नोटा बंदी व परिणाम
नोटा बंदी प्रकरणाने संमिश्र भावना बघायला मिळत आहेत. सर्वच लोक आपापल्या परीघ, आकलनक्षमता, राजकीय विचार, जीवनशैली, पूर्वग्रह यांच्या एकत्रित प्रभावाने सदर घटनेकडे बघत आहेत. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या एका विनोदचित्रानुसार झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. जेवढं प्रसार माध्यमं व सोशल मिडीया यातून माहित होतंय, पसरवल्या जातंय त्याबाहेरही बरंच मोठं जग आहे ज्यावर ह्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम झालेत, होत आहेत, होणार आहेत.
ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा करणे, यायोगे आपल्या परिघाबाहेर काय होतंय व त्यातून आपल्यालाही दोन गोष्टी शिकायला मिळून ज्ञानाचे क्षितिज जरा विस्तारेल.
मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे.
एक उदाहरण आहे ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवाल्यांचं. एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. पूर्ण रस्त्यात तो ऑन हिज ओन म्हणजे स्वतःवर अवलंबून असतो. अशा प्रसंगी मध्येच कुठेही त्याला अर्ध्या रात्री कळते की आता आपल्या जवळची रक्कम शून्य झाली, फक्त कागद आहेत तेव्हा त्याच्यासाठी सरकारी नियमात बसणारे कोणते उपाय आहेत? लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही, पम्पवाले अजून दोन दिवस मदत करतील, एवढी रक्कम कोणतीही बँक बदलून देणार नाही. तेव्हा त्याच्याकडे काय उपाय आहेत किंवा तुमच्या कुणाच्या माहितीत असे काही झालेले? मला वाटतं चिनार जोशी यांना ह्यातलं ठाऊक आहे त्यांनीही आपले विचार मांडावे.
इतर प्रसंगांचे स्वागत आहे!
वाचने
122429
वाचनखूण
प्रतिक्रिया
187
In reply to एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून by सुबोध खरे
जाऊ द्या हो! ते दोन 'लक्ष'
In reply to मी फक्त ड्रायवरकडे इतकी रक्कम by संपत
पावती
In reply to मी फक्त ड्रायवरकडे इतकी रक्कम by संपत
ओ संपत भाऊ, कशाला तुम्ही वाद
काही उपाय
असे ट्रकचालकाकडे असलेले
संपादक मंडळ,
In reply to संपादक मंडळ, by संदीप डांगे
असहमत.
In reply to असहमत. by मोदक
+१११११११११११११११११
In reply to असहमत. by मोदक
सहमत पण तटस्थ
कोणाकडे एक कोटी रुपये आहेत
झीन्यूज च्या लैनीतले लोक्स
In reply to झीन्यूज च्या लैनीतले लोक्स by सचु कुळकर्णी
अगदी सहमत. अगदी फर्स्ट हँड
.
In reply to . by कवितानागेश
ही उपमा मनमोहन सिंगांना
In reply to ही उपमा मनमोहन सिंगांना by मोदक
हि काडी आहे का?
विषय महत्त्वाचा आहे, लोक
सनी लियोन प्रकरणाची आठवण झाली
कठिण समय येता कोण कामास येते
कठिण समय येता कोण कामास येते
चांगली चर्चा. फक्त चर्चा
वीस लाख रुपये घेऊन निघालेला
उदाहरणातल्या काल्पनिक
In reply to उदाहरणातल्या काल्पनिक by मोदक
तो टरक डायवर ईस लाक घीउन
अखेर 20 लाखांचा ट्रक सापडला ?
In reply to अखेर 20 लाखांचा ट्रक सापडला ? by रानरेडा
नावं बरोबर आहेत का?
In reply to अखेर 20 लाखांचा ट्रक सापडला ? by रानरेडा
तार्किक चूक. ट्रक्सची किंमत
In reply to तार्किक चूक. ट्रक्सची किंमत by श्रीगुरुजी
खिशातल्या वीस लाखाचे हे ट्रक
हैला
नोटबंदी गम्मत जम्मत
In reply to नोटबंदी गम्मत जम्मत by डाम्बिस बोका
अगदी सहमत.
In reply to नोटबंदी गम्मत जम्मत by डाम्बिस बोका
+१
नोट बंदी चे समर्थन करता होते
In reply to नोट बंदी चे समर्थन करता होते by Rajesh188
हे नक्की का?
आली नवी नोट बंदी ! आता किती चा ट्रक ?
In reply to आली नवी नोट बंदी ! आता किती चा ट्रक ? by हेमंत सुरेश वाघे
थांबा हो.. अजून टूलकिट तयार
ही बातमी अगोदर फुटली होती का?
In reply to ही बातमी अगोदर फुटली होती का? by कंजूस
२०१६ पासून लोकं हे बोलत आहेत