खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी जे न देखे रवी...
पेरणा कोण शिकवते कळ्यांना कसे, केव्हां उमलायचे कोण शिकवते पानांना केव्हां कसे गळायचे ऋतुराज वसंत येता झाडे बहरून येती निसर्ग चक्र फिरता होती फुले कळ्यांची श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला खरचं गरज आहे का? हे सर्व शिकवावयाची बुद्धिमान मानवाला!!! जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची धन्वंतरी कशाला हे सर्व शिकवण्यास मग मित्र मैत्रिणीं कशाला? फक्त पार्टी झोडण्यास!!!!! (दारू ढोसण्यास) ह्म्म ...... असे हा सहावा वेद न लगे संथा कुणाची का भांबावलास तू रे ही कस्तुरी तुझ्याच पाशी अदृष्य सापळे हे का पळे तू उगाच जे पाहिजे ते आहे जवळ तुझ्याच कधी समजेल या खुळ्यांना जे पाहिजे ते आहे तुझ्याच पाशी -कवी चाहूल ३१-९-२०२२ ता. क.- कवीता वाचकांना एक अनुभव (शब्दात ओन्ली) फ्रि...फ्रि...फ्रि

11 टिप्पण्या 5,013 दृश्ये

Comments

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

कवी चाहूल =)) उच्च. सुरु ठेवा...! -दिलीप बिरुटे

कर्नलतपस्वी नवीन

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरांची पहिली सही बघून धन्स झालं. प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

नि३सोलपुरकर नवीन

श्वानास कसे कळते मास भादव्याचा आला आणी -कवी चाहूल . __/\__.

ज्ञानोबाचे पैजार नवीन

आणि मूळ माल वाचला नव्हता त्याने पहिल्यांदा वाचताना लैच गोंधळ उडाला, पण मग कवी चाहूल चा अर्थ लागला अन झटकन सगळा उलगडा झाला. जहापन्हा तुसी ग्रेट हो तोफु कबुल करो पैजारबुवा,

कर्नलतपस्वी नवीन

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आम्ही पाषाणयुगी. आम्ही अश्वत्थामा. ब्रह्मास्त्र फेकलं की परत घेता येत नाही. तुमचं म्हणणं पटलं ,पूर्णा लिहायला हवी होती. आता तुम्हीच व्हा आमचे तारणहार आणी बघा काय करता येते का? बाकी प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

कर्नलतपस्वी नवीन

प्रचेतस, नि३सोलापुरकर, माऊली प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

कर्नलतपस्वी नवीन

जानुके आपुली आदम आणी ह्व्वाची स्वर्गातूनच शिकून आली कला फळे चाखायची

धर्मराजमुटके नवीन

In reply to by कर्नलतपस्वी

आदिम काळात आदम ने हव्वा ला जाणले तरी त्यांना संतती झाली असा उल्लेख मराठी बायबलात आहे. आता संतती साठी किती प्रयत्न करावे लागतात ? स्वर्गातून जी कला आली आहे ती खाली धरतीवर पोहोचेपर्यंत कमी कमी होत अणूएवढी सुक्ष्म झाली आहे त्यामुळे शिक्षणाची गरज आहे.