जगाची रित.

जागु जे न देखे रवी...
जगाची ही रितच न्यारी, कसेही वागा निंदाच पदरी ! गुणी, सज्जन ठरतो बावळट, स्पष्टवक्ता, म्हणे आम्हास उद्धट ! शांत व्यक्तीला 'माठाची' ची उपमा, चतूराच्या माथी, धटिंगडाचा तुरा ! सुट्टी घेतल्यास होतो कामचुकार, राब-राब राबल्यास ओटी चा भिकार ! सुखात नांदल्यास, बायकोचा बईल, समाजात गुंतल्यास, ह्याचे कसे होईल ? दान करणार्‍यावर, काळ्या पैशाचे लेबल, काट्-कसर करणारा, कंजूष एक नंबर ! निंदकाचे घर असावे शेजारी, शेजार्‍यालाही असतोच शेजारी !
वर्गीकरण
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

10 टिप्पण्या 3,701 दृश्ये

Comments

अनंता नवीन

जागु, मनात काहीही न ठेवता, कुणाचा मुलाहिजा न बाळगता, दुतोंडी लोकांना चांगलच हाणलत की ! अगदी माझ्याच मनातल्या भावना बोलून दाखवल्यात. चांगल्या कवितेबद्दल अभिनंदन :)

JAGOMOHANPYARE नवीन

स्पष्टवक्ता, म्हणे आम्हास उद्धट .... बरोबर आहे.... ( स्पष्टपणे प्रतिक्रिया दिल्यामुळे मला उद्धट म्हटल्यास माझी हरकत नाही !)

jenie नवीन

"जगाची ही रितच न्यारी, कसेही वागा निंदाच पदरी ! गुणी, सज्जन ठरतो बावळट, स्पष्टवक्ता, म्हणे आम्हास उद्धट !" आगदी खरं आहे... कसही वागा समाधान म्हणून नाही कुणाला... सुंदर कविता अभिनंदन जागु..

सँडी नवीन

In reply to by jenie

हेच म्हणतो. जागु, मस्त लिहलयं तुम्ही. काव्य आवडलं. =D> -सँडी काय'द्याच बोला?

मनीषा नवीन

निंदकाचे घर असावे शेजारी, शेजार्‍यालाही असतोच शेजारी ! ... सर्वांनीच समजून घ्यावे असे सत्य कविता आवडली ..

प्राजु नवीन

सुखात नांदल्यास, बायकोचा बईल, समाजात गुंतल्यास, ह्याचे कसे होईल ? दान करणार्‍यावर, काळ्या पैशाचे लेबल, काट्-कसर करणारा, कंजूष एक नंबर ! निंदकाचे घर असावे शेजारी, शेजार्‍यालाही असतोच शेजारी ! वरची तीनही कडवी खूप आवडली. मस्त उतरली आहे. निंदकांचे घर शेजारीच असते.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनामिक नवीन

व्वा मस्तं उतरली आहे कविता... अजून येऊ द्या. -अनामिक

क्रान्ति नवीन

अगदी खरं खरं लिहिलंस, तेही इतक्या सहजपणे. आवडली कविता. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com

जागु नवीन

अनंता, जगमोहन, जेनी, सँडी, मनिषा, प्राजू, अनामिक, क्रांती, शितल तुमचे खुप खुप धन्यवाद.