंजी घालू लागतं.
रुबीक क्यूबचं कोडं सुटतं तेव्हा प्रत्येक वेळी मनात आनंदाची कारंजीच उडायला लागतात असं नाही. कधी कधी कोडं सुटल्यावर मेंदूतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्यागत सर्वव्यापी वेदना शरीरभर पसरतात.
वाचने
18349
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
आपल्यासारखेच इतरांचेही झालेले असल्याचे वाचून जरा हुश्श्य. वाटले
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाटसपचा दुरुपयोग वाढला आहे.
In reply to आपल्यासारखेच इतरांचेही झालेले असल्याचे वाचून जरा हुश्श्य. वाटले by चित्रगुप्त
जुन्या काळातली पण मराठीत
तडकडताई बद्द्ल ऐकले नहते आधी
In reply to जुन्या काळातली पण मराठीत by गवि
आजच....
अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा
In reply to आजच.... by कर्नलतपस्वी
चौकस भौ...
In reply to अपरंपाराच्या पुरुषाच्या ती सोन्याच्या मोहरा by चौकस२१२
पेंडश्यांनी नंतर बापूच्या
In reply to चौकस भौ... by कर्नलतपस्वी
हादरवून टाकणारी आहे.
In reply to आजच.... by कर्नलतपस्वी
ऊत्तम कांबळे ह्यांचे “अनिष्ट
नग्नपूजा
In reply to ऊत्तम कांबळे ह्यांचे “अनिष्ट by अमरेंद्र बाहुबली
अंताजी
In reply to नग्नपूजा by चौकस२१२
उत्तम परिचय अबा.
In reply to ऊत्तम कांबळे ह्यांचे “अनिष्ट by अमरेंद्र बाहुबली
ह्रु. गुप्ते - गोठण्यातल्या
भैरप्पा असो वा दुर्गा भागवत.
In reply to ह्रु. गुप्ते - गोठण्यातल्या by कंजूस
त्यांच्याकडे नावीन्य
In reply to ह्रु. गुप्ते - गोठण्यातल्या by कंजूस
मधु मंगेश कर्णिक.....
In reply to त्यांच्याकडे नावीन्य by प्रचेतस
अशोक शहाणे लिखित नपेक्षा
In reply to ह्रु. गुप्ते - गोठण्यातल्या by कंजूस
वरील
मी नुकतीच
हलकं फुलकं काही असेल तर सुचवा
In reply to मी नुकतीच by चांदणे संदीप
अरेवा! धन्यवाद!
In reply to हलकं फुलकं काही असेल तर सुचवा by प्रचेतस
'एकाला बोलो रे' - शिरीष
लॉर्ड्स ऑफ डेक्कन
पेंडश्यांनी नंतर बापूच्या
यशोदा प्रिव्ह्यु येथे पाहा.
In reply to पेंडश्यांनी नंतर बापूच्या by कंजूस
ओके
In reply to पेंडश्यांनी नंतर बापूच्या by कंजूस
----------
In reply to पेंडश्यांनी नंतर बापूच्या by कंजूस
विकत घेण्याअगोदर ओनस्क्रीन
व्यंकटेश माडगूळकरांचे 'वावटळ'
वावटळ वाचायला हवे,
In reply to व्यंकटेश माडगूळकरांचे 'वावटळ' by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
काय करू मी?
वेगवेगळ्या कोर्ट केसेसचे
In reply to काय करू मी? by हणमंतअण्णा शंक…
नाईन इलेव्हन घटनेवरील
In reply to वेगवेगळ्या कोर्ट केसेसचे by गवि
नाईन इलेव्हन घटनेवरील
In reply to नाईन इलेव्हन घटनेवरील by टर्मीनेटर
इंग्रजीत ५८५ पानी PDF फाइल आहे.
In reply to नाईन इलेव्हन घटनेवरील by अमरेंद्र बाहुबली
उदा नाईन इलेव्हन घटनेवरील
In reply to वेगवेगळ्या कोर्ट केसेसचे by गवि
अभिराम भभकमकर
In reply to काय करू मी? by हणमंतअण्णा शंक…
नवीन?
How Prime Ministers Decide हे
थोडक्यात करुन दिलेला पुस्तक परिचय आवडला!
“घे भरारी” हे ऊद्योगपती
"द विट ऑफ क्रिकेट" - बॅरी
प्रख्यात कन्नड लेखक एस एल
William Dalrymple books
हि पुस्तके वाचायला आवडतील!
In reply to William Dalrymple books by कंजूस
अमेरिकन सिनेमे
In reply to हि पुस्तके वाचायला आवडतील! by टर्मीनेटर
The Report (styled as The
In reply to हि पुस्तके वाचायला आवडतील! by टर्मीनेटर
इंटरेस्टींग...
In reply to The Report (styled as The by आंद्रे वडापाव
लादेन मोहिमेचं वर्णन
In reply to The Report (styled as The by आंद्रे वडापाव
स्टीफन किंग च Shawshank
नामवंतांनी चिरफाड करणारा लेखक
माझ्या पाविपत जिंकतो तर (http
In reply to नामवंतांनी चिरफाड करणारा लेखक by कंजूस
अरे देवा
In reply to माझ्या पाविपत जिंकतो तर (http by अमरेंद्र बाहुबली
पोलिसांणी त्याण्णा पकडायचा
In reply to अरे देवा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जेम्स सुझमन यांचे ‘Work The History of How We Spend Our Time’
कलम 370 + 35 अ , हे पुस्तक ....
मस्त! येउद्या त्याचा पुस्तक
In reply to कलम 370 + 35 अ , हे पुस्तक .... by मुक्त विहारि
नको ....
In reply to मस्त! येउद्या त्याचा पुस्तक by टर्मीनेटर
एस एल भैरप्पा यांची गृहभंग
गृहभंग
In reply to एस एल भैरप्पा यांची गृहभंग by जेपी
जेम्स हिल्टन
अल्बर काम्युचे "परका" नुकतेच
छान .
In reply to अल्बर काम्युचे "परका" नुकतेच by अहिरावण
The stranger
अधिक माहिती : https://en
In reply to The stranger by कंजूस
बरोबर.
In reply to अधिक माहिती : https://en by अहिरावण
हेच का ते?
In reply to The stranger by कंजूस
हेच ते पुस्तक.
In reply to हेच का ते? by स्वधर्म
हाकामारीचा आटोपशीर परिचय लेख
महाभारत जालावर कुठे मिळेल.
महाभारत
अविस्मरणीय युद्ध कथा....