मराठी : वाचन घडते कसे ?
यंदाच्या महाराष्ट्र दिन (१ मे ) अर्थात मराठी भाषा दिनानिमित्ताने एक कल्पना मनात आली. त्यातून प्रसवलेला हा धागा त्या दिवशीच प्रसिद्ध करण्याचा मानस होता परंतु इथल्या तांत्रिक समस्येमुळे ते जमले नाही. आता ती कल्पना सर्वांसमोर मांडतो.
मराठी भाषकांचे मराठी वाचन किती प्रमाणात आहे आणि ते कोणकोणत्या माध्यमांमधून केले जाते याचा कानोसा घेण्याचा हा एक प्रयत्न. मराठी वाचन करण्याची जी विविध माध्यमे आहेत त्यांचे खालील प्रमुख गटांमध्ये वर्गीकरण करता येईल:
* दैनिके
*नियतकालिके
* मराठी संस्थळे
* पुस्तके
या माध्यमांच्या अनुषंगाने खाली एक प्रश्नावली तयार केलेली आहे. आपल्या सवडीनुसार आपल्याला योग्य वाटेल त्या प्रश्नांची उत्तरे प्रतिसादांमधून द्यावीत ही विनंती. या प्रश्नांव्यतिरिक्तही आपणास काही अन्य टिप्पणी करायची असल्यास करू शकता.
दैनिके
१ . रोज कोणती दैनिके वाचता ? छापील का आंतरजालीय ?
२. फक्त बातम्या वाचता की अन्य सदरे देखील?
३. बातम्यांखेरीज आवडणारी सदरे कोणती ?
४. अजिबात न आवडणारी सदरे कोणती ?
५. छापील दैनिके कायमस्वरूपी चालू राहावीत असे वाटते का ?
अन्य नियतकालिके
( मासिक, साप्ताहिक, वार्षिक, इ. )
१. कोणती वाचता ? छापील/ आंतरजाल ?
२. त्यातील आवडणारी सदरे
३. दैनिकांच्या जोडीने यांच्या वाचनाची आवश्यकता वाटते का?
मराठी संस्थळे
१. कोणकोणत्या संस्थळांवर वावर असतो ?
२. इथले वाचन दररोज / अधूनमधून/ क्वचित करता ?
३. आवडणारे विभाग किंवा लेखनप्रकार
४. नावडणारे विभाग / प्रकार
५. फक्त वाचक आहात की अधूनमधून स्वतंत्र लेखन सुद्धा करता ?
पुस्तके
१. वाचण्याची वारंवारिता : दरमहा/ वर्षातून काही महिने/ क्वचित
२. वाचन प्रकार: छापील / इलेक्ट्रॉनिक
३. वाचन श्रवणाचा अनुभव असल्यास : पुस्तक वाचन आणि पुस्तक श्रवण यात अधिक काय आवडते ?
४. पुस्तक वाचनाचा स्रोत : वाचनालय / विकत / मोफत प्रकारे.
५. आवडणाऱ्या आणि नावडणाऱ्या पुस्तकांचा प्रकार.
६. भविष्यात छापील पुस्तके कायमस्वरूपी राहावीत असे वाटते का ?
* वाचनाच्या इतर प्रकारांसंबंधी काही लिहावयाचे असल्यास स्वागत.
वरील प्रश्नांच्या उत्तरांची सुरुवात माझ्यापासून करत नाही. माझी उत्तरे मी चर्चा समारोपाच्या वेळेस देईन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
धन्यवाद !
सूचना : फक्त मराठी भाषेतील वाचनाबद्दलच लिहावे.
*************************************************************************************************
वाचने
21714
वाचनखूण
प्रतिक्रिया
52
इतकं कोण टाइप करणार म्हणून
In reply to इतकं कोण टाइप करणार म्हणून by मनो
धन्यवाद
प्रश्नावलीला माझी उत्तरे खालील प्रमाणे...
माझं वाचन
In reply to माझं वाचन by सर टोबी
विनोदी सकाळ
😀
😀
😀
तीस एप्रिल तेवीस...
In reply to तीस एप्रिल तेवीस... by कर्नलतपस्वी
वा, मस्त !
सुंदर !
ऐतिहासिक कादंबरी फारसे नाही
दैनिके
सर्व प्रतिसाद छान.
कुमार सर,
In reply to कुमार सर, by श्रीगणेशा
वा, मस्त !
छान उपक्रम!
In reply to छान उपक्रम! by Bhakti
छान वाचन.
माझे वाचन:
2.
पुस्तक वाचावे, गाणे ऐकावे आणि
"वाचन : छापील की डिजिटल" या
"वाचन : छापील की डिजिटल" या
In reply to "वाचन : छापील की डिजिटल" या by हेमंतकुमार
साहित्यिक अनुभवासाठी, व
धांडोळा...
In reply to धांडोळा... by Nitin Palkar
वा !
धांडोळा...
सिंहावलोकन
In reply to सिंहावलोकन by मनोज28
मनोज,
स्मार्ट इ पेपर
In reply to स्मार्ट इ पेपर by हेमंतकुमार
epaper.esakal smartpaper
In reply to epaper.esakal smartpaper by कंजूस
गैरसमज
हा धागा जेव्हा जेव्हा समोर
१९८४ पुस्तकासंबंधी शंका
दैनिक
सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
बागेतले वाचन
कसे 'घडते' ... आणि 'घडले'
दैनिके
उत्तम !
वाचन बंद पडण्याची कारणे
लॅपटॉप विरुद्ध छापील वाचन
In reply to लॅपटॉप विरुद्ध छापील वाचन by हेमंतकुमार
कोरडे डोळे हे मुख्य कारण
In reply to कोरडे डोळे हे मुख्य कारण by चित्रगुप्त
बघावे लागेल...
In reply to कोरडे डोळे हे मुख्य कारण by चित्रगुप्त
व्याधीवर काही इलाज -
In reply to व्याधीवर काही इलाज - by कंजूस
@ कंजूसः जरा डीटेलवार माहिती देता का ?
In reply to @ कंजूसः जरा डीटेलवार माहिती देता का ? by चित्रगुप्त
हे :
In reply to @ कंजूसः जरा डीटेलवार माहिती देता का ? by चित्रगुप्त
डॉ. बाईंनी भिंगातून पाहिले.
Readwhere app(Android app)
मराठी पुरतं बोलायचं झालं तर
In reply to मराठी पुरतं बोलायचं झालं तर by सर टोबी
सहमत. टोबीसर.
In reply to मराठी पुरतं बोलायचं झालं तर by सर टोबी
वा !
In reply to मराठी पुरतं बोलायचं झालं तर by सर टोबी
राजहंस +११
दोन उदाहरणे देतो.
लहानपणापासून कसरीसारखी