पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे
पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले. तोपर्यंत पुणे स्टेशनची कौलारू मुख्य इमारत आटोपशीर होती. स्टेशनमध्ये तीन फलाट होते आणि पहिल्या फलाटावरून दुसऱ्या-तिसऱ्या फलाटावर जाण्यासाठी एक लोखंडी पादचारी पूलही होता. दोन आणि तीन नंबरच्या फलाटावर उतरत्या छपराप्रमाणे शेड करण्यात आली होती. तिचा भाग आजही पाहायला मिळतो. या फलाटांच्या शेजारीच छोटे फलाट केलेले होते, जे अतिविशिष्ट व्यक्तींच्या प्रवासाच्यावेळी वापरले जात असत. गाड्या आणि जादाचे डबे उभे करून ठेवण्यासाठी काही मार्ग त्याचबरोबर मालगाड्यांमध्ये मालाचा चढउतार करण्यासाठी स्वतंत्र मार्ग तीन नंबरच्या फलाटाच्या पलिकडे होते. त्याच बाजूला एक लोको शेडही होती. तरीही त्यावेळी पुणे जंक्शनचा विस्तार मर्यादित होता.
वाढत्या प्रवासी आणि मालवाहतुकीचा पुणे जंक्शनवर उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांवर ताण वाढत चालला होता. त्यामुळे या स्थानकाच्या परिसराची पुनर्रचना करण्याची गरज भासू लागली होती. ती गरज विचारात घेऊन पुणे जंक्शनमध्ये 1925 आमुलाग्र बदल केले गेले. आधीची इमारत पाडून प्रशस्त इमारत बांधली गेली आणि स्थानकाचाही मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. स्थानकामधल्या फलाटांची संख्या वाढली. 1928-29 पर्यंत मुंबई-पुणे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले. कालांतराने घोरपडीला मोठी डिझेल लोको शेड उभारण्यात आली.
आजही पुणे जंक्शनवर वाहतुकीचा मोठा ताण आहे. जवळजवळ दीडशे प्रवासीगाड्या पुणे जंक्शनमध्ये ये-जा करतात, त्यापैकी काही दैनिक तर काही आठवड्यामधल्या काही दिवशीच धावतात. त्यामध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस, मुंबई-चेन्नई मेल, दख्खनची राणी या ऐतिहासिक गाड्यांचाही समावेश आहे. त्याबरोबर मालगाड्यांचीही पुणे जंक्शनवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. 1971 पर्यंत ब्रॉड गेज आणि मीटर गेज गाड्यांची ये-जा या स्थानकातून होत होती. या स्थानकाच्या विस्ताराला आता मर्यादा आलेल्या आहेत. त्यामुळे आता अन्य ठिकाणी टर्मिनल उभी करून या जंक्शनवरचा भार कमी केला जात आहे.
पुणे जंक्शनच्या 165 वर्षांच्या निमित्ताने मी तयार केलेला व्हिडिओ खालील लिंकवर पाहता येईल.
https://youtu.be/WRCVsP9W2Mc In reply to पुणे जंक्शनची एकदम जंक्शन by शेखरमोघे
In reply to रेल्वे by सर टोबी
वाठार स्टेशन, पुणे कोल्हापूर मार्ग (पूर्वाश्रमीचा मद्रास अँड सदर्न मराठा मार्ग) ब्रिटिशकालीन आहे इमारत. हे स्टेशन अजय देवगणच्या राजकुमार संतोषी निर्मित "द लेजंड ऑफ भगतसिंग" सिनेमात लाहौर स्टेशन म्हणुन वापरले होते शूटिंगला असेही ऐकले होते (संदर्भ - साँडर्स हत्येनंतर भगत, राजगुरू, पंडितजी वगैरे मंडळी लाहोर सोडून गायब होत असतात वेषांतर करून तो सीन)In reply to छान लेख by धर्मराजमुटके
In reply to वाठारचे टुमदार स्टेशन आवडले by सर टोबी
संपूर्ण डब्यामध्ये जेमतेम सोळा जणांसाठीच असणारे हे डबे म्हणजे आरामदायक प्रवासाची एक अनुभूती असायची.लोकांत इमानदारी शिल्लक असण्याचा तो काळ होता. आता एका डब्यात १६ ठेवले तर किमती अफाट कराव्या लागतील नाहीतर रेल्वे तरी भिकेला लागेल. तसेही तिकिटावर आजकाल रेल्वे छापतेच की "IR recovers only 53% of it's operational costs" असे काहीसे. बाकी, रेल्वे सोबत कैक काव्यात्मक गोष्टी लिंक झालेल्या आहेत. उदाहरणार्थ हिमाचल मधील सोलन जिल्ह्यात पडणारे बरोग (बडोग) स्टेशन अन् टनेल.
ह्या स्टेशनचे नाव पडले आहे ते वरील बोगदा ज्यांच्या नावावर आहे त्याच रेल्वेत इंजिनिअर म्हणून असलेल्या कर्नल बारोग ह्यांच्या नावे. सुरुवातीला बारोग् ह्यांना हा बोगदा तयार करण्याचे काम मिळाले होते पण काही गणिती micalculation मुळे त्या बोगद्याचे पूर्ण अलाईनमेन्ट हुकले. त्याचे त्यांना इतके वैषम्य वाटले की त्यांनी तिथेच साईट वर आत्महत्या केली. पुढे दुसरे इंजिनियर लावून रेल्वेने बोगदा पूर्ण करून घेतलाच.....पण कर्तव्यात कसूर झाल्यामुळे पार प्राण देणाऱ्या बरोग साहेबांचे नाव स्टेशन अन् बोगद्याला देण्यात आले. In reply to सर टोबी by इपित्तर इतिहासकार
"IR recovers only 53% of it's operational costs"मीही ते वाचले आहे. एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल ?
In reply to एकाद्या प्रवाश्याला पुर्ण किंमत द्यायची असेल तर ती कशी देता येईल by Trump
"IR recovers only 53% of it's operational costs"अशाच अर्थाचे वेगवेगळे पूर्वीपासून रेल्वेत लिहिलेले असते. मला वाटते की बर्थच्या साईडला किंवा कोणत्या तरी पट्टीवर अधिक स्पष्ट लिहिलेले असे. आणि त्याचा सारांश असा की तुम्हाला रेल्वे प्रवास टाळणे किंवा अन्य (महागड्या) मार्गाने करणे शक्य असेल तर तसे करा आणि रेल्वे प्रवासरुपी सवलत अधिक गरजू व्यक्तींना घेऊ द्या. चुभूद्याघ्या..
In reply to "IR recovers only 53% of it's by गवि
In reply to जे लोक पुर्ण भाडे देऊ शकतात त्यांना ती सुविधा रेल्वेने द्यायला by Trump
सदर संदेश हा मुख्यत: समाजकंटकाना उद्देशुन असावा.ते तर असेलच. मान्यच आहे. तोही एक वेगळा संदेश असेलच. मी जो संदेश ढोबळ मानाने उल्लेखिला तो रेल्वेत खूप पूर्वी कुठेतरी बघितल्याचे मला स्पष्ट आठवत आहे. पण मजकूर नेमका आठवत नाही. त्यात तर्काला जागाच ठेवली नव्हती. रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे. गेल्या अनेक वर्षांत रेल्वे प्रवास न घडल्याने आताही हे सर्व लेटेस्ट अस्तित्वात असेल असे सांगता येत नाही.
In reply to सदर संदेश हा मुख्यत: by गवि
रेल्वे सर्वांनाच प्रवास सवलतीत देते, आणि तोटा सहन करून देते, त्यामुळे (तुम्ही privileged असाल तर) गरजूंना तो फायदा मिळू द्या. अशा अर्थाचे.पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....
In reply to बरोबर आहे गवि by इपित्तर इतिहासकार
पण मुळात प्रवासी वाहतूक हा रेल्वे रेव्हेन्यूचा मुख्य स्त्रोत नाही, तो माल वाहतूक आहे, प्रवासी वाहतूक एक लोकप्रिय समाजतुष्टी उपाय आहे एका अर्थाने रेल्वेचे स्वतःचे सी.एस.आर....तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि इतर सुविधांची गरजच नव्हती. ज्यांना परवडते असे लोक दुर सारण्यासाठी दर्जा खालवणे पुरेसे आहे.
In reply to तसे असते तर वंदे भारत, तेजस, राजधानी, वातानुकुलित डबे, आणि .. by Trump
In reply to बरोबर आहे गवि by इपित्तर इतिहासकार
On subsidising train travel We are giving Rs 59,000 crore subsidy — that’s bigger than many states’ budgets — on passenger transportation at this point of time. Which practically means that every passenger on an average is getting about 55 per cent concession. Our passenger prices are the lowest in the world. If you do the Vande Bharat in France, it would be about seven times the price. If you do that journey in Japan, it would be about eight or nine times the price. If you do a similar journey in Switzerland, that will be about 20 times the price. In freight, last year, we made another record. We carried 1.5 billion tonnes (second highest in the world). The earnings from freight is good. It’s good that we cross subsidise it. We have a very large team, our team has 12 lakh employees. The pension cost is about Rs 55,000 crore. Salary and wages is about Rs 1,02,000 crore. Energy cost is Rs 40,000 crore. Our maintenance cost is about Rs 9,000 crore. So, with all those numbers, it’s tough math. https://indianexpress.com/article/india/ashwini-vaishnaw-if-you-have-to-go-green-then-we-as-a-country-must-invest-significantly-in-railways-8689571/
In reply to भारतीय रेल्वे हि जगात सर्वात by सुबोध खरे
In reply to थोडे जास्त पैसे... by कर्नलतपस्वी
In reply to संपूर्ण भारतीये रेल्वेचे माहित नाही पण by धर्मराजमुटके
फुकटे प्रवाशी ४ रुपयाऐवजी १०० रुपये देतात. कशी काय रेल्वे तोट्यात आहे ?मुंबई लोकलचा मर्यादित अनुभव आहे, त्यामुळे तुम्ही नेमक काय म्हणता आहात ते जरा स्पष्ट केले तर बरे होईल.
In reply to म्हणजे ? by इपित्तर इतिहासकार
In reply to दोन स्टेशन by धर्मराजमुटके
In reply to दंडाची रक्कम पाहून by इपित्तर इतिहासकार
In reply to तुम्ही रेल्वे तोट्यात नाही असे म्हणता आहात का ? by धर्मराजमुटके
In reply to प्रवासी भाडे चारपट (चारपट by सुबोध खरे
गेल्या दहा वर्षात आपला पगार किती वाढला आणि त्या मानाने रेल्वेचे भाडे किती वाढले याचा कुठेतरी ताळमेळ असावा कि नाही?इकॉनॉमी ऑफ शकेल पाहता मायक्रो अन् मॅक्रो ह्यांची तुलना होऊ शकणार नाही राव.
In reply to रेल्वे तोट्यात आहे, रेल्वेचे by धर्मराजमुटके
रेल्वेने उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधावेत, स्वतःचे खर्च कमी करावेत, नवीन संकल्पनांवर काम करुन उत्पन्न वाढवावे (नियमित आणि थोडी थोडी तिकिटवाढ समर्थनीय आहेच).रेल्वेने ह्या दिशेने काम कधीचे सुरू केले आहे, स्टेशन रीडेव्हलपमेंट, पार्किंग लॉट ऑपरेशन, कमर्शियल स्पेस लीज करणे इत्यादी सुरुवात होती, आता रेल्वेची जागा लिज करून उत्पन्न सुरू करण्याचे बेस्ट उदाहरण म्हणजे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वर लांब पल्ल्यांच्या गाड्या जात तिथे लॉबी मध्ये नमः पोड्स नावाचे पॉड हॉटेल सुरू झाले आहे. सेम मुंबई सेंट्रल मध्ये पण. एकदा काही कामानिमित्त मंत्रालयात यायचे होते आणि सोबोची हॉटेल परवडणारी नव्हती म्हणून पॉडचा पर्याय घेतला होता, उत्तम, स्वच्छ अन् किफायतशीर सेवा होती, रिसेप्शन वरचा पोरगा म्हणाला होता की प्रचंड हिट आहे ही सुविधा.
पुणे जंक्शनची एकदम जंक्शन