मराठी : वाचन घडते कसे ?
In reply to इतकं कोण टाइप करणार म्हणून by मनो
In reply to माझं वाचन by सर टोबी
त्यामुळे बस डे, यीन मंत्रिमंडळ, कोणे तो माठ असे काही विनोदी उपक्रम सकाळ चालवीत असतो.तो बस डे हा भलताच विनोदी उपक्रम वाटायचा. एकाच दिवशी म्हणे स्वतःचे खासगी वाहन न वापरता म्हणे फक्त पीएमपीच वापरायची म्हणे. म्हंजे एकाच दिवशी बसमध्ये खच्चून गर्दी करायची म्हणे, त्या साठी जास्त बस सोडणार म्हणे (इ त र दिवशी अशी कार्यक्षम सेवा पुरवायला यांना काय रोग जडतो म्हणे ?) काही उत्सवी (अर्थात शेळीब्रेटी) लोकं बसने प्रवास करत असल्याचे फोटो छापायचे .... सगळाच विनोदी सकाळ प्रकार !
😀
😀
😀
In reply to तीस एप्रिल तेवीस... by कर्नलतपस्वी
छापील पुस्तके नेहमी प्रकाशीत व्हावी. इ- पुस्तक वाचतो पण मजा नाही.+११ पुस्तकांचे छापील व इलेक्ट्रॉनिक असे दोन्ही प्रकार कायमस्वरूपी असावेत; प्रत्येकाचे महत्त्व वेगवेगळे आहे. वाचक त्याच्या गरजेनुसार पर्याय निवडू शकेल अलीकडे (विशेषतः काही अभ्यासाच्या पुस्तकांमध्ये) असे जाणवले की छापील पुस्तक कमीत कमी पानांत बसण्यासाठी प्रकाशक या पुस्तकातील अक्षरांचा आकार खूप छोटा करू लागलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे तापदायक आहे. वय, चष्म्याचा नंबर आणि डोळ्यांची स्थिती असे अनेक मुद्दे विचारात घेतले, तर ई-बुक मध्ये अक्षरांचा आकार हवा तेवढा करता येणे हा एक महत्त्वाचा फायदा आहे.
असंख्य ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या कागदाची मोठ्या प्रमाणावर असलेली मागणी पूर्ण होण्यासाठी रद्दी कुठून निर्माण होईल>> रोचक मुद्दा. यावरून एका लेखकाने केलेला विनोद आठवला. ते म्हणायचे, लेखक नवोदित असो वा मान्यवर- या सर्वांमध्ये एक समानता जरूर आहे. ती म्हणजे हे सर्वजण मिळून नियमित रद्दीनिर्मिती करीत असतात!
२. भीषण अवस्था आहे बातम्या आणि लेखात वापरल्या मराठीची.खरं आहे. फक्त जालावरील अंकांपेक्षा छापील दैनिके अजून बरीच बरी आहेत.
दैनिकेछापील. सकाळ आणि मटा, स्थानिक बातम्यांसाठी दोन्ही उत्तम. त्यातही मटा जास्त बरा. डिजीटल अंकापेक्षा छापील पेपर खरेच छान आहे. मटाची रविवारची संवाद पुरवणी आवडते. सकाळची सप्तरंग मात्र साधारण आहे द्वारकानाथ संझगिरींचे लेख सोडून. श्रीराम पवारांचे करंट अंडरकरंट सदर तर डोक्यात जाते. लोकसत्ता क्वचित ऑनलाईन वाचतो. महेश सरलष्करांचे लाल किल्ला हे सदर विशेष आवडीचे.
अन्य नियतकालिकेपूर्वी लोकप्रभा ऑनलाईन वाचायचो,आता तेही बंद पडलेय.
मराठी संस्थळेकट्टर मिपाकर असल्याने इतर माबो, ऐसी इत्यादी संस्थळावर जात नाही, क्वचित कुणी एखाद्या चांगल्या लेखाचा दुवा दिला तरच जातो. मिपावर राजकीय धाग्यांवर क्वचितच जातो, भटकंती, कथा, विडंबनं वगैरे आवडतात. अधूनमधून काही लेखनही करतो.
पुस्तकेकिंडल आहे मात्र त्यावर वाचत नाही. छापील पुस्तकेच आवडतात, त्यातही कोर्या पुस्तकांचा गंध घ्यायला खास आवडते. सुहास शिरवळवकर, गोनीदा, श्री. ना. पेंडसे, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, भैरप्पा, शिवराम कारंथ, डॅन ब्राऊन, सिडने शेल्डन, रॉबिन कूक, फ्रेडरिक फॉरसिथ, जेफ्री आर्चर, अॅलीस्टर मॅक्लीन हे आवडीचे लेखक. नव्या दमाच्या लेखकांमध्ये हृषिकेश गुप्ते. शालेय आणि कॉलेजजीवनात वाचनालयावर भर होता, प्रचंड पुस्तके वाचली, नंतर मात्र स्वतः विकत घेणे सुरु केलेय. सुमारे पाचशे पुस्तके घरात असावीत, तपशीलवार याद करायचे केव्हापासूनचे ठरवत आहे. पण आता करावी म्हणतो. छापील पुस्तके मात्र राहिलीच पाहिजेत असे मत आहे.
In reply to कुमार सर, by श्रीगणेशा
मला मात्र असं पुस्तक अजून कोणाकडूनही मिळालं नाही, किंवा मला घ्यावंसं वाटलं नाही, आणि माझ्याकडून नेलेलं पुस्तक अजून कोणीही परत केलं नाही.हे भलतेच आवडले आहे !! यावरून मार्क ट्वेन यांचा विनोद आठवला:
" कोणालाही पुस्तक उसने देऊ नका कारण ते कधी परत येत नसते. तुम्हाला सांगतो, माझे स्वतःचे ग्रंथालय अशाच पुस्तकांमुळे उभारणे शक्य झाले आहे !"
In reply to छान उपक्रम! by Bhakti
mompresso मराठीवरहे नव्याने समजले आणि ते बंद होणार असेही तुम्ही म्हणताय. असो ! वाचनलेखन शुभेच्छा.
पुस्तक वाचावे, गाणे ऐकावे आणि चित्रपट पहावाखूप छान!
रोज रात्री साडेनऊ वाजता इ-वाचनाची सर्व प्रकारची साधने बंद करून टाकतो. हा स्वतःवर घातलेला कठोर निर्बंध.निर्बंध आवडला! अनुकरण करण्याचा प्रयत्न करेन नक्की.
त्यानंतर संग्रहातले (अनेक वेळा वाचलेले असले तरीही) एखादे छापील पुस्तक उघडतो आणि त्यातले एखादे प्रकरण वाचतो. हे लवकर व चांगली झोप येण्यासाठी फारच उपयुक्त ठरले आहे !हाही एक छान शिरस्ता!
माहिती मिळवण्यासाठी डिजिटल माध्यमांवर वाचन आणि साहित्यिक अनुभवासाठी, व बोधात्मक विकासासाठी पारंपरिक माध्यम, म्हणजे पुस्तकं हळूहळू लक्षपूर्वक वाचणं, हे दोन्ही गरजेचं आहे.
माहिती मिळवण्यासाठी डिजिटल माध्यमांवर वाचन आणि साहित्यिक अनुभवासाठी, व बोधात्मक विकासासाठी पारंपरिक माध्यम, म्हणजे पुस्तकं हळूहळू लक्षपूर्वक वाचणं, हे दोन्ही गरजेचं आहे.
In reply to "वाचन : छापील की डिजिटल" या by हेमंतकुमार
साहित्यिक अनुभवासाठी, व बोधात्मक विकासासाठी पारंपरिक माध्यम...कधी कधी आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे, त्यासाठी शब्द गवसत नाहीत. इथे ते चपखल शब्द गवसले आहेत -- साहित्यिक अनुभव व बोधात्मक विकास! खूप छान!
In reply to धांडोळा... by Nitin Palkar
गुरुनाथ नाईक हे गोव्याचे लेखक, साधारण १९७१/७२ च्या सुमारास त्यांची 'फॅन मेल' एवढी होती की 'पर्वरी' या त्यांच्या गावात खास पोस्ट ऑफिस उघडावे लागले होते.>>> हे मात्र भन्नाटच ! भलतेच आवडले
In reply to सिंहावलोकन by मनोज28
दैनिके : लोकसत्ता आणि म.टा. पूर्वी नियमित वाचत होतो. आता मात्र वाचवत नाही आणि सोडवत नाही अश्या सीमारेषेवर आहे.अगदी अगदी ! म्हणूनच मी सुद्धा जे एकमेव छापील दैनिक घरी चालू ठेवले आहे ते बहुतेक अजून दहा वर्षे तरी चालू ठेवीन असे दिसते. काही फायदे जाणवतात.
हा पहिलाच प्रतिसाद आहे.चांगला आहे. आवडला 🙂
In reply to स्मार्ट इ पेपर by हेमंतकुमार
In reply to epaper.esakal smartpaper by कंजूस
२) अनुवादक : जयंत गुणे
३) अनुवादक : भारती पांडे
जॉर्ज ऑरवेल लिखित १९८४ या पुस्तकाचा मराठी अनुवाद>> एकूण तीन अनुवाद आहेत हे समजले. मी ते वाचलेले नाही. कोणी सांगावे. .. २.
एखाद पावसाळी दुपारी ह्यापैकी एक कादंबरी अन् चहा हे आवडते कॉम्बोअरे वा, छानच ! वाचन शुभेच्छा..
वाचन जवळ जवळ बंद पडलेले असल्याने काय लिहीणार ?>> हा प्रामाणिक प्रतिसाद देखील या सर्वेक्षणस्वरूप धाग्यासाठी महत्त्वाचा आहे. .. २.
मराठी काय किंवा इंग्रजी, इतर भाषेतली पुस्तकं शहरापासून दूर राहणाऱ्यांना अशी कितीशी मिळत असतील?>>> चांगला आणि महत्त्वाचा मुद्दा. एखादा वाचनप्रेमी कामधंद्याच्या निमित्ताने जगभरात कुठेही असला तरी त्याला हव्या त्या भाषेतील पुस्तक वाचण्याची सोय इ-माध्यमामुळे झाली आहे हे नि:संशय.
In reply to लॅपटॉप विरुद्ध छापील वाचन by हेमंतकुमार
In reply to कोरडे डोळे हे मुख्य कारण by चित्रगुप्त
विशिष्ट तापमानाच्या गरम पट्ट्या डोळ्यांना शेक देण्यासाठीमला माहित नाही. याचा शास्त्रीय शोध घ्यावा लागेल. उपाय अर्थात सोपा दिसतोय
In reply to कोरडे डोळे हे मुख्य कारण by चित्रगुप्त
In reply to व्याधीवर काही इलाज - by कंजूस

In reply to @ कंजूसः जरा डीटेलवार माहिती देता का ? by चित्रगुप्त
In reply to @ कंजूसः जरा डीटेलवार माहिती देता का ? by चित्रगुप्त
In reply to मराठी पुरतं बोलायचं झालं तर by सर टोबी
In reply to मराठी पुरतं बोलायचं झालं तर by सर टोबी
In reply to मराठी पुरतं बोलायचं झालं तर by सर टोबी
इतकं कोण टाइप करणार म्हणून