खरचं गरज आहे का?
लेखनविषय:
काव्यरस
पेरणा
कोण शिकवते कळ्यांना
कसे, केव्हां उमलायचे
कोण शिकवते पानांना
केव्हां कसे गळायचे
ऋतुराज वसंत येता
झाडे बहरून येती
निसर्ग चक्र फिरता
होती फुले कळ्यांची
श्वानास कसे कळते
मास भादव्याचा आला
खरचं गरज आहे का?
हे सर्व शिकवावयाची
बुद्धिमान मानवाला!!!
जानुके आपुली
आदम आणी ह्व्वाची
स्वर्गातूनच शिकून आली
कला फळे चाखायची
धन्वंतरी कशाला
हे सर्व शिकवण्यास
मग मित्र मैत्रिणीं कशाला?
फक्त पार्टी झोडण्यास!!!!!
(दारू ढोसण्यास)
ह्म्म ......
असे हा सहावा वेद
न लगे संथा कुणाची
का भांबावलास तू रे
ही कस्तुरी तुझ्याच पाशी
अदृष्य सापळे हे
का पळे तू उगाच
जे पाहिजे ते
आहे जवळ तुझ्याच
कधी समजेल या खुळ्यांना
जे पाहिजे ते
आहे तुझ्याच पाशी
-कवी चाहूल
३१-९-२०२२
ता. क.- कवीता वाचकांना एक अनुभव (शब्दात ओन्ली) फ्रि...फ्रि...फ्रि
वाचने
5013
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
कवी चाहूल =))
उच्च.
सुरु ठेवा...!
-दिलीप बिरुटे
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टरांची पहिली सही बघून धन्स झालं.
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
कहर आहे कर्नलसाहेब =))
श्वानास कसे कळते
मास भादव्याचा आला
आणी
-कवी चाहूल .
__/\__.
आणि मूळ माल वाचला नव्हता त्याने पहिल्यांदा वाचताना लैच गोंधळ उडाला, पण मग कवी चाहूल चा अर्थ लागला अन झटकन सगळा उलगडा झाला.
जहापन्हा तुसी ग्रेट हो तोफु कबुल करो
पैजारबुवा,
In reply to पेरणा लिवली नाही by ज्ञानोबाचे पैजार
आम्ही पाषाणयुगी.
आम्ही अश्वत्थामा.
ब्रह्मास्त्र फेकलं की परत घेता येत नाही.
तुमचं म्हणणं पटलं ,पूर्णा लिहायला हवी होती. आता तुम्हीच व्हा आमचे तारणहार आणी बघा काय करता येते का?
बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
In reply to पेरणा लिवली नाही by ज्ञानोबाचे पैजार
खरडल्या बघा.
In reply to पेरणा लिवली नाही by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद.
प्रचेतस, नि३सोलापुरकर, माऊली प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
जानुके आपुली
आदम आणी ह्व्वाची
स्वर्गातूनच शिकून आली
कला फळे चाखायची
In reply to जानुके आपुली by कर्नलतपस्वी
आदिम काळात आदम ने हव्वा ला जाणले तरी त्यांना संतती झाली असा उल्लेख मराठी बायबलात आहे. आता संतती साठी किती प्रयत्न करावे लागतात ?
स्वर्गातून जी कला आली आहे ती खाली धरतीवर पोहोचेपर्यंत कमी कमी होत अणूएवढी सुक्ष्म झाली आहे त्यामुळे शिक्षणाची गरज आहे.
हा हा