कान्हा
लेखनविषय:
पैलतीरावर तुझी बासरी
घुमते ..कान्हा, वेड लावते
निळे मोरपीस ,श्यामल अंगी
खुलते आणिक हळू खुणवते
अस्तित्वाच्या हिंदोळ्यावर
मी ही होते राधा , मीरा
घनश्याम ,मनमोहन ओठी
निळाईत ही विरे दिठी.
निळा जलाशय निळ्या नभाशी
करीतो हितगुज हळवे,कोमल
सारे होई एकरूप अन्
व्यापून उरतो केवळ कृष्ण
वाचने
2496
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
व्यापून उरतो केवळ कृष्ण ??
In reply to व्यापून उरतो केवळ कृष्ण ?? by चित्रगुप्त
हो..
छान
In reply to छान by कर्नलतपस्वी
धन्यवाद
अरे..
अरे..
व्वा, खुप सुंदर कविता!
सुंदर!