मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कान्हा

पद्मश्री चित्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
पैलतीरावर तुझी बासरी घुमते ..कान्हा, वेड लावते निळे मोरपीस ,श्यामल अंगी खुलते आणिक हळू खुणवते अस्तित्वाच्या हिंदोळ्यावर मी ही होते राधा , मीरा घनश्याम ,मनमोहन ओठी निळाईत ही विरे दिठी. निळा जलाशय निळ्या नभाशी करीतो हितगुज हळवे,कोमल सारे होई एकरूप अन् व्यापून उरतो केवळ कृष्ण

वाचने 2499 वाचनखूण प्रतिक्रिया 8

कर्नलतपस्वी 17/06/2022 - 10:24
कविता आवडली. चित्रगुप्त यांचा छोटा बदल खुप भावला.

In reply to by कर्नलतपस्वी

पद्मश्री चित्रे 20/06/2022 - 07:03
खरं आहे..सुचवलेला बदल चांगला आहे. धन्यवाद

राघव 20/10/2022 - 00:44
ही कविता कशी सुटली म्हणायची! सुंदर, नेहमीप्रमाणेच! आवडली!! :-)

राघव 20/10/2022 - 00:44
ही कविता कशी सुटली म्हणायची! सुंदर, नेहमीप्रमाणेच! आवडली!! :-)

चौथा कोनाडा 21/10/2022 - 11:35
व्वा, खुप सुंदर कविता! अगदी चित्रदर्शी ! निळ्या रंगात फिरवून आणलेत! केवळ कृष्ण आणि कृष्णचि केवळ दोन्ही समर्पक वाटतात.