मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पथ्य

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आमची प्रेरणा मिलिंद फणसेंची सुरेख कविता नेपथ्य का शेवटी माकड पिणार्‍याचे होते ? माझेच नव्हे, हे ज्याचे त्याचे होते ! चालता लुडकतो इकडे तिकडे पडतो हे असेच नेहमी बेवड्यांचे होते लागली वळाया नजर सारखी माझी हे लक्षण रे थोडी चढल्याचे होते तू चषक कशाला दिलास हातामध्ये ? मज दिसू लागले चित्र उद्याचे होते सोडता सुटेना मदिरा माझ्याच्याने मज खरे प्रलोभन मदिराक्ष्यांचे होते जर ताड, माड अन् मोह असे देशीही मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ? वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई जे काय फरक ते त्या पथ्याचे होते

वाचने 5352 वाचनखूण प्रतिक्रिया 9

धनंजय गुरुवार, 02/21/2008 - 04:39
जर ताड, माड अन् मोह असे देशीही मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ? वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई जे काय फरक ते त्या पथ्याचे होते मस्त!!!! कधीकधी मी मूळ कविता न वाचता तुमच्या विडंबनांचा आस्वाद घेतो, पण या बाबतीत मुळातली कविता वाचून विडंबन खूपच अधिक आवडले!

ऋषिकेश गुरुवार, 02/21/2008 - 06:04
अजुन मुळ कविता वाचली नाहि आहे. पण ही रचना आवडली :).. आता मुळ कविता वाचतो :) -ऋषिकेश

कोलबेर गुरुवार, 02/21/2008 - 06:34
आपल्या विडंबनांचा पुस्तकरुपी संग्रह काढण्याचे जरा सिरियसली घ्यावे!

वरदा गुरुवार, 02/21/2008 - 07:02
वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई जे काय फरक ते त्या पथ्याचे होते खूप आवडल्या ह्या ओळी...मस्त विडंबन..

विसोबा खेचर गुरुवार, 02/21/2008 - 23:23
जर ताड, माड अन् मोह असे देशीही मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ? क्या बात है...! तात्या. -- मी जेव्हा दारुच्या दुष्परिणामाबद्दल वाचलं तेव्हा मी वाचणं सोडून दिलं! :)

चतुरंग गुरुवार, 02/21/2008 - 23:30
फारच छान! दारुचे दुष्परिणाम ह्यावरची एक ग्राफिती - "दारूने माणूस हळूहळू मरतो - असू दे, इथे घाई कोणाला आहे?" चतुरंग

लिखाळ गुरुवार, 02/21/2008 - 23:34
जर ताड, माड अन् मोह असे देशीही मग कशास अवडंबर द्राक्ष्यांचे होते ? वेगळी न "केश्या" दारू आणि दवाई जे काय फरक ते त्या पथ्याचे होते वा वा .. मस्त ! मजा आली.. --लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.