स्कूप( Scoop,)
आता विसाव्याचे क्षण....
असे जरी असले तरी,
जो पर्यंत राम तोपर्यंत काम
असेच जगावे लागते.
डोक्याला खुराक हवा,हात पाय हलवायलाच हवे,पंचेंद्रियाचे लाड पुरवायला हवे. असो...
नेहमीप्रमाणेच वामकुक्षी आगोदर नेटफ्लिक्स उघडले.नवीन मालिका Scoop दोन दिवसांपूर्वी प्रकाशीत झाली होती.अमेझोन प्राईमने आगोदर सुचित केले होते.सहसा आंग्ल भाषेच्या वाटेला मी जात नाही मग तो चित्रपट असो किंवा पुस्तकं. टिचकी मारण्या आगोदर सारांश व कलाकारांची नावे वाचल्यावर कळाले की नाव जरी आंग्ल भाषेत असले तरी मालिका हिन्दीच आहे.
दिग्दर्शक-हंसल मेहता (स्कॅम १९९२ फेम)
कलाकार-करिश्मा तन्ना, संदेश कुलकर्णी, हरमन बावेजा,मोहम्मद झीशान अय्युब व इतर.
प्रकाशन तारीख- २ जून २०२३
कथानकाचा आधार,
प्रसिद्ध वरिष्ठ महिला पत्रकार जिग्ना व्होरा, यांनी स्वतःच्या आयुष्यात घडलेली दुर्दैवी घटना, Behind Bars in Byculla: My Days in Prison,(प्रकाशनाची तारीख १८ सप्टेंबर २०१९) या पुस्तकात लिहीली असून सहा भागाची ही छोटीसी मालिका याच पुस्तकावर आधारीत आहे.
सत्य घटना.....
२०११ मधे पत्रकार ज्योतिर्मय डे (जे डे) यांची मुंबईत हिरानंदानी, पवई येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली.या खुना मधे संशयित म्हणून जिग्ना व्होरा यांना मुबंई पोलीसांनी अटक केली.
कथानक
जागृती पाठक,महत्वाकांक्षी पत्रकार, वरीष्ठ पत्रकाराचा खुन व ऑर्गनाईझ्ड क्राईम मधे अडकते.यानंतर तीने व तीच्या नातेवाईक,मित्र,शुभचिंतकांनी केलेला संघर्ष,तुरूंगातले ते भयावह अनुभव,जटिल न्याय प्रक्रिया, क्लिष्ट सरकारी प्रणाली,अधिकाराचा गैरवापर,एक महिला पत्रकार,सिंगल मदर व त्यामुळेच येणाऱ्या मर्यादा, महिला म्हणून पुरूषप्रधान समाजा च्या वेगवेगळ्या आपेक्षा अशा अनेक बाजूं दाखवणारी मालिका प्रेक्षकांची उत्कंठा सुरवाती पासून शेवटपर्यंत कायम ठेवण्यात यशस्वी झाली आहे.MOCOCA आणि TADA चा कठोर वापर.अंडरवर्ल्ड,मीडिया आणि पोलिस यांच्यातील संबंध अशा व इतर संबधीत वरील सब॔धीत मुद्द्यांवर ही मालिका आरामात बोलते. मालिका तुम्हाला तथ्ये सादर करते.
तारांगण...
मुख्य भूमिकेत करिश्मा तन्ना हिचा शानदार अभिनय. ती मालिकेची हिरो आहे.करिश्मा तन्नाने पत्रकार जागृती पाठक या भूमिकेला पुरेपुर न्याय दिला आहे.हरमन बवेजा, संदेश कुलकर्णी, प्रोसेनजीत, मोहम्मद झीसान अयुब, तन्मय धनानिया आणि इतर सर्व कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय.
मालिकेच्या तांत्रिक बाजू सुद्धा पडद्यामागील कलाकारांनी बखुबी सांभाळल्या आहेत. हंसल मेहता हे दिग्दर्शक म्हणून सर्व कलाकारां कडून उत्कृष्ट काम करवून घेण्यात यशस्वी झाले आहे. कलाकारांनी सुद्धा जीव ओतून काम केले आहे. अंडरवर्ल्ड ट्रायल तुरूंगात कसे राहातात व त्यांच्या कुटुंबियांची कुतरओढ,इटंर पर्सनल,डिपार्टमेंटल दुश्मनी स्पर्धा याचे चित्रण खूप छान आहे. कथा प्रवाही आहे व प्रेक्षकवर्ग प्रवाहात बरोबर वाहात जातो.
अगर एक आदमी कहे कि बाहर बारिश हो रही है और दूसरा कहे कि बाहर धूप है.ऐसे में मीडियाका काम दोनों का पक्ष बताना नहीं,बल्कि खुद खिड़की के बाहर देखकर सच बताना है.
-जोनाथन फ्रेस्सर
हे कुणी ,केव्हा कुणाला,कुणाच्या साठी म्हणाले आहे हे बघण्यासाठी मालिका बघायला हवी. जोनाथन यांचे विचार आजची पत्रकारिता गंभीरपणे फाॅलो करते का असा एक विचार मनात डोकावून जातो.
एवढ्या हाय प्रोफाईल, हायली कनेक्टेड अंडर ट्रायल व्यक्तीची ही दुरावस्था तर दुर्दैवी गरीब,लाचार कुठल्याही प्रकारची मदत उपलब्ध नसणाऱ्या अंडर ट्रायल लोकांची काय अवस्था असेल या कल्पनेनेच अंगावर काटा येतो.
थोडे लेखिकेबद्दल..
मुबंई मधे रहाणारी ३७ वर्षिय सिंगल मदर,जिग्ना व्होरा,वरीष्ठ पत्रकार,फ्री प्रेस,मुबंई मिरर आणी मिड डे सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रा साठी गुन्हेगारी जगातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून रकाने लिहीत होत्या. सुविद्य कायद्याची पदवी व पत्रकारिते मधे पदविका.आयुष्यात अनेक दुर्दैवी घटनांवर मात करत करियरच्या शिखरावर असताना एकदम खाली कोसळते. यमयातना झेलल्या नंतर तब्बल सात वर्षांनी २०१८ मधे या भयानक दुष्टचक्रातून मुक्त होते.
आकर्षक आणि चित्तवेधक अशी मालिका.
मला मालिका आवडली. पुस्तक सुद्धा मागवले आहे.
वाचने
4516
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
मदत
कळाले नाही
In reply to कळाले नाही by धर्मराजमुटके
काही पेस्ट चा लोचा.
In reply to काही पेस्ट चा लोचा. by कर्नलतपस्वी
काहीच्या...
परीचय आवडला
In reply to परीचय आवडला by राजेंद्र मेहेंदळे
कंटेट इज किंग.
मालिकेचा विषय पत्रकारितेचा आहे
In reply to मालिकेचा विषय पत्रकारितेचा आहे by सर टोबी
असहमत
In reply to असहमत by चलत मुसाफिर
सहमत
In reply to असहमत by चलत मुसाफिर
परंतु पत्रकारिता मात्र
In reply to मालिकेचा विषय पत्रकारितेचा आहे by सर टोबी
मला सुद्धा तुमचे म्हणणे पटते.
परीचय आवडला.
In reply to परीचय आवडला. by भागो
पुस्तक मागवलयं
In reply to परीचय आवडला. by भागो
भागो...
परिचय आवडला कर्नलसाहेब. ही
परिचय आवडला!