त्यांनी हिंदीत का बोलावं?
In reply to केंद्र सरकारच्या कामकाजाची by चेतन सुभाष गुगळे
स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग देऊ नये. हिंदी विरुद्ध इंग्रजी असे ते आहे. दोन भिन्नभाषिक लोकांनी परस्पर संवाद साधण्याकरिता इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे आवाहन आहे.ही सुरुवातीची पायरी आहे.. सुरवातीला असे वरवर सामान्य भासणारे, हितद्वेषी न वाटणारे आवाहन करायचे आणि मग सगळे लोक हिंदी शिकलेत की हळूहळू एकेक मुद्दा पुढे रेटायचा असा मोठा कार्यक्रम (अजेंडा) असू शकतो.
यात सक्ती नाही. स्थानिक भाषेची गळचेपी तर अजिबात नाही. दोन मराठी भाषिकांनी मराठीत बोलू नये किंवा दोन तमिळ भाषिकांनी तमिळमध्ये बोलू नये असे सांगत नाहीयेत अमित. फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे.मुळात असे काही आवाहन करायचे कारणच काय ?लोक आपापल्या पद्धतीने मार्ग काढतातच की .. आताही दोन भिन्न राज्यातील एकमेकांची स्थानिक भाषा न जाणणारे लोक - आपापसात हिंदी बोलतच नाहीत , फक्त इंग्लिशच बोलतात असं काही नाहीये .. कधी इंग्लिशमध्ये बोलत, कधी हिंदीत संवाद साधत तर कधीअन्य कोणतीतरी भाषा बोलत किंवा एकमेकांची भाषा शिकून तोडकी-मोडकी बोलत तर क्वचित प्रसंगी एखादा दुभाषा मध्ये घेत मार्ग काढतातच .. आता तर इंटरनेटमुळे गुगल ट्रान्सलेटर सारखे अॅप वा फोनवरुन हवे ते चित्र दाखवत संभाषण करण्याची सोय उपलब्ध आहे. मला आठवते एकदा चेन्नईजवळ मी अल्पकालीन वास्तव्यास असताना घसा दुखू लागल्याने मला ओवा हवा होता तेव्हा मी ओव्याचे चित्र स्थानिक दुकानदाराला दाखवून ओवा मिळवला होता. जवळपास सर्वच राज्यात इतर राज्यातून स्थलांतर केलेले लोक आहेत... कोणतेही व्यवहार थांबलेले नाहीत. थोड्याफार अडचणी येत असतील पण व्यवहार पुढे सरकतातच. मग आता मुद्दाम आवाहन करायचे कारणच काय ? नीती आयोग वा कुठल्या आयोगाने तर म्हंटले आहे का की सगळ्या राज्यातील लोकांना एक भाषा येत नसल्याने देशाचा जीडीपी खाली घसरला वगैरे.. ? आणि आवाहन करायचेच होते तर लोकांना असेही म्हणा ना की तुम्ही दुसर्या राज्यात दीर्घकालीन वास्तव्यास असाल , स्थलांतरित झाला असाल तर तिथली स्थानिक भाषा आवश्य शिकून घ्या, त्या भाषेचाही आदर करा. असं आवाहन का केलं नाही अमित शहांनी लोकांना- त्यातही हिंदी भाषिक लोकांना ? विरोध हिंदी भाषेला नाहीये तर "इतर भाषिकांनी हिंदी आवर्जुन शिकावी आणि हिंदी भाषिकांनी मात्र वर्षानुवर्षे दुसर्या राज्यात राहून स्थानिक भाषा शिकण्यात स्वारस्य दाखवू नये, स्थानिक भाषेचा आदर करु नये " या दुटप्पी धोरणाला विरोध आहे.
In reply to स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग by तर्कवादी
In reply to स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग by तर्कवादी
In reply to केंद्र सरकारच्या कामकाजाची by चेतन सुभाष गुगळे
फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे
का??
तमीळ भाषकाचा नी मराठी भाषकाचा हिंदीशी संबंध काय?
आपली स्थानिक भाषा + एक अजून एक भाषा (ज्यांना आपली स्थानिक भाषा येत नाही त्यांच्यासोबत दैनंदिन व्यवहारात संवाद साधण्याकरिता) अशा दोन भाषा येणे गरजेचे असेल तर ही दुसरी भाषा शिकायला सोपी अशी कोणती आहे? अर्थातच हिंदी
हे कोणी ठरवले?? तुम्हीला हिंदी सोपी वाटते म्हणून बंगाली, केरळी ईशान्येकडील राज्यानाही ती सोपी वाटते का?बरं मग सोपीच भाषा घ्यायची असेल तर गुजराती का नको?? किंवा हरयानवी किंवा राजस्थानी?? In reply to फक्त जेव्हा एक मराठी भाषिक by अमरेंद्र बाहुबली
In reply to जगात चौथा आणि भारतात पहिला क्रमांक by चेतन सुभाष गुगळे
In reply to खोटे आकडे. हिंदी खुद्द हिंदी by अमरेंद्र बाहुबली
हिंदी खुद्द हिंदी भाषीक राज्यातही बोलली जात नाही. मध्य प्रदेशात बुंदेलखंडी, बाघेलखंडी नी माळवी बोलतात, युपीत मैथीली नी भोजपुरी बोलतात, बिहारात ही भोजपुरी बोलली जाते.हा माझाच मुद्दा तुम्ही पुन्हा अधोरेखित करताय. त्यांची मातृभाषा हिंदी नाहीचे मूळी पण दुसरी भाषा म्हणून ते हिंदी बोलतात. इतकंच काय गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागातही दुसरी भाषा म्हणून हिंदी बोलली जाते.
मग ही आकडेवारू कुठून आणलीय??अर्थातच दुसरी भाषा असली तरी त्यांना हिंदी येते म्हणून त्यांचादेखील या आकडेवारीत सामावेश केलेला आहे.
In reply to हिंदी खुद्द हिंदी भाषीक by चेतन सुभाष गुगळे
In reply to हिंदी द्वितीय by अमरेंद्र बाहुबली
In reply to हिंदी खुद्द हिंदी भाषीक by चेतन सुभाष गुगळे
त्यांची मातृभाषा हिंदी नाहीचे मूळी पण दुसरी भाषा म्हणून ते हिंदी बोलतात.
मिळतीजुळती असणे आणि बर्यापैकी फरक असणे हे जरा समजून घ्याल का? सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बर्याच लोकांना मालवणी आणि प्रमाण मराठीत बोलता येणे फार अवघड जाऊ नये. याचा अर्थ मालवणी ही मराठीपासून पूर्णत: वेगळी आहे का? ती जर पूर्णत: वेगळी असेल तर भाषावार प्रांतरचनेदरम्यान सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रात का सामील केला असेल? In reply to चेतन गुगळे by उपयोजक
मिळतीजुळती असणे आणि बर्यापैकी फरक असणे हे जरा समजून घ्याल का?
याचा अर्थ मालवणी ही मराठीपासून पूर्णत: वेगळी आहे का?मिळतीजुळती, बर्यापैकी फरक, बर्यापैकी फरक हेच तीन निकष लावून तर इंग्रजी ऐवजी द्वितीय भाषा म्हणून हिंदीचा आग्रह धरला जातोय. इंग्रजी ही स्थानिय भाषांना पूर्णतः परकी आहे तर हिंदी बर्यापैकी जवळची. मराठीला तर खूपच जवळची.
In reply to फक्त जेव्हा एक मराठी भाषिक by अमरेंद्र बाहुबली
तमीळ भाषकाचा नी मराठी भाषकाचा हिंदीशी संबंध काय?इंग्रजीशी तरी काय संबंध? जे कॉलेजला गेलेत, इंजिनिअरींग मेडिकल सायन्स कॉमर्स वगैरे शिकलेत त्यांच्यातले सर्वच्या सर्व देखील अस्खलित इंग्रजी बोलू शकत नाहीत. इतर मंडळी जसे की शेतकरी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, ड्रायव्हर, हमाल वगैरेंना तर इंग्रजी किती अवघड जाईल. हिंदी तूलनेने सोपीच की इंग्रजीपेक्षा.
हे कोणी ठरवले?? तुम्हीला हिंदी सोपी वाटते म्हणून बंगाली, केरळी ईशान्येकडील राज्यानाही ती सोपी वाटते का?बरं मग सोपीच भाषा घ्यायची असेल तर गुजराती का नको?? किंवा हरयानवी किंवा राजस्थानी??लिपी आणि उच्चारण यात सुलभता आहे. हरियाणवी / राजस्थानी मध्ये बाणातला ण, मराठी आणि दक्षिणी भाषांमध्ये असलेलं ळ असली उच्चारायला अवघड अक्षरं हिंदीत नाहीत म्हणून. मी मारवाडी भाषिक जैन असून अनेकदा मला गुजराती लोकांच्या सोबत संपर्क करावा लागतो. गेली किमान पस्तीस वर्षे अधूनमधून गुजराती कानावर पडते आहे. काही शब्द समजले तरी पूर्ण वाक्य समजत नाही, स्वतः जुळवून बोलणे तर कधीच शक्य नाही. त्यामुळे गुजराती कधीच सोपी वाटली नाही. बेळगाव मध्ये तीन महिने राहिलो पण अनेकदा ऐकूनही एकही कन्नड शब्द समजला नाही. धुळ्यात दोन वर्षे राहूनही अहिराणीतले काही शब्द समजले. पूर्ण वाक्य समजणे बोलणे हे काही जमले नाही. हिंदी मात्र शेजारी आणि दूरचित्रवाणी + आकाशवाणी + चित्रपट यांच्यामुळे फारच लवकर आत्मसात केली.
In reply to केंद्र सरकारच्या कामकाजाची by चेतन सुभाष गुगळे
फक्त जेव्हा एक मराठी भाषिक एका तमिळ भाषिका सोबत संवाद साधतोय तेव्हा इंग्रजी ऐवजी हिंदीला प्राधान्य द्यावे असे हे साधे आवाहन आहे.
हिंदीच का?In reply to म्हणजे by सुखीमाणूस
In reply to भाषा हा प्रश्न च नाही by sunil kachure
In reply to भाषा हा प्रश्न च नाही by sunil kachure
In reply to ओके by धर्मराजमुटके
हिंदी / इंग्रजी ला पर्याय म्हणून इतर कोणती भारतीय भाषा देता येईल काय ? नकोच आहे पर्याय. पर्याय का हवा?In reply to हिंदी / इंग्रजी ला पर्याय by अमरेंद्र बाहुबली
पर्याय का हवा?समजले नाही. म्हणजे पर्याय का नको ?
In reply to ओके by धर्मराजमुटके
In reply to मराठी आणि इंग्लिश या दोन भाषा by श्रीगुरुजी
In reply to माझ्यासाठी देखील. भत्तर by अमरेंद्र बाहुबली
In reply to आणि दक्षिणीलोक, इतर साहेब by चौथा कोनाडा
In reply to बरोबर आहे. by चेतन सुभाष गुगळे
साहेबाची चमचेगिरी करायला इंग्रजी बरी पडते यांना. म्हणजे कामचूकारपणा करुनही पगारवाढ / बढती मिळतेच.
भ्रम आहे. इंग्लिशमध्ये बोलून साहेबाची चमचेगिरी करण्याचे दिवस साहेबाबरोबरच गेले. आता बढतीसाठी वेगळी कौशल्ये लागतात. गरीब मजुराकडून प्रेमाचे शब्द मिळतात हासुद्धा अजून एक भ्रम.In reply to आणि दक्षिणीलोक, इतर साहेब by चौथा कोनाडा
In reply to +१ by कॉमी
In reply to +१ by कॉमी
आपल्या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना येणाऱ्या भाषेच्या दुस्वासासाठी खूप कमी भारतीयांना येणारी भाषा कवटाळायला बघणे म्हणजे फार मूर्खपणाचे वाटते.
भाषा एक टूल आहे. तिचा सर्वांना उपयोग व्हायला पाहिजे, निस्ती अस्मिता धरून बसून उपयोग नाही.
आक्षेप. आपल्या देशातील जास्तीत जास्त मानवी पैदास केलेल्या राज्यांची भाषा असा शब्द हवा. मग ह्या हिशेबानेIn reply to +१ by कॉमी
In reply to +१ by कॉमी
In reply to कोमी by sunil kachure
गृहमंत्री देशातील अनेक भाषा कडे दुर्लक्ष करून हिंदी वापरा असे कसे काय सांगू शकतात?गृहमंत्र्यांनी स्थानिक भाषेसोबत कोणती भाषा वापरावी यावर उपदेश दिलेला. स्थानिक भाषेऐवजी नाही. मग हिंदीच का ह्याचे साधे सरळ उत्तर आहे भारतात सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा म्हणजे हिंदी.
हिंदी भाषा एजेंडा हाच मुळी राजकीय आहे.लोकांची सोय होत असेल तर अजेंडा असला तरी काही फरक पडत नाही. अजेंडा फोल पडायला फार कुणाला न येणारी भाषा लादली जाऊ नये. सामान्य लोकांची सोय बघावी.
एकच देश,आपल्याच देशातील. हे शब्द वापरूच नका.हे शब्द कोणीही वापरले नाहीयेत. अमित शहांच्या सल्ल्यामध्ये सुद्धा स्थानिक भाषा प्रथम स्थानिच होत्या.
50% लोक हिंदी समजत नाहीत.करेक्ट. भाषांची यादी आणि किती टक्के भारतीयांना ती भाषा बोलता येते हे पाहिले तर समजेल हिंदीचा सर्वात जास्त आहे. मराठी केवळ १०% लोकांना येते. इंग्लिश सुद्धा १०%.
In reply to गृहमंत्री देशातील अनेक भाषा by कॉमी
भारतात सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा म्हणजे हिंदी. हे कोणी ठरवलं? भारतात हिंदी न समजनारे लोक जास्त आहेत.
लोकांची सोय होत असेल तर अजेंडा असला तरी काही फरक पडत नाही. अजेंडा फोल पडायला फार कुणाला न येणारी भाषा लादली जाऊ नये. सामान्य लोकांची सोय बघावी.
लोकांची सोय होतेय? ऊत्तर भारतीय मजूर म्हणजे लोक का? त्यांच्या सोयी साठी हिंदी का लादून घ्यावी?
करेक्ट. भाषांची यादी आणि किती टक्के भारतीयांना ती भाषा बोलता येते हे पाहिले तर समजेल हिंदीचा सर्वात जास्त आहे. मराठी केवळ १०% लोकांना येते. इंग्लिश सुद्धा १०%.
नीट पहा. किती लोकांना हिंदी येते ते. In reply to भारतात सगळ्यात जास्त लोकांना by अमरेंद्र बाहुबली
भारतात हिंदी न समजनारे लोक जास्त आहेत.१. भारतात सर्व भाषांमध्ये हिंदी सगळ्यात जास्त लोकांना बोलता येते. २. भारतात हिंदी बोलता येणाऱ्या लोकांपेक्षा हिंदी न बोलता येणारी लोकं जास्त आहेत. वरकरणी विरोधाभास वाटला तरी दोन्ही वाक्यांमध्ये विरोधाभास नाहीये. दोन्ही खरी वाक्ये आहेत. भारतात हिंदी समजणार्या लोकांची संख्या- ४३.६३% आहे. अशी दुसरी कोणतीही भाषा भारतात नाही जी ४३.६३% किंवा जास्त भारतीय नागरिकांना बोलता येते. याचा अर्थ ती "सगळ्यात जास्त लोकांना बोलता येणारी भाषा आहे".
हे कोणी ठरवलंजनगणनेमधून आलेली आकडेवारी आहे. इथे बघा. विकिपीडिया वर विश्वास नसल्यास सेन्सस वेबसाईट वरून एक्सेल फाईल डाउनलोड करा, आणि तपासा.
नीट पहा. किती लोकांना हिंदी येते ते.आणखी काय नीट पाहायचे ?
In reply to भारतात हिंदी न समजनारे लोक by कॉमी
भारतात हिंदी समजणार्या लोकांची संख्या- ४३.६३% आहे. ही आकडेवारी खोटी आहे. हिंदी ईतर राज्यांवर लादण्यासाठी अशी खोटी माहीती खुद्द सरकारच पसरवते. हिंदी भाषीक राज्ये न्हणून जी काज्ये गणली जातात ची देखील हिंदी बोलत नाहीत. ईतर भारताचा प्रश्नच नाही.In reply to भारतात हिंदी समजणार्या by अमरेंद्र बाहुबली
In reply to भारतात सगळ्यात जास्त लोकांना by अमरेंद्र बाहुबली
लोकांची सोय होतेय? ऊत्तर भारतीय मजूर म्हणजे लोक का? त्यांच्या सोयी साठी हिंदी का लादून घ्यावी?स्थानिक भाषेनंतर, ज्यांना स्थानिक भाषा येत नाही, त्यांसाठी दुसरी भाषा कुठली असावी हे ठरवण्यासाठी ज्यांना स्थानिक भाषा येत नाही त्यांना काय बोलता येते हेच पहावे लागेल. मग जर उत्तर भारतीय लोकं जास्त प्रमाणात आहेत हे तर हिंदी वापरण्यासाठीचे आणखी एक सबळ कारण झाले. दुसरी भाषा म्हणून इंग्लिश घेतली तर ती सुद्धा १० मधल्या एका व्यक्तीलाच येण्याची शक्यता आहे. त्याउलट हिंदी १० मधल्या ४ ते ५ जणांना येण्याची शक्यता आहे. हिंदी लादून कुठे घेत आहात, व्यवहार स्थानिक भाषेतच होणार आहेत. आणि हो, ती लोकं आहेत.
In reply to लोकांची सोय होतेय? ऊत्तर by कॉमी
इंग्लिश घेतली तर ती सुद्धा १० मधल्या एका व्यक्तीलाच येण्याची शक्यता आहे. त्याउलट हिंदी १० मधल्या ४ ते ५ जणांना येण्याची शक्यता आहे. चुकीची माहीती. कुत्र डुकरासारखी मानवी पैदास तेली म्हणून युपी बिहारची भाषा देशावर लादून घ्या हे सांगणे मुर्खपणाचे आहे. हिंदी दहा मधल्या चार ते पाच जणांना यायची शक्यता आहे ही देखील चुकीची माहीती.In reply to लोकांची सोय होतेय? ऊत्तर by कॉमी
In reply to +१ by कॉमी
In reply to दुस्वास ... कोणत्याच भाषेचा नसावा !! by तर्कवादी
In reply to दुस्वास ... कोणत्याच भाषेचा नसावा !! by तर्कवादी
पण हिंदी भाषिक इतर राज्यात -निदान महाराष्ट्रात तरी वर्षानुवर्षे राहून "क्यो सीखनी है हमे मराठी" अशी जी मग्रुरी दाखवतात त्याबद्दल आपण काय म्हणाल ?
प्रचंड सहमत.
आमच्याकडे मारवाडी भाडेकरू आहेत. ३ वर्षे होतील. अजूनही हिंदी बोलतात. मराठी शिकण्याचा प्रयत्न शून्य. कारण काही अडतच नाही...
एकदा मुलाच्या एडमिशन बाबत बोलणं चालू असताना बोलले की हम तो बच्चे के लिये इंग्लिश मिडयम school देख रहे है. मराठी की हमे कोई जरुरत नही है.
त्यांनी मुलाला कोणत्याही मिडीयम मध्ये शिकवावे पण शेवटचे वाक्य खटकले. इथे येऊन पैसा कमवा. रिसोरसेस वापरा.. पण इथली भाषा शिकू नका. हाच न्याय इतर राज्यात चालेल का. ???
लोकांनी इथे येऊ नये असे नाही. या रहा .. पण इथल्या भाषेचा आदर ठेवून बोला. शिका. भले वेळ लागेल.. परंतु २-२ पिढ्या जातात पण तरीही ते भाषा शिकण्यास उत्सुक नसतात. उलट आपणच त्यांच्याशी हिंदीत बोलावे अशी अपेक्षा....
In reply to पण हिंदी भाषिक इतर राज्यात by बापूसाहेब
In reply to अमराठींना भाड्याने जागा देऊ by श्रीगुरुजी
In reply to त्यासाठी घरमालक ही तितकाच by सुरिया
In reply to पण हिंदी भाषिक इतर राज्यात by बापूसाहेब
In reply to दोष त्यांचा नाही आपला आहे by sunil kachure
In reply to दुस्वास ... कोणत्याच भाषेचा नसावा !! by तर्कवादी
In reply to एखादी भाषा न शिकणे ह्याचा by कॉमी
माझे बरेच मारवाडी आणि गुजराती मित्र आहेत. ते उत्तम मराठी बोलतात.माझा मुद्दा गुजराथींबद्दल नव्हताच. गुजराथी, दाक्षिणात्य लोक मराठी शिकतात आणि आवर्जुन बोलायचा प्रयत्नही करतात हे मी पाहिले आहे. मुद्दा म.प्र, उ.प्र, बिहार येथील हिंदी भाषिकांबद्दल होता. ते मराठीचा तिरस्कार करतात हे मी स्वतः अनुभवले आहे. अगदी पुण्यातले अनुभव आहेत हे. एखाद्या ५-६ जणांच्या घोळक्यात एखाद-दुसराच हिंदी भाषिक असेल आणि बाकीचे मराठी भाषिक मराठीतून अनौपचारिक गप्पा मारत असतील तरी हे हिंदी भाषिक लगेच रडका सूर लावणार "अरे आप हिंदी मे बात करो ना" जसं काही मराठी कानावर पडल्याने ह्यांच्या कानाची जळजळ होते.
अमिताभ बच्चन अतिशय एक टोक आहेपंजाबी राजीव भाटिया (अक्षय कुमार ) हा छान मराठी बोलू शकतो.
पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे.भाषेला विरोध नाहीये... सक्तीला विरोध आहे. आणि हिंदी भाषिकांच्या मग्रुरीला विरोध आहे. भाषेला विरोध नाहीये तर आपली मराठी भाषेची अस्मिता गमावण्याला विरोध आहे.
In reply to माझे बरेच मारवाडी आणि गुजराती by तर्कवादी
Hindi should be accepted as alternative to English, and not to regional languagesही शहांची थेट क्वोट आहे. ह्यातले दुसरे वाक्य हि पूर्ण चर्चा थांबवायला खरं तर पुरेसे आहे असे मला वाटते. अक्षय कुमार बोलतो तर छानच आहे. आणि मराठी शिकायची नसल्यास त्यात काही वावगे नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. पण ही चर्चा त्यावर नाही असे मला वाटते. हि चर्चा सेकंडरी भाषा कोणती वापरावी ह्यावर आहे. बाकी मराठी बोलणाऱ्या लोकांवर दमदाटी होत असल्यास तेही चुकीचेच आहे.
In reply to सक्ती म्हणजे नक्की काय by कॉमी
सक्ती म्हणजे नक्की काय म्हणताय ? प्रायमरी लँग्वेज म्हणून हिंदी वापरा अशी सक्ती सोडा,साधा सुझाव सुद्धा अमित शाह यांनी केला नाहीयेओके.. अप्रत्यक्ष सक्ती (म्हणजे सध्या आवाहनाच्या .. माफ करा सुझावच्या रुपात असली तरी) कशी होवू शकते वा स्थानिक भाषेचे खच्चीकरण कसे होवू शकते ते विस्ताराने सांगतो. समजा अ नावाचा बंगाली व्यक्ती आहे - तो बंगाली प्रथम भाषा असल्याने बंगाली शिकलेला आहेच तसेच डेस्क जॉब करणारा सुशिक्षित असल्याने पोटापाण्याकरिता म्हणून इंग्लिशही शिकला आहे. आता तो तामिळनाडूतल्या अशा शहरात स्थलांतरीत होतो जेथे अनेक विविधभाषी लोक नाहीत (तसे चेन्नईतही तामिळ शिवाय कठीणच- पण असे शहर घेवू ज्यात इतर भाषिक हे चेन्नईपेक्षाही कमी असतील - मदूराई कदाचित ठीक राहील ?) तर तिथे तो ब तामिळ या व्यक्तीला भेटतो - ब ला तामिळ प्रथम भाषा असल्यामुळे येतेच पण तो ही सुशिक्षित असल्याने इंग्लिशदेखील येते. इंग्लिशमध्ये संवाद साधत अ व ब ची मैत्री होते. पण शहरात बाकी अनेकांना इंग्लिश फारशी येत नसल्याने (रिक्षावाले, विविध विक्रेते, इस्टेट एजंट ई ) अ ची अडचण होतेच आहे. मग तो ब ची मदत घेत या अडचणीतून मार्ग काढतो पण त्याचबरोबर आपल्याला इथे दीर्घकाळ वास्तव्य करायचे असल्याने थोडीफारतरी तामिळ शिकल्याशिवाय गत्यंतर नाही हे त्याला समजते आणि तो हळूहळू ( ब च्या मदतीने किंवा इतर मार्ग वापरुन) तामिळ शिकू लागतो. पुढे तो स्वतःच्या मुलाला इंग्लिश शाळेत घालतो (आजकालच्या आसपास दिसणार्या प्रथेप्रमाणे तामीळनाडूतही तामिळ भाषेतून शिक्षण कमी झाले असावे असे मानून मी हे लिहिले आहे... )तिथे इंग्लिश सोबत द्वितीय भाषा तांमिळ असते पण यास अ ची हरकत नाही.. कारण त्या शहतात दीर्घकाळ वास्तव्यास रहायचे तर तामिळ यायलाच हवे हे तो जाणून आहे. म्हणूनच आपल्या शाळेत तामिळ शिकावे लागू नये म्हणून तो धडपडत नाही, शाळेवर प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष दबाव आणत नाही की आयसीएसई किंवा दुसर्या इंटरनॅशनल शाळांच्या मागे लागत नाही.. थोडक्यात तो हळूहळू तामिळ भाषेला आपलंसं करतो. पण यात तो कुठेही हिंदी शिकत नाही. किंवा त्याच्या सोयीकरिता अनेक स्थानिकांना (ब सारख्यां सुशिक्षितांचा अपवाद वगळता) इंग्लिश शिकावे लागत नाही.. की हिंदीही शिकावे लागत नाही .. ते अनेक स्थानिक वर्षानुवर्षे स्वतःच्या भाषेतूनच बोलतात.. ज्यांना सर्व जगाचे ज्ञान मिळवायचे नाहीये त्यांना इंग्लिशची सक्ती कुणी करत नाहीच. स्मार्टफोनची भाषाही स्थानिक लावता येते पण सगळेच अॅप स्थानिक भाषेत नसल्याने वा स्थानिक मोबाईल वापरण्यापुरते किरकोळ प्रमाणात थोडेसे इंग्लिश शिकावे लागते तितकेच हेच जर अमित शहांचे आवाहन अगदी गांभीर्याने मानायचे तर अ आणि ब ला ही स्वतःची प्रथम भाषा व इंग्लिश या बरोबरच हिंदीही शिकावी लागेल. मदुराई शहरातल्या अनेक व्यापार्यांना, सेवा देणार्या व्यक्तींना कधीतरी कुणी अ येणार ज्याला तामिळ येत नाही त्याच्याशी व्यवहार करण्याकरिता म्हणून हिंदी शिकावे लागेल. याउलट तो अ "मला हिंदी येतंय आणि इथे हिंदी मध्ये काम होतंय तर कशाला शिकू तामिळ" असा विचार करत तामिळ भाषा शिकण्यात रस घेणार नाही. पुढे त्याच्या मुलांना शाळेत घालताना तो इंग्लिश शाळेत घालेल आणि दुसरी भाषा म्हणूनही तामिळ असेल तरी ती टा़ळता येईल का हे बघण्याकडेच त्याचा कल असेल किंवा टाळता आली नाही तरी जेमतेम उत्तीर्ण होण्याकदे कल असेल . हळूहळू असे परभाषिक स्थलांतरित तेथे वाढू लागतील आणि त्यांच्या सोयीकरिता म्हणून अमित शहांच्या सुचनेप्रमाणे स्थानिक लोक हिंदी शिकत राहतील तर मात्र बहुतांशी स्थलांतरित मात्र तामिळ शिकणार नाहीतच. हळूहळू असे होईल की १००० लोकसंख्येपैकी समजा ७०० लोक मूळ स्थानिक असतील तर त्यातले काही विरोधक सोडलेत तरी ६५० लोक आता हिंदी शिकलेले असतील तर उरलेल्या ३०० बिगर तांमिळ स्थलांतरितांपैकी जेमतेम ५० जणांना मोडकं तोडकं तामिळ येत असेल तर २५० लोकांना अजिबात येणार नाही. तर आता ९५० लोकांना हिंदी येत असेल तर तामिळ ७५० लोकांना येत असेल .. तसेच सगळे व्यहवार हिंदी भाषेतून होवू शकत असतील तर मग हिंदी संख्यात्मक प्राबल्यही वाढेल आणि व्यावहारिक महत्वही. हळूहळू हिंदी ही व्यवहाराची मुख्य भाषा होईल व ज्या भाषेशी अर्थकारण जोडलंय त्या भाषेचं महत्व वाढून स्थानिक भाषेचं महत्व कमी होईल. शाळेत, स्थानिक व्यवहारात, सोसायटीच्या मिटींगमध्ये हे हिंदी भाषिक तामिळ पेक्षा हिंदीतच संभाषण व्हायला हवं म्हणून जोर देत राहतील... बाकी यासगळ्यामुळे अर्थकारण कसं बदलत जाईल तो वेगळा विषय.. पण आता भाषेपुरतंच लिहितोय... मुळात आपल्या भागात परराज्यातून १० लोक येणार आणि त्यांना स्थानिक भाषा येत नाही म्हणून १०० लोकांनी एक भाषा का शिकावी ? त्याऐवजी त्या १० लोकांनी स्थानिक भाषा शिकावी हे सयुक्तिक नाही का ?.. [पर्यटन क्षेत्र व पर्यटक म्हणून येणार्या लोकांना वगळून इतर स्थलांतरितांबद्दल मी बोलत आहे] दुसरी भाषा हिंदी की इंग्लिश असा वाद असताना .. अनेकांना दुसर्या भाषेची गरजच नाही.. इंग्लिशची सुद्धा नाही. आणि इंग्लिशची जी गरज आहे ती सुद्धा जगातले विविध ज्ञान मिळवण्याकरिता.. आपल्या भागात येणार्या परभाषिक लोकांशी संवाद साधता यावा म्हणून कुणीच इंग्लिश शिकत नाही (पुन्हा पर्यटन क्षेत्रात सेवा देणारे वगळून) तर इंग्लिशमुळे परभाषिकांशी सहज संवाद होण्याची एक शक्यता निर्माण होणे हा एक सहपरिणाम आहे उद्देश नाही..काही प्रतिसादाकांनी म्हंटले आहेच की दाक्षिणात्य लोकांचे इंग्लिश फार काही चांगले नसते , ते अनेक चुका करतात. खरेच आहे ते .. ते स्वतःची भाषा सोडून दुसर्ञा भाषेला विनाकारण जास्त महत्व देत नाहीतच. कोणताही स्थलांतरित असाच उठून स्थलांतर करत नाही.. कुणीतरी त्याला तिथे येण्याकरिता निमंत्रण देते तेव्हाच तो तिथे येतो ना ?मग दुसरी भाषा न येणार्या त्या प्रदेशात त्या स्थलांतरिताची सोय कशी करावी , मग त्याला काही काळ तरी गरजेप्रमाणे मदत पुरवावी ही पण त्या निमंत्रकाची जबाबदारी आहे.. उदा: एखाद्या कंपनीने परभाषिकाला नोकरी दिली असल्यास त्याला स्थिरस्थावर होण्यासही मदत करावी, स्थानिक भाषेचे जुजबी ज्ञान त्याला द्यावे, त्याला मदत करण्याकरिता इतर स्थानिक व दुसरी भाषा जाणणार्या इतर कर्मचार्यांना प्रोत्याहित करावे. जाता जाता: भारतातील एखाद्या राज्यातील बहुतांशी लोकांना इंग्लिश बोलता येतंय आणि तिथे इंग्लिश बोलून व्यवसाय करणं सोपं आहे म्हणून इंग्लंड, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियातून भरभरुन लोक त्या राज्यात स्थलांतरित होणार नाहीत.. !! [सकाळपासून थोडा थोडा करत हा प्रतिसाद टंकला आहे, त्यामुळे आलेल्या विस्कळितपणाबद्दल क्षमस्व]
In reply to सक्ती म्हणजे नक्की काय by तर्कवादी
In reply to तर्कवादी by उपयोजक
मार्मिक! व्यवस्थित मांडलंय गणित!धन्यवाद उपयोजक.. एकूणात मुद्दा हाच आहे की वरवर जरी अमित शहांच्या आवाहनातली मांडणी ही इंग्लिश विरुद्ध हिंदी अशी दिसत असली आणि त्यामुळे सकृतदर्शनी ती जरी स्थानिक भाषेकरिता अपायकारक वाटत नसली तरी अंतिमतः ती स्थानिक भाषा विरुद्ध हिंदी अशीच जाणारी आहे.
In reply to एखादी भाषा न शिकणे ह्याचा by कॉमी
एखादी भाषा न शिकणे ह्याचा अर्थ दुस्वास होत नाही. एखादी भाषा बहुतांश भारतीयांना येते (हिंदी), आणि दुसरी भाषा बहुतांश भारतीयांना येत नाही (इंग्लिश) अश्यामध्ये केवळ भावनिक कारणांसाठी पहिल्या भाषेला विरोध करणे हे चुकीचेच आहे.पूर्वार्ध एकदम खरा आहे, उत्तरार्ध पटतो आहे. मारवाडी गुजराती उत्तम मराठी बोलतात हेही खरे आहे पण एक उदाहरण माझ्या शेजारीच आहे. नवरा गुजरातेतुन शिकलेला पण गेली ५ वर्षे जॉबसाठी पुण्यात आहे, बायको जन्मापासून महाराष्ट्रातील गुजराती आहे. नवरा अगदी सुंंदर मराठी बोलतो, सोसायटीत वगैरे आवर्जून मराठी बोलतो त्याउलट त्याची पत्नी कधीही मराठी बोलत नाही किंबहुन ती सदैव मराठी लोक, मराठी परंपरा, येथिल ट्राफिक वर खडे फोडत असते. तेही हिंदीतून. मला वाटते की एक सिंपल नियम करावा. सर्वच राज्यांसाठी. १ महिन्यापेक्षा जास्त वास्तव्य करायचे असेल, ड्रायव्हिंग लायसन्स इथले हवे असेल, इथली सॅलरी स्लीप हवी असेल, राशन कार्ड, आधार कार्ड, प्रॉपर्टी पेपर्स, व्हिकल आणि अप्लायन्सेस पर्चेस येथे करायचे असेल तर एक कोर्स, परिक्षा आणि सर्तिफिकेट अनिवार्य करावे. हे धोरण सर्वच राज्यांनी कठोरपणे राबवावे. त्यातून रोजगार निर्मीतीही होइल. जर्मनी, फ्रान्स ल जायला ती भास्।आ शिकायला पैसे मोजता तर ज्या राज्यात आपण पैसा कमवायला जातोय तिथली भाषा शिकायला आणि त्यासाठी पैसे खर्चायला हरकत नसावी.
In reply to एखादी भाषा न शिकणे ह्याचा by सुरिया
In reply to Switzerland चे नागरिकत्व हवे by श्रीगुरुजी
तुम्ही घरात वेगळ्या भाषेत बोलता हे कारण देऊन त्यांचा अर्ज काही काळासाठी स्थगित ठेवला गेला.फारच भयानक. घरात कोणती भाषा बोलायचे याचे पण नियम ? अवघड आहे. उद्या कदाचित घरात भारतीय पदार्थ बनविले म्हणून नागरिकत्व रद्द व्हायचे.
In reply to अरे बापरे ! by धर्मराजमुटके
In reply to नागरिकत्व मिळविण्यासाठी by श्रीगुरुजी
In reply to +१ by कॉमी
खूप कमी भारतीयांना येणारी भाषामग संस्कृत ही राष्ट्रभाषा करावी. तिच्या इतकी राष्ट्रीय व्याप्ती अन्य कोणत्याच भारतीय भाषेची नाही.
In reply to खूप कमी भारतीयांना येणारी by उपयोजक
In reply to अं ? by कॉमी
In reply to कॉमी साहेब by उपयोजक
पण म्हणून अरबी,फार्सीने भरलेली उर्दुछाप हिंदी ही देशाची भाषा राष्ट्रभाषा होऊ नये.राष्ट्रभाषा करा असा आजिबात आग्रह नाही. सेकंडरी लँग्वेज म्हणून वापरा. उर्दू अरबीने भरलेली भाषा चालत नाही, पण इंग्लिशने भरलेली इंग्लिशछाप भाषा जी फक्त १० मधल्या १ भारतीयाला येते ती मात्र चालते हे कसे ?
In reply to ओके by धर्मराजमुटके
प्रत्येकाला इंग्रजी शिकणे अवघड आहे त्यापेक्षा हिंदी सोपी आहे. आणि इतकंच आहे तर दक्षिणी भाषेतील चित्रपट मूळ भाषेसोबत फक्त इंग्रजीतच डब करावेत पण नाही ते तर हिंदी प्रमाणेच आता तर थेट भोजपूरीत देखील डब होतात. कारण काय तर ह्या उत्तर भारतीयांच्या खिशातून पैसे हवे आहेत तर मग त्यांच्यापर्यंत पोचायला त्यांच्या भाषेत संवाद साधायला मग या दाक्षिणात्यांचा भाषाभिमान आड येत नाही का? बाहूबली तुमचा सिनेमा जर फक्त स्थानिक + इंग्रजी भाषेत आणला असता तर इतका प्रचंड व्यवसाय करु शकला असता का? हिंदीत असल्यामुळेच उत्तर भारतातही तो पाहिला गेला. त्यांना जर दाक्षिणात्यांचा द्वेष असता तर त्यांनी सरसकट सर्वच दक्षिण भारतीय चित्रपटांवर ते हिंदीत डब असले तरीही बहिष्कार टाकला असता.या विधानांचा अजूनतरी कोणी प्रतिवाद केलेला नाहीये. यापूर्वी एका प्रतिसादात ए आर रहमान यांचा उल्लेख आला आहे. त्यांनी देखील डब्ड तसेच स्वतंत्र हिंदी चित्रपटांना संगीत दिल्यानेच अधिक यश कमावले. ज्या गीताकरिता ते आंतराष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोचले ते गीत देखील हिंदी भाषेत आहे. The soundtrack won the Golden Globe Award for Best Original Score, BAFTA Award for Best Film Music, and two Academy Awards, one for Best Original Music Score and the other for Best Original Song for "Jai Ho". The soundtrack has also won two Grammy Awards, one for the album itself and another for the song "Jai Ho". The latter song would be reworked by Ron Fair and The Pussycat Dolls into an English language adaptation "Jai Ho! (You Are My Destiny)" which would go on to become and international hit for the group. https://en.wikipedia.org/wiki/Slumdog_Millionaire:_Music_from_the_Motion_Picture दक्षिण भारतीयांच्या हिंदी विरोधात प्रामाणिकपणा दिसत नाहीये. आर्थिक फायदा दिसेल तेथे हिंदी विरोध बाजूला इतकेच काय हिंदीच नव्हे तर भोजपुरीला देखील आपलेसे करायचे तयारी दिसतेय. महाराष्ट्र हिंदी विरोधात कधीच नव्हता. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर मात्र राज्य सरकार पुरस्कृत हिंदी विरोध महाराष्ट्रात दिसून येत आहे. दक्षिण भारतीयांच्या नादाला लागून महाराष्ट्राने असा विरोध करु नये. दक्षिण भारतीय महाराष्ट्र आणि मुंबईत राहूनही त्यांच्या भाषेचे दडपण आणून सिनेमाचालकांना इथे त्यांच्या स्थानिक भाषेतील चित्रपट प्रदर्शित करायला लावतात. चैन्नई / कोचीमध्ये मराठी चित्रपट सिनेमाघरांत प्रदर्शित होतात का? इतकेच काय पण डीडी डायरेक्ट प्लस ने सर्व भाषांतील काही मोफत वाहिन्यांचे देशभर प्रसारण केले आहे. जेणेकरुन आपण देशाच्या कोणत्याही भागात असलो तरी आपल्या स्थानिक भाषेचे कार्यक्रम तिथे बसून पाहू शकतो. असे असताना चैन्नईतल्या प्रत्येक लॉजमध्ये असलेल्या टीवीवर मराठी कार्यक्रम दिसतील अशी सोय असते का?
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत?
मी त्यांच्याशी किंवा अशा सर्वांशी मराठीतच बोलतो व ते त्यांना समजतं. मी कोणाशीही हिंदीत बोलत नाही. महाराष्ट्रात सर्वांशी मराठीत व महाराष्ट्राबाहेर इंग्लिशमध्ये बोलतो. In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का?
पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल?
हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या राज्यांत येणार्या मजूर वर्गातील किती लोकांना इंग्रजी येते. स्थानिक व हिंदी भाषेत जसे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळते तसे इंग्रजी भाषेत मिळते का? शाळेत न जाता / न गेलेल्यांनाही हिंदी येऊ शकते तशी इंग्रजी येते का?
पंक्चर काढणारे केरळी अण्णा महाराष्ट्रात स्थानिक नागरिकांशी मराठी किंवा इंग्रजीत बोलतात की हिंदीत? आपण त्यांना फक्त मराठी किंवा इंग्रजी चा पर्याय दिला आणि यापैकी कुठल्याही भाषेत संवाद साधता आला नाही तर तुमच्याकडे पंक्चर काढणार नाही असा पवित्रा घेतला तर काय होईल?
हेच कटिटर हिंदीभाषाभिमानी तमीळणआडूत जाऊन पोटापाण्यासाठी तमीळ शिकतात कारण त्याना माहीत असते तमीळ शिकलं नाही तर पोट भरनार नाही. पण तेच महाराष्ट्रात “हिंदी मे बोलो“ म्हणून मराठी माणसावर दादागीरी करतात. कारण?? तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.In reply to पोटापाण्याकरिता वेगवेगळ्या by अमरेंद्र बाहुबली
तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीसाठी मायमराठी चा खून करून हिंदीत बोलतात. अर्थआत तुम्हा वर सांगीतल्याप्रमाणे तुम्ही मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.
In reply to याच्याशी सहमत आहे by उपयोजक
मुळचे मराठी नाहीत त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेबद्दल तितकी आत्मियता नाही.या आरोपाबद्दल बोलायचे तर मी इंग्रजी ऐवजी हिंदी ही बाजू लावून धरलीय मराठी ऐवजी हिंदी अशी नाही. तरी ही असा आरोप होत असेल तर मात्र जे हिंदी ऐवजी इंग्रजी अशी बाजू लावून धरत आहेत त्यांच्यावर
तुम्ही मूळचे भारतीय असूच शकत नाही अजुनही इंग्रजी गुलामगिरीच्या मानसिकतेत अडकले असल्याने तुम्हाला इंग्रजी या परक्या भाषेबद्दल जितकी आत्मियता वाटते तितकी हिंदी या भारतीय भाषेबद्दल नाही.असा आरोप करावा काय? पण असा आरोप मी करणार नाही कदाचित माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती व मग मूळतः व्यवहारात मराठीला मी प्राधान्य न देता सरसकट इंग्रजीचा वापर केला असता तरीही माझ्यावर असला गचाळ आरोप आला नसता.
In reply to हा फारच वैयक्तिक आणि तद्दन by चेतन सुभाष गुगळे
आमचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. आम्ही फक्त घरी मारवाडी बोलतो. चारशे वर्ष झाले महाराष्ट्रात येऊन तरी देखील तुम्ही घरात मारवाडीच बोलतात. म्हणजे ४०० वर्षांपासून तुम्ही तुमची मुळ भाषआ जपून ठेवलीय. घरात मराठी बोलावीशी वाटत नाही कारण ती तुमची मातृभाषा नाही. त्यामुळेच मा बोललो का तुम्हाला मराठी विषयी आत्मियता नाही. जशी तुम्हाला मारवाडी प्रिय तशी आम्हाला मराठी.In reply to आमचे पूर्वज चारशे by अमरेंद्र बाहुबली
In reply to अतिशय चुकीचा प्रतिसाद ! by धर्मराजमुटके
In reply to पुण्यात मी पाहतोय. by अमरेंद्र बाहुबली
In reply to अतिशय चुकीचा प्रतिसाद ! by धर्मराजमुटके
In reply to अतिशय चुकीचा प्रतिसाद ! by धर्मराजमुटके
In reply to +१ by कॉमी
In reply to आमचे पूर्वज चारशे by अमरेंद्र बाहुबली
In reply to श्री गुगळे ह्यांच्यावर अशी by Trump
In reply to श्री गुगळे ह्यांच्यावर अशी by Trump
In reply to हिंदी भाषेला प्राधान्य देतात by sunil kachure
गुजरात मध्येच राहणारे गुजराती,राजस्थान मध्येच राहणारे मारवाडी हिंदी लं प्राधान्य देणार नाहीत.आणि हिंदी चे समर्थन पण करणार नाहीत. अगदी मराठी लोक जितकी हिंदी लं किंमत देतात तितकी पण हे त्यांच्या राज्यात देणार नाही.हा तुमचा अंदाज चूकीचा आहे. गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. आमच्या राज्यात आला आहात तर फक्त आमच्या स्थानिक भाषेतच नाहीतर इंग्रजीतच बोला अशी दमदाटी गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा या राज्यांत होत नाही हे स्वानुभावरुन सांगतो.
In reply to गुजरात मध्येच राहणारे गुजराती by चेतन सुभाष गुगळे
गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मलाIn reply to गुजरात मध्येच राहणारे गुजराती by चेतन सुभाष गुगळे
गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत हिंदी बोलली जाते. राजस्थानात तर मूळ राजस्थानी लोकदेखील जेव्हा मोठा सार्वजनिक कार्यक्रम करतात तेव्हा हिंदीला प्राधान्य देतात हे मी एक मारवाडी म्हणून तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला तरी ते गुजरातीतच बोलतात हा अनुभव आहे मलाIn reply to गुजरातमध्ये परप्रांतियांसोबत by अमरेंद्र बाहुबली
In reply to गुजरातेते समोरचा हिंदीत बोलला by चौथा कोनाडा
In reply to गुजरात मध्ये by sunil kachure
In reply to श्री गुगळे ह्यांच्यावर अशी by Trump
In reply to हा फारच वैयक्तिक आणि तद्दन by चेतन सुभाष गुगळे
In reply to चेतन गुगळे by उपयोजक
हिंदी भाषेने मराठीचे बरेच नुकसान केले आहे.इंग्रजीने जास्त केले आहे.
शिवाय ही ज्यांची मातृभाषा आहे त्या गायपट्ट्यसतले लोक महाराष्ट्रात सगळीकडे घुसून लोकसंख्या वाढवत आहेत. आज महाराष्ट्रातल्या कितीतरी पे स्केल चांगले असणार्या नोकर्यांवर हे हिंदीभाषिक आहेत.दक्षिण भारतीयांनीच जास्त नोकर्या बळकावल्या आहेत.
In reply to हिंदी भाषेने मराठीचे बरेच by चेतन सुभाष गुगळे
In reply to दक्षिण भारतीय लोकांनी नोकऱ्या बळकावल्या आहेत by sunil kachure
मुंबई मधील शेट्टी लोकांच्या बार मध्ये आता कन्नड waiter नाहीत..इतक्या कमी उत्पन्नावर त्यांचं लक्ष नाही. साहेबाचा पीए वगैरेंसारख्या मोठ्या मिळकतीची पदे त्यांनी बळकावली आहेत मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांत. मराठी भाषेचा आणि मराठी जनांचा हेच जास्त अपमान आणि दु:स्वास करतात उत्तर भारतीयांपेक्षाही.
In reply to हा फारच वैयक्तिक आणि तद्दन by चेतन सुभाष गुगळे
माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती.
म्हणजे योग्य काय यावर विचार न करता
तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात आणि त्यामुळे तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते त्यावरुन तुम्ही ठरवता की सर्व भारतात कोणती भाषा बोलली जावी ते? छान छान!In reply to छान गुगळे सर by उपयोजक
तुम्ही कोणत्या माध्यमातून शिकलात आणि त्यामुळे तुम्हाला कोणती भाषा सोपी वाटते त्यावरुन तुम्ही ठरवता की सर्व भारतात कोणती भाषा बोलली जावी ते? छान छान!मुद्दा कळला नाही की कळूनही न कळल्याचा आव आणताय? ठळक केलेले शब्दच महत्त्वाचे आहेत कारण तेच भाषेचे भवितव्य ठरविणार आहेत.
माझ्या पालकांना परवडले असते आणि त्यांनी मला इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले असते तर माझी मराठी भाषा तितकीशी परिणामकारक नसतानाही इंग्रजी मात्र प्रभावी झाली असती आणि इथे इंग्रजी विरुद्ध हिंदी वादात मी इंग्रजी बाजू लावून धरली असती.या शब्दांमधून मला हे सांगायचे आहे की मराठी माध्यमात शिकल्याने माझे मराठी उत्तम आहे पण परिणामस्वरुप इंग्रजी कच्चे. जिथे मराठीत संभाषण शक्य नाही अशा ठिकाणी अर्थातच इंग्रजीपेक्षा तूलनेने मला हिंदी सोपी. म्हणजे मी हिंदी वि. इंग्रजी वादात जरी हिंदीची बाजू घेत असलो तरी मूळात माझे मराठी चांगले. याउलट हिंदी विरुद्ध इंग्रजी वादात इंग्रजी बाजू लावून धरणारा असेल तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असणार म्हणजेच तुलनेत त्याचे मराठी तितकेसे प्रभावी नाही. पण आता हिंदी ऐवजी इंग्रजी सक्ती अशीच होत राहिली तर पालक मुलांना टाकणार इंग्रजी माध्यमात. आता याच्या परिणामी मुलांचे मराठी कच्चे राहणार म्हणजे अंतिमतः इंग्रजी आग्रह मराठीलाच भविष्यात बुडविणार.
In reply to तुम्ही कोणत्या माध्यमातून by चेतन सुभाष गुगळे
जिथे मराठीत संभाषण शक्य नाही अशा ठिकाणी अर्थातच इंग्रजीपेक्षा तूलनेने मला हिंदी सोपी.
मला हिंदीपेक्षा इंग्लिश खूप सोपी वाटते.
म्हणजे मी हिंदी वि. इंग्रजी वादात जरी हिंदीची बाजू घेत असलो तरी मूळात माझे मराठी चांगले.
मी जन्मतःच मराठी आहे.
याउलट हिंदी विरुद्ध इंग्रजी वादात इंग्रजी बाजू लावून धरणारा असेल तो इंग्रजी माध्यमातून शिकलेला असणार म्हणजेच तुलनेत त्याचे मराठी तितकेसे प्रभावी नाही.
चुकीचे गृहीतक आहे. मी बालवाडीपासून १० पर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो व मला मराठी उत्तम येते. परंतु हिंदीच्या तुलनेत इंग्लिश खूपच सोपी वाटते. In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.
तुम्ही तुमचा हेका सोडत नाही.मग इतरांनी त्यांचा हेका का सोडावा?In reply to आधी स्वत:मधे बदल करा चेतनजी by उपयोजक
In reply to उपायोजक धागा तुम्हीच काढलाय by चेतन सुभाष गुगळे
In reply to विरोधी मत स्वीकारा की. by उपयोजक
In reply to हिंदी विरोध देखील तितकासा प्रामाणिक नाही by चेतन सुभाष गुगळे
दक्षिण भारतीयांच्या हिंदी विरोधात प्रामाणिकपणा दिसत नाहीये. आर्थिक फायदा दिसेल तेथे हिंदी विरोध बाजूला इतकेच काय हिंदीच नव्हे तर भोजपुरीला देखील आपलेसे करायचे तयारी दिसतेयमाझ्यामते विरोध हिंदीला नाही.. हिंदीच्या सक्तीला आहे. दोन्ही गोष्टीत फरक आहे.
महाराष्ट्र हिंदी विरोधात कधीच नव्हता. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर मात्र राज्य सरकार पुरस्कृत हिंदी विरोध महाराष्ट्रात दिसून येत आहे.पुन्हा एकदा - हिंदी विरोध आताही नाही आणि नसावा... हिंदीच्या सक्तीला विरोध आहे. उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रात येवून वर्षानुवर्षे "क्यो सीखनी है हमे मराठी ?" अशा मग्रुरीला - एखाद्या घोळक्यात एखादाच हिंदी भाषिक असूनही इतर मराठी भाषिक मराठीत गप्पा मारु (मी अनौपचारिक गप्पा म्हणतोय हं.. कार्यालयीन बैठकी नाही) लागल्यावर "अरे यार.. हिंदी मे बात करो ना" म्हणत तक्रारीचा सूर लावण्याला विरोध आहे. म्हणजे हिंदी भाषिकांसमोर मराठी बोलणं म्हणजे गुन्हाच झाला का ? याबद्दल काय म्हणणे आहे ? बाकी आर्थिक फायदा असेल तर मी फ्रेंच भाषेतही एखादा व्हिडिओ वा एखादे लेखन प्रसिद्ध करेन --किंवा माझी व्यक्तिगत आवड म्हणूनही शिकेन ...पण म्हणून कुणी फ्रेंच भाषा सक्तीची केली तर मी कडाडून विरोध करेन.. हा दुटप्पीपणा नसून निवडीचा अधिकार आहे. माझे हिंदी भाषिक मित्र आहेत, मी त्यांच्याशी हिंदीत बोलतो, मी हिंदी चित्रपट, मालिका व गाणी बघतो.. पण ही माझी निवड आहे. .. उद्या कुणी मराठी चित्रपटांवर बंदी घातली तर मी कडाडून विरोध करणारच.
असे असताना चैन्नईतल्या प्रत्येक लॉजमध्ये असलेल्या टीवीवर मराठी कार्यक्रम दिसतील अशी सोय असते का?माझा चन्नईजवळ महिंद्रासिटीत अल्पकाळ वास्तव्यातला अनुभव आहे.. तिथे एका सर्विस अपार्टमेंटमध्ये माझी राहण्याची सोय माझ्या कंपनीकडून करण्यात आलेली होती. त्यावेळी मला काही मराठी मालिका बघण्याची सवय होती. पण तिथल्या टाटा स्काय वर त्या वाहिन्या दिसत नसल्याने मी त्यांच्या मॅनेजरला फोन केला असता तिने दहा मिनटात मराठी पॅक जोडून माझी सोय केली.
In reply to अमित शहा by सुखीमाणूस
शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या फायद्याचे आहे, कायमची निवडुन येण्याची सोय झाली...
शिवसेनेला विरोध म्हणून अनेक भाजप समर्थक मराठीला विरोध करतात. तेयांचा कडे पाहून रडावे की हसावे ते च कळत नाही. हियाबाबत श्रिगुरूजींकडे भाजपेयींनी पहावे, ते सेना विरोधी असूनही कट्टर मराठीवादी आहेत. मराठी मुंबई म्हटलं का सेना आठवते ह्यातच सेनेचं कर्त्तृत्व दिसतं.धागा काथ्याकूट सदरात असला तरीही चर्चेकरिता काढलेला दिसत नाहीये तर निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय.सहमत आहे. तसेही प्रत्येकाची मते ठरलेली असतात. कोणी चर्चेमुळे आपले मत बदलत नाही. त्यामुळे कोणत्याही ठराविक आय डीं ना दोष देता येत नाही. धागा कोणत्याही सदराखाली काढला तरी त्याकडे केवळ मौजमजा म्हणून पहावे. असेही जालावर लिहिणारे बहुसंख्यांचे पोटापाण्याचे प्रश्न तीव्र नसणारे असतात आणि ज्यांना त्याची भ्रांत आहे त्यांच्याकडे चर्चा करण्याइतका वेळ, वकूब आणि उत्साह नसतो. पुर्वी मलाही अशा चर्चा वाचून आपणही काहितरी लिहावे असा हुरुप येत असे पण आता हे सगळे नको वाटते. लिहिणार्यांचा हुरुप वाढावा म्हणून अधून मधून प्रोत्साहन पर दोन शब्द लिहिणे किंवा केवळ वाचनमात्र राहणे ही त्यातल्या त्यात सुखासिन पर्याय आहेत.
In reply to निष्कर्ष आधीच ठरवलेला दिसतोय. by धर्मराजमुटके
लिहिणार्यांचा हुरुप वाढावा म्हणून अधून मधून प्रोत्साहन पर दोन शब्द लिहिणे
म्हणजे आधी लिहावं म्हणून प्रोत्साहन द्यायचं नंतर त्यांनाच रिकामटेकडे म्हणायचं.
चांगलंय. चालू द्या. :(In reply to धर्मराजमुटके by उपयोजक
In reply to इथले किती लोक IPL च समालोचन by धनावडे
इथले किती लोक IPL च समालोचन मराठीतून ऐकतात??का बरे ऐकावे ? समालोचन इंग्रजी मधे उपलब्ध आहे ना ? हिंदी मधून ऐकायचे नाही एवढाच तर विषय आहे ना ?
In reply to इथले किती लोक IPL च समालोचन by धनावडे
In reply to कोणत्या वाहिनीवर आहे? स्टार by श्रीगुरुजी
In reply to हिट star वर Star sport १ वर by धनावडे
In reply to तीन भाषा by sunil kachure
स्थानिक भाषा, हिंदी,इंग्लिश ह्या तीन भाषा शिकण्याची काय गरज आहे.उगाच टाईम वाया जातो.बरोबर आहे. शिवाय स्थानिक भाषा (उदा. मराठी) पण व्याकरणासहित शिकण्याची आवश्यकता नाही. पुर्ण वाक्यात एखाद दुसरा मराठी शब्द असला आणि बाकी इंग्रजी शब्द असले तरी चालून जाण्यासारखे आहे. उदा.उगाच टाईम (वेळ) वाया जातो. शिवाय विरामचिन्हे खाल्ली तरी चालतात. उदा. कशाला हवी. (?)
इंग्लिश बोलणाऱ्या लोकांची संख्या आता कमी असेल पण वाढेल दहा वर्षात.ह्याबद्द्ल प्रचंड सहमत. आताही इंग्रजी शाळेत जाणारी मराठी मुले आणि त्यांचे पालक आपापसात हिंदी किंवा इंग्रजी बोलतात. त्यामुळे इंग्रजी (सॉरी इंग्लिश) बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाणार ह्याबद्द्ल सहमत आहे.
In reply to हिंदी एक भारतीय भाषा आणि by चेतन सुभाष गुगळे
In reply to हिंदी एक भारतीय भाषा आणि by चेतन सुभाष गुगळे
In reply to हिंदी बहुभाषिक पट्ट्यातील by सतिश गावडे
In reply to परदेश म्हणजे कोणता देश? by चेतन सुभाष गुगळे
In reply to तुम्ही माझ्या प्रतिसादातील by सतिश गावडे
In reply to पुन्हा वाचला. by चेतन सुभाष गुगळे
In reply to प्रश्नाला सोयीस्कर बगल by सतिश गावडे
In reply to संपर्क भाषा by sunil kachure
मराठी करा देशाची भाषा सर्वांस मराठी शिकवा.नक्की. इथे एक मराठी भाषक हिंदी ऐवजी तेलुगू भाषा सगळ्या भारतभर संपर्क भाषा म्हणून चालेल असे लिहितात.
असे पण हिंदी आणि मराठी मध्ये जास्त फरक नाही.आहे ना. खुप फरक आहे. मराठी वाले मराठी सोडून हिंदी, इंग्रजी भाषा बोलण्यास जास्त उत्सुक असतात हा मोठा फरक आहे.
हिंदी वाले मान्य करतील का बघा.हिंदी वाले मान्य करतील काय ते पण बघा आणि तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी पण मराठीला राष्ट्रभाषा म्हणून मान्य करतील काय ते पण विचारा.
In reply to अमितजींच्या मूळ आवाहनाला by चेतन सुभाष गुगळे
याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता आणि ज्याची परिणती त्या देशाशी भारताचे संबंध बिघडण्यात व आपले एक माजी पंतप्रधान जीवानिशी गमावण्यात झाली.
अत्यंत चुकीची माहिती आहे. श्रीलंकेतील लिट्टे, तुल्फ व इतर तामिळ संघटनांनी सुरू केलेला सशस्त्र लढा हा फक्त भाषेशी निगडीत नव्हता. किंबहुना भाषा हे त्यामागील एक अत्यंत दुय्यम कारण आहे. वंशभेद, तामिळांवरील अत्याचार व अन्याय, वारंवार झालेली तामिळ नागरिकांची हत्याकांडे यामुळे हा सशस्त्र संघर्ष सुरू झाला होता. याच तमिळ भाषिकांनी त्यांच्या भाषिक संघर्षावरुन शेजारील देशात मोठा रक्तपात व संघर्ष घडविला होता
अर्धवट माहिती आहे तुम्हाला. In reply to चेगु by उपयोजक
In reply to तुम्हाला पूर्ण माहिती असेल तर by चेतन सुभाष गुगळे
In reply to गुगळे सर by उपयोजक
In reply to दहशतवादी संघटनेचे आणि मारेकर्यांचे समर्थन निषेधार्हच आहे. by चेतन सुभाष गुगळे
अशा अतिरेकी संघटनेची बाजू घ्यायचे व त्यांच्यातील मारेकर्यांच्या फाशीला विरोध भारतीय तमिळींना काय कारण
लिट्टे ज्यामुळे स्थापन झाली त्या श्रीलंकन सरकारच्या अत्याचारांबद्दल आणि भारताने या वादात तमिळ लोकांना काहीही मदत केली नाही याबद्दल तुम्ही चकार शब्द काढत नाहीये. श्रीलंकन तमिळांवर अत्याचार झाले आणि भारत सरकार मदत करत नव्हते म्हणून लिट्टे स्थापन झाली हे विसरु नका.In reply to चेतन गुगळे by उपयोजक
श्रीलंकन तमिळांवर अत्याचार झाले आणि भारत सरकार मदत करत नव्हते म्हणून लिट्टे स्थापन झाली हे विसरु नका.दुसर्या देशाच्या अंतर्गत व्यवहारात का ढवळाढवळ करावी? भारतातील मुस्लिमांनी पाकिस्तानची मदत मागावी का? पाकिस्तानने केली तर आपण शांत बसू का? तरीही आधी भारताने तशी मदत केली, मग अंगाशी आल्यावर श्रीलंकन सरकारची नाराजी घालविण्याकरिता शांति सेना पाठविली आणि मग लिट्टेची नाराजी ओढवून घेतली जिचा परिणाम श्री. राजीव गांधींच्या हत्येत झाला.
In reply to भारतातील कोणत्याही दोन by श्रीगुरुजी
भारतातील कोणत्याही दोन व्यक्तींना ज्या भाषेत एकमेकांशी संवाद करायचा आहे त्यात अमित शहा किंवा इतरांनी पडू नये. त्यांनी हिंदीतच संवाद करावा ही साधी सूचना सुद्धा अत्यंत संतापजनक आहे.सहमत. वर एका प्रतिसादात मी म्हंटल्याप्रमाणे दोन व्यक्तींना एकमेकांना सहकार्य करायचं असल्यास त्या वाटेल त्या प्रकारे मार्ग काढतीलच - मग इंग्लिश, हिंदी , स्थानिक भाषा, मोबाईलवरचे अॅप, इंटरनेटवरुन फोटोज, दुभाषा मित्रांची मदत (आता फोनवर इंटरनेट, व्हॉट्स अॅप - व्हॉईस मेसेज यामुळे यासगळ्या गोष्टी कितीतरी सोप्या झाल्या आहेतच) अमित शहांनी उगाच चिंता करण्याचं कारण नाही .. अणि साधी सूचना वगैरे काही नसतंच. निकड/ आवड असल्यावर माणूस कसाही मार्ग काढतोच.. माझे वडील फारसे शिकलेले नाहीत, त्यांचं इंग्लिश फार चांगलं आहे अशातला भाग नाही पण त्यांनी आतापर्यंत इंग्लिश चित्रपट पैसे खर्चुन थिएटरला जावून बघितलेत. या उलट मी मात्र उच्चार नीट कळत नाही म्हणून इंग्लिश चित्रपट बघायचे टाळतो.. किमान इंग्लिश सबटायटल्स तरी असलेले चित्रपटच घरी बघतो , थिएटरला तर स्वतःहून फक्त टायटॅनिक हा एकच इंग्लिश चित्रपट मी आतापर्यंत बघितला आहे. उद्या अमित शहा म्हणतील इंग्लिश चित्रपटही बघू नका, त्याऐवजी हिंदीच बघा.. जाता जाता : The Terminal ह्या इंग्लिश चित्रपटाबद्दल सांगायला आवडेल - काही राजकीय व तांत्रिक कारणामुळे अमेरिकेतल्या एका विमानतळावर अडकलेल्या नायकाची ही कथा आहे. इंग्लिश येत नसलेला हा नायक प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत अनेक दिवस विमानतळावरच रहातो त्याची ही कथा आहे.
In reply to मराठी भाषा आणि मराठी लोक by sunil kachure
देशात मराठी लोकांचा द्वेष केला जातोजनरलाईज्ड स्टेटमेंट. त्यामुळे या वाक्याला तसा काहीच आधार नाही. देशात प्रत्येक राज्यातील लोकांचा कोणी ना कोणी द्वेष करतोच. आता पंजाब निवडणूकीच्या प्रचारात एका नेत्याने एक बिहारी सौ बिमारी असे विधान केले होते.
महाराष्ट्र हे सर्वात जास्त प्रगत राज्य आहे.हे विधान खरं आहे. पण यामागचं कारण मुंबई महाराष्ट्रात आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात उद्योगांची मुख्य कार्यालये आहेत आणि येथून महसूल मिळतो. मुंबईत जेमतेम ३५ टक्के नागरिक मराठी भाषिक आहेत. मुंबईची प्रगती मराठी + इंग्रजी + हिंदी + गुजराती या मिश्रणाच्या जोरावर झाली हे सत्य आहे. या मिश्रणातून हिंदी जरी वगळली तरी प्रगतीचा आलेख बराच खाली येईल.
महाराष्ट्र शिवाय देशाचा गाडा चालणार नाही.हे संदिग्ध वाक्य आहे. हे असेच अनेक राज्यांबद्दल सांगता येईल. पण तूर्तास महाराष्ट्राचा गाडा मुंबईच्या जोरावर चालतो हे म्हणता येईल. मुंबईचा गाडा चोवीस तास अखंड विजेच्या जोरावर चालतो असेही म्हणता येईल. विजेचा गाडा प्रचंड प्रमाणात विज निर्मिती करणार्या विदर्भाच्या जोरावर चालतो असे म्हणता येईल. विदर्भाचं हिंदी आणि मराठी यापैकी कोणत्या भाषेवर जास्त प्रेम आहे? विदर्भाला महाराष्ट्रात राहण्यात किती रस आहे? महाराष्ट्रापासून वेगळं निघायचा विचार विदर्भाने किती वेळा व्यक्त केलाय?
देशातील कोणताच बिगर हिंदी भाषा असणारा व्यक्ती अमित शाह ह्यांच्या हिंदी विषयी मतचा विरोध च करेल.हे विधान खात्रीशीर पणे सत्य मानता येईल काय? गुजराथी, राजस्थानी आणि इतरही असे अनेक बिगर हिंदी भाषिक आहेत ज्यांना इंग्रजीपेक्षा हिंदीत संवाद साधणे सुलभ वाटते.
फक्त मराठी लोक हे जरा विचित्र च आहेत. ह्यांना देश पातळीवर नेहमीच द्वेष नी बघितले जाते तरी हे हिंदी चे समर्थन करतात.इथे भाषेच्या द्वेषाबद्दल बोलणं चालू आहे की व्यक्तिच्या द्वेषाबद्दल? हे जे कन्फ्यूजन (मानसिक गोंधळ हा मराठी शब्द आहे पण त्यातून अर्थ तितका थेटपणे पोचत नाही) आहे ते खाली एका स्वतंत्र प्रतिसादात दूर करायचा प्रयत्न करतो.
In reply to परस्पर विरोधी वाक्यांनी भरलेला हा प्रतिसाद आहे. by चेतन सुभाष गुगळे
In reply to परस्पर विरोधी वाक्यांनी भरलेला हा प्रतिसाद आहे. by चेतन सुभाष गुगळे
विदर्भाचं हिंदी आणि मराठी यापैकी कोणत्या भाषेवर जास्त प्रेम आहे? विदर्भाला महाराष्ट्रात राहण्यात किती रस आहे? महाराष्ट्रापासून वेगळं निघायचा विचार विदर्भाने किती वेळा व्यक्त केलाय?
मग भाषावार प्रांतरचना केली त्यावेळी सांगायचं होतं वैदर्भ्यांनी 'हिंदी मातृभाषा आहे म्हणून. त्यावेळी काय ते झोपले होते का?"In reply to चेतन गुगळे by उपयोजक
In reply to बॉलीवूडला आणि पर्यायाने by उपयोजक
In reply to निष्कर्ष असा काढता येईल by sunil kachure
१) भारतीय भाषा म्हणून हिंदी भाषा विविध भाषिक लोकात संपर्क भाषा म्हणून वापरण्यास हरकत नाही. पण हिंदी ची सक्ती नसावी. लोक च परिस्थिती नुसार संपर्क भाषा ठरवतील सरकार नी हस्तक्षेप करू नये.अगदी सहमत.. हिंदीच्या वापरास हरकत नाहीच.. फक्त सरकारी हस्तक्षेप आणि सक्ती असू नये. हा ज्याचा त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे..
२)सर्व भारतीय प्रादेशिक भाषा ना त्यांचा सन्मान मिळालाच हवा.अगदी.. आणि हाच सन्मान व्यक्त करण्याकरिता जर अमित शहांनी त्या आवाहनासोबतच "परराज्यात दीर्घकाळासाठी स्थायिक असणारे हिंदी वा इतर भाषिक नागरिक यांनी त्या त्या राज्यातील भाषेचा सन्मान करावा, तिथली भाषा शिकण्याचा प्रयत्न करावा आणि सर्व राज्यातील भाषिक सौहार्द वाढीला लागावे" तर त्यांच्या आवाहनाचे नक्कीच स्वागत झाले असते.
In reply to दक्षिणी लोकांचा हिंदीला का by चौथा कोनाडा
याचा परिणाम म्हणून अण्णा दुराई यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम् हा नवा राजकिय पक्ष १९४९ साली स्थापन केला. तामिळनाडूमधील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करत द्रविड मुन्नेत्र कळघमने उत्तर भारतीयांच्या कथित वर्चस्वाला आव्हान देण्यास सुरुवात केली. पुढे हाच त्यांचा मुख्य मुद्दा बनत गेला. दक्षिणेकडील चार राज्यांचे एकत्रित वेगळे द्रविडनाडू / द्रविडीस्थान हे स्वतंत्र राष्ट्र करावे अशी देखील आणखी एक द्रमुकची मागणी होती. सुरुवातीला स्वतंत्र द्रविडनाडूची मागणी फक्त तामिळभाषिक प्रदेशापुरतीच होती, नंतर त्यात इतर चार दक्षिणी राज्यांनाही समाविष्ठ करण्यात आले. पण कालांतराने भाषावार प्रांतरचना झाल्याने आणि भारतातून फुटून स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणे के केंद्रसरकारने अवैध ठरवल्याने ही मागणी द्रमुकला सोडून द्यावी लागली. केंद्र सरकारच्या "त्रैभाषिक" धोरणला अर्थात राष्ट्रभाषेच्या नावाखाली हिंदी लादण्याला) वेळोवेळी नापसंती दर्शवत हिंदी भाषेला कडाडून विरोध केला. आणि याच धोरणाचा पुढचा भाग म्हणून एनईपी-२०२० या राष्ट्रीय शिक्षण धोरणामधील "त्रैभाषिक" सूत्राला (कारण त्यात पुन्हा "त्रैभाषिक" धोरणाच्या नावाखाली हिंदी सक्ती होणार म्हणून) त्यांचा विरोध आहे.आताच मराठी माणसांनी नीट डोळे उघडून पाह्यला हवे अन्यथा दाक्षिणात्यांच्या हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल.
In reply to लेखमाला वाचली. धन्यवाद. by चेतन सुभाष गुगळे
हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तीस खतपाणी घालणे ठरेल. हिंदीला विरोध म्हणजे देशाच्या विभाजनवादी वृत्तास खतपाणी घालणे?? व्वा. किती ती विद्वत्ता.In reply to हिंदी विरोधा अंध पाठिंबा देणे by अमरेंद्र बाहुबली
स्थानिक विरुद्ध हिंदी असा रंग